Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Raigad News Update : राडगड येथील पेण येथे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी तीन मांडूळ जप्त करण्यात आली आहेत. दादर सागरी पोलिसां नी ही कारवाई केली आहे।
Yavatmal News Update : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील 17 वर्षीय युवकाचा निर्गुडा नदिपात्रात कोसळल्याने मृत्यू झाला. सागर राजू टावरी असे मृत तरूणाचे नाव आहे. सागर हा त्याच्या काही मित्रांसोबत मुकुटबन मार्गावरील निर्गुडा नदिच्या पुलावर गेला होता.
#LIVE : गुणरत्न सदावर्ते 18 दिवसानंतर जेलमधून बाहेर आले आहेत. यापुढेही आपला लढा सुरूच राहिल असे सदावर्ते यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हटले आहे.
राज्यातील अनेक मंत्री ईडीच्या चौकशी कक्षेत आहेत. भोंग्यांचा प्रश्न केंद्राकडे टोलवून सरकारला आपल्या मंत्र्यांना अभय द्यायचं आहे. असा आरोप करत भोंग्यावर सरकारची भूमिका मनसेला पुरक आहे का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. याबरोबरच भोंग्यांवरून महाराष्ट्रात 3 तारखेला काही अघटीत होऊ शकतं, अशी शंका देखील आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात 1 मे रोजी वंचित शांती मार्च काढणार अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिली.
Pune Fire : पुण्यातील कोंढवा बुद्रुक, पारगे नगर येथे येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून दहा अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून विझवण्याचे काम सुरू आहे,
खासदार नवनीत राणा यांचा विकृतपणा त्यांना नडला आहे. यात पोलीस यंत्रणा अथवा सरकारवर दोष देण्यात काही अर्थ नाही, अशी टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
Akola News Update : अकोला येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उपनिरिक्षक सरिता कुवारे यांच्या घरी चोरी झाली आहे. 21 ते 25 एप्रिलदरम्यान कुवारे सुट्टीवर असताना चोरट्यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरवर डल्ला मारला आहे. काडतूसांचे चार राऊंडही चोरी गेल्याची माहिती मिळाली आहे.
Sanjay Raut : मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं कारस्थान केलं जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Jalna News : परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी नुकताच जाहीर केलेला औरंगाबाद-पुणे हा महामार्ग जालना शहरापर्यंत जोडावा, अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली. या मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलं आहे. नॅशनल हायवे ऑथिरीटी ऑफ इंडियाकडून होणाऱ्या या द्रुतगती महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावरुन अवघ्या सव्वा तासातच औरंगाबाद ते पुणे हा प्रवास होणार आहे. त्यामुळे स्टील आणि बियाणे उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराच्या विकासात अधिक भर पडेल. शिवाय जालना शहरात ड्राय पोर्ट होत असल्याने या महामार्गाची लांबी वाढवावी अशी ही खोतकर यांनी केली आहे.
mumbai : पाण्यात पोहायला गेलेल्या आरे कॉलनी मधील चार जनांपैकी एक तरुणी आणि एक पुरुष बुडल्याची घटना विहार तलावात घडली आहे. संदीप काशिनाथ टबाले हे चाळीस वर्षीय तर अठरा वर्षाची आणखी एक तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान आरे कॉलनी मधील आंबा वाडी येथे रहाणारे संदीप टबाले, सागर टबाले, यश नार्वेकर आणि ही तरुणी पोहण्यास आरे कॉलनी, पवईच्या मध्यावर असलेल्या विहार तलावात गेले होते. मात्र पोहत असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यात संदीप आणि ती तरुणी पाण्यात बुडाली. या वेळी इतर दोघांनी याची माहिती आरे पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दल आणि पालिका आणि मुलुंड पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला.अखेर आज सकाळी या दोघांचे मृतदेह हाती लागले आहे.या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यू ची नोंद केली असून मुलुंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 29 आणि 30 तारखेला पुण्याच्या दौऱ्यावर असतील अशी माहिती आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप खोटे,असल्याचं चांदीवाल आयोगाच्या अहवालात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या. गृहमंत्र्यांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला आहे.
Mumbai News : अंमलबजावणी संचालनालयाने 22 हजार 842 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणूक प्रकरणात ABG शिपयार्ड लिमिटेडवर छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आज (26 एप्रिल) मुंबई, पुणे आणि सुरतमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. मुंबईमध्ये ABG शिपयार्डच्या ओपेरा हाऊस स्थित कार्यालयात छापे ठाकण्यात आले. या शहरांमध्ये फेडरल एजन्सीद्वारे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या गुन्हेगारी कलमांतर्गत तब्बल 26 परिसर शोधले जात आहेत.
Mumbai News : संपूर्ण शहरात ड्रग्ज तस्करांची वाढती दहशत लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात ड्रग्ज तस्करांविरोधात मोहीम सुरु केली आहे. अशाच एका कारवाईत डोंगरी पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1.90 लाख रुपये किंमतीचं 380 ग्रॅम चरस जप्त केलं आहे. अब्दुल कादर कुनी असं या आरोपीचं नाव असून तो मुंबईचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी दक्षिण मुंबई परिसरात सक्रिय होता आणि ग्राहकांना चरसचा पुरवठा करत होता. अब्दुल कादर कुनी चरस कुठून आणत होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. त्याच्याविरुद्ध कलम 8 क 20 ब नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सब्सटान्स अॅक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबाना शेख आणि पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Electricity Supply : ठाणे शहरात वीज पुरवठा खंडीत, महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याचा परिणाम
Pimpri Chinchwad News : इन्स्टाग्रामवर कोयते घेऊन स्टेट्स ठेवणं पिंपरी चिंचवडमधील तिघांना चांगलंच महागात पडलं आहे. गुंडाविरोधी पथकाने तिघांना अटक केली आहे. या आरोपींकडून सहा कोयते, दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. अक्षय खोजे, ओंकार ठाकूर, अक्षय चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. आरोपींवर भारतीय शस्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pimpri Chinchwad News : रमजान महिन्यात होणाऱ्या इफ्तार पार्टीत खासकरुन पुरुषांनाच आमंत्रित केलं जात. पण पिंपरी चिंचवडमध्ये याला फाटा देण्यात आला आहे. इथे फक्त महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील मुस्लिम महिलांनी ही यात सहभागी होत रोजा इफ्तार केला. महिला काँग्रेसने या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा विद्या मराठा प्रसारक समाज या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ उत्तम राजळे यांनी आपल्या मुलीच्या विवाह प्रसंगी 'लॉकडाऊन' हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे. लग्नामध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला. वधू-वरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हा विवाह पार पडला. त्यानंतर वधू-वर आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कोरोनाच्या उद्रेकात कोरोनाशी झुंज देणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांना हा कविता संग्रह समर्पित करण्यात आला. यानिमित्ताने एक साहित्यिक विवाह सोहळा घडवून आणण्याचा मानस राजळे यांचा होता. अनेक नवोदितांना प्रेरणा देण्याचं काम यातून होणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Nagpur News : नागपूर महानगरपालिकेचे वादग्रस्त अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण गंटावार यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यावर सातत्याने गैरहजर राहण्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गंटावार यांच्या निलंबनाबाबत कोरोना काळात माजी महापौर संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांनीही महापालिकेच्या वेगवेगळ्या सभेत निर्देश दिले होते.मात्र, तेव्हा मनपा प्रशासनाने निलंबनाच्या आदेशावर अंमलबजावणी केली नव्हती. मात्र आता गंटावार सातत्याने कर्तव्यावर गैरहजर राहून महापालिकेच्या आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यानंतर मनपा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
Aurangabad News : औरंगाबाद शहरात आजपासून 09 मे 2022 पर्यंत जमावबंदीचे आदेश. आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी काढले जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक लोक विनापरवाना एकत्र जमू शकत नाही. रमजान ईद ,महापुरुषांच्या जयंती आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर काढले जमावबंदीचे आदेश.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राणा दाम्पत्याच्या जामीनावर आज सुनावणी
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राणा दांपत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. आयपीसी कलम 124 A मध्ये दंडाधिकारी कोर्टाला जामीनाचे अधिकारच नसल्यानं तो मंगळवार सकाळपर्यंत मागे घेण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात पहिल्याच सत्रात यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.
मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
औरंगाबाद येथील राज ठाकरेंच्या 1 मेच्या सभेआधीच मनसे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचा मनसेला रामराम केला आहे. दाशरथे आज मुंबईत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारानंतर ठाकरे दिल्लीत पोहोचतील. यावेळी राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री वळसे-पाटील आणि संजय राऊतांविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतरांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. देशभरात एकूण 7412 परीक्षा केंद्रे असतील. सुमारे 34 लाख मुले परीक्षेला बसले आहेत. (10वी आणि 12वी दोन्ही) दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत तर बारावीची परीक्षा 15 जूनपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 पर्यंत चालणार आहे.
पंतप्रधान दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता 7 लोककल्याण मार्गावर 90 व्या शिवगिरी तीर्थयात्रा ब्राह्मो विद्यालयाच्या वर्धापन दिन आणि सुवर्ण महोत्सवाच्या वर्षभराच्या संयुक्त सोहळ्याच्या उद्घाटनात सहभागी होतील.
डायलॉगच्या तीन दिवसीय परिषदेचा दुसरा दिवस
दिल्लीत 7 व्या रायसीना डायलॉगच्या तीन दिवसीय परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी मंक्षी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसची बैठक
आज सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक होणार असून त्यात काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते सुनील जाखर आणि केव्ही थॉमस कारवाईचा निर्णय घेणार आहेत.
कुमार विश्वास आणि अलका लांबा चौकशीला हजर राहणार
पंजाब पोलिसांनी आज आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास आणि अलका लांबा यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील 'प्रक्षोभक विधानां'बद्दल दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे.
लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आरोप निश्चितीवर सुनावणी
यूपीमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आज जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी होणार आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आज मॉस्कोला भेट देणार
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आज मॉस्कोला भेट देणार असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत.
रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने
आज आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (Royal challengers bangalore vs Rajsthan Royals) या दोन संघ मैदानात उतरणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता दोन्ही संघात सामना होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -