Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडमधील गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2022 02:27 PM
नागपूर अमरावती महामार्गावर बाजारगाव जवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघात, तिघांचा मृत्यू  

नागपूर अमरावती महामार्गावर बाजारगाव जवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू  झाला आहे. 

भरधाव टेंपोची उभ्या पिकअपला धडक; एकाचा मृत्यू , १९ जखमी



भरधाव वेगातील टेंपोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअपच्या मागे थांबलेल्या चालकाचा दोन्ही वाहनात चिरडून जागीच मृत्यू झाला तर पिकअपमधील १९ जण जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक आज सकाळी झाला अपघातातील मयत आणि जखमी लातूर जिल्ह्यातील आजनी बु. (ता. शिरूर अनंतपाळ) येथील आहेत.


 

 



 
मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल होतील -राजेश टोपे

मार्च महिन्यात मोठ्या पद्धतीने निर्बंध शिथिल केले जातील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हीच इच्छा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  

Raigad News Update : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात अपघात, दोघांचा मृत्यू 

Raigad News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. 

expressway : पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात आज पुन्हा अपघात, भरधाव कंटेनर ट्रेलर चार कारला धडक..

mumbai pune expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर आज दुपारच्या सुमारास झालेला अपघात खूप विचित्र होता. यामध्ये, मुंबईकडे येणाऱ्या चालकाचे ट्रेलरवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने पुढे जाणाऱ्या हुंडाय कारला जोरदार ठोकर दिली...  त्यानंतर या भरधाव ट्रेलरने काही अंतरावर असलेल्या क्रेटा कारला धडक दिल्याने क्रेटा कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या मिडियन गार्डन मध्ये शिरली... 

Yavatmal News Update : यवतमाळ येथील कारागृहातील आरोपी पोलिसाची गाडी घेऊन रुग्णालयातून पसार 

Yavatmal News Update : यवतमाळ येथील कारागृहातील आरोपी रुग्णालयातून पसार झाला आहे. यवतमाळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयात हा प्रकार घडला. नावेद उर्फ गब्या मो कदिर (वय 39)  असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरोना बाधित असल्याने त्याला 12 फेब्रुवारीपासून कोविड रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रुग्णालयातून काल मध्यरात्री एका पोलीस कर्मचाऱ्याची गाडी घेऊन या आरोपीने पलायन केले आहे.

Beed Maharashtra Updates : बीडमधील गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल



वाळू तस्करांच्या विरोधात कारवाई केल्याने गुन्हे दाखल झाल्याची गेवराईमध्ये चर्चा..बीडच्या गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तहसीलदार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घरात घुसून धमकी दिल्याप्रकरणी तीन वेगवेगळ्या महिलांनी त्यांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

या प्रकरणी तहसीलदार सचिन खाडे यांच्याशी विचारणा केली असता दोन दिवसांपूर्वी त्यांनी काही वाळू माफिया वर कारवाई केली होती त्यावेळी त्या वाळूमाफियांनी तहसीलदार सचिन खाडे यांना धमकी दिली आणि यातूनच कारवाईचा राग मनात धरून वाळू माफियांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याच बोललं जातं आहे . गेल्या काही दिवसांपासून सचिन खाडे यांनी वाळू माफियावर जोरदार कारवाई करायला सुरुवात केली आहे आणि यातूनच हे खोटे गुन्हे दाखल झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे

 

 
















 




 














Pune News Updates : टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक 

Pune News Updates : टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक 


संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटय़वधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघड


नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना केली अटक


 त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखीन आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार


मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे 


टीईटी 2018 मध्ये आरोपी मुकुंदा याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितले


त्याशिवाय 2019 च्या टीईटी  परीक्षेत 1 कोटींवर रक्कम केली पोहोच

राज ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळलं, गोरेगावमधील घटना

LIVE : राज ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळलं, गोरेगावमधील घटना youtube.com/watch?v=Rs3Gfk 

Narayan Rane LIVE : सुशांत सिंहची हत्या झाली, रमेश मोरेची हत्या करण्यात आली, ती कोणी केली? जया जाधव यांची हत्या कुणी केली? : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे सवाल

Narayan Rane LIVE : सुशांत सिंहची हत्या झाली, रमेश मोरेची हत्या करण्यात आली, ती कोणी केली? जया जाधव यांची हत्या कुणी केली? : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे सवाल https://youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 


 
Narayan Rane LIVE : दिशा सालियनवर बलात्कार करुन तिची हत्या, तिनं आत्महत्या केली नाही : केंद्रीय मंत्री नारायण राणे

Narayan Rane LIVE : दिशा सालियनवर बलात्कार करुन तिची हत्या, तिनं आत्महत्या केली नाही : केंद्रीय मंत्री नारायण राणे https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

Maharashtra Buldhana News Updates : सिंदखेडराजा येथे वातावरणात तणाव, भाजपच्या रॅलीला पोलिसांनी अडविले, भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विनोद वाघ यांच्यासह 13 जण पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Buldhana News Updates : सिंदखेडराजा येथे वातावरणात तणाव, भाजपच्या रॅलीला पोलिसांनी अडविले, भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विनोद वाघ यांच्यासह 13 जण पोलिसांच्या ताब्यात, भाजपा कार्यकर्ते आक्रमक 
Narayan Rane Live : बंगल्यात एक टक्काही अनधिकृत बांधकाम केले नाही, नारायण राणेंचे स्पष्टीकरण

Narayan Rane Live : बंगल्यात एक टक्काही अनधिकृत बांधकाम केले नाही, नारायण राणेंचे स्पष्टीकरण

Narayan Rane LIVE : शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठी माणसांच्या मुळावर उठलेत : केंद्रीय मंत्री नारायण राणे

Narayan Rane LIVE : शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठी माणसांच्या मुळावर उठलेत : केंद्रीय मंत्री नारायण राणे https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Narayan Rane LIVE : आमची इमारत 100 टक्के कायदेशीर, असं असतानाही 'मातोश्री'कडून त्रास : केंद्रीय मंत्री नारायण राणे

Narayan Rane LIVE : आमची इमारत 100 टक्के कायदेशीर, असं असतानाही 'मातोश्री'कडून त्रास : केंद्रीय मंत्री नारायण राणे https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Pune Mumbai express high way update : पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, मोठी वाहतूक कोंडी 

Pune mumbai express high way update : पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून यामुळे वाहतूक कोंडी , छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि विकेंड दोन्ही एकत्र आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडलेत, मुंबईहुन- पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गर्दी झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागतेय

Pune Mumbai express high way update : पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, मोवाहतूक कोंडी 

Pune mumbai express high way update : पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून यामुळे वाहतूक कोंडी , छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि विकेंड दोन्ही एकत्र आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडलेत, मुंबईहुन- पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गर्दी झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागतेय

रायगड: वरंध घाटातील कावळा गडजवळ अपघात, तीन शिवप्रेमी 200 फूट दरीत मोटरसायकसह कोसळले, दोघांची सुखरुप सुटका

रायगड :शिवज्योत घेण्यासाठी रायगडकडे येणाऱ्या शिवप्रेमींना अपघात;  दोनशे फूट खोल दरीत तीन शिवप्रेमी मोटारसायकलसह कोसळले,  महाड एमआयडीसी पोलिसांकडून दोघांची सुखरूप सुटका, एकाचा शोध सुरू. महाड आणि भोर दरम्यान वरंध घाटातील कावळा गड येथे झाला अपघात

आमदार रवी राणा यांना शिवजयंतीपर्यंत अमरावतीत नो एन्ट्री

आमदार रवी राणा हे आज अमरावतीत येणार होते पण पोलीसांनी त्यांना शिवजयंती दिवशी आपण शहरात राहू नये असं सांगण्यात आलं.


शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून अमरावतीत येऊ नये असं पोलिसांनी सांगितल्याने आमदार रवी राणा आता उद्या नवी दिल्लीत साजरी करणार शिवजयंती...


आमदार रवी राणा यांची माहिती...


 

पार्श्वभूमी

1. राज्यभरात शिवजंयतीचा उत्साह, चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन, एबीपी माझाचाही रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
Shiv Jayanti 2022: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. 


महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील


आज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केलं. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होतं. 


महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही. महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्य़ाण, डोळ्यासमोर  ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल.  

2.मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार, ट्विट करत राणेंचा गौप्यस्फोट, सुशांतसिंह -दिशा सॅलियन प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचा इशारा, आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद


3. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीला पोलीस संरक्षण, सोमय्यांकडून बदनामी सुरु असल्याची गृहमंत्र्यांकडे तक्रार, तर आत्महत्येपूर्वी सोमय्यांनी नाईकांना धमकावल्याचा राऊतांचा दावा


4.ऑनलाईन परीक्षेतील कॉपी बहाद्दरांचा एबीपी माझाकडून पंचनामा, पैसे मोजून ऑनलाईन उत्तर मिळवल्याचं उघड, तर कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं मंत्र्यांचं आश्वासन


5. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय, मालिकाही जिंकली, गुणतालिकेवर पाहुण्यांचा भोपळा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.