Maharashtra Breaking News 25 July 2022 : अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा : अजित पवार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूरः विदर्भातील एका विधानपरिषद आमदाराकडून नागपूर महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याला अश्लिल शिवीगाळ करण्यात आल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. नागपूर महानगरपालिकेतील वर्तुळात तसेच सोशल मीडियावर नावांबाबत चर्चा रंगली आहे. ऑडिओमध्ये आमदार आपल्या फंडाला 'कोणी माई का लाल हात लावू शकत नाही, असा दम त्या कर्मचाऱ्यांना देत असल्याचे समजते. मात्र या प्रकरणाची पोलिस तक्रार झाली नसल्याने आमदर आणि कर्मचाऱ्याच्या नावाबाबत दुजोरा मिळाला नाही.
Hingoli News : हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज किसान सभेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. नाफेड प्रशासनाच्या विरोधात हे धरणे आंदोलन किसान सभेच्या वतीने आज करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडे जवळपास 7000 क्विंटल अधिक हरभऱ्याची विक्री केली आहे परंतु मागील तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना या हरभऱ्याचा मोबदला मिळालाच नाही. तीन महिन्यापासून शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित आहे यासाठी आज किसान सभेच्या वतीने आज हे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे
Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात तीन आरोपींकडून बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आली आहे. सोमनाथपुर वार्डातू जप्त केलेल्या हत्यारांमध्ये देशी बनावटीचे पिस्टल, एक देशी कट्टा आणि एका स्टीलच्या तलवारीचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून लावजोत सिंग देवल या आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. बिहार येथून हे शस्त्र आणण्यात आल्याची राजुरा पोलिसांनी माहिती दिली असून ही शस्त्र कशासाठी आणण्यात आली याचा पोलीस तपास करताहेत.
धर्माबाद येथे नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान 14, 16, 18 व 20 वयोगटातील मुलामुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मिटर धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, लांब उडी, वॉकिंग इत्यादी खेळ प्रकाराचा समावेश होता. पावसात सुरू असणाऱ्या या स्पर्धांमध्ये धर्माबाद तालुक्यासह जिल्हाभरातील विविध तालुक्यातील 400 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
Maharashtra : पुणे- सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्यानं अपघात झाला आहे. तीव्र उतार आणि पाऊस यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालकाचं कंटेनरवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालक मात्र यात जखमी झालायं. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
आमदार प्रवीण दरेकर यांनी सहकारी संस्था निबंधक यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मागे घेतली आहे. निबंधकांनी अपात्र ठरवल्यामुळे प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाला मुकावे लागले होते. त्यानंतर आपण मजूर म्हणून पात्र असल्याचा दावा करत निबंधकांच्या आदेशा विरोधात दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात दाखल नव्या याचिकेवर मुंबई महापालिकेला दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश, तूर्तास दोन आठवडे मुंबई महापालिकेला बंगल्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश. नारायण राणे यांनाही जागेवर सध्या कोणतेही नवे बांधकाम करण्यास मनाई, पालिकेचे उत्तर दाखल झाल्यावर राणे यांनाही उत्तर दाखल करण्याचे निर्देश
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे शिवसैनिकांचा घरावर मोर्चा सुरु असताना धैर्यशील माने दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पंचगंगा प्रदूषण, पूरपरिस्थिती, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Ravikant Tupkar : विदर्भातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आज आक्रमक बघायला मिळाले. गेल्या दहा दिवसांत एकट्या विदर्भात अतिवृष्टीमुळे जवळपास अडीच ते तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र राजकारणी, आमदार हे मंत्रीपदाच्या फिल्डिंग मध्ये व्यस्त आहेत. एकाही आमदाराला शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही. विदर्भातील शेतकऱ्याला (Farmer) या सरकारने वाऱ्यावर सोडलं असून ज्याप्रकारे रोम जळत होता आणि राजा फिडल वाजवत बसला होता तशी अवस्था विदर्भाची झाली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रु मदत सरकारने द्यावी, अन्यथा ज्या प्रकारे श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात जनता घुसली होती. त्याप्रमाणे राज्यातील जनता लोकप्रतिनिधींना उघडयावर फिरू देणार नाही. उध्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मोठं आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे, असा इशाराही स्वाभिमानाचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे.
Shiv Sena Morcha against MP Dhairyasheel Mane : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला आहे. मात्र, शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत. त्यामुळे संभाजी महाराज पुतळ्यानजीक शिवसैनिकही ठाण मांडून बसले आहेत.
Shiv Sena Morcha against MP Dhairyasheel Mane : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला आहे. मात्र, शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत. त्यामुळे संभाजी महाराज पुतळ्यानजीक शिवसैनिकही ठाण मांडून बसले आहेत.
मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे आणि संजय पवार करत आहेत. मोर्चाला शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावताना खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. गली गली मै शोर है माने चोर है अशाही घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
Pune News : पुणे महापालिकेत 42 बोगस इंजिनियरची भरती करण्यात आल्याचं काही महिन्यांपूर उघडकीस आलं होतं. पुणे महापालिकेत सफाई कामगार किंवा शिपाई म्हणून काम करणार्या 42 जणांना इंजिनियर म्हणून बढती देण्यात आल्याचं 'एबीपी माझा'ने उजेडात आणलं होतं. तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचा देखील यामधे समावेश होता. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्यासाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं महापालिका आयुक्तांनी जाहीर केलं होतं. मात्र सहा महिन उलटून गेल्यावर देखील या प्रकरणात काहीच कारवाई न करण्यात आल्याने आम आदमी पक्षाकडून आज पुणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं आणि आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली.
Shiv Sena Morcha against MP Dhairyasheel Mane : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला आहे. मात्र, शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत.
Indapur News : इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हिएशनचे विमान कोसळले. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाली आहे. बारामतीतील कार्व्हर एव्हिएशनमार्फत प्रशिक्षण दिले जाते. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर विमान खाली कोसळले. हे विमान विमानातील इंधन संपल्यामुळे कोसळले आहे. यामध्ये महिला पायलट किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे. हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले.
Indapur News : इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हिएशनचे विमान कोसळले. या अपघातात पायलट भावना राठोड किरकोळ जखमी झाली आहे. बारामतीतील कार्व्हर एव्हिएशनमार्फत प्रशिक्षण दिले जाते. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर विमान खाली कोसळले. हे विमान विमानातील इंधन संपल्यामुळे कोसळले आहे. यामध्ये महिला पायलट किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे. हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले.
मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर कडाडून हल्ला चढवला, बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले. 1 शिवसैनिक 100 जणांना भारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. पोलिसांनी कितीही बंदोबस्त लावला, तरी आम्ही निवासस्थानी घुसणार असल्याचे ते म्हणाले.
President Droupadi Murmu : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा (N. V. Ramana) यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.
Mumbai News : घाटकोपरमध्ये एका मॅनहोलमध्ये पडलेल्या म्हशीला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. रात्री एकच्या सुमारास घाटकोपर-अंधेरी लिंक रोड आणि एलबीएस मार्ग जंक्शनला एक उघड्या गटारात ही भली मोठी म्हैस पडली होती. मालकाने एकच दिवस आधी ही म्हैस विकत घेतली होती. 10 ते 12 फूट खोल गटारात पडल्यानंतर ही म्हैस पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यानंतर ती गटारात अडकून पडली. स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवाननी तब्बल पाच तास या म्हशीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. गटार तोडले तर म्हशीला इजा होईल. म्हणून अग्निशमन दलाचे काही जवान गटारात उतरले. त्यांनी म्हशीला दोरी बांधली आणि पंधरा ते वीस जवानांनी अक्षरशः हाताने खेचून या भल्या मोठ्या म्हशीला बाहेर ओढलं. मग जेसीबीने तिला वर खेचण्यात आलं. सुमारे पाच तास चाललेले हे बचाव कार्य पहाटे सहा वाजता संपलं म्हैस सुरक्षित बाहेर आली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Beed News : बीडमधील केज पोलिसांनी विद्युत मोटारी चोरणाऱ्या तीन चोरट्यांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली आहे. मध्यरात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना सिंधी या ठिकाणी एक संशयित वाहन आढळून आलं आणि त्यावेळी पोलिसांनी या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामधील चोरट्यांनी पळ काढला पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडलं. या चोरट्यांच्या गाडीमधून तीन विद्युत मोटारी आणि वायर जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चोरी करणारे तीन महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ratnagiri News : जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी, शाळा बंद होण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शासनाच्यावतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. मात्र या उपक्रमांना यश येत नसल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात मागील 2 वर्षांत 15 शाळा तर गेल्या 7 वर्षांत तब्बल 47 शाळा बंद झाल्या आहेत. दरवर्षी घटणारी पटसंख्या, बंद पडणाऱ्या शाळा ही एक चिंतेची बाब प्रशासनासमोर निर्माण झाली आहे.
Pune News : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून दहा वाजता होणार असलेले आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या अभ्यासिकेच्या समोर होणारे आंदोलन स्थगित करण्यात आलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आंदोलन करु नये अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा नोटीस पुण्यातील अभ्यासकांना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलन न करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 पासून घेण्यात येणार्या परीक्षांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि यूपीएससीच्या धर्तीवर नवीन परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत होणाऱ्या परीक्षांसाठी हा नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत लागू होणार आहे. आतापर्यंत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ पर्यायांमधून एका पर्यायाची निवड करावी लागायची. मात्र आता यूपीएससीच्या धर्तीवर सर्व प्रश्नांची विस्तृत स्वरुपात उत्तरे द्यावी लागणार आहेत.
Nashik News : नाशिकच्या रस्त्यांवर हजारो पोलीस आज सकाळी धावताना दिसले आणि याचं निमित्त होते ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पोलीस आयुक्तालय नाशिकच्या वतीने आयोजित 75 किलोमीटर दौडचे. आज सकाळी सात वाजता पोलीस आयुक्तालयाबाहेर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते या दौडला सुरुवात झाली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह हजारो कर्मचारी यात सहभागी झाले होते. रविवार कारंजा, आडगाव नाका ते तपोवन अशी 8 किलोमीटरची पहिली दौड करण्यात येऊन 15 ऑगस्टपर्यंत अंजनेरीसह इतर भागात रॅली काढण्यात येऊन 75 किमी पूर्ण केले जाणार आहे.
Gondia News : गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला इथे नागाने कोंबडीची तब्बल 10 अंडी गिळली. कोहळीटोला चिखली येथे राहुल शेंडे यांच्या कोंबड्यांचा गोंधळ सुरु झाला. त्यांच्याकडे जाऊन बघितले असता कोंबडीच्या दडव्यात पाच फुटाचा नाग असल्याचं राहुल शेंडे यांनी पाहिलं. त्यांनी तातडीने तालुक्यातील सृष्टी फाऊंडेशनच्या सर्पमित्रांना बोलावलं. या सर्पमित्रांनी सापाला कोंबडीच्या दडव्यातून बाहेर काढले आणि पाहतात तर काय त्याचा पोट पूर्ण भरलेलं होतं. भक्ष्य पकडल्यानंतर साप पळण्यासाठी म्हणून पोटातील सर्व अन्न किंवा केलेली शिकार बाहेर काढत असतो. यावेळी सापाने गिळलेले कोंबडीची 10 ते 11 अंडी तोंडाबाहेर काढली. दरम्यान सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. यावेळी ग्रामस्थांसोबत संस्थेचे सर्पमित्र उपस्थित होते.
Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कलजवळ धावत्या कारमध्ये आग लागली असून कारमध्ये चालकासहित एक महिला उपस्थित होती. आग लागल्यानंतर लगेच दोघे कारमधून बाहेर निघाले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कार जळून खाक झाली आहे. मिरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी पहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
कोरोना काळात बंद केलेल्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू होणार आहे. प्रगती एक्सप्रेस सकाळी 7.50 वाजता पुण्याहून रवाना होईल तर संध्याकाळी 4.25 मिनिटांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना होईल.
Maharashtra Rain Updates : आज अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Maharashtra Politics News : एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झालेल्या धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी मोर्चा काढला आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली धैर्यशील मानेंच्या कोल्हापुरातील घरावर मोर्चा निघणार आहे. धैर्यशील मानेंनी त्यांच्या समर्थकांना शांततेचे केलं आवाहन केलंय. धैर्यशील माने अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत
Droupadi Murmu Oath Ceremony : देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आज राष्ट्रपती पद (President) आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देणार. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Maharashtra Politics News : सुप्रीम कोर्टात पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे आयोगाने दिलेल्या नोटीशीवर कोर्टाने स्थगिती देण्याची शिवसेनेनं विनंती केली आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात शिवसेना ही बाब मेंशन करणार आहे. दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार
सुप्रीम कोर्टात पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे आयोगाने दिलेल्या नोटीशीवर कोर्टाने स्थगिती देण्याची शिवसेनेनं विनंती केली आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात शिवसेना ही बाब मेंशन करणार आहे. दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे
आज द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपपतीपदाचा शपथविधी
द्रौपदी मुर्मू भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एन.वी.रमण्णा त्यांना पदाची शपथ देतील. सकाळी 10.15 वाजता शपथविधी होणार आहे.
खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर आज शिवसैनिकांचा मोर्चा
एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झालेल्या धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी मोर्चा काढला आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली धैर्यशील मानेंच्या कोल्हापुरातील घरावर मोर्चा निघणार आहे. धैर्यशील मानेंनी त्यांच्या समर्थकांना शांततेचे केलं आवाहन केलंय. धैर्यशील माने अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत
आजही विदर्भात पावसाचा अंदाज
आज अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू
कोरोना काळात बंद केलेल्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून सुरू होणार आहे. प्रगती एक्सप्रेस सकाळी 7.50 वाजता पुण्याहून रवाना होईल तर संध्याकाळी 4.25 मिनिटांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -