Maharashtra Breaking News LIVE Updates : किरीट सोमय्या सोमवारी पत्रकार परिषद घेणार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Feb 2022 11:11 PM
किरीट सोमय्या सोमवारी घेणार पत्रकार परिषद 

भाजप नेते किरीट सोमय्या उद्या (सोमवार, 21 फेब्रुवारी)  मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलीय.

कल्याण मध्ये दोन तरुणांचा हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल

शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कल्याण-डोंबिवली शहरात देखील शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी बाईक रॅली ,मशाल रॅली आयोजन करण्यात आलं होतं. .कल्याण जवळ असलेल्या मोहना परिसरात देखील सायंकाळच्या सुमारास शिवजयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं .सर्व काही शांततेत सुरू असताना  या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचवल्या .
. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.या व्हिडियोच्या आधारे खडकपाडा पोलीसानी तपास सुरू करत  या दोन तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय . जयदीप पाटील हर्षद भंडारी असे या दोन तरुणांच नाव आहे

संजय राऊतांची अतुल लोंढेंच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नागपूरातील नंदनवन परिसरातील घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही - यशोमती ठाकूर
काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे.

विकास... विकास आणि विकासावरच आमची चर्चा - शरद पवार

विकास... विकास आणि विकासावरच आमची चर्चा झाली असल्याचे माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सांगितलं.

देशातील बिघडलेल्या राजकीय परिस्थितीवर मार्ग काढण्यावर झाली चर्चा - शरद पवार

देशातील बिघडलेल्या राजकीय परिस्थितीवर मार्ग काढण्यावर चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं आहे. 

तेलंगणा राज्याच्या निर्मितीत शरद पवार यांची मोठी भूमिका - केसीआर   

तेलंगणा राज्याच्या निर्मितीत शरद पवार यांनी मोठी भूमिका बजावली आहे - केसीआर   

केसीआर यांनी घेतली पवारांची भेट

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची भेट. 

खाऊ देण्याचे आमिष दाखवून 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने घराचा दरवाजा बंद करून 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत घडला आहे.


 

फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ माणसानं असं काहीतरी बोलावे हे काही अपेक्षित नाही - जितेंद्र आव्हाड

ठाण्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचे लग्न झाले तरी त्याचे श्रेय घ्यायचे कोणाला मुलगा झाले तरी त्याचे श्रेय घ्यायची सवय लागली आहे असा टोला महाविकासआघाडीला लगावला होता .याबाबत जितेंद्र आव्हाड यानी फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ  माणसाने असं काहीतरी बोलावे हे काही अपेक्षित नाही, श्रेयाची  लढाई ठाण्यात आहे असं मला कधी दिसल नाही .राजकारणात कार्यकर्त्याचा हुरूप वाढवण्यासाठी अस बोलावं लागतं असा टोमणा लगावला .आव्हाड राष्ट्रवादीच्या कार्यलया उद्घाटनलनासाठी डोंबिवलीमध्ये आले होते.

हे असाच सुरू असेल तर देशाला भवितव्य काय? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हे असाच सुरू असेल तर देशाला भवितव्य काय? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   

आमच्या भेटीत लपवाछपवीसारखं काहीच नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमच्या भेटीत लपवाछपवीसारखं काहीच नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

परिवर्तनाच्या मुद्द्यावर आंच एक मत - केसीआर

परिवर्तनाच्या मुद्द्यावर आंच एक मत असल्याचं केसीआर म्हणाले आहेत. 

अनेक विषयांवर आमचं एक मत - केसीआ

उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याचं केसीआर म्हणाले आहेत. 

उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला  : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट






तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट






चंद्रशेखर राव यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, एकनाथ शिंदे सुभाष देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित

चंद्रशेखर राव यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी 
उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, एकनाथ शिंदे
सुभाष देसाई आणि अरविंद सावंत उपस्थित

पुनम महाजन यांच्या निवासस्थानावर काँग्रेसचं नरेंद्र मोदी माफी मांगो आंदोलन

पुनम महाजन यांच्या निवासस्थानावर काँग्रेसचं नरेंद्र मोदी माफी मांगो आंदोलन


मात्र, पोलिसांनी काही अंतरावर असलेल्या ओएनजीसी येथे आंदोलकंना थांबवले


मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन

Maharashtra Solpaur News : सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपला झटका

Maharashtra Solpaur News : सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपला झटका


भाजप शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांची कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिट्टी


निवडणुका जाहीर होण्याआधीच पक्षाने अपेक्षित प्रभागातून तिकीट नाकारल्याने पक्षावार नाराज असल्याची प्रधाने यांचे मत


स्वतः पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास 1 हजार समर्थक कार्यकर्ते आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचा दावा


पक्षातील वरिष्ठानी कोणीतही समजूत घातली नसल्याचा बिज्जू प्राधाने यांचा आरोप

नाशिक: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन ; पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी

Nashik : नाशिक: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन ; पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी 

लोणावळकरांचा रास्ता रोको, रास्ता रोको केल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीत अडकावं लागलं

पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आतुर असणाऱ्या, त्यांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या लोणावळकरांनी आज रास्ता रोकोची भूमिका घेतलीये. शहरातून जाणारा पुणे-मुंबई महामार्ग नागरिकांच्या जीवावर उठताना दिसतोय, तरी प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन बसलाय. म्हणूनच आज लोणावळकर आक्रमक झालेत. रविवार म्हणजे लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घ्यायला पर्यटकांची ठरलेली गर्दी. पण त्याच दिवशी रास्ता रोको केल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीत अडकावं लागलंय. पुणे-मुंबई महामार्ग हा लोणावळ्यातून जाताना अरुंद होतो, त्यामुळं अनेकदा अपघात झालेत. यात काही नागरिकांना जीव गमवावा लागलाय, म्हणूनच या मार्गाचे रुंदीकरण करावे यासाठी शहरवासीयांनी एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीकडे मागणी केली. पण त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतापलेले नागरिक आज रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पुणे आणि मुंबईसह राज्यातील बहुतांश पर्यटक आज लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटायला येत असतात. पण त्या सर्वांना या रास्ता रोकोमुळं वाहतूक कोंडीत ताटकळावं लागलंय. एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीला धारेवर धरण्यासाठी शहरवासीयांनी ही भूमिका घेतलेली आहे. या आंदोलनाला कोणतंही वेगळं अथवा राजकीय वळण लागू नये म्हणून जागरूक नागरिक म्हणून सगळे या आंदोलनात सहभागी झालेत.या जागरूक नागरिकांचा रोष हा पर्यटकांवर नसून बेशिस्तपणे प्रवास करणाऱ्या अजवड वाहतुकीवर आहे. ही वाहतूक अरुंद रस्त्यात ही बेदरकरारपणे सुरु असते, असं या जागरूक नागरिकांचं म्हणणं आहे. ही अवजड वाहतूक शिस्तीत जात नाही किमान रुंदीकरण करून त्यावर तोडगा काढा. अशी मागणी हे नागरिकांना वारंवार करत आलेत. पण एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनीकडे झोपेचं सोंग घेऊन बसलीये, ते आमच्या मागणीला गांभीर्याने घेतच नाहीत. असा आरोप ते करतायेत. म्हणूनच नाईलाजास्तव आज रास्ता रोको करण्याचा आक्रमक पवित्र घेतल्याचं ते सांगतायेत. शहराची आर्थिक उलाढाल करणारे आमच्या देवासमान पर्यटकांना कोणताही त्रास देण्याचा आमचा हेतू नसल्याचं ते सांगतायेत. या पर्यटक आणि प्रवाश्यांसाठी पर्यायी मार्गाची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात येत होती. 


 

 
रशिया- युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थांसाठी जयंत पाटील यांची हाक...

मुंबई दि. २० फेब्रुवारी - मोदीजी विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे.त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून केले आहे. 



युक्रेनच्या लष्कराने युध्द सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केले आहे



रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.त्यांना मदत हवी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अहमदनगर : श्रीगोंदामध्ये माजी सैनिका घरी चोरी, 15 तोळे सोने, रिव्हॉल्वर चोरीला

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी वांगदरी येथे सेवानिवृत्त सैनिकाच्या घरी धाडसी चोरी, सुमारे पंधरा तोळे सोने आणि रिव्हाल्वर चोरुन नेल्याने एकच खळबळ; श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

MUmbai BJP : मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

MUmbai BJP : मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट


शिवतीर्थ या निवासस्थानी घेतली भेट


तीनच दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती


भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या वाढत्या गाठीभेटी

हिंगोली: नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवलं तेव्हा ते धुतल्या तांदळाचे होते का, शिवसेनेचे माजी खासदार  शिवाजी माने यांचा सवाल

Narayan Rane : नारायण राणे आता खुनी दिसू लागले आहेत मुख्यमंत्री बनवलं होतं तेव्हा ते काय धुतल्या तांदळाचे होते का? शिवसेनेचे माजी खासदार  शिवाजी माने यांचा सवाल 

वाळवा तालुक्यातील शिगावचे जवान रोमित चव्हाण यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण, गावावर शोककळा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील  शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबावर शोककळा परिसरली आहे. रोमितवर उद्या सकाळी वारणा नदीकाठी अंत्यसंस्कार होणार आहे. काश्मीरमधील शोपियाँ येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचा वीरपुत्र रोमित तानाजी चव्हाण हे शहीद झाले. शहीद रोमित चव्हाण हे 1 राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये कार्यरत होते. ते सैन्य सेवेमध्ये गेली 5 वर्षापासून कार्यरत होते.  त्यांचे पार्थिव आज (20 फेब्रुवारी) रात्री 8 वाजता पुणे येथे येणार असून शिगाव येथे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयतर्फे देण्यात आली. 

शिवाजी पार्कावर सुरु असलेल्या कामासंदर्भात परिसरातील नागरिक, खेळाडू घेणार राज ठाकरेंची भेट

शिवाजी पार्कावर सुरु असलेल्या कामासंदर्भात परिसरातील नागरिक, क्लबची मंडळी आणि मैदानावर खेळणारे खेळाडू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहेत. आज 11.30  वाजता राज ठाकरे आणि नागरिक यांची  शिवतीर्थावर बैठक होणार आहे. शिवाजी पार्क मैदानात सध्या सुरू असलेल्या कामासंदर्भात नागरिकांच्या काही हरकती सूचना आहेत. यासंदर्भात मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्यासोबत शिवाजी पार्कमधील रहिवासी, स्पोर्ट्स क्लबचे सदस्य राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. शिवाजी पार्कवर खेळणाऱ्या खेळाडूंचे आणि क्लबमधील नागरिकांचे देखील अनेक प्रश्न आहेत.

धक्कादायक! औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना, प्रेमात अडसर ठरणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने केला खून

औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या 9 वर्षाच्या मुलाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आईला अटक केली आहे. पोलिसांकडून आपल्याला अटक केली जाईल म्हणून, महिलेच्या प्रियकराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केली आहे. वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातील हा प्रकार आहे. सार्थक रमेश बागूल असे मृत मुलाचे नाव आहे. तर संगीता रमेश बागूल  व तिचा प्रियकर साहेबराव माणिकराव पवार अशी आरोपींची नावे आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज सातारा दौऱ्यावर...

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज साताऱ्यात येत आहेत. जागतिक तापमान वाढीच्या संदर्भातील कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँक आणि लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटिल, निलमताई गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आज भारत वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना

IND vs WI, 3rd T20 : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने  तीन सामन्यांची टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताने 2-0 ने या मालिकेत आघाडी गेतली आहे. आज तिसराही सामना जिंकून भारत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप  देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यांत वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव केला होता.  रोहित शर्माच्या नेतृत्वातील सलग तिसऱ्या मालिकेत विजय भारताने हा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला आता फक्त आठ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा नवीन पर्याय वापरण्याचा या सामन्यात प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.

पार्श्वभूमी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट. सोबत अभिनेते प्रकाश राजही उपस्थित. 


Telangana CM K Chandrashekar Rao meets Maharashtra CM Uddhav Thackeray and his cabinet ministers and leaders at Varsha bungalow - Maharashtra CM's official residence in Mumbai.

Actor Prakash Raj was also present. pic.twitter.com/nYHrkpofJ9


— ANI (@ANI) February 20, 2022

/>


Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महत्वाच्या हे़डलाईन्स


 मोदी सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी चंद्रशेखर राव यांचा पुढाकार, तेलंगणाचे मुख्यमंत्री आज मुंबई दौऱ्यावर, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार


  मुंबई आणि दिल्लीसह प्रमुख शहरात घातपात घडवण्याचा दाऊद इब्राहिमचा कट, एनआयएकडून एफआयर दाखल, यंत्रणांना सतर्कतेचा इशारा


  दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचा वीरपूत्र धारातीर्थी, सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील शिगावच्या रोमीत चव्हाणांना वीरमरण


 बारमधील ऑर्केस्ट्रा कलाकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राज्यात ऑर्केस्ट्रा बारमध्ये चारऐवजी 8 महिला कलाकारांना सामील करता येणार


 राजकीय कॅप्टन निवडण्यासाठी पंजाबची जनता आज ईव्हीएमचं बटण दाबणार, विधानसभेच्या सर्व 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान, तर उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान


राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल, दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप


दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचा वीरपूत्र धारातीर्थी, सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील शिगावच्या रोमीत चव्हाणांना वीरमरण


  कॅनडात स्वस्तिकवर बंदी घालण्याच्या हालचाली, कॅनेडियन संसदेत विधेयक सादर, कॅनडा सरकारविरोधात भारतीयांचं आंदोलन
 
 युक्रेन रशिया सीमेवर तणाव वाढला, सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीमुळे जगावर युद्धाचे ढग


श्रीलंका दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे ,चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळलं, रोहित शर्माकडेच कसोटी कर्णधारपदाचीही कमान, तर टी-२०त बुमराह आणि जाडेजाचं पुनरागमन



Raj Thackeray : 'मराठी भाषा गौरव दिवस इतक्या जोरदारपणे साजरे करा की...' राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र


Raj Thackeray Letter to MNS Party Workers : येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहित म्हटलं आहे की, 27  फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा करतो. 'गौरव दिवस'. पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानं सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली. 


हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे. 


राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता, असं त्यांनी म्हटलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.