Maharashtra Live Updates 1st August 2022 : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर पलटी होवून एक विद्यार्थी ठार झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झालेत. जखमींवर सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त दोधेश्वर तीर्थस्थळी भावीकांची मोठी गर्दी होत असते. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह बागलाण ॲकेडमीच्या सैनिक आणि पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना दरवर्षी बोलवले जाते. आजही विद्यार्थी दोधेश्वर मंदिराच्या बंदोबस्तसाठी गेले होते. सायंकाळी ट्रॅक्टरमधून विद्यार्थी सटाणाकडे जाताना घाटातील पहिल्याच वळणावर ट्रॅक्टर पलिटी होवून विद्यार्थी घाटातील दगडावर, रस्त्यावर आदळून जखमी झाला. नंतर त्याचा मृत्यू झाला.
नागपूर : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुणाल बर्वे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो बीकॉम प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.
आज दुपारी महाविद्यालय संपल्यावर कुणाल मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेला होता. यावेळी त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यांच्या पाठोपाठ कुणाल ही तलावात पोहोण्यासाठी गेला. पण काही वेळातच तो बुडाला.
मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यपालांकडून माफी मागण्यात आली आहे. माझ्याकडून कदाचित चूक झाली असेल, राज्यसेवकाला क्षमा करावी असे म्हणत राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली.
नागपूरः जिल्ह्यात सध्या 1565 कोरोना बिधत सक्रिय असून सोमवारी प्राप्त अहवालानुसार 92 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर 82 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील 54 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1511 बाधित गृहविलगीकरणात आहेत. सोमवारी 755 जणांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी सर्व काही दिले असताना यांनी का गद्दारी केली? असा प्रश्न शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांवर हल्लाबोल केला. "यांच्या लायकी पेक्षा जास्त दिले असेल त्यामुळे यांनी गद्दारी केली. प्रकाश आबिटकर यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. 567 कोटी त्यांच्या मतदार संघात दिले आहेत. असे असताना या प्रकाश आबिटकर यांनी असे का करावे? या गद्दार गटात दोन गट आहेत. अनेक जण स्वतःच्या भुकेसाठी गेले तर दुसरा गट फसवून नेला आहे. सर्व गद्दार लोकांना सांगतो जिथे आहात तिथे राहा, पण आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला समोर या, असे आव्हान यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी स्वतःच्या रक्ताने प्रतिज्ञा पत्र लिहिले आहे. आमदार आणि खासदार गेले, पण जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव यांच्या बरोबर एकनिष्ठ असल्याचा संदेश या पत्रातून देण्यात आला आहे. आज कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे ही प्रतिज्ञापत्रे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
सुषमा स्वराज यांची आठवण करुन देत सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महागाईवरून सरकारला टोला लगावला आहे. 60 वर्षांकडे बोट दाखवतात, आठ वर्षे पण खूप असतात. घरातली नवी सून पण इतक्या वर्षात तयार होते. तिलाही घराची जबाबदारी नाकारता येत नाही. 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही याबाबत सरकार श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती सांगणार की नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
Chandrapur News : घराची भिंत पडल्याने पत्नीचा मृत्यू तर पती आणि दोन मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. बल्लारपूर शहरातील मौलाना वॉर्ड परिसरातील ही घटना आहे. योगिता पुणेकर (वय ३६ वर्षे) असं मृत महिलेचं नाव तर विनीत (पती), सांची (मुलगी) आणि वेदांत (मुलगा) अशी गंभीर जखमींची नावं आहे. कच्च्या घरात हे कुटुंब राहत होतं. रात्री अचानक घरातील मधली भिंत कोसळून दुर्घटना झाली. जखमींवर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे हे घर मोडकळीस आल्याची प्राथमिक माहिती आहे.
Uddhav Thackeray Press Conference : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार, खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष
Mumbai News : खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. अवघ्या काही मिनिटांची ही भेट होती. भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राऊत कुटुंब खिडकीत आलं होतं. संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी, दोन मुलींना उद्धव ठाकरे यांना निरोप दिला.
Raigad News : रायगड जिल्ह्यातील उरण येथील इनलाईन शिपिंग कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जासई येथील गोदामातील गव्हाच्या काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुमारे 4 कोटी 67 लाख किमतीचा 23 लाख 39 हजार किलो गव्हाचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान इथून सरकारी वितरणाचा गव्हाचा काळाबाजार सुरु होता. इनलाईन शिपिंगचे मालक प्रवीण अंचल आणि व्यवस्थापक सुमन कुमार यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि सार्वजनिक वितरण प्रणाली 2015 अन्वये उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मेहकरः नागपूर ते औरंगाबाद जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या भिषण अपघातात तब्बल 22 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चार प्रवाशांची स्थिती गंभीर आहे.
Nagpur : नागपुरहुन औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बस मधील 21 प्रवासी तर ट्रक मधील 1 प्रवासी जखमी झाला आहे. मुंबई नागपूर महामार्गावरील मेहकरजवळ असलेल्या हॉटेल परिवार समोर ही घटना सकाली साडेअकराच्या सुमारास घडली. अपघातानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन तात्काळ जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलं. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
Buldhana News : नागपूरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात बसमधील 21 तर ट्रकमधील 1 प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावरील मेहकरनजीक असलेल्या हॉटेल परिवारसमोर सकाळी साडे अकराच्या सुमारास हा आपघात घडला. अपघातानंतर हॉटेलवरील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन तात्काळ जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केलं. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अपघातात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
जुलै महिन्यातील एकूण जीएसटी कर
मागील सलग चार महिन्यांपासून करसं
महाराष्ट्राकडून जीएसटीत वाटा स
मागील वर्षीच्या जुलै महिन्याचा
सीजीएसटी 25 हजार 751 कोटी, एसजी
सेस या करातून 10 हजार 920 को
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (2 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पुणे विभागीय आयुक्तांसोबत आढावा बैठक, त्यानंतर पत्रकार परिषद आणि सासवडला सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती होणार आहे.
Nanded News : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कलदगाव येथील शेतकऱ्याच्या कुक्कुटपालनचे शॉर्ट सर्किटमुळे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी, अवकाळी पावसाने आधीच त्रस्त असलेल्या कलदगाव येथील शेतकरी संतोष गव्हाणे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून काही महिन्यांपूर्वी गावरान कोंबड्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. या कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये त्यांनी पाच हजार कोंबड्यांचा (पक्षी) पहिला लॉट घेतला होता. परंतु या कुक्कुटपालन शेडमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत शेडमधील हजारो कोंबड्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर तडफडून जळून खाक झाल्या. दरम्यान या आगीत हजारो कोंबड्यांचा होरपळून मृत्यू होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
Sindhudurg News : कोकणातील समुद्रात दोन महिन्यांचा मासेमारी बंदी कालावधी आज संपत असून, आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात होत आहे. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर दर्यावर स्वार होण्यास मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे. पावसाने गेले काही दिवस दडी मारली असल्याने मासेमारी हंगामाची दमदार सुरुवात होईल. 1 जून ते 31 जुलै हा कालावधी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी म्हणून शासनाने जाहीर केला आहे. या काळात मासेमारी पूर्णतः बंद असते. त्यामुळे नदी, खाडी पात्रातील मासळीचा आस्वाद मत्स्य खवय्यांकडून लुटला जात होता. आता मासेमारी हंगाम सुरु होत आहे. दुसरीकडे श्रावण मासास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या मासेमारी हंगामात उपलब्ध होणाऱ्या मासळीला चांगला दर मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
Solapur News : सध्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असताना माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथील तलाव देखील ओव्हरफ्लो झाल्याने येथे तयार झालेले धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन चार वर्षात गिरझणी तलावाच्या शेजारी हे नैसर्गिक धबधबे होत असल्याचे पर्यटकांच्या लक्षात येऊ लागल्याने अनेक ठिकाणाहून हे पर्यटक गिरझणी तलावावर गर्दी करु लागले आहेत. लोणावळा येथील भुशी डॅमप्रमाणे गिरझणी येथे हे नैसर्गिक धबधबे सुरु झाले असून आता माळशिरस तालुक्यातील गिरझणी हे देखील नवीन पावसाळी पर्यटन केंद्र म्हणून समोर येऊ लागले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक
Sanjay Raut Arrest : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आलं.
आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा (Shiv Samvad Yatra) दुसरा टप्पा आजपासून (1 ऑगस्ट) सुरु होत आहे. सिंधुदुर्गातल्या कुडाळ, वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान 1 आणि 2 ऑगस्ट रोजी ही 'शिव संवाद' यात्रा निघणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे 1 ऑगस्टपासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात शिव संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जाणार आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या अचिंता शेऊलीने इतिहास रचला, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
Commonwealth Games 2022 : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर अचिंता शेऊलीने (Achinta Sheuli) आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये (Weight Lifting) 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. अचिंताने पहिल्या स्नॅच फेरीत 137 किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये त्याने 139 किलो वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने स्नॅचमध्ये 143 किलो वजन उचलले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अचिंता शेउली हा भारतातील तिसरा ऍथलीट आहे. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले.
व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात कपात, जाणून घ्या कोणत्या शहरात कितीने स्वस्त झाले LPG सिलेंडर?
LPG Price Reduced: व्यावसायिक LPG सिलेंडरच्या (19 किलो) किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे, जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता
Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी? केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू
Monkeypox Suspected Dies in Kerala : केरळमध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणं असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. संयुक्त अरब अमिरातीहून (UAE) केरळमध्ये परतलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सदृश्य लक्षणं आढळली होती. केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज (Kerala Health Minister Veena George) यांनी रविवारी माहिती दिली की, युएईहून परतलेल्या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सदृश्य लक्षणे आढळली होती. या रुग्णाचा मृत्यू मंकीपॉक्समुळे झाल्याचा संशय आहे. या रुग्णाला इतर कोणताही आजार नव्हता. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभाग तरुणाच्या मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -