Maharashtra Breaking News 22 July 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नाही: एकनाथ शिंदे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 22 Jul 2022 10:43 PM
जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट.. जयंत पाटलांनी हजर राहून वारंट रद्द करत केला जामीन मंजूर..
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षापुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना वारंट काढले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे. 

  जिल्हा परिषद निवडणूकीवेळी आमदार जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मारला. मुंबई पोलिस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात आ.जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील , शरद गायकवाड , मोहन गायकवाड , राजेंद्र भासर , विलासराव शिंदे , जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने आ.जयंत पाटील यांना वारंट काढले होते. आज दुपारच्या सुमारास आ.जयंत पाटील इस्लामपूर न्यायालयात हजर राहिले होते.जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे..
सातारा आणि सांगलीला नवे जिल्हाधिकारी 

डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची देखील बदली झाली आहे. त्यांच्या जागी रुचेश जयवंशी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.  

Eknath Shinde : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नाही: एकनाथ शिंदे

दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली असून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी कोणतीही अडचण नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही सूचना दिली नाही, मंत्रिमंडळाच्या विस्तारावर कोणताही निर्बंध लावण्यात आला नाही असंही ते म्हणाले. तसेच त्यावेळी नक्षल्यांच्या धमक्या येत होत्या, सुरक्षा देणं किंवा वाढवणं हे गृहखात्याचं काम, त्यावर मला काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नाशिकच्या पेठसह त्र्यंबक तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के

नाशिकमधील पेठसह त्र्यंबक तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेल्या खरपडी, नाचलोंढी, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैराईपाली  या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 


नाशिकपासून 40 किमी अंतरावर काल 2.4  रिश्टर स्केलचा धक्का बसला होत. याच परिसरात आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तीन रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद नाशिक मेरी येथील भूकंप मापक यंत्रावर करण्यात आलेली आहे.

जि.प., पं.स. निवडणुकीचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दि.आज दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि.२७ जून रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दि.१३ जुलै रोजीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया स्थगिती केली होती.  त्यामुळे आरक्षण सोडतीच्या सुधारित प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. आता जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांनी तर पंचायत समिती स्तरावरील आरक्षणाची सोडत तहसीलदारांनी करावी. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांपेक्षा कमी नसलेल्या दर्जाचा अधिकारी नेमावा, अशा सूचना आहेत.

सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार

सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश फेऱ्यांचा विस्तृत वेळापत्रक सोमवार पर्यंत जारी केले जाणार आहे. दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर आता तातडीने ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश फेऱ्या संदर्भात सोमवारपर्यत वेळापत्रक जाहीर केलं जाईल. राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर होऊन एक महिना झाला तरी देखील अकरावी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया रखडली होती.  सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. त्या दरम्यान राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भाग २ सुद्धा २२ जुलै पासून विद्यार्थी ऑनलाइन भरत आहेत.  

एकनाथ शिंदेंचा  दणका.. नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली

एकनाथ शिंदेंचा  दणका.. मातोश्रीचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांची बदली..


शिंदेंच्या विश्वासातील डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांची नाशिक मनपा आयुक्त पदावर नियुक्ती 


पुलकुंडावर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत

Nagpur Covid Update : जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढताच, सक्रिय रुग्णसंख्या 1417

नागपूरः कोरोनाची बाधा झाल्यानंतर अस्वस्थ रुग्णांवर रुग्णालयात भरती करण्याची वेळ येत असून सध्या 66 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात 219 नव्या बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 155 आणि ग्रामीणमधील 64 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 188 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीने 1417चा टप्पा पार केला असून भविष्यात चाचण्या वाढविल्यास दररोज हजार बाधितही समोर येऊ शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आज 2644 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तर 490 जणांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पत्नीसाठी रेशमी इरकल साडी भेट

Solapur News : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पत्नीसाठी रेशमी इरकल साडी पाठवण्यात आली. काही दिवसापूर्वी आमदार शहाजी पाटील यांचं एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये बायकोला लुगडं घेण्याची ऐपत नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं होतं. एका आमदाराला दीड ते पावणे दोन लाख रुपये मानधन असतानाही त्यांच्या पत्नीला साडी घेता आली नाही. त्यात आज अजित पवार यांचे वाढदिवस आहे. त्यामुळे एका भावातर्फे बहिणीला साडी भेट या उद्देशाने आम्ही साडी पाठवत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

सोलापुरात अनोख्या पद्धतीने अजित पवार यांचा वाढदिवस साजरा, नागरिकांना भेट म्हणून चक्क खड्डे बुजवले

Solapur News : माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस सोलापुरात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना भेट म्हणून चक्क खड्डे बुजवण्यात आले. पावसामुळे सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. शहरातील मरिआई चौक परिसरातील खड्डे बुजवण्यात आले. 

कोकण रेल्वेवरील मोठी दुर्घटना टळली, सावंतवाडीमध्ये मालवाहू गाडीचे चार डबे सुटले

Sindhudurg News : कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने कोळसावाहू मालगाडीचे चार डबे सुटून सावंतवाडी स्टेशनवर राहिले. सावंतवाडी स्टेशनपासून अलिकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या घटनेनंतर मालवाहू गाडी थांबवण्यात आली. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डबे जोडून गाडी पूर्ववत केली. सुदैवाने कोकण रेल्वे मार्गावरील मोठी दुर्घटना टळली आहे. तर सध्या कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

CBSE दहावीचा निकाल जाहीर, आसा पाहा निकाल

CBSE दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. 

Ramdas Tadas : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भाजपचे वर्चस्व ! खासदार रामदास तडस यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज

नागपूरः अनेक दशकांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यप्रणालीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने ही परिषद तडकाफडकी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातील कुस्ती नागरिकांनी बघितली आणि सत्तांतर झाले. आता भारतीय कुस्ती महासंघाच्या हलचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) आणि अर्जुनवीर पै. काका पवार (Kaka Pawar) यांनी आज नागपुरातील जवाहर वसतीगृह येथे अर्ज भरला. राज्यातील 45 जिल्हा तालीम संघांपैकी 33 तालीम संघांचा तडस, पवार गटाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. या पाठिंब्याच्या जोरावर या निवडणूका बिनविरोध  करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे.

उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीचं जगभरातून कौतुक, महाराष्ट्राला चांगले मुख्यमंत्री मिळाले होते, मनमाड येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे लाईव्ह

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत  गरजू मुलींना सायकलीचे  वाटप
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत गरजू मुलींना 17 सायकली वाटप करण्यात आल्यात. आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचने हा उपक्रम राबवत गरजू मुलींना सायकल वाटप केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पोस्टर न लावण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचने हा गरजू मुलींना सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेतला. यासाठी समाजातील गरीब कुटूंबातील मुलींची निवड करण्यात आली आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या सायकल मुलींना वाटप केल्या. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरकडून तिकीटांच्या बुकिंगला सुरुवात 

राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरकडून तिकीटांच्या बुकिंगला सुरुवात, कमर्शिअल फ्लाईट्स करीता बुकिंगची सुरुवात, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि कोचीकरीता तिकीट विक्री सुरु, ७ आॅगस्टपासून अकासा एअरचं पहिलं विमान उडणार, मुंबई आणि अहमदाबादकरीता पहिले सुरुवात नंतर १३ आॅगस्टनंतर बंगळुरु आणि कोचीसाठी देखील कमर्शिअल फ्लाईट्स, इतर फ्लाईट्सच्या तुलनेत अकासाकडून ५ ते ७ टक्के स्वस्तात तिकीटांची बुकिंग, सर्व फ्लाईट्सच्या तिकीटांच्या विक्रीसाठी बुकिंग उपलब्ध

Jungly Mushroom : मटनापेक्षाही महाग मशरुम! गोंदियाच्या बाजारपेठेत महागड्या 'जंगली मशरुम'ची चर्चा

https://marathi.abplive.com/news/gondia/jungly-mushroom-for-sale-in-gondia-market-huge-demand-for-jungly-mushroom-from-customers-1082207

LIVE : 'शिवसैनिकांमुळंच शिवसेना उभी राहिली'; शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर लाईव्ह

अहमदनगर : शिवसेनेच्या माजी महिला आघाडी प्रमुख स्मिता अष्टेकर पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगरमधील शिवसेनेच्या माजी महिला आघाडी प्रमुख स्मिता अष्टेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांनी शिवसेनेतील बंडखोर नगरसेवकांसह मुख्यमंत्री शिंदेंना काळे फसण्याचा इशारा दिला होता. नगर दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेंचा मुलगा योगीराज गाडेंनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांनाही काळे फसण्याचा इशारा दिला होता. 

पुणे : 16 व्या मजल्यावरून पडून महिला कामगाराचा मृत्यू; कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतीच्या 16 व्या मजल्यावरून डक्टमध्ये पडून एका महिला कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


Pune Crime News:16 व्या मजल्यावरून पडून महिला कामगाराचा मृत्यू; कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?https://t.co/GXYsFnGrtd#pune





शिवसेनेचे बंडखोर खासदार हेंमत गोडसे शिंदे नाशिकमध्ये दाखल

शिवसेनेचे बंडखोर खासदार हेंमत गोडसे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल होत असून इगतपुरीच्या घाटणदेवी मंदिराजवळ थोड्याच वेळात त्यांचे स्वागत होणार आहे.

हेमंत गोडसेच्या मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार

शिवसेनेचे बंडखोर खासदार हेमंत गोडसेंना शिवसैनिकांचं आव्हान दिलं आहे. हेमंत गोडसेच्या मतदारसंघातील कार्यकर्ते आज मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शिंदे गटात सामील झालेले हेमंत गोडसे हे आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत. हेमंत गोडसे शक्ती प्रदर्शन करत असताना दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातील शिवसैनिक मातोश्रीवर जाणार आहेत. हेमंत गोडसे यांचा मतदारसंघातील शिवसैनिक शिवसेनेसोबत असल्याचा संदेश देण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.





भंडाऱ्यात विजेच्या खांबावरील पथदिवे लावताना धक्का लागल्यामुळे कंत्राटी लाईनमनचा मृत्यू, नवेगाव/धुसाळा इथली घटना

Bhandara News : विजेच्या खांबावरील पथदिवे लावताना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने कंत्राटी लाईनमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली.  मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव/धुसाळा इथे हा प्रकार घडला. सुंदरलाल यादोराव कटरे (वय 32 वर्ष रा. नवेगाव) असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मृतक हा सरपंच याच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतीचे रोजंदारीवर पथदिवे लावण्याचे काम करायचा. मात्र सरपंच आणि मृतक हे कोणत्याही प्रकारचे महावितरण विभागाला सूचना न देता मनमर्जीप्रमाणे काम विद्युत विभागाचे करायचे. मृतक नेहमीप्रमाणे ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा कार्य वीज प्रवाह सुरु असतानाच अनेक दिवसांपासून करत होता. मात्र आज पथदिवे लावण्याचे हे काम करत असतानाच त्याला विजेचा जबर धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच गावात या हळहळ व्यक्त केली जात आहे. सरपंच यांच्या हलगर्जीपणामुळे युवकांचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.

पुणे : वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक

पुणे शहर परिसरात वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करून हडपसर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने या गाड्या हडपसर, कोंढवा भारती, विद्यापीठ, सासवड या भागातून चोरल्या असल्याचे समोर आलं आहे.आकाश मनोहर गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या आरोपीने अजून कुठे अशा प्रकारच्या गाड्या चोरी केल्या आहेत का याचा तपास हडपसर पोलीस करत आहेत.





पिंपळगाव टोलनाक्यावर शिवसैनिकांची सुहास कांदे विरोधात घोषणाबाजी

पिंपळगाव टोलनाक्यावर शिवसैनिकांची सुहास कांदे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सुहास कांदे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केल्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे : एमआयटी कॉलेजबाहेर मद्य पिण्यासाठी आमंत्रित करणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई

पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्याना मद्य पिण्यासाठी आमंत्रित करणारे फ्लेक्स व्हायरल झाले होते. लोणी येथील कॉलेजच्या गेट जवळ विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर म्हणत "द टीपसी टेल्स" या हॉटेलचे फ्लेक्स लावण्यात आले होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आय कार्डवर एका विशेष किमतीत कितीही ड्रिंक्स पिण्याची सार्वजनिक ऑफर असल्याची जाहिरात देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दारू पिण्यासाठी खास सवलत देत बेकायदेशीर जाहिरात करण्यात आली होती. पोलीस आणि उत्पादन शुल्ककडून कारवाई व्हावी एशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोस्टर व्हायरल झाल्यानंतर काही वेळात ते काढून टाकण्यात आलं आहे.



आधी पुढे ढकललेल्या नगरपरिषदांत थेट नगराध्यक्ष निवड होणार, 92  नगरपरिषदा आणि ४ नगर पंचायतीत थेट नगराध्यक्ष निवड

आधी पुढे ढकललेल्या नगरपरिषदांत थेट नगराध्यक्ष निवड होणार, 92  नगरपरिषदा आणि ४ नगर पंचायतीत थेट नगराध्यक्ष निवड

सोलापूर :

मोहोळ तालुक्यातील वटवटे गावातील एका शेतात ऊसाच्या पिकामध्ये केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांच्या कारवाईत जवळपास 4 किलो वजनाचे गांजासह एकूण 4 लाख 41 हजार 300 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सदाशिव दत्तू ढोबळे असे आरोपी शेतकऱ्याचे नाव असून कामाती पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली होती. पोलिसांनी या संदर्भात पाहणी केली असता शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी लहान मोठी गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. कामती पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. या संदर्भात एनडिपीएस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





रिक्षा भाडे वाढ करा अन्यथा 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून रिक्षा बंद, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेचा इशारा 1 ऑगस्ट रोजी कल्याण आरटीओ कार्यालयावर मोर्चा धडकणार

Kalyan News : रिक्षा भाडे वाढ करा अन्यथा 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून रिक्षा बंद पुकारु, असा इशारा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेने दिला आहे. तसंच 1 ऑगस्ट रोजी कल्याण आरटीओ कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली रिक्षा भाडे वाढ गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी दोन रुपयांची वाढ देण्यात आली. मागील वर्षी ही भाडे वाढ देण्यात आली असली तरी दुसरीकडे वर्षभरात सीएनजीच्या दरात तब्बल 28 रुपयांची दरवाढ झाली आहे. त्याचबरोबर रिक्षाची देखभाल दुरुस्ती, इन्शुरन्स आदींमध्ये वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने रिक्षा चालकांना दैनंदिन खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागते. एकूणच वाढलेल्या किमती पाहता रfक्षा भाड्यात वाढ करा या मागणीसाठी मागील तीन महिन्यापासून रिक्षा संघटनांकडून पाठपुरावा सुरु आहे. मात्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 31 जुलैच्या रात्रीपासून कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेकडून रिक्षा बंदचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यासह एमएमआर रिजनमधील रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच कल्याण आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 31 जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रिक्षा बंदच राहणार, असाही इशारा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर आणि इतर पदाधिकाऱ्याकडून देण्यात आला आहे.

Pune News : पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी आमंत्रित करणारे फ्लेक्स व्हायरल

Pune News : पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी आमंत्रित करणारे फ्लेक्स वायरल, लोणी येथील कॉलेजच्या गेट जवळ विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर म्हणत "द टीपसी टेल्स" या हॉटेलचे फ्लेक्स, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आय कार्ड दाखवा आणि एका विशेष किमतीत कितीही ड्रिंक्स पिण्याची सार्वजनिक जाहिरात अशी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दारू पिण्यासाठी खास सवलत देत बेकायदेशीर जाहिरात करण्यात आली आहे. पोलिस आणि उत्पादन शुल्ककडून कारवाई व्हावी सामाजिक कार्यकर्त्यांची होती. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी देवीप्रसाद शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे पोस्टर वायरल झाल्यानंतर काही वेळात ते काढून टाकण्यात आलं. 

Chandrapur News : वाघासाठी थांबविण्यात आलं महामार्गावरील ट्रॅफिक
वाघासाठी महामार्गावरील ट्रॅफिक थांबविण्यात आल्याची अनोखी घटना चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळाली आहे. नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथील ही घटना असून वनविभागाने ट्रॅफिक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी रस्ता करून दिला. परवा दुपारी एक वाघ रस्त्याच्या शेजारी बसला होता मात्र रस्त्यावरील भरधाव आणि अवजड वाहतुकीमुळे त्याला रस्ता क्रॉस करता येत नव्हता म्हणून वनविभागाने दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी वेळ दिला. सायगाटा परिसरातील जंगलात सध्या एक वाघीण आणि तिच्या दोन पिल्लांचं बस्तान आहे. या महामार्गावरील सायगाटा येथील हनुमान मंदिराजवळून या वाघांचा भ्रमणमार्ग आहे. त्यासाठी या वाघांना हायवे ओलांडावा लागतो. गेल्या एक महिन्यात अनेक वेळा या भागात लोकांना वाघांचं दर्शन झालंय.
रिक्षा भाडे वाढ करा अन्यथा 31 जुलै मध्यरात्रीपासून रिक्षा बंद, कोकण विभाग  रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेचा इशारा 

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली रिक्षा भाडे वाढ गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आली  पहिल्या टप्प्यासाठी 2 रुपयांची वाढ देण्यात आली .मागील वर्षी ही भाडे वाढ देण्यात आली असली तरी दुसरीकडे वर्षभरात सी एनजीच्या दरात तब्बल २८ रुपयांची दरवाढ झाली आहे . त्याचबरोबर रिक्षाची देखभाल दुरुस्ती , इन्शुरन्स , आदींमध्ये वाढ झाली आहे .महागाई वाढल्याने रिक्षा चालकांना दैनंदिन खर्चाचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागते .एकूणच वाढलेल्या किमती पाहता रीक्षा भाड्यात  वाढ करा या मागणीसाठी मागील 3 महिन्यापासून रिक्षा संघटना कडून पाठपुरावा सुरू आहे मात्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. . 31 जुलैच्या रात्रीपासून  कोकण विभाग  रिक्षा टॅक्सी महासंघ संघटने कडून रिक्षा बंदचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यासह एमएमआर रिजन मधील  रिक्षा चालक या बंद मध्ये सहभागी होणार आहेत .  .तसेच कल्याण आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे  .   31 जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रिक्षाबंदच राहणार असाही इशारा कोकण विभाग  रिक्षा टॅक्सी महासंघ  संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर व इतर पदाधिकाऱ्याकडनं देण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


22nd July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 22 जुलै याच दिवशी भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली होती. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 22 जुलैचे दिनविशेष.


1923 : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी 10,000 हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. 


1925 : इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म. 


गोविंद तळवलकर यांचं संपूर्ण नाव गोविंद श्रीपाद तळवलकर. हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते.


1908 : साली भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.


2003 : साली अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची मुले मारली गेली.


1965 : साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि आशा संस्थेचे एक संस्थापक आणि सदस्य संदीप पांडे यांचा जन्मदिन.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.