Maharashtra Breaking News 23rd May 2022 : शिवसेनेची इतकी वर्षे सत्ता असतानाही औरंगाबादमध्ये पाण्याचा सत्यानाश; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 May 2022 10:52 PM
Nagpur News Update :  नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घराजवळ तरूणाची हत्या

नागपुरातील बेझनबाग परिसरात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घराजवळ एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. तिलक चव्हाण असे हत्या झालेल्या 35 वर्षीय तरूणाचे नाव आहे. 

बेझनबाग परिसरात एका घराचे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी कार्यरत मजुरांमध्ये कुठल्यातरी कारणातून आज संध्याकाळी वाद झाला. त्याच वादतून एका मजुराने तिलक चव्हाणच्या डोक्यावर लाकडी दंडुक्याने वार करत त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू   आहे.  

Pune News Update : पुण्यातील लोणावळा आणि खंडाळ्याच्या घनदाट झाडीत दिल्लीचा अभियंता हरवला

पुण्यातील लोणावळा आणि खंडाळ्याच्या घनदाट झाडीत दिल्लीचा एक अभियंता हरवला आहे. नागफणी सुळका उतरताना तो कोणत्या पायवाटेने आला हेच विसरून गेला. या अभियंत्यांचं फरहाण शाह असं नाव आहे. 20 मे रोजी तो हरवला असून अद्याप ही त्याचा शोध सुरु आहे.  वाट चुकल्यामुळे फरहाण कुटुंबीय आणि मित्रांना याबाबत कळवत होता. दुपारी अडीच वाजता त्याचा शेवटचा संपर्क झाला, त्यावेळी पुढच्या तीन-चार तासांत माझा संपर्क न झाल्यास मला शोधायला कोणाला तरी पाठवा असं तो म्हणाला होता. त्यानंतर मोबाईलची बॅटरी कमी झाली आणि तो संपर्कक्षेत्राबाहेर गेला. अध्याप तो कोणाला आढळून आलेला नाही. 

फरहाण दिल्लीवरून कोल्हापूरला कंपनीच्या कामानिमित्त आला होता. शुक्रवारी तो पुण्यात परतला, मात्र ज्या विमानाने तो  दिल्लीला परतणार होता, त्यासाठी खूप अवधी होता. त्यामुळे त्याने लोणावळ्याला फेरफटका मारायचा निर्णय घेतला. परंतु, त्याच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. त्याच्या शोधासाठी लोणावळा पोलिसांसह शिवदुर्ग, मावळ वन्यजीव, रायगड बचाव पथक आणि स्थानिकाकंडून शोधकार्य सुरु आहे.  पोलिसांनी फरहाणच्या मोबाईल लोकेशनवरून मॅप तयार केला. त्यानुसार शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण अद्याप ही बचाव पथकाला यश आलेलं नाही. त्यामुळे आता फरहाणच्या कुटुंबियांनी शोधून देणाऱ्यांना एक लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केलीय.

Jalgaon News Update : जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

गावातील सरपंच , उपसरपंच  लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील  महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. साध्या वेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलक महिलेच्या हातातून रॉकेलचा कॅन वेळीच महिलेच्या हातून काढून घेतल्यामुळे आत्महत्तेचा प्रयत्न फसला. 

"मला न्याय मिळाल्याशिवाय मी जिल्हाधिकारी कार्यालयातून जाणार नाही, तसेच माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असा पवित्रा आंदोलक पीडित महिला प्रतिभा प्रेमसिंग परदेशी यांनी घेतला होता. यामुळे महिला पोलीस कर्मचारी येत नाही तोपर्यत आंदोलक महिला  प्रतिभा परदेशी  यांना रोखून ठेवण्यात आले. तिच्याकडून रॉकेलचे पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे. 

Aurangabad: धक्कादायक! पोटच्या मुलानेच केली आई-वडिलांची हत्या, कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह

औरंगाबादमधील पुंडलीकनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका माथेफिरू तरुणाने आपल्याच आई-वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. आई-वडील हिशोब मागतात याचाच राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र शामसुंदर कलंत्री, असं आरोपीचे नाव आहे. त्याला शिर्डीतून औरंगाबाद पोलिसांनी अटक केली

Gondia : गोंदियात पुन्हा भाजप-राष्ट्रवादी एकत्र, सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का

गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत पुन्हा कांग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी -भाजप-चाबी गटाने या निवडणुकीत मारली बाजी आहे. चारही विषय समितींच्या सभापती पदावर राष्ट्रवादी -भाजप- चाबी - अपक्ष गटाने आपले उमेदवार निवडून आणले आहेत. यात भाजपकडून  संजय टेंभरे,  सविता पुराम यांची निवड करण्यात आली. तर, अपक्ष  सोनु कुथे  आणि ऱाष्ट्रवादीकडून पुजा अखिलेश सेट यांची  निवड करण्यात आली. नुकतीच 10 मेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूकीमध्ये काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादीने भाजपच्या साथीने बहुमत सिद्ध केलं होतं. 

Gondia: गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभापति पदाच्या निवडणुकीत कांग्रेस पुन्हा बाहेर

आज गोंदिया जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीच्या सभापतिची निवडणूक पार पडली असून  झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला बाहेर ठेवत राष्ट्रवादी, भाजप, चाबी आणि अपक्ष गटाने बाजी मारत चार पदावर आपला ताबा मिळविला आहे. यात भाजपकडून संजय टेंभरे, सविता पुराम यांची निवड करण्यात आली. तर अपक्ष सोनू कुथे आणि राष्ट्रवादीकडून पूजा अखिलेश सेट यांची निवड करण्यात आली. नुकतीच 10 मे रोजी जिल्हा परिषदेची अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक  पार पडली असून यात काँग्रेसला बाहेर ठेवत भाजपाने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करीत बहुमत सिद्ध करत सत्ता स्थापन केली. दरम्यान आज महत्वपूर्ण असलेल्या चार विषय समितिची निवडणूक झाली असून यात पुन्हा राष्ट्रवादी,भाजप, चाबी आणि अपक्ष गट एकत्र येत 4 विषय समितीवर कब्जा मिळविला. 

Chandrapur Fire: लाकूड साठवण डेपोला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना येथील लाकूड साठवण डेपोला लागलेली आग अद्यापही सुरूच आहे. ही आग विझविण्यासाठी गेल्या 24 तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या 40 अग्निशमन विभागाच्या गाड्या प्रयत्न करत आहेत. मात्र ही आग अजूनही धुमसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड गर्मी असल्यामुळे अग्निशमन विभागाने टाकलेलं पाणी काही मिनिटात वाफ बनून उडून जातं आणि ढिगाऱ्याखालील निखारे पुन्हा पेट घेतात. त्यामुळे आता हे निखारे राख झाल्यावरच आग शांत होईल अशी परिस्थिती आहे.

Aurangabad : शिवसेनेची इतकी वर्षे सत्ता असतानाही औरंगाबादमध्ये पाण्याचा सत्यानाश; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

महानगरपालिकेत इतकी वर्षे सत्ता असूनही पाण्याच्या बाबतीत सत्यानाश झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपण मुख्यमंत्री असताना 1600 कोटी रुपये मंजूर केले होते, आता त्यातील 600 कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत, महापालिकेकडे एकही रुपया नाही असंही ते म्हणाले.

Congress :  राज्यपातळीवर कॉंग्रेसचे शिबीर 1 आणि 2 जूनला

Congress :  कॉंग्रेस टिळक भवन येथील महाराष्ट्र कॉंग्रेस कार्यकारणीची बैठक संपली  आहे. उदयपूरमधील चिंतन शिबीरानंतर राज्यपातळीवर कॉंग्रेसचे येत्या 1 आणि 2 जूनला शिर्डीत चिंतन शिबीर आहे.

Rajya Sabha : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आजच उमेदवार जाहीर करणार

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आपल्या उमेदवाराचे नाव आज संध्याकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रवेशाची देण्यात आलेली मुदत संपली असून आता ही जागा ग्रामीण भागातील जेष्ठ नेत्याला देण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

Aurangabad News Update : औरंगाबादमध्ये मुलाकडून आई-वडिलांची गळा चिरून हत्या

औरंगाबादमध्ये मुलानेच आई-वडिलांची गळा चिरून हत्या केली आहे. घरच्या दुकानातील पैसे तो खर्च करत असे आणि त्याला आई-वडील हिशोब मागत. याचाच राग मनात धरून आई-वडिलांची हत्या केली आहे. देवेंद्र शामसुंदर कलंत्री असं हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तर किरण कलंत्री आणि शामसुंदर कलंत्री अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. देवेंद्र कलंत्री याला औरंगाबाद पोलिसांनी  शिर्डीतून अटक केली आहे.

Obc Reservation: भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण; ओबीसींना राजकिय आरक्षण देण्याची मागणी

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी यवतमाळ भाजपा व ओबीसी मोर्चाच्या वतीने आझाद मैदान (रंगमंच) येथे लाक्षणिक उपोषण  करण्यात आले. या उपोषणात भाजपाच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. हे उपोषण आमदार मदन येरावार, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या लाक्षणिक उपोषणात सहभागी होऊन राज्यात ओबीसींना पुनश्च आरक्षण देण्याची मागणी केली.

Ahmednagar: दीड कोटी रुपयांचे चोरीचे स्टील जप्त

स्टीलची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून स्टीलची चोरी करून ते काळ्याबाजारात विक्री करण्याचा प्रकार अहमदनगर येथून उघडकीस आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर यांच्या पथकाने नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन ठिकाणी छापे मारून तब्बल दीड कोटी रुपयांचा माल जप्त केलाय. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली कारवाई नगर-औरंगाबाद हायवे लगत हॉटेल निलकमल शेजारी असलेल्या पत्र्यांच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत करण्यात आली. तर दुसरी कारवाई खोसपुरी शिवारात नगर औरंगाबाद महामार्गावर हॉटेल संग्राम पॅलेस शेजारी असलेल्या पत्र्याच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणात 14 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. मात्र ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी जी शेखर यांच्या पथकाने नगरमध्ये येऊन केल्याने नगर पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत चर्चेला उधाण आले आहे.

कोल्हापुरात वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Kolhapur News : वाढत्या महागाईच्या विरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या तसेच गॅसचे दर गेल्या काही दिवसात गगनाला भिडले आहेत. याला विरोध करत निषेध व्यक्त करण्यासाठी आज हा लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच महिलांनी चुली पेटवून त्याठिकाणी झुणका-भाकर केली. तसेच ती झुणका-भाकर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. यावेळी मुश्रीफ यांनी राज ठाकरे यांचा देखील समाचार घेतला. शिवाय ओबीसी आरक्षणानंतरच निवडणुका घेतल्या जातील असा पुनरुच्चार त्यांनी केला.

सात दिवसात शेतकरी प्रश्नांची दखल घ्या, अन्यथा आंदोलन, पुणतांब्यातील शेतकऱ्यांचा इशारा

Puntamba Farmers :  शेतकरी प्रश्नांवरुन अहमदनगर जिलह्यातील पुणतांबा येथील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आज पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. आजच्या ग्रामसभेत सरकारला ठरावाची प्रत पाठवून आंदोलनाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. शेतकरी प्रश्नांची
येत्या सात दिवसात दखल घेतली नाही तर 1 ते 5 जून दरम्यान धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक  

महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक  सुरु. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्व मंत्री प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित   आहेत.

Anil Deshmukh News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 8 जून रोजी सुनवणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर 8 जून रोजी सुनवणी

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात होणार सुनावणी 

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल आरोपपत्रात ऋषिकेशही आरोपी 

या प्रकरणात ऋषिकेश देशमुख यांना 27 मे 2022 रोजी कोर्टात हजर राहण्यासठी समन्स जारी केलंय

Dhule Maharashtra News : धुळे शहरात नऊ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापालिकेवर हंडा मोर्चा

Dhule Maharashtra News :  धुळे शहरात नऊ ते दहा दिवस आड होत असलेला पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला

राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा एअर’कडून त्यांच्या पहिल्या विमानाचे फोटो समोर 

राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा एअर’कडून त्यांच्या पहिल्या विमानाचे फोटो समोर , एअरलाइन्सकडून ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर , जूनमध्ये अकासा एअरला आपल्या ह्या पहिल्या विमानाची डिलिव्हरी मिळण्याचा अंदाज, जुलै महिन्यापासून अकासा एअर आपले कमर्शिअल आॅपरेशन्स सुरु करण्याचा अंदाज

राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअर’कडून पहिल्या विमानाचे फोटो जारी

Mumbai News : राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअर’ने त्यांच्या पहिल्या विमानाचे फोटो समोर आणले आहेत. एअरलाईन्सकडून 72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. जूनमध्ये 'अकासा एअर'ला आपल्या पहिल्या विमानाची डिलिव्हरी मिळण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यापासून अकासा एअर आपले कमर्शिअल ऑपरेशन्स सुरु करण्याची शक्यता आहे.

बांदाजवळील शेर्ले गावात गोवा बनावटीच्या दारुसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शेले आरोसबाग येथे गोवा बनावटीच्या दारुची कारमधून बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई केली. या कारवाईत एकूण 5 लाख 65 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकारणी कारचालक मनवेल कैतान डिसोझा याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. 

Puntamba Maharashtra News : विशेष ग्रामसभेला सुरूवात, पुणतांबा गावात शेतकरी प्रश्नावर विशेष ग्रामसभा

विशेष ग्रामसभेला सुरूवात, पुणतांबा गावात शेतकरी प्रश्नावर विशेष ग्रामसभा, शेतकरी संपाची हाक देणा-या पुणतांबा गावात आज विशेष ग्रामसभा...
ग्रामसभेत शेतकरी प्रश्नावर होणार चर्चा...
शेतकरी प्रश्नावर आंदोलनाची दिशा आज ठरणार...
राज्यातील शेतकरी करतोय आज अनेक अडचणींचा सामना..
राज्यातील शेतकरी नेत्यांना आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभे राहण्याची शक्यता...
 
Nagpur Maharashtra News : ओबीसी आरक्षणासाठी नागपुरात भाजप आक्रमक, ओबीसी मोर्चाचं आंदोलन, राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

Nagpur Maharashtra News :  “नाकर्त्या राज्य सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आहे, उद्धव ठाकरे सरकारने ओबीसींचा राजकीय खून केला आहे” असा आरोप करत नागपूरातील संविधान चौकात भाजपच्या ओबीसी मोर्चाने राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण मिळालं आहे, पण महाराष्ट्रात मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे…. त्यामुळे भाजप आक्रमक आहे. राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी भाजपने आज आंदोलन केले...

Aurangabad Maharashtra News :  पुंडलिकनगरात पती-पत्नीची हत्या;  कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह,

Aurangabad Maharashtra News :  पुंडलिकनगरात पती-पत्नीची हत्या;  कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह,  शामसुंदर  हिरालाल कलंत्री आणि  किरण शामसुंदर कलंत्री अशी मृतांची नावे. मुलानेच हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज,  कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू,  हत्येच्या सत्राने औरंगाबाद हादरले,  हत्येनंतर मृतदेह ठेवले वेगवेगळ्या मजल्यावर,  पलंगाखाली लपवून ठेवलेले आढळले मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

Kolhapur Maharashtra News : जोतिबासाठी बनवली 1 टनाची महाघंटा

Kolhapur Maharashtra News : जोतिबासाठी बनवली 1 टनाची महाघंटा, सांगली जिल्ह्यातील पलूस येथील भाविक सर्जेराव नलवडेकडून केली जाणार अर्पण, 44 इंच उंच, 40 इंच घेरा असणारी घंटा, शुक्रवारी केली जाणार विधिवत अर्पण

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत, पहाटेच कोल्हापूरकडे रवाना : सूत्र

Rajya Sabha Election 2022 : संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून ते आज पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली होती. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट घालण्यात आली होती

राहुल गांधी केंब्रिज विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष’ या विषयावर संवाद साधणार

लंडन- काँग्रेस नेते राहुल गांधी केंब्रिज विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष’ या विषयावर संवाद साधणार आहेत, भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता हा संवाद आहे. 

पंतप्रधान मोदींचा जपान दौरा आजपासून...क्वाड शिखर संमेलन, बायडन भेटीसह अनेक महत्वाच्या बैठका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 आणि 24 मे असे दोन दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान एंथनी अल्बानीस यांची भेट घेणार आहेत.
मोदींचा आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- पहाटे 4.20 वाजता- मोदींचं टोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन.
- पहाटे 5 वाजता- मोदींचं जपानमधील भारतीयांकडून स्वागत केलं जाणार आहे.
- सकाळी 10.30 ते 12.20-  मोदींच्या सुजुकी, एनईसी, UNIQLO, सॉफ्टबैंक ग्रुप कॉर्प या कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठका होणार आहेत.
- दुपारी 1 वाजता- मोदींच्या हस्ते इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक पार्टनरशिपचा शुभारंभ होणार आहे.
- दुपारी 2 वाजता- जापानी व्यापार वर्गासोबत गोलमेज संमेलनाला मोदींची हजेरी.
- दुपारी 4 वाजता- जपानमधील भारतीय समुदायासोबत मोदी बातचित करतील.  

पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात

पुणतांबा येथे आज विशेष ग्रामसभा होणार आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने पुन्हा शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या ग्रामसभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. पुणतांबा हे ऐतिहासिक शेतकरी संपाचे गाव असून 5 वर्षांपूर्वी या गावानं शेतकरी संप पुकारला होता.

मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक 

काँग्रेस टिळक भवन येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची नाना पटोलेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विकासनिधी वाटप, ओबीसी प्रश्नावरुन असलेला रोष या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओबीसी आरक्षणाच्या  मुद्द्यावरुन इशारा देणारे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ओबीसी विभागाकडून ओबीसी आक्रोश आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 
 
केंद्रानंतर राज्य सरकारकडूनही पेट्रोल डिझेलवरचा कर कमी, मध्यरात्रीपासून नवे दर लागू  

राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लीटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत 
 
नवनीत राणांचा आज संसदीय अधिकार समितीसमोर जबाब 

खासदार नवनीत राणांनी जेलमध्ये असताना त्यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे 25 एप्रिल रोजी तक्रार केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत आज दुपारी 12 वाजता खासदार नवनीत राणा यांना हजर राहण्याची नोटीस बजावली गेली आहे. खासदार नवनीत राणा आज आपल्या जबाबामध्ये काय भूमिका मांडणार हे पाहावं लागेल. 
 
ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदीरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदीरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदीरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदीरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलंय. 

ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी

ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली आहे. या प्रकरणी 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. तसेच, काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ. कुलपति तिवारी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याबाबत वाराणसी कोर्टात याचिका करणार आहेत. 
 
औरंगाबादेत भाजपचा जल आक्रोश मोर्चा

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून दुपारी 4 वाजता भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे, घागरी घेऊन सहभागी होतील. दरम्यान, काल रात्री औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचे बॅनर फाडण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जमून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.  

संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, खासदारकीसाठी शिवबंधन बांधणार का?

संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. संभाजीराजे छत्रपती आज दुपारी 12 वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. सध्यातरी राजेंचा शिवसेना प्रवेशास नकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे सर्व मराठा समन्वयकांशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. 
 
पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, खासदारकीसाठी शिवबंधन बांधणार का?
संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. संभाजीराजे छत्रपती आज दुपारी 12 वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. सध्यातरी राजेंचा शिवसेना प्रवेशास नकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे सर्व मराठा समन्वयकांशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. 
 
औरंगाबादेत भाजपचा जल आक्रोश मोर्चा
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून दुपारी 4 वाजता भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे, घागरी घेऊन सहभागी होतील. 

दरम्यान, काल रात्री औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचे बॅनर फाडण्यात आले आहेत. भाजप कार्कर्त्यांनी घटनास्थळी जमून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. व्हीज आलेत.
 
ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी
ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली आहे. या प्रकरणी 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. तसेच, काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ. कुलपति तिवारी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याबाबत वाराणसी कोर्टात याचिका करणार आहेत. 
 
ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदीरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदीरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदीरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलंय. 
 
नवनीत राणांचा आज संसदीय अधिकार समितीसमोर जबाब 
खासदार नवनीत राणांनी जेलमध्ये असताना त्यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे 25 एप्रिल रोजी तक्रार केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत आज दुपारी 12 वाजता खासदार नवनीत राणा यांना हजर राहण्याची नोटीस बजावली गेली आहे. खासदार नवनीत राणा आज आपल्या जबाबामध्ये काय भूमिका मांडणार हे पाहावं लागेल. 
 
केंद्रानंतर राज्य सरकारकडूनही पेट्रोल डिझेलवरचा कर कमी, मध्यरात्रीपासून नवे दर लागू  
राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लीटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत 
 
मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक 
काँग्रेस टिळक भवन येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची नाना पटोलेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विकासनिधी वाटप, ओबीसी प्रश्नावरुन असलेला रोष या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओबीसी आरक्षणाच्या  मुद्द्यावरुन इशारा देणारे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ओबीसी विभागाकडून ओबीसी आक्रोश आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 
 
पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात
पुणतांबा येथे आज विशेष ग्रामसभा होणार आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने पुन्हा शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या ग्रामसभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. पुणतांबा हे ऐतिहासिक शेतकरी संपाचे गाव असून 5 वर्षांपूर्वी या गावानं शेतकरी संप पुकारला होता.
 
पंतप्रधान मोदींचा जपान दौरा आजपासून...क्वाड शिखर संमेलन, बायडन भेटीसह अनेक महत्वाच्या बैठका 
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 आणि 24 मे असे दोन दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान एंथनी अल्बानीस यांची भेट घेणार आहेत.
मोदींचा आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- पहाटे 4.20 वाजता- मोदींचं टोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन.
- पहाटे 5 वाजता- मोदींचं जपानमधील भारतीयांकडून स्वागत केलं जाणार आहे.
- सकाळी 10.30 ते 12.20-  मोदींच्या सुजुकी, एनईसी, UNIQLO, सॉफ्टबैंक ग्रुप कॉर्प या कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठका होणार आहेत.
- दुपारी 1 वाजता- मोदींच्या हस्ते इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक पार्टनरशिपचा शुभारंभ होणार आहे.
- दुपारी 2 वाजता- जापानी व्यापार वर्गासोबत गोलमेज संमेलनाला मोदींची हजेरी.
- दुपारी 4 वाजता- जपानमधील भारतीय समुदायासोबत मोदी बातचित करतील.  
 
आंतरराष्ट्रीय-
लंडन- काँग्रेस नेते राहुल गांधी केंब्रिज विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष’ या विषयावर संवाद साधणार आहेत, भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता हा संवाद आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.