Maharashtra Breaking News LIVE Updates : जर 15 वर्षा आधी राज साहेबांनी कानाखाली लगावली नसती तर आज परिस्थिती तीच असती- शर्मिला ठाकरे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Feb 2022 10:21 PM
देशाचं वातवरण कलुषीत करण्याचं काम सुरूय - अशोक चव्हाण

 देशाच वातावरण कलुशित करून आपल्याला मागे पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप गंभीर आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रावर केलाय शिवाय जी बुलेट ट्रेन अहमदाबाद,नागपूरला जाऊ शकते ती मराठवाड्यात का येऊ शकत नाही असा सवाल ही अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारला परभणीत विचारलाय.


परभणीत आज सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या ८० कोटीच्या विविध कामाचे भुमिपुजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे हि भूमिपुजन सावर्जनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमांनंतर आयोजित सभेत त्यांनी केंद्र सरकार वर गंभीर आरोप केले आहेत तसेच नवाब मालिकांबरोबर जे होतंय ते अत्यंत दुर्दैवी असुन विरोधकांकडून घाणेरडे आणि सुडाचे राजकारण केले जात आहे आमचेही सरकार होते मात्र आम्ही असे खालच्या पातळीचे राजाकडून कधी नाही असे हि ते म्हणाले .. 

चंद्रपूर : पोटदुखीच्या त्रासाने जवानाचा मृत्यू

चंद्रपूर : सावली तालुक्यातील सादागड येथील आशीष मंगाम (27) या सैन्यदलातील जवानाचा मृत्यू, पोटदुखीच्या त्रासाने युवा सैनिकाच्या झालेल्या मृत्यूने हळहळ, उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सैनिक रुग्णालयात पोटदुखीच्या तासानंतर करण्यात आले होते दाखल, मृत्यूची माहिती परिवाराला देण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी घेतली कुटुंबाची भेट, उद्या मूळगावी सादागड येथे पोचणार पार्थिव, अविवाहित असलेल्या या जवानावर सैन्य इतमामात होणार अंत्यसंस्कार

जर 15 वर्षा आधी राज साहेबांनी कानाखाली लगावली नसती तर आज परिस्थिती तीच असती.- शर्मिला ठाकरे

 जर पंधरा वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याने कानाखाली लगावली नसती तर आजही आपल्याला तेच चित्र पाहायला मिळालं असतं, असे म्हणत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचे संबोधन केले. महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद आहे, असे यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 11 कर्तृत्ववान मराठी महिलांचा गौरव देखील करण्यात आला. मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे 365 दिवस मराठीतच बोलले पाहिजे आणि यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे असे आवाहन महिला मनसे पदाधिकारी यांना शर्मिला ठाकरे यांनी केले. तसेच युवराज संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी गरज असलेल्या आमरण उपोषणा बाबत विचारले असता, समाजात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले पाहिजे असे देखील आरक्षणाच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर लता दिदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या आठवणीत मोठे संगीत विद्यापीठ सुरू करावे असे मत यावेळी शर्मिला ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले..

राज्यपाल यांची राजकीय फटकेबाजी, खैरे आणि बागडे यांना कानपिचक्या -

राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यक्रमात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानसभा अध्यक्ष यांना टोला लगावला. खैरे यांना उद्देशून बोलतांना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आमदार-खासदार असताना लोक मागे-पुढे असतात. परंतु तुम्ही माजी झालात की कुणी येत नाही का हो खैरेजी! तर ‘नोट आणि वोट’ संस्कृतीतून नेत्यांनी बाहेर पडण्याची गरज असल्याचे  बागडे यांच्याकडे पाहून राज्यपाल म्हणाले.

कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून राज्य सरकारला मंगळवार पर्यंतचा अल्टिमेटम

कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून राज्य सरकारला मंगळवार पर्यंतचा अल्टिमेटम


संभाजीराजेंच्या मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडणार


बुधवारनंतर कशा पद्धतीने आंदोलन होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल


मराठा संघटना प्रतिनिधींचा राज्य सरकारला इशारा


संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली कोल्हापुरात संघटना प्रतिनिधींची बैठक

Beed News : बेलेश्वर संस्थानच्या महंतासह, डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी

Beed News : तालुक्यातील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थांचे महंत महादेव भारती महाराज आणि लिंबागणेश येथील डॉ. सचिन जायभाये यांना कॉल करून अज्ञात व्यक्तीने 25 लाखांची मागणी केली आहे. तसंच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बेलेश्वर संस्थान हे हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्री उत्सवाच्या तोंडावर भाविक भक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे - विद्यार्थ्यांकडून 5 लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गुन्हा

पुणे - विद्यार्थ्यांकडून 5 लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर चतुशृंगी पोलिसात खांडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. करण मधुकर कोकणे असे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षाचे नाव आहे.


डिजीटल मार्केटींगचे कार्यालय सुरु करण्यासाठी कोकणे आणि त्याचा साथीदार अमर पोळ या दोघांनी मागतली खंडणी..


अमर पोळ हा वैद्यकीय परीक्षेत नापास झाला असून कोकणे हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे.


 

Russia Ukraine War: खारकीव शहरामधून रशियन सैन्याला बाहेर पाडण्यास यूक्रेनियन सैन्य यशस्वी

Russia Ukraine War: यूक्रेनमधल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या खारकीव शहरामधून रशियन सैन्याला बाहेर पाडण्यास यूक्रेनियन सैन्य यशस्वी झाले आहे. यूक्रेनियन सैन्यानं खारकीव शहरावर संपूर्णपणे ताबा मिळवला आहे. खारकीव रशियाच्या सीमेवरुन जवळ असल्यानं सर्वात आधी प्रभावित झालं होत. यामध्ये अनेक भारतीय नागरिक देखील अडकून पडले आहेत. यातच खारकीव, समी आणि कीवमध्ये यूक्रेनियन आणि रशियन सैन्यात तीव्र संघर्ष सुरू असल्याची भारतीय दूतावासाची माहिती जाहीर केली आहे. तसेच कर्फ्यू लागला असल्याने घाबाहेर पडू नये सोबतच रेल्वे स्थानकाकडे जाऊ नये, अशा सूचना देखील दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावतीच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी साधला संवाद

रशिया–युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, साहिर तेलंग, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ  गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या ८ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच तातडीने त्यांच्याशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तिवसा तालुक्यातील तुषार अशोग गंधे यांच्यासह सर्वांना धीर देत केंद्राच्यावतीने लवकरात भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले...

मी मतांची भीक मागायला आलोय, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी तुमच्या मतांची भीक मागायला आलोय, असे विधान  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतस यात राजकारण तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष हे कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.

नांदेड : वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा

नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापुर येथील वसतिगृहात विद्यार्थ्यांचे दोन गट आपसात भिडल्याने भांडण होऊन मोठा राडा झालाय. आपसातील वादातून या विद्यार्थ्यानी केलेल्या तोडफोड आणि जाळपोळीत पाच मोटारसायकलचे मोठे नुकसान झालेय. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गावगुंडा प्रमाणे तुफान राडा करून जाळपोळ व तोडफोड केल्याने वसतिगृहातील शिक्षक मंडळी व इतर विद्यार्थीही प्रचंड भेदरलेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहात आज दुपारी हा प्रकार घडलाय. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना शांत केलय. यातील दोषी विद्यार्थ्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलय. तर किरकोळ वादातून विद्यार्थ्यांनी केलेल्या या जाळपोळ आणि तोडाफोडीमुळे मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येतय.

२१ वे मराठी बाल साहित्य संमेलन उत्साहात
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या बाल साहित्य संमेलनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे मारुतीराव सांबरेकर यांच्या हस्ते झाले.संमेलनाचे  अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या नीला आपटे यानी भूषवले होते. प्रारंभी मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. यावेळी दिवंगत डॉ. एन. डी. पाटील, लता मंगेशकर, रमेश देव, सिंधुताई सपकाळ, डाॅ. अनिल अवचट, बाबासाहेब पुरंदरे, सुधा नार्वेकर व अपर्णा व्यंकटेश यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.   मान्यवरांनी दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन केले. नीला आपटे व अन्य मान्यवरांनी सावित्रीबाई फुले आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन केले.

उदघाटन सत्रानंतर कथाकथन सत्र झाले. या सत्रामध्ये बाल कथाकारानी बहारदार कथाकथन करून टाळ्या मिळवल्या. 
बीड - मोटारसायकल शोरुमला भीषण आग

बीड शहरातील हिरो या मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग लागली आहे. आज रविवारचा दिवस असल्याने सुदैवाने यामध्ये कर्मचारी कार्यरत नव्हते, मात्र आगीची माहिती मिळताच मालकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर बीड अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत लाखोंच्या नवीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. आग एवढी भीषण असून गोदामा सह शोरूम मध्ये देखील पसरली आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

ज्या ज्या जिल्ह्यात इतर पक्षाचे पालकमंत्री तिथे कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही- मंत्री वडेट्टीवार

ज्या ज्या जिल्ह्यात इतर पक्षाचे पालकमंत्री तिथे कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही- मंत्री वडेट्टीवार


ज्या-ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे पालकमंत्री नाहीत त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येत आहेत. त्यासाठी मी पक्षाच्या आणि सरकारच्या पटलावर वकिली करेल. तसेच हा मुद्दा कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडेल असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. तर काही गोष्टी आपल्यालाही समजून घ्यावी लागतील. त्याचबरोबर आपल्याला भाजपच्या 106 आमदारांची संख्या 25 वर आणायची असून, तोपर्यंत स्वतः बसायचं नाही,असेही वडेट्टीवार म्हणाले.

खासदार संभाजीराजेंना भेटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे उशिरा दाखल झाल्याने कार्यकर्ते आक्रमक

#BREAKING : खासदार संभाजीराजेंना भेटण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे उशिरा दाखल झाल्याने कार्यकर्ते आक्रमक, उपोषणकर्ते कार्यकर्त्यांकडून मंडपात गोंधळ करण्यास सुरुवात, संभाजीराजेंकडून शांत बसण्याचं आवाहन

Pimpari Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

पिंपरी चिंचवडमध्ये एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना काल रात्री घडलेली आहे. संजय बंकट सरवदे असं त्यांचं नाव होतं. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. वल्लभनगर येथील बसस्थानकात ते वाहक म्हणून कार्यरत होते. सध्या राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनात ते सहभागी होते. त्यामुळे सध्या कामावर रुजू नव्हते. अशातच काल रात्री 8:45च्या सुमारास जेवण केलं आणि मग बाथरूममध्ये गेले. बराचवेळ ते बाहेर न आल्यानं तपासलं असता गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळले. वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी आत्महत्या केली तेंव्हा घरात पत्नी, दोन मुलं अन एक मुलगी उपस्थित होती. पण त्यांनी असं का केलं? याबाबतचं कोणतं ही कारण अद्याप समोर आलेलं नाही. अंत्यविधीसाठी त्यांचं पार्थिव उमरग्याला नेहण्यात आले आहे.

MP Sambhajiraje Chhatrapati :  खासदार संभाजीराजेंच्या तब्येतीच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल

MP Sambhajiraje Chhatrapati :  खासदार संभाजीराजेंच्या तब्येतीच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल, जेजे रुग्णालयातून 4 डॉक्टरांचे एक पथक आलं, संभाजीराजेंचे रक्तदाब आणि ब्लड सॅम्पल्स घेतलेत

Beed News Updates :  औंढा आणि परळीत महाशिवरात्री यात्रा भरणार नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Beed News Updates : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने यावर्षी ही होणार आहे.कोविड अनुरूप नियमांचे पालन करुन भाविकांसाठी दर्शन व वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहे.दरम्यान यावर्षी ही परळीत महाशिवरात्र यात्रा भरणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातून समोर आले.

मध्य रेल्वेवर काही काळ वीज गुल झालेली मात्र आता सुरुळीत, ट्रिप होती, हार्बर मार्ग मेगाब्लॉकमुळं बंद,सर्व कॉरिडॉरवर गाड्या धावत असल्याची रेल्वेची माहिती

मुंबईच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत

मुलुंड ट्रॉम्बे येथील वीजपुरवठा करणारी टाटाची केबल खंडीत; मुंबईच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत, टाटाकडून दुरुस्तीचे काम हातीघेतले गेलेय, एका तासात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु

Mumbai Electricity Issue : मुंबईतील अनेक महत्वाच्या भागात वीज गायब! सीएसएमटी, दादर, वरळीसह विविध भागात वीजपुरवठा खंडित, लोकल ट्रेन देखील ठप्प

मुंबईतील अनेक महत्वाच्या भागात वीज गायब! सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अंटोप हिल, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, अशा विविध भागात वीजपुरवठा खंडित, गेल्या अर्ध्या ते एक तासापासून वीजपुरवठा खंडित,लोकल ट्रेन देखील ठप्प

दिशा सलियन प्रकरण: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Breaking : दिशा सलियन प्रकरण: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव यांचा 100 कोटींचा घोटाळा - किरीट सोमय्या 

शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव यांचा 100 कोटींचा घोटाळा 


आयकर विभागाने करोडो रुपयांची रोख रक्कम आणि 10 बँक लॉकर्स जप्त केले


फिक्सर विमल अग्रवाल आणि BMC मुंबई महापालिकेचे ५ कंत्राटदार आणि यशवंत जाधव कुटुंबीयांच्या ३३ जागांवर छापे


रविवारी देखील धाडी सुरू - किरीट सोमय्या 





पार्श्वभूमी

1.कीव्हमध्ये रस्त्यावर दिसल्यास गोळी घालण्याचे आदेश, युक्रेननंतर फिनलँड आणि स्वीडनला रशियाचा इशारा, चेर्नोबिलनंतर आणखी एक अणुप्रकल्प ताब्यात घेण्याचा प्रयत्न


2. अमेरिकेची युक्रेनला ३५० दशलक्ष डॉलरची लष्करी मदत, जर्मनी १ हजार अँटी टँक , ५०० स्टिंगर क्षेपणास्त्रे पुरवणार, फोनवरुन झालेल्या चर्चेत झेलेन्सीकींची मोदींकडे राजकीय मदतीची मागणी


3. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन दोन विमानं मायदेशी परतले, ४५०हून अधिक विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास, मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई


4.  नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडेंचे बेकायदेशीररित्या फोन टॅप केल्याचा आरोप, आयपीएस रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल, महाविकास आघाडीचा फडणवीसांवर हल्लाबोल


5.मराठीचा वर्तमान आणि भविष्यावर वैचारिक मंथन, एबीपी माझाच्या अभिजात मराठी मोहिमेत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, मराठी राजभाषा निमित्त दिवसभर विशेष कार्यक्रम


6. मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार


7. 48 तास उलटले; शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी अजूनही आयकर विभागाची छापेमारी सुरुच


Shivsena Corporator Yashwant Jadhav IT Raid : गेले 48 तास उलटूनही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे..  शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली आहे. दरम्यान,  शिवसैनिकांनी काल आयकर विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.  शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीचा निषेध केला आहे. 


गेल्या 48 तासाहून अधिक काळ झाले आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी करत आहेत. काल शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना समजून शांत केले होते.  रात्रीपासून शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून आहेत. यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने शुक्रवारी सकाळपासूनच छापेमारी सुरू केली आहे.


यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढणार असल्याचं समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले झाले होते. त्यामुळे माझगाव परिसरात पोलिस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला होता. आयकर विभागाला चौकशी करीत असताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे. 


8.जिल्ह्यात चार आमदार तरीही बीडचे राष्ट्रवादी भवन अंधारात! दीड लाखांच्या विजबिलामुळे कनेक्शन कट 


9.मुंबईसह आसपासच्या सर्व महापालिकांतील धोकादायक आणि बेकायदेशीर बांधकामं थांबवा; हायकोर्टाचा आदेश


10. भारताकडून धर्मशालाच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा, रविंद्र जाडेजा, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीनं टी-20 मालिका भारताच्या खिशात

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.