Maharashtra Breaking News 21 May 2022 : मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार!
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नंदुरबारच्या ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक, बोलरो आणि दुचाकीमध्ये विचित्र अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वराचा जागेवर मृत्यू झाला. या अपघातानंतर गावकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन केलं. सध्या प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांची सामाजिक ऐतिहासिक विषयांवर प्रदिर्घ चर्चा झाली.
Uddhav Thackeray : मुंबईत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब रोज व्यंगचित्र काढायचे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
औरंगाबाद बजाजनगर अष्टविनायक रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तीन महिने काम करूनही पगार न दिल्याने ही तोडफोड करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या तालेरा रुग्णलयात जनरेटरला लागली आहे. ही घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. सकाळ पासून वीज नसल्याने जनरेटरवर रुग्णालयाच कामकाज सुरू होतं. जनरेटर ची बॅटरी तापल्याने आग लागल्याचं अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
केंद्र सरकार केवळ लोकप्रियतेच्या हव्यासापोटी पेट्रोल डिझेल दरात कपात करत आहे. याचा फायदा सर्व सामान्यांना होणार आहे. पण डीलरचे काय? दर कपात करताना शासनाने किमान पूर्व कल्पना देणे किंवा चर्चा करणे अपेक्षित आहे.पण तसे झाले नाही. यावरून एखादे आंदोलन देखील होऊ शकतं, असा इशारा फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिला आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे ब्राम्हण संघटनांची बैठक संपली. यावेळी त्यांनी ब्राम्हण संघटनांच्या 40 जणांसोबत संवाद साधला. या बैठकीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु आहे.
LPG Cylinder : केंद्र सरकारचा देशवासियांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोल 9 रू.50 पैशांनी आणि डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार आहे.
पेट्रोल डिझेल आता स्वस्त होणार आहे. पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात येणार आहेत.
ब्राम्हण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचं शरद पवारांनी आश्वासन दिलं आहे, असे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र यासाठी तेरा अटी आणि शर्थी घालण्यात आलेल्या आहेत. ही सभा उद्या सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा मंच सभागृहात होणार आहे.
Maharshtra News : मागासवर्गीय संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापेक्षा सामाजिक न्याय मंत्र्यांना लग्नात हजर राहणे महत्वाचे वाटते. अशी टीका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निसर्ग मंगल कार्यालयात दाखल झाले आहेत. ब्राम्हणविरोधी असल्याच्या आरोपानंतर शरद पवार हे ब्राम्हण संघटनांशी संवाद साधणार आहेत. ब्राम्हण संघटनांच्या भेटीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे, ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपालसिंग असे या मुलीचे नवा असून एकतर्फी प्रेमातून हा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महापुरात उध्दवस्त होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने उपाययोजना कराव्यात. पिकांचा विमा काढून त्याचे पैसे सरकारने भरावे. तर काही रक्कम शेतकरी भरतील. पण या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढे यावे, असे राजू शेट्टी म्हणाले.
मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. आज नैऋत्य मोसमी वाऱ्यांची कोणतीही प्रगती बघायला मिळाली नाही आहे. येत्या 27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. मात्र, त्याआधी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. केरळमध्ये सध्या अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना बघायला मिळत आहे. मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अपेक्षित उंची न गाठल्याने अद्यापही मान्सून आल्याची घोषणा नाही. मान्सून आल्याचे सर्व मापदंड पूर्ण केल्यानंतरच हवामान विभागाकडून केरळात दाखल झाल्याची घोषणा होणार आहे.
Nagpur : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतात पूर्णता शांतता आहे. गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाने भारतात आणलेल्या लांगूलचालनेच्या पद्धतीमुळे समाजामध्ये दुफळी निर्माण झाली होती. आता ती दूर होऊन आपण सगळेच भारतमातेचे पुत्र आहोत. अशा पद्धतीची भावना देशांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. तसेच नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना त्यांनी नवाब मलिक यांचे डी गॅंगशी असलेले संबंध अतिशय गंभीर आहेत. पण तरीही त्यांचे मंत्रिपद टिकवण्यासाठी महाविकास आघाडी धडपड करत आहे. मागील दोन वर्ष ओबीसीचे आरक्षण टिकवण्यासाठी धडपड करून ओबीसी डेटा तयार केला असता तर ओबीसींना आज आरक्षण गेले नसते.
लाल महालातील नृत्य प्रकरणानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे मनपा प्रशासनाने लोकांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
लाल महालात लावणीचे शूटींग करण्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
औरंगाबाद शहरात गेल्या 24 तासात दोन खुनाच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींचीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये कॉलेज जवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे. पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहेत.
Maharashtra News : शरद पवार यांच्या निमंत्रणानंतर ब्राम्हण संघटनांमध्ये फूट पडल्याच दिसत असून ब्राम्हण महासंघ आणि परशुराम सेवा संघानंतर राज्यातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय बहुभाषीय ब्राम्हण महासंघाने पवारांच्या सोबत चर्चा करन्यास विरोध केलाय. शरद पवार यांच्या भेटीची ही वेळ नसून त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केलेल्या वक्तव्याने ब्राम्हण समाजात रोष आहे. तसेच त्यांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्या बाबत अगोदर खुलासा करावा अशी भूमिका या संघटनेन घेतली आहे.
खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे पासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची शाखा जे. जे रुग्णालय मुंबई येथे आज द्वारसभा झाली. त्यात परिचारिका सभासदांना 23 मे पासून सुरू होणाऱ्या परिचारिकांच्या आंदोलनासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यात आले. बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. 23, 24, 25 मे 2022 पासून मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन आणि सर्व जिल्ह्यात 1 तास काम बंद आंदोलन आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच दिनांक 26 आणि 27 मे 2022 रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे 2022 पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात ययेणार आहे. यावेळी आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या जे.जे.रुग्णालय शाखेच्या परिचारिका सुद्धा सहभागी होणार आहेत. रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो. तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन
नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वाढत्या महागाई विरोधात आंदोलन केले असून महिलांना चूल आणि लाकूड देऊन केला केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाई कमी नाही झाली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Rajiv Gandhi : आज राजीव गांधी यांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांचं स्टोन आर्ट हे कलाकार सुमन दाभोलकर यांनी साकारले आहे.दगडावर सुंदर अशी राजीव गांधी यांची कलाकृती पहायला मिळतेय.
OBC आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समर्पित आयोगाने आजपासून राज्यातील विविध संस्था आणि नागरिकांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील कौन्सिल हॉलला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील नागरिकांची मते आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखालील समिती जाणून घेत आहे. हरकती आणि सुचना घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने या समितीच्या सदस्यांचे तीन गट करण्यात आलेत आणि लोकांच्या हरकती ऐकल्या जात आहेत. उद्या 22 मे ला ही समिती औरंगाबाद विभाग, 25 मे ला नाशिक विभाग तर 28 मे ला मुंबई विभागातील नागरीकांच्या हरकती आणि सुचना ऐकणार आहे.
Petrol Diesel Price Today 21 May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel New Rates) जाहीर केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग 45व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या किमती (Diesel) वाढल्या होत्या. त्यावेळी पेट्रोलचे दर 80 पैशांनी, तर डिझेलचे दर 80 पैशांनी वाढवण्यात आले होते.
भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. देशात आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात केलं जातं आणि त्यामुळे किरकोळ इंधनाच्या किमती Import Parity Rates वरुन ठरवल्या जातात. दरम्यान, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात मिळतंय. येथे 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर, आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये लिटर आहे.
Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे खाद्यतेल भरलेला टँकर उलटला. खाद्यतेल भरण्यासाठी लोकांची झुंबड,,चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा टँकर उलटल्याची माहिती. पोलीस घटनास्थळी दाखल. टँकर रस्त्याच्या कडेला उलटल्याने वाहतूक सुरळीत
Amit Shah : गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
Maharashtra News : शरद पवारांकडून (Sharad pawar) राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी (Brahman) असल्याची मतं सोशल मीडियावर (Social Media) काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांचा विरोध आहे. मात्र इतर संघटना चर्चेसाठी तयार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलय.
पार्श्वभूमी
आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
राज्यातील ब्राह्मण संघटनांना पवारांचं चर्चेचं निमंत्रण
शरद पवारांकडून (Sharad pawar) राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी (Brahman) असल्याची मतं सोशल मीडियावर (Social Media) काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांचा विरोध आहे. मात्र इतर संघटना चर्चेसाठी तयार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलय.
अमित शाह आज अरूणाचल प्रदेश दौरा
गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर हे आठवडाभर दिल्ली दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
राजीव गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त 'भारत जोडो' अभियान
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'भारत जोडो' अभियान भारतीय युवा कॉंग्रेसतर्फे राबवण्यात येणार आहे.
आज दिल्लीसाठी करो या मरो, समोर मुंबईचं आव्हान
आज आयपीएलमध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) हे संघ आमने-सामने उतरणार आहेत. या दोघांमध्ये दिल्लीसाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या खात्यावर 14 गुण असल्याने आज ते सामना जिंकल्यासच 16 गुणांसह पुढील फेरीत जाण्यासाठी पात्र ठरु शकतात. अन्यथा बंगळुरुचा संघ पुढील फेरीत जाऊ शकतो. बंगळुरुच्या खात्यावरही 16 गुणच असले तरी दिल्लीचा नेट रनरेट चांगला असून आजही एक चांगला विजय मिळवल्यास ते प्लेऑफममध्ये एन्ट्री घेतील. तर मुंबई इंडियन्सचं आव्हान याआधीच संपलं असलं तरी हंगामातील शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी ते मैदानात उतरतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -