Maharashtra Breaking News 23 April 2022 : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहित अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
लातूर येथील उदगीर येथे गेल्या तीन दिवसांपासून सूरू असलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. याबरोबर मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावरून देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे मनसेला आता मराठी बरोबरच इतर भाषिकांचेही समर्थन मिळताना दिसत आहे. घाटकोपर मधील गुजराती समाजातील तरुणांनी ही मनसेच्या या भूमिकेच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत. घाटकोपर येथील असल्फा मेट्रो स्थानकाजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करत राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली जात आहे. परंतु, राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहेत.
Amravati News Update : अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार झाला आहे. योगेश घारड हे आपल्या चारचाकी वाहनातून उतरून घरी जाताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी त्यांच्या मांडीला लागली असल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहेत.
Renu Sharma : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या रेणू शर्मा यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र उन्हाळी पिकांना मात्र फटका बसला आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव येथे तंटामुक्त समिती अध्यक्षाचा खून करण्यात आला आहे. महेश बबनराव घोडमारे असे त्यांचे नाव आहे. संबंधित प्रकरणावर सध्या पोलिस चौकशी करत आहेत.
राजगड किल्ल्यावर सध्या अनेक पर्यटक जात आहेत. अशातच किल्ल्यावर मधमाशांकडून अनेक पर्यटकांना चावा घेण्यात आला आहे. मधमाशांचे मोहोळ मागे लागल्याने किल्ल्यावर पर्यटकांची चांगलीच पळापळ झाली. मधमाशांकडून झालेल्या या हल्ल्यात एक महिला दरीत कोसळून जखमी झाली आहे.
Amravati News Update : आज दुपारी 12 वाजता अमरावती येथील शंकर नगर मधील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरावर शिवसैनिकांची अचानक धडक दिली. मोठ्याप्रमाणात शिवसैनिकांची राणा दाम्पत्यविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी घराच्या समोर आणि आजूबाजूच्या रोडवर बॅरिकेटस लावले. यावेळी शिवसैनिकांनी हनुमान चालीसाचं पठणही केलं.
दुपारी दीड वाजता आमदार रवी राणा यांनी माझ्या घरावर दगडफेक झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी स्पष्ट केलं की दगडफेक झाली नाही. तरीही शिवसैनिकांनी अमरावती येथील शंकर नगर मधील त्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठा राडा केला. शिवसैनिकांनी राणा यांच्या घरासमोर लावलेले बॅरिकेटस खाली फेकून आत घुसण्याचा प्रयत्न केला. रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
Neelam Gorhe : प्रत्येक प्रार्थना आणि धर्म ग्रंथावर आमची श्रुद्धा आहे. परंतु, सध्या हनुमान चालिसावरून नौटंकी करणारे राणा दाम्पत्य हे भाडोत्री टॅक्सी असल्याची टीका शेवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ग्रंथ प्रदर्शनाला नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
इतिहासात पुतना मावशीने जे कार्य केल तेच काम करण्याचं काम आज नवनीत राणा करत आहेत. सरकार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर अरेतुरे करून टीका करण्याचे काम भाजपाचे काही लोक करत आहेत. शिववसैनिक जर राणांच्या घरासमोर गेले नसते तर मातोश्रीवर हे लोक पवार साहेबांच्या घरासारखी चाल करून आले असते. ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्याला वाय सेक्युरिटी मिळते, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांची लाईफलाईन असणारी लालपरी अर्थातच एसटी बस पुन्हा एकदा धावू लागल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कल्याण एसटी डेपोत आज 100 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे गेले काही महिने ओस पडलेला एसटी डेपो पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेलेला पाहायला मिळाला.
Sanjay Raut : बोगस घंटाधारी हिंदुत्ववादी वातावरण गढूळ करतायत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. नागपुरात त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान संवाद साधला.
आद्यकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यातील पहिलं महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन आज बुलढाण्यात आयोजित केलं आहे. लेखिका ताराबाई शिंदे नगरीत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. या एकदिवसीय दिवशीय संमेलनात मुंबईतील जेष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे हे उपस्थित आहेत. या संमेलनात रसिकांनी मोठी गर्दी केली आहे.
Ahmednagar Crime news : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय...काल रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास नेवासे तालुका लोहगाव येथे ही घटना घडलीये...राजळे हे सोनई येथूल काम आटोपून घोडेगाव मार्गे आपल्या घरी मोटारसायकल वरुन निघाले होते.... दरम्यान तीन ते चार आरोपी दोन मोटारसायकल वरुन त्यांच्या मागावर होते... राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच अज्ञात आरोपींनी बेछूट गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला... या हल्यात राजळे यांच्या कमरेखाली एक आणि डाव्या पायाला एक गोळी लागली तर डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे...दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली...राजळे यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय... त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची तब्येत सुधारली असल्याचे सांगितले...मात्र, अशा पध्दतीने मंत्र्यांच्या स्वीय सहाय्याकावर जीवघेणा हल्ला झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे...या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे...पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय.
इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या सर्व निर्यातीवर बंदी, भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता
भारतातील तेलाचे भाव आणखी भडकण्याची शक्यता, आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे सुर्यफूलाचे तेल आणि इतर तेलाच्या किंमतीत वृद्धी
स्थानिक महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच तेलाची टंचाई आणि कच्च्या मालाच्या सर्व निर्यातीवर बंदी
इंडोनेशिया पाम तेलाचा मोठा निर्यातदार, २८ एप्रिलपासून सर्व शिपमेंट्स थांबवण्याचे अध्यक्ष जोको विडोडो यांचे निर्देश, मात्र टंचाईवर मात झाल्यास आणि महागाई नियंत्रणात आल्यास पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचं देखील स्पष्ट
इंडोनेशियाकडून देशातील वाढत्या महागाईशी लढण्यासाठी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी, भारतात पाम तेलाचा वापर
डिझेल-पेट्रोलमध्ये मिसळलेल्या जैव-इंधनात देखील पाम तेलाचा वापर
जगभरातील सुमारे ५० टक्के घरगुती उत्पादनांमध्ये पाम तेलाचा वापर
शाम्पू, आंघोळीचा साबण, टूथपेस्ट, व्हिटॅमिनच्या गोळ्या, मेकअपच्या वस्तू इत्यादींमध्येही पाम तेलाचा वापर
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला.राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सर्वोच्च त्याग करून मातृभूमीचे रक्षण करण्याची शपथ घेतली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.परेडचे नेतृत्व प्रतीक चंद्रकांत दिघे या जवानाने मेजर यू.एस. पिल्लाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.मिलिटरी बँडच्या तालावर जवानांनी केलेले संचलन लक्षवेधी ठरले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर ही सैन्यातील जुनी रेजिमेंट आहे.पूर्वीपासून शौर्याची परंपरा या रेजिमेंटला लाभली आहे.लष्करी जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती याला खूप महत्त्व असते.प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा तुम्हाला सेवा बजावताना उपयोग होणार आहे. नवे तंत्रज्ञान आवश्यक करणे देखील महत्त्वाचे आहे.मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरची गौरवशाली परंपरा जपण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असे उद्गार मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी जवानांना मार्गदर्शन करताना काढले. कार्यक्रमाला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे कुटुंबीय,अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते.प्रशिक्षण कालावधीत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या जवानांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
satara news : राजगडावर मधमाशांचा हल्ला, पर्यटक जखमी, स्वतःचा बचाव करताना एक युवती कड्यावरुन खाली कोसळली, स्थानिकांच्या मदतीतून तिला जखमी अवस्थेत काढले आहे. ट्रेकर्स मंडळी घटनास्थळी पोहोचले आहेत.
Anil Bonde : आमदार रवी राणांनी आख्खी शिवसेना कामाला लावली असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. शिवसेनाच हे प्रकरण वाढवत आहे. सगळ्यांनी मिळून हनुमान चालीसा वाचायला पाहिजे असे बोंडे म्हणाले.
Pune Crime : बाणेर परिसरातून चक्क मोबाईल टॉवरच चोरून नेले..
चोरटे कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. पुण्यातील बाणेर परिसरातून चोरट्यांनी चक्क मोबाईलचे बसविलेले टॉवर अन त्याचे साहित्यच चोरून नेले. मॉडेल कॉलनी आणि पाषाण भागात या घटना घडल्या असून, पोलीसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, सध्या मोबाईल टॉवर चोरीच्या प्रकरणाने परिसरात चांगलीच चर्चा रंगविली आहे.याप्रकरणी देवेंद्र कुंभलकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणा दांपत्य कसं आहे हे अमरावतीकरांना माहिती आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि लगेचच बाजू बदलली. त्यामुळे गांभीर्यानं घ्यावी अशी परिस्थिती नाही. यामध्ये काही टेन्शन तयार होईल असं काहीच नाही. फार त्यांच्याकडे लक्ष द्याययला हवं असं नाही- जयंत पाटील
Nitin Nandgaonkar : राणा दाम्पत्य दाखल झाल्यास स्वागत करु… मी कशासाठी येत असतो हे सर्वांना माहिती आहे. त्यांना दाखल व्हावं. स्वागत करु. आम्ही कडवट शिवसैनिक- नितीन नांदगावकर
दाखल झाल्यास स्वागत करु… मी कशासाठी येत असतो हे सर्वांना माहिती आहे. त्यांना दाखल व्हावं. स्वागत करु. आम्ही कडवट शिवसैनिक- नितीन नांदगावकर
पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीला
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील लॉ कॉलेज समोर जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली, गिरीश पदमावार (60) असे मयताचे नाव असल्याची माहिती, याच ठिकाणी मयताची दुचाकी आणि पेट्रोल भरलेली कॅन होती आढळली, शव पोस्टमोर्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल, आत्महत्या असल्याची प्राथमिक माहिती, प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू
Buldhana News Update : मुंबई - नागपूर महामार्गावर मेहकर नजीक लक्झरी बस व कारचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
गंभीर जखमींना औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलंय.
सकाळी चार वाजता झाला अपघात , मृतक हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील असल्याची माहिती.
मृतकांचे नातेवाईक अजूनही अपघात स्थळी पोहोचले नसल्याने मृतांची ओळख पटलेली नाही.
उल्हासनगर शहरात एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून काही जण किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. कॅम्प नंबर 5 च्या भाटिया चौकात स्वामी नारायण पॅलेस ही इमारत आहे. आज रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब हा दुसऱ्या मजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन इमारत खाली करून सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. ही इमारत 1996 साली बांधण्यात आली होती या इमारतीमध्ये 10 प्लॅट असून काही दुकान आहेत. इमारत धोकादायक यादीत नसतानाही अचानक स्लॅब कोसळला. यावेळी आमदार कुमार आयलानी आणि माजी सभागृह नेते भरत गंगोत्री यांनीही तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली. उल्हासनगर शहरात 20 ते 25 वर्षे जुन्या आशा अनेक इमारती असून त्या जर्जर झाल्या आहेत. त्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Accident News : उल्हासनगरमध्ये एका भरधाव कारनं चार ते पाच दुचाकी आणि रस्त्यातील काही नागरिकांना धडक दिल्याचा प्रकार समोर आलाय. कॅम्प नंबर 2 च्या जपानी मार्केट परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघाताची सगळी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका कार चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकींना धडक देत नागरिकांच्या अंगावर गेली. या अपघातात दोन ते तीन नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटना घडल्यानंतर मार्केट परिसरातील नागरिकांनी या कार चालकाला ताब्यात घेत त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे. कार चालकाची सध्या चौकशी सुरू असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
- भाजप नेते मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस स्थानकात लेखी तक्रार नोंदवली.
- मातोश्री कलानगरबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या जमावानं त्यांना बळजबरीने गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.
- वांद्रे येथील कलानगरजवळच्या सिग्नलवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजवरुन सगळ्या प्रकार समोर येऊ शकतो, असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
- या हल्ल्याचा राजकीय सूत्रधार कोण आहे? याचा तपास करण्यात यावा आणि 307,149,506(2)आयपीसी 34 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे.
इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 | 104.77 |
दिल्ली | 105.41 | 96.67 |
चेन्नई | 110.85 | 100.94 |
कोलकाता | 115.12 | 99.83 |
हैद्राबाद | 119.49 | 105.49 |
कोलकाता | 115.12 | 96.83 |
बंगळुरू | 111.09 | 94.79 |
शहरं | पेट्रोलचे दर (प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 रुपये | 104.77 रुपये |
पुणे | 120.60 रुपये | 103.28 रुपये |
नाशिक | 120.02 रुपये | 102.73 रुपये |
परभणी | 123.51 रुपये | 106.08 रुपये |
औरंगाबाद | 120.63 रुपये | 103.32 रुपये |
कोल्हापूर | 120.64 रुपये | 103.35 रुपये |
नागपूर | 121.03 रुपये | 103.73 रुपये |
IOCL, Petrol-Diesel Price Stable in India Today 23 April 2022 : राष्ट्रीय बाजारात आज (शनिवारी) 23 एप्रिल 2022 रोजी सलग सतराव्या दिवशी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशभरात 7 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) च्या लेटेस्ट दरांनुसार, आज देशातील सर्व शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
Navneet Rana vs Shivsena : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर आज सकाळी 9 वाजता हनुमान चालिसा पठण करणारच अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे मातोश्रीसमोर राणा विरुद्ध शिवसेना सामना रोखण्याचं आव्हान पोलिसांवर आहे. एकीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेरच फिल्डिंग लावलीय. तर दुसरीकडे मातोश्री निवासस्थानाबाहेर कालपासून शिवसैनिकांनी जागता पहारा ठेवला आहे. रात्रभर शिवसैनिक राणांच्या निवासस्थानाबाहेर आणि मातोश्रीबाहेर बसून होते. तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
'मातोश्री' समोर राणा दाम्पत्यांचं हनुमान चालिसा पठण
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालिसा पठण करणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता ते मातोश्री समोर येणार आहेत. त्यामुळे मातोश्रीजवळ शिवसैनिकांनी एकच गर्दी केली असून या परिसरात तणावग्रस्त वातावरण आहे. मातोश्रीसमोर शिवसैनिकांची गर्दी वाढली आहे.
राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आज काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, त्याच्या प्रतिक्रिया
भाजप नेते मोहित कंबोज 'मातोश्री' बाहेरुन जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मोहित कंबोज हे 'मातोश्री' बाहेर उभे राहून रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या हल्ल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. शुक्रवारी रात्री साड नऊ वाजता मोहित कंबोज हे कलानगर परिसरातून जात होते. मोहित कंबोज यांची गाडी दिसल्यानंतर शिवसैनिकांनी त्यावर हल्ला केला. शिवसैनिकांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार असल्याची माहिती मोहित कंबोज यांनी दिली आहे.
कोल्हापूरात राष्ट्रवादीचा मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज कोल्हापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे.
देशभरातील 1500 मौलवी आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला-
धार्मिक तेढ वाढवणारी तसेच सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत असल्याने देशातील जवळपास 1500 मुस्लिम मौलवी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. तसेच पैगंबर बिल संदर्भात देखील चर्चा करणार आहेत.
स्थळ - अजमेरी मस्जिद हॉल, अनीस कंपाउंड, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, साकीनाका,
वेळ - रात्री 10 वाजता
अमित शाह यांचा बिहार दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बिहार दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेणार नसल्याने त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जातीय जनगणना तसेच विशेष राज्याचा दर्जा आणि इतर काही मुद्द्यांवरुन भाजप आणि नितीश कुमार यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात येतंय.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सार्वजनिक बँकांसोबत बैठक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या वर्षीचा अर्थसंकल्प मांडल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे.
आज दोन सामने
आजचा पहिला सामना गुजरात-कोलकाता दुपारी साडे तीन वाजता, तर दुसरा बंगळुरु-हैदराबादमध्ये संध्याकाळी साडे सात वाजता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -