Maharashtra Breaking News 21 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jul 2022 06:28 PM
चित्रा वाघ यांनी लक्ष वेधलेल्या नाना पटोलेंच्या प्रकरणावर महिला आयोग म्हणतंय....!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात अद्याप कोणतीही तक्रार राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही. असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलं. तसेच कोणत्याही पीडितेने आमच्याकडे तक्रार आली तर त्याची शहानिशा करून संबंधित विभागाला कारवाईच्या सूचना देतो. या पदाची गरिमा पाहता, त्यामुळं कोणत्याही गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवत नाही. असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केले. पिंपरी चिंचवडमध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी पार पडली. त्यानंतर चाकणकरांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.

Nagpur Covid Update: दिवसभरात 249 नव्या कोरोना बाधितांची नोंद

नागपूरः जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची ( Nagpur) आकडेवारी वाढत असून आज दिवसभरात तब्बल 249 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. या नव्या बाधितांमध्ये शहरातील 159 शहरी तर 90 ग्रामीण बाधितांचा समावेश आहे. गुरुवारी 192 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 1386 सक्रिय कोरोना बाधित आहे. बाधितांपैकी 64 कोरोना (Covid) बाधितांवर रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 1322 बाधित गृहविलगीकरणात आहेत. आज 1790 आरटीपीसीआर (RTPCR) चाचण्या करण्यात आल्या आणि 411 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गजनान किर्तीकर यांच्या भेटीला

#BREAKING: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गजनान किर्तीकर यांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंसोबत असलेले गजानन किर्तीकर शिंदे गटात जाणार? https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

OBC Reservation : युतीच सरकार आल्यावर 15 दिवसांत आरक्षण मिळालं,  नाशिकच्या भाजप कार्यालयासमोर जल्लोष

OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षण लागू करून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्दल भाजप कार्यालय नाशिक येथे भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिक्षक भरती MPSCमार्फत होणार? शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे प्रस्ताव

Teacher Recruitment MPSC : शिक्षक भरती MPSCमार्फत करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाकडे देण्यात आला आहे. पुढे होणारी शिक्षक भरती एमपीएससीमार्फत करण्याचा शिक्षण विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. यामुळं पुढे होणाऱ्या शिक्षक भरती एमपीएससी मार्फत होणार का? असा सवाल केला उपस्थित होत आहे. मात्र निर्णय होईपर्यत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू असलेल्या पद्धतीनेच पार पडणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

तळकोकणात मासेमारी करताना नदीत बुडून एकाचा मृत्यू



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळ्यात नदीत मासेमारी केली जाते. अनेकजण नदीत मासेमारी करण्यासाठी जात असतात. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील शेरपुद्दीन मोहम्मद बटवाले हे ओझरम-पियाळी येथे मासेमारी करण्यासाठी गेले असता पाय घसरून नदीत पडले. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी शेरपुद्दीन बटवाले यांना पाण्याबाहेर काढत तत्काळ रिक्षाने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


 





 
Petrol-Diesel Price : देशातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 21 July 2022 : देशांतर्गत बाजारात आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. सलग 2 महिन्यांहून अधिक काळ महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती राष्ट्रपती पदाची शपथ घेणार

श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे आज सकाळी 10 वाजता पुन्हा राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. 

Aaditya Thackeray : धो-धो पावसात आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद

Aaditya Thackeray : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भरपावसात केलेल्या भाषणाची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील एका कार्यक्रमात भरपावसात न थांबता भिजत आपलं भाषण सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्र सरकारमधून बाहेर पडलीय, अशातच आदित्य ठाकरे यांनी काल सायंकाळी वडाळ्यात केलेले भाषणही चांगलंच चर्चेत आहे, याच कारण म्हणजे त्यांच्या भाषणाच्या वेळी देखील जोरदार पाऊस सुरू होता, आणि या भरपावसात त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधलाय. विशेष म्हणजे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Presidential Election 2022 : राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल

Presidential Election 2022 : भारताचा पुढील राष्ट्रपती कोण निवडला जाईल? या प्रश्नावरून आज पडदा उठणार आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळ लवकरच भारताला नवे राष्ट्रपती मिळतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी म्हणजेच आज जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 


8 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली.  या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला.  द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता. मुर्मू विजयी झाल्यातर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील.  सकाळी 11 वाजता संसद भवनाच्या रूम नंबर 63 मध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता आहे.


 ईडी कारवाई विरोधात कॉग्रेसचं राज्यभर आंदोलन


सोनिया गांधीना आज ईडी समोर हजर होणार आहे.   सोनिया गांधी सकाळी 11.30 वाजता घरातून निघणार आहेत.  केंद्र सरकार विरोधात आज काँग्रेसचे नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. जीपोओ चौकातून निघणाऱ्या मोर्चात नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंग सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही


आदित्य ठाकरे  यांची शिवसंवाद यात्रा


सत्ता संघार्षानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदा मुंबई बाहेर जाणार आहे. 21 ते 23 जुलै दरम्यान शिवसंवाद यात्रा भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी अशी असणार आहे. आज भिवंडीत यात्रा असणार आहे. आज भिवंडी आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता इगतपुरी येथे मेळावा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता नाशिकमध्ये मेळावा होणार आहे


श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती राष्ट्रपती पदाची शपथ घेणार


श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे आज सकाळी 10 वाजता पुन्हा राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.