Maharashtra Breaking News 22 April 2022 : पुणे : अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, भाजप युवा मोर्चाचं विश्रामबाग पोलिसांना पत्र
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Jalna News Update : जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर 74 हजार रूपयांची लूट केल्याची घटना समोर आली आहे. दावलवाडी गावाजवळील एका पेट्रोल पंपावर दुपारी एकच्या सुमारास अचानक एक व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवर आला. त्याने पेट्रोल भरल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांच्या हातातील 74 हजारांची रक्कम पळवली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात त्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी पोहोचणार आहेत. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Ajit Pawar : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे. त्याचा इम्पेरियल डेटा पूर्ण होईपर्यंत, राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय होतोय, असे अजित पवार म्हणाले.
Nanded News Update : नांदेड येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात गोंधळ उडाला आहे. पुतळा उभारणीसाठी ज्या संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्यांना कार्यक्रमात स्थान न मिळाल्याने लिंगगायत समाजाच्या अनेक संघटनांकडून अनावरणास विरोध करण्यात येत आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केदार जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. परंतु, त्याआधी कार्यक्रम स्थळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत गोधळ घातला आहे.
पुतळा उभारणीसाठी ज्या संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्यांना कार्यक्रमात स्थान न मिळाल्याने लिंगगायत समाजाच्या अनेक संघटनांचा विरोध करण्यात येतोय. सदर कार्यक्रम काँग्रेस हायजॅक करत असल्याचा सामाजिक संघटनां आरोप करत आहेत. नांदेड येथे महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळयाच्या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांचा गोंधळ चालू असून हा लोकार्पण सोहळा केदार जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. दरम्यान कार्यक्रम स्थळी आंदोलक संघटनांचा प्रचंड घोणबाजी करत गोधळ सुरू झालाय.
नागपुरात काल संजय राऊत यांच्या सभेसाठी चोरीची वीज वापरल्यावर शिक्कामोर्तब.... महावितरणने संबंधित सभेसाठी डेकोरेशन चे काम करणाऱ्या व्यक्तीवर चोरीची बीज घेतल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली..
सिल्व्हर ओक हिंसक आंदोलन प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते आणि 115 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
सदावर्ते यांना 50 हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार अनिवार्य
तर 115 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन एसटी कर्मचाऱ्यांना गिरगाव दंडाधिकाऱ्यांकडून न्यायालयीन कोठडी . 19 एप्रिल रोजी आरोपी संदीप गोडबोले, अजित मगरे आणि मनोज मुदलीयार यांना 22 एप्रिलपर्यंत अधिक तपासासाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.सोमवारी या तिन्ही आरोपींचा जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यात येणार आहे. सोबतच इतर ११५ जणांचा देखील जामीन मंजूर करण्यात आलाय
Wardha News Update : वर्ध्यात ब्राह्मण समाजाने मूक मोर्चा काढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी या मोर्तातून करण्यात आली. यावेळी ब्राम्हण समाजातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
Mumbai News : राणा दाम्पत्य यांनी पोलिसांना माहिती देताना कायदा आणि सुव्यवस्था कुठले परिस्थितीत बिघडू देणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. आजचा दिवस त्यांचा मुंबईतच मुक्काम असणार आहे.जे राणांचे कार्यकर्ते अमरावती आणि मुंबईत आले आहेत. त्यांनासुद्धा आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नका असं सांगितलं आहे. यासंदर्भात थोड्याचवेळात राणा दाम्पत्य माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
Amravti News : आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते काल दुपारीच सहा वाहनं करून मुंबईसाठी निघाले. तर आजही काही कार्यकर्ते रेल्वेने मुंबई साठी निघाले. अजून अनेक कार्यकर्ते आज सायंकाळी रेल्वेने मुंबईसाठी रवाना होतील. राणा दाम्पत्य हे सकाळी नागपूरवरुन विमानाने निघून सकाळीच मुंबईत दाखल झाले.
Beed News : परळीतील हिंदुधर्मीय नागरिक आणि ब्राह्मण समाजानं आज पोलीस ठाण्यात ठिय्या धरला असून अमोल मिटकरी यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. परळी शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येनं मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आलं. या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचं निवेदन देण्यात आलं. या निवेदनावर कारवाई करू, असं आश्वासन पोलिसांनी दिले मात्र मात्र जोपर्यंत अधिकृतपणे एफआयआर नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून आम्ही जाणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतले आहे.
सांगली : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी सातत्याने वाढतच आहेत. त्यांच्याविरोधात आणखी एक तक्रार नोंदवण्यात आली आहे. आता सांगलीतील मिरज पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा समाजाबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी ही फिर्याद दिली आहे.
नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली, 'या प्रकरणी सध्या तपास सुरू असलेल्यानं हस्तक्षेप करणं योग्य नाही', सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी
Phone Tapping Case : पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ, फोन टॅपिंगमध्ये बोगस नावं वापरल्याची सूत्रांची माहिती, संजय राऊत यांचा एस. रहाटे, तर खडसेंचा खडासने असा उल्लेख
Nashik News: नाशिक : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाच विजेच्या लपंडावचा फटका; खाजगी कार्यक्रमात बोलत असतानाच वीज पुरवठा दोन वेळा झाला खंडित, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ
पुणे : पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली. परिणामी पीएमपीच्या ताफ्यातील सहाशे बसची वाहतूक बंद झाली. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणं आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये कारवाई करण्याची नोटीस पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे. पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गांवर धावतात.
पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली.
परिणामी पीएमपीच्या ताफ्यातील सहाशे बसची वाहतूक बंद...
थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणं...
अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे होणार नुकसान...
ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये कारवाई करण्याची नोटीस पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली....
पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गांवर धावतात.....
Nashik News : अमोल मिटकरींविरोधात उपनगर पोलिसात तक्रार, महिला आणि ब्राह्मण समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं तक्रार
नाशिकच्या साधू महंत, ब्राह्मण समाजाने केली तक्रार
दोन दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विविध ब्राह्मण संघटनाची आज दुपारी बैठक, बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढील दिशा
Nashik News : अमोल मिटकरींविरोधात उपनगर पोलिसात तक्रार, महिला आणि ब्राह्मण समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं तक्रार
नाशिकच्या साधू महंत, ब्राह्मण समाजाने केली तक्रार
दोन दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विविध ब्राह्मण संघटनाची आज दुपारी बैठक, बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढील दिशा
Amravati Breaking News : आमदार रवी राणांना मुंबईला जाऊ देणार नाही, अमरावती शिवसेनेचा इशारा...
रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल..
सायंकाळी 5 वाजता पासूनच शिवसैनिक बडनेरा रेल्वे स्थानकावर हजर राहतील..
रात्री 8 वाजता राणा दाम्पत्य आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठणासाठी निघणार मुंबईला...
राणा दांपत्याला रोखण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आक्रमक...
Aurangabad Crime News : औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे, मध्यरात्री दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण ग्रामीण,कल्याण पूर्व ,डोंबिवली पूर्वेकडील काही परिसरातमध्ये पहाटे 4 वाजल्या पासून वीज पुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. महापारेषणच्या पाल ते पलावा या अतिउच्चदाब उपकेंद्राला जोडणाऱ्या वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणकडून बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आता बिघाड दुरुस्त झाला असून वीज पुरवठा सुरळीत झाला आहेय
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी आज शेवटची तारीख
आज एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनानंतर कामावर हजर राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शेवटची तारीख आहे. 93 हजार एसटी कर्मचाऱ्यांना पैकी 70 हजारांच्यावर एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. 93 हजार एसटी कर्मचाऱ्यांना पैकी 70 हजारांच्यावर एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
पोल-खोल रथावर झालेल्या दगडफेकीत प्रकरणी भाजपने पुन्हा एकदा 24 तासाचा अल्टिमेटम
पोल-खोल रथावर झालेल्या दगडफेकीत प्रकरणी भाजपने पुन्हा एकदा 24 तासाचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आज पोलिसांच्या वतीने प्रमुख आरोपींना अटक केली जाते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. 24 तासांपर्यंत आरोपींना अटक केली नाही तर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपची काय रणनीती असेल हे बघावं लागेल.
गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार
भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अशातच गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मंत्री नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी
मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. मलिकांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. गुरूवारी वेळेअभावी सुनावणी झाली नाही.
हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईला रवाना होणार
खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यासाठी राणाा दांमपत्य आज रात्री 8 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला रवाना होणार आहे.
जहांगीरपुरीत झालेल्या हिंसाचारानंतर आज नमाज पठण
जहांगीरपुरीत झालेल्या हिंसाचारानंतर आज नमाज पठण करण्यात येणार आहे. यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. दोन्ही समाजाच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच जहांगीरपुरीतील जामा मशिदीने आज नमाज पठणासाठी लहान मुलांना न आणण्याचे आवाहन केले आहे.
बारामुल्ला खोऱ्यात जहाल दहशतवाद्यासह पाच जणांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी विरोधी कारवाईमध्ये झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाने एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा जहाल दहशतवादी युसूफ दार उर्फ कांतरू यांचा समावेश आहे. ही चकमक बारामुल्ला परिसरात झाली असून सुरक्षा दलाच्या यशामुळे एक मोठा कट उधळल्याचं सांगितलं जातंय. अजूनही तीन-चार दहशतवादी असल्याची माहिती समोर येत आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज भोपाळ दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज भोपाळ दौऱ्यावर आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हिमााचल दौऱ्यावर
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आजपासून दोन दिवस हिमाचल दौऱ्यावर आहेत. या वेळी एका रोड शो चे देखील आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यातील नड्ड यांचा हा दुसरा हिमाचल दौरा आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या भारत दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरीस जॉन्सन यांच्यत हैदराबाद हाऊस येथे बैठक होणार आहे. त्यानतर ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना देखील भेटणार आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी प्रशांत किशोर यांच्या उपस्थित बैठक
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या याचिकेवर सुनावणी
चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जामीन याचिकेवर झारखंड हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
DC vs RR : दिल्ली आणि राजस्थानमध्ये टक्कर
दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये शुक्रवारी आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 34 वा सामना होणार आहे. वानखेडे मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली आणि राजस्थान यांच्यात मुकाबला होणार आहे. दिल्लीने आतापर्यंत सहा सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर राजस्थानने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि राजस्थान संघाने आपल्या मागील सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते. वानखेडे मैदानावर रंगणारा दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना रोमांचक होणार यात कोणतेही दुमत नाही.
आज इतिहासात
1915 - पहिल्या महायुद्धावेळी जर्मनच्या सेनेने पहिल्यांदा विषारी गॅसचा वापर केला होता.
1921 - नेताजी सुभआषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसची उच्चभ्रू नोकरी नाकारली
1958 - एडमिरल आर डी कटारी भारतीय नौसनेचे पहिले भारतीय प्रमुख बनले
1970 -जगात पहिल्यंदा पृथ्वी दिवसाचे आयोजन करण्यात आले
1983 - अंतरिक्ष यान सोयूज टी-8 पृथ्वीवर परतले
2021 - युवा विश्व चॅपियनशिप फायनलमध्ये फायनलमध्यो पोहचलेल्या सात भारतीय महिलांनी सुवर्ण पदक जिंकले
2021 - ऐसी दिवानगी देखी नहीं कही, घुंगट की आड से या नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणऱ्या नदीम - श्रवण यांच्यापैकी श्रवण राठोड यांचे निधन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -