Maharashtra Breaking News Live Updates : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Mar 2022 01:59 PM
नौदलाची त्रिकट युध्दनौका विजयदूर्गात

सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतीय नौदलाची त्रिकट युध्दनौका विजयदूर्ग बंदरात दाखल


सागरी सुरक्षेचा आढावा व स्थानिक मच्छिमार व शासकीय यंत्रणा समवेत सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा 


समुद्रात होणाऱ्या अनधिकृत हालचालीवर लक्ष ठेवणे तसेच पावसाळ्यात किंवा चक्रीवादळाच्या वेळी नौदलाची मदत कशी घ्यायची या संदर्भात माहिती दिली


उद्या सकाळी ही नौदलाची त्रिकट युध्दनौका मुंबईच्या दिशेने रवाना होणार

Bhiwandi Fire : भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. या आगीत संपूर्ण कारखाना आणि तयार कपडे जळून खाक झाले आहेत. या आगीचे नेमके कारण अजूनही समजू शकले नसून आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले असून या आगीची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दुसरा धक्का

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दुसरा धक्का


हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रश्नांत पाटील यांच्या नंतर दुसरा मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार


3 एप्रिलला लाखेवाडी बावडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य श्रीमंत ढोले राष्ट्रवादीत प्रवेश करणार


3 एप्रिलला लाखेवाडीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन. मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार

भाजपा प्रदेश सचिवपदी पावसकर यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्षपदी आ. जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा सोमवारी केली.
मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लीगल सेलचे महासचिव अखिलेश चौबे यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय या वेळी उपस्थित होते.

Goa CM : प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपद

नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत गोव्यामध्ये भाजप विजयी झाल्याने आता मुख्यमंत्री त्यांचाच होणार असून प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे.

Maharashtra Corona : राज्यात 99 नवे कोरोनाबाधित

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात 99  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,72,512 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात 180 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

harshvardhan patil : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दुसरा धक्का, चुलत बंधूंनंतर आणखी एक नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश 

harshvardhan patil : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुसरा धक्का दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांच्यानंतर लाखेवाडी बावडा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य श्रीमंत ढोले राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 3 एप्रिल 2022 रोजी लाखेवाडीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात ढोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. 

Nitesh Rane in Tuljapur : भाजप आमदार नितेश राणे यांनी सहपरिवार घेतलं तुळजाभवानीचे दर्शन

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सहपरिवार तुळजाभवानीचे दर्शन घेतले. राणे कुटुंबीय दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी नारायण राणे यांच्या पत्नी नीलिमा राणे, नितेश राणे हे सपत्निक उपस्थित होते. यावेळी राणे कुटुंबियांच्या हस्ते देवीची पूजा पार पडली.

Congress leader Navjot Singh Sidhu Case :रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंह सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवरील सुनावणी पुढे ढकलली

रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्या शिक्षेत वाढ करण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात शुक्रवार, 25 मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रकरणात, SC ने सिद्धूला फक्त ₹ 1000 च्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.मारहाणीत मृत झालेल्या वृद्ध गुरनाम सिंह यांच्या कुटुंबीयांनी शिक्षेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.





Nawab Malik News : नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 4 एप्रिलपर्यंत मुक्काम आर्थर रोड कारागृहातच

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 4 एप्रिलपर्यंत मुक्काम आर्थर रोड कारागृहातच


नवाब मलिक यांना जेलमध्ये बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्याची मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी


23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं केली होती अटक

Wardha News : वर्धा : पवनार परिसरातील ऊसतोड मजुरांमध्ये वाघाची दहशत, धास्तीने मजूर उसतोडणीस नकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

Wardha News : वर्धा : पवनार परिसरातील ऊसतोड मजुरांमध्ये वाघाची दहशत, धास्तीने मजूर उसतोडणीस नकार देत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

धान उत्पादकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, 600 कोटींची तातडीची मदत करण्यात येणार 

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची तातडीची मदत करणार आहे. धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना बोनस देण्याची सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी  केली होती. मात्र बोनसचा फायदा दलालांना होऊ नये म्हणून जमिनीचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन मदत करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Nawab Malik Updates : जेलमध्ये बेड मिळावा यासाठी नवाब मलिक यांचा कोर्टात अर्ज, मंत्री नवाब मलिक यांना सेशन कोर्टामध्ये हजर केलं

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आहे


आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपत आहे


जेलमध्ये बेड मिळावा यासाठी नवाब मलिक यांनी कोर्टात अर्ज केला आहे


त्यासोबत मलिक यांनी कोर्टात आपले मेडिकल रिपोर्टही सादर केले आहेत

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार, तीन जवान जखमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत. सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा गड असलेला चिंतागुफा परिसर असून इथे सीआरपीएफचा नवीन कॅम्प उघडण्यात आला आहे. या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी गोळीबार करुन हल्ला केला. प्रतिउत्तरात जवानांनी गोळीबार केला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कॅपमध्येच उपचार करण्यात सुरु करण्यात आले आहेत. सध्या नक्षलवाद्यांचा हल्ला परतावून लावण्यात सीआरपीएफ जवानांना यश आले असले तरी या घटनेने खळबळ उडाली आहे.

Pune News : चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज कंपनीत बिबट्या; सात तासानंतर जेरबंद करण्यास यश

Pune News : चाकण MIDC मधील मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हाळुंगे पोलीस आणि वनविभाग (जुन्नर) यांना बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. 

Pune Leopard News : सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मर्सिडीज कंपनीतील बिबट्या जेरबंद 

चाकण MIDC मधील मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हाळुंगे पोलीस आणि वनविभाग (जुन्नर) यांना बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आल होत.

Pune News : पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये बिबट्या, 12 वाजताच्या सुमारास जेरबंद

Pune News : पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली. हा बिबट्या मर्सडीज कंपनीच्या परिसरात आढळला.  त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून युद्धपातळीवर मोहीम राबवली. अखेर 12 वाजताच्या सुमारास बिबट्याला जेरबंद केलं गेलं

Kolhapur News : शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांची नाराजी स्वाभाविक, परंतु प्रचारात सक्रिय होतील; गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास 

Kolhapur News :  कोल्हापुरातील सर्व शिवसैनिक एकदिलाने या पोटनिवडणुकीत काम करतील, राजेश क्षीरसागर यांची नाराजी स्वाभाविक होती, पण ते देखील प्रचारात सक्रिय होतील; गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास 

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पालिकेच्या नोटीशीविरोधात हायकोर्टात धाव. जुहू येथील बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून पालिकेने बजावली आहे नोटीस

Narayan Rane : नारायण राणेंची पालिकेच्या नोटीशीविरोधात हायकोर्टात धाव. जुहू येथील बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावरून पालिकेने बजावली आहे नोटीस. नोटीशीची मुदत संपत येत असल्यानं कारवाई थांबवण्यासाठी राणेंची हायकोर्टात याचिका. उद्या होणार सुनावणी

Sanjay Raut : मुंबई : महाराष्ट्र शत्रूसमोर झुकणार नाही, स्वाभिमानासाठी लढत राहू; शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन

Sanjay Raut : मुंबई :  महाराष्ट्र शत्रूसमोर झुकणार नाही, महाराष्ट्र कायम लढत राहणार, कष्टकरी वर्गासाठी लढत राहू, स्वाभिमानासाठी लढत राहू; शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन

नांदेडमधील हडको परिसरात वेल्डिंगचे काम करणाऱ्या मजुराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

नांदेड शहरातील हडको परिसरात वेल्डिंग आणि टर्नरचे काम करणाऱ्या मजुराचा दुकानात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंजितसिंग टर्नर असे मजुराचे नाव असून सकाळी आपल्या दुकानात वेल्डिंगचे काम करत होते. यावेळी वेल्डिंग करण्याच्या अवजारात विद्युत प्रवाह उतरुन ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत आहेत.

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक्र धरणात अवघा 38 टक्के पाणीसाठा शिल्लक

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणात अवघा 38 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. धरणात दोन महिने पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या हे जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसेच नंदुरबार शहरात पालिकेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात. आहे महिन्यानंतर पालिका ही पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकते. एकूणच जिल्ह्यात या वर्षाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई पाहण्यास मिळू शकते

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक्र धरणात अवघा 38 टक्के पाणीसाठा शिल्लक

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणात अवघा 38 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. धरणात दोन महिने पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या हे जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसेच नंदुरबार शहरात पालिकेच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात. आहे महिन्यानंतर पालिका ही पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकते. एकूणच जिल्ह्यात या वर्षाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई पाहण्यास मिळू शकते

कामकाज सुरु होताच शेअर बाजार वधारला, मात्र अस्थिर वातावरण कायम 

सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक देखील 36 अंकांनी वर गेला आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे अस्थिर स्थिती कायम असल्यानं भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.  कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढून 110 डॉलर प्रति बॅरेलवर गेले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर स्थितीत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 76.02 वर आहे.

Kolhapur News : कोल्हापूर:  मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ

Kolhapur News : कोल्हापूर:  मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह, शाहूवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Kolhapur News : कोल्हापूर: सह्याद्री प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, शाहूवाडी तालुक्यात 12 ट्रक लाकूड तस्करी उघड; कोल्हापूर वनविभागाची कारवाई

Kolhapur News : कोल्हापूर: सह्याद्री प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे.  शाहूवाडी तालुक्यात 12 ट्रक लाकूड तस्करी समोर आली आहे. उदगीर-इनामदारवाडी येथील झाडं तोडून नेताना कारवाई करण्यात आली. कोल्हापूर वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. 

Aurangabad News :औरंगाबाद :पैठण-औरंगाबाद रोडवरील गेवराई तांडाजवळ एसटीच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Aurangabad News : औरंगाबाद: पैठण-औरंगाबाद रोडवरील गेवराई तांडा येथे झालेल्या अपघातात पैठणला जाणाऱ्या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. जिमसिंग देवराम चव्हाण (५०, रा. मूळ, मालेगाव, जि. नाशिक) असे अपघात मृत वारकऱ्याच नाव असून, सायकलवरून दर्शनासाठी निघालेल्या जिमसिंग यांना एसटी बसने समोरून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पार्श्वभूमी

Maharashtra Budget Session : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम


Maharashtra Budget Session 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. गिरीश महाजन यांनी याबाबत हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेतं तेही पाहावं लागणार आहे.  तसंच काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या सभागृहात या अखेरच्या आठवड्यात तरी बोलणार का हा प्रश्न आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेलेल दोन आठवडे सभागृह डोक्यावर घेतलं होतं. त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


Sharad pawar on MIM: एमआयएमच्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया


Sharad pawar on MIM: एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावरून सध्या अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांना एआयएमआयएमच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया विचारली असता पवार यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु, ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होय म्हटलं पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या संबंधित निर्णय घेऊ शकता हे तो पर्यंत राष्ट्रीय समितीने स्पष्ट केले नाही, तो पर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत तो पक्ष निर्णय नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय. 


Girish Mahajan: गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात; सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी


Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येचा विवाहसोहळा आज थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी लावली होती. जळगावातील जामनेरमध्ये 14 एकर जागेवर हा  विवाहसोहळा संपन्न झाला.  या विवाह सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह काँग्रेस नेते तथा राज्याचे मंत्री अमित देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते.  गिरीश महाजन यांनी सर्व विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यामंडळींचं स्वागत केलं.


बैलगाडा शर्यत बघणं जीवावर बेतलं, आयोजकांच्या चुकीमुळं गावकऱ्याचा मृत्यू


नेरळ येथे उकृल ग्रामपंचायत हद्दीत आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दौलत देशमुख असे या मृत व्यक्तीचे नाव असून, आयोजकांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला आहे, या प्रकरणी आयोजकांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दौलत देशमुख अस मृत व्यक्तीचा नाव आहे, बैलगाडी शर्यत सुरू होताच एक बैलगाडी रिंगण सोडून थेट प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन शिरल्याने उपस्थित असलेले कर्जत येथील चोचीची वाडीत राहणारे दौलत देशमुख या प्रेक्षकाला बैलाचे शिंग लागला, तर उपस्थित प्रेक्षकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केल्याने या चेंगराचेंगरीत दौलत देशमुख हे आणखी जखमी झाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.