23 March 2022 Breaking News LIVE Updates : प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन; रुपाली पाटील

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Mar 2022 08:37 PM
Yavatmal News : झोपाळा खेळताना सिमेंटचा पोल अंगावर पडल्याने चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू

सिमेंटच्या पोलला बांधलेल्या पाळन्याला झोका देताना सिमेंट पोल अंगावर पडल्याने बहिणीसह चिमुकल्या भावाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील महावीर नगरात ही घटना घडली आहे. प्राची विजय घुक्से (वय 9) आणि तेजस विजय घुक्से (6 महिने अशी मृतांची नावे आहेत. 

NCP : प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन; रुपाली पाटील

रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे. जर संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


 

Amravati News : शहरातील गौसनगर येथे पोलिसांनी जप्त केले अमली पदार्थ

अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिसांनी शहरातील गौसनगर येथे एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. अंदाजे चार लाख रुपये इतकी या अमली पदार्थाची किंमत असून याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे.

Nandurbar flash : शासकीय ठेकेदाराकडून 43 लाखांची लाच मागणाऱ्या अभियंत्यांना अटक

शासकीय ठेकेदाराकडून 43 लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या दोन अभियंत्यांना अटक करण्यात आली असून नंदुरबार लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. अक्कलकुवा पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुनिल पिंगळे सहाय्यक अभियंता संजय हिरे आणि खाजगी व्यक्ती अभिषेक शर्मा यांना लाचेचा पहिला हप्ता 400000 स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती


महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीकडून लवकरच नवीन महिला प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होणार असून महिला आयोगाचं पद चाकणकर यांना मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात येणार आहे. 

Mumbai Mask : मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची लवकरच सुटका

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता जर मुंबईत मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं मास्क मार्शलना दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Mumbai Mask : मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची लवकरच सुटका

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता जर मुंबईत मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं मास्क मार्शलना दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटीसह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. हवामान विभागाने पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली होती. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू तसेच उन्हाळी पिकांना फटका बसणार आहे. 

नवी मुंबईत पाणी प्रश्नावरुन शेकापचं हंडा आंदोलन, महिला कार्यकर्त्यांचा सिडको अधिकाऱ्यांना हंड्यासह घेराव

नवी मुंबई : मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा, अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवेमधील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. याविरोधात शेकापतर्फे हंडा आंदोलन करण्यात आलं. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांना शेकापच्या महिला कार्यकर्त्यांनी हंड्यासह घेराव घातला. पुढील चार दिवसात योग्य उपाययोजना करत पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी दिलं. पाणी प्रश्न न सुटल्यास पुढील आंदोलन सिडको अधिकाऱ्यांच्या दालनात करु, असा इशारा शेकापतर्फे देण्यात आला.

Hero MotoCorp: हिरो मोटोकाॅर्पचे अध्यक्ष आणि प्रवर्तक पवन मुंजाल यांच्यावर आयकर विभागाचा छापा, कंपनीचे शेअर दोन टक्क्यांनी घसरले

Hero MotoCorp : हिरो मोटोकाॅर्पचे अध्यक्ष आणि प्रवर्तक पवन मुंजाल यांच्यावर आयकर विभागाने छापा मारला. ही कारवाई करचुकवेगिरी प्रकरणी झाली असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईनंतर हिरो मोटोकॉर्पचे शेअर कोसळले असून २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. 

Kirit Somaiya : आणखी सहा घोटाळे समोर येणार; किरीट सोमय्यांचा निशाणा आता थेट आदित्य ठाकरेंवर!

Kirit Somaiya : महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. किरीट सोमय्या यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने थेट ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. सगळी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले. 


ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे 6 कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाईने केल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही सवाल त्यांनी केला. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Corona Vaccine : नोव्हॅक्सच्या कोरोना लसीला आपातकालीन वापरासाठी DCGI ची मंजुरी

Novavax Corona Vaccine Get Approval : सध्या देशात कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. यामध्ये लसीकरणाचा मोठा परिणाम असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. अशातच कोरोना विरोधातील लढाईत आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नोव्हावॅक्सच्या कोरोना लसीला 12 ते 17 वर्षे वयोगटातील व्यक्तींवर आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि नोव्हावॅक्स यांनी माहिती दिली. दरम्यान, भारतात सध्या प्रौढ व्यक्तींनंतर आता पौगंडावस्थेतील आणि लहान मुलांच्या कोरोना लसीकरणावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

वर्षा बंगल्यावर डिनर डिप्लोमसी रंगणार; मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व आमदार, मंत्र्यांना मार्गदर्शन करणार!
मुंबई : वर्षा बंगल्यावर आज डिनर डिप्लोमसी रंगणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार, मंत्र्यांना आज वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं आहे. या स्नेहभोजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री आठ वाजता सर्व आमदार, मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा सिल्वर ओक परिसरात आंदोलनाचा प्रयत्न, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात





मराठा आरक्षणावरुन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी आज (23 मार्च) सकाळी सिल्वर ओक परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांना मुंबई पोलिसांनी काही मीटर आधीच ताब्यात घेतलं. पेडर रोडच्या जंक्शनवर असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळच मुंबई पोलिसांनी योगेश केदार यांना ताब्यात घेतलं. साल 1994 च्या अध्यादेशावरुन आंदोलकांमध्ये रोष होता. याच अध्यादेशाची होळी ते सिल्वर ओकबाहेर करणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलकांनी तिथेच या जीआरचे कागद फाडून आपला निषेध व्यक्त केला. तसेच शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त केली.


 

 



 


पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी नंदुरबारमधील वाहनधारकांच्या गुजरातमधील पेट्रोल पंपावर रांगा

नंदुरबार : पाच राज्यातील निवडणूक संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात 110.91 रुपये पेट्रोलचे दर आहेत तर 94.69 पैसे डिझेलचे दर आहेत. गुजरात राज्यात पेट्रोल 96.99 रुपये तर डिझेल 89 रुपये दर असल्याने वाहनचालक नंदुरबारमधून गुजरातमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी जात आहेत. गुजरातमधील पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल खरेदीसाठी वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील महाराष्ट्र राज्यामधील पेट्रोल पंप ओस पडलेले दिसतात. नंदुरबार जिल्ह्यातील वाहनधारक मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गुजरात राज्याला पसंती देत आसल्याने चित्र आहे.

हिंगोली शहरात दोन गटात तुफान राडा, परस्परांच्या तक्रारीवरुन 16 जणांवर गुन्हे दाखल





हिंगोली : जुन्या वादातून काल (22 मार्च) रात्री उशिरा दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. हिंगोली शहरातील हरण चौक परिसरात रात्री उशिरा ही घटना घडली. या राड्यामुळे शहरातील वातावरण भीतीमय झालं होतं. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत या दंग्यावर नियंत्रण मिळवलं. यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. या राड्यात अनेक गाड्यांची आणि दुकानांची तोडफोड झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 16 जणांच्या विरोधात हिंगोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेने शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.


 

 



 


बुलढाणा : कडक बंदोबस्तात पोलीस व्हॅनमधून संदल काढत सैलानी यात्रेची सांगता
बुलढाणा : कडक बंदोबस्तात पोलीस व्हॅनमधून संदल काढत सैलानी यात्रेची सांगता झाली. यात्रेवर बंदी असतानाही प्रशासनानेच परंपरा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी

देशभरातून 50 ते 60 हजार भाविकांची उपस्थिती होती. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने देशात प्रसिद्ध असलेल्या सैलानी यात्रेला बंदी घातली होती. तरीही प्रशासनाने परंपरा कायम ठेवत होळीच्या दिवशी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत छोटी नारळांची होळी केली होती तर परंपरेप्रमाणे होळीच्या पाचव्या दिवशी परंपरेनुसार सैलानी बाबांचा संदल निघत असतो. रात्री प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात सैलानी बाबांचा संदल काढून परंपरा कायम ठेवली. यावेळी पोलीस व्हॅनमधून संदल काढण्यात आला. 
Salman Khan : सलमान खानला अंधेरी न्यायालयाचं समन्स; पत्रकाराला धमकावल्याचा आरोप

Salman Khan : तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयाने दिले आहेत. सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना 5 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स आहेत. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल रपेट मारणाऱ्या सलमानचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता मात्र त्यावेळी सलमान आणि बॉडीगार्डनं असभ्य वर्तन करत मोबाईल हिसकावून घेतला आणि धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी सलमान विरोधात तक्रार दिली होती. सध्या अंधेरी न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. 

Petrol Diesel Price Hike : सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ

Petrol Diesel Price Hike : इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.


उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 83 पैसे प्रति लिटरने किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 110.82 रुपये प्रति लीटर तर डिझेल 95.00 रुपये प्रति लीटर आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Petrol Diesel Price Hike : सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ, पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागलं


Petrol Diesel Price Hike : इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.


उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 83 पैसे प्रति लिटरने किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 110.82 रुपये प्रति लीटर तर डिझेल 95.00 रुपये प्रति लीटर आहे. 


Russia Ukraine War : लाखो डॉलर्स घेऊन पळून जात होती युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी, सुटकेससह हंगेरियन सीमेवर सैनिकांनी पकडले


Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष अद्याप सुरुच आहे. युद्धात एकीकडे युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांच्या शौर्याने संपूर्ण जगाची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे युक्रेनमधील परिस्थितीमुळे लाखो युक्रेनियन दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले आहेत. यावेळी असे काही लोक आहेत जे बेकायदा संपत्ती घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनच्या हंगेरीच्या सीमेवर असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे युक्रेनच्या माजी खासदाराच्या पत्नीला सुटकेसमध्ये कोट्यवधी रुपये अवैध पद्धतीने नेताना सैनिकांनी पकडले आहे.


सुटकेसमध्ये लाखो डॉलर्स आणि युरो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनच्या माजी खासदाराची पत्नी काही दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये डॉलर आणि युरो घेऊन जात होती. युक्रेनच्या माजी खासदाराच्या पत्नीचं नाव कोटवित्स्की आहे. कोटवित्स्की पैसे घेऊन देश सोडण्याचा प्रयत्न करत होती, मात्र हंगेरीच्या सीमेवरील सुरक्षा जवानांनी तिला अडवले. सैनिकांनी संशयावरून तिच्या सुटकेसची झडती घेतली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सूटकेसमध्ये सुमारे 28 दशलक्ष डॉलर्स आणि 1.3 दशलक्ष युरो रोख होते. ती झाकरपट्टिया प्रांतातून हंगेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.