Sanjay Raut on Eknath Shinde : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा नुकताच पार पडला. या कुंभमेळ्यामध्ये देशभरातील 60 कोटींहून अधिक भाविकांनी गंगेत जाऊन डुबकी घेतल्याचा दावा केला जात आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये विविध सेलिब्रिटी, राजकारणी तसेच सामान्य भाविकांनी सुद्धा डुबकी घेतली. मात्र, या महा कुंभमेळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाठ फिरवली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा गेले नाहीत. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती. आता टीकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा अत्यंत बोचऱ्या शब्दांमध्ये शिंदे यांच्यावर पलटवर केला आहे.
भाजपचा बास हिंदू नाही का?
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना सवाल करताना म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे सुद्धा आश्चर्यकारक आहेत. स्वतःला हिंदू म्हणून घेणारे उद्धव ठाकरे कुंभला का गेले नाहीत? असा सवाल शिंदे यांनी केला आहे. हे खूप चांगलं आहे. हाच प्रश्न आदरणीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारण्याची हिंमत शिंदे यांनी दाखवावी. भाजपचा बास हिंदू नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
मोहन भागवत महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी गेले होते का?
दुसरीकडे, संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की उद्धव ठाकरे, संजय राऊत स्नान करण्यासाठी का गेले नाहीत? असा सवाल केला जात आहे. हा प्रश्न चांगला आहे. मात्र, मोहन भागवत महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी गेले होते का? आम्ही त्यांना फॉलो करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हे हिंदू असल्याचे ते म्हणाले. भाजप आता नकली झाल्याचा टोला सुद्धा संजय राऊत यांनी लगावला.
गडबड दिसल्यानेच भाजपचे मूळ प्रमुख आहेत ते गेले नाहीत
त्यांनी पुढे सांगितले की मोहन भागवत यांना स्थान करताना पाहिले गेले नाही. ते गेले असते, तर आम्ही गेलो असतो. तशी आमची योजना होती असं संजय राऊत यांनी सांगितले. भाजपचे मूळ प्रमुख आहेत ते गेले नाहीत. तिथे गडबड दिसल्यानेच गेले नसल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. त्यामुळे भागवत स्नानासाठी गेले नाहीत म्हणून आम्ही गेलो नाही. मोहन भागवत गेले असते, तर आम्ही देखील गेलो असतो असे त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या