Maharashtra Breaking News Live 17 September 2022 : राज ठाकरे चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यासाठी रवाना, सीएसएमटीबाहेर मनसे सैनिकांची गर्दी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Sep 2022 07:32 PM
Nagpur : सीताबर्डी येथील फ्लायओव्हर वरुन पडून तरुणीचा मृत्यू

नागपूरः शहरातील सीताबर्डी येथील असलेल्या उड्डान पुलावरुन तरुणी पडली असून घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.

राज ठाकरे चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यासाठी रवाना, सीएसएमटीबाहेर मनसे सैनिकांची गर्दी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सीएसएमटी स्थानकावरुन ते ट्रेनने नागपूरसाठी रवाना होणार आहेत. सीएसएमटी स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे

Jaikwadi Dam : जायकवाडीतून दीड लाख क्यूसेक्सने पाणी सोडणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडीतून दीड लाख क्युसेक पाणी सोडण्याची प्रशासनाची तयारी.


नदी काठच्या गावांना सतर्कतेचा प्रशासनाकडून इशारा.


दीड लाख क्युसेक ने पाणी सोडल्यास अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता.


या वर्षात पहिल्यांदा दीड लाखाने पाणी सोडले जाणार.


प्रशासनाच्या इशाऱ्नंयातर गावकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण. 

वर्ध्यात 'सेवा पंधरवड्या'ला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोनज 

वर्धा जिल्ह्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आज आरोग्य शिबीर आणि रक्तदानाने या सेवा पंधरवड्याची सुरुवात झाली. अनेक युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपचे आमदार तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान आणि आरोग्य शिबीर पार पडले. 

'महाबीज'च्या संचालक निवडणुकीतील मतमोजणीदरम्यान गोंधळ

'महाबीज'च्या दोन संचालकांच्या निवडणुकीतील मतमोजणीदरम्यान गोंधळ उडालाय. मतमोजणी दरम्यान एका रूमचे सील उघडे असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे आज ही मतमोजणी प्रक्रिया थांबवून उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी यावर आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ 'महाबीज'च्या  दोन संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडलीय. विदर्भ विभाग मतदार संघातून डॉ. रणजित सपकाळ, प्रशांत गावंडे, तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख, वकील विष्णुपंत सोळंके यांच्यात लढत आहे. दरम्यान, मतपत्रिका, ओळखपत्र पाठविण्याची तारीख 12 ऑगस्ट होती. तर मतपत्रिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर होती. त्यानुसार 15 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर दरम्यान मतपत्रिका, वैध मतपत्रिकांची आणि छाननी म्हणजेच मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. आजचा मतमोजणीचा तिसरा दिवस होता.

उस्मानाबाद येथे हॉटेलवर छापा, पाच महिलांची सुटका 

उस्मानाबाद येथे पोलिसांनी  वेश्या व्यवसाय चालणाऱ्या दोन  ठिकाणी धाडी टाकून पाच महिलांची सुटका केली. पोलिसांनी यावेळी लॉज चालकांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली. उस्मानाबाद शहरातील  हॉटेल बावर्ची आणि हॉटेल सरिता येथे पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.  दोन्ही हॉटेल चालकांवर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्राला वेदांत प्रकल्प गमवावा लागला; माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा आरोप  

सोलापूर : सध्या राज्यात गाजत असलेल्या वेदांता प्रकल्पाबाबत रोज आरोप प्रत्यारोप सुरु असताना आज माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागलीय. तीन पक्षांच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांना पुढे करण्यात आले आणि त्यांनी 30 महिने मातोश्रीवर झोपून हा प्रकल्प घालवल्याची टीका लक्ष्मण ढोबळे यांनी केली. मोठे उद्योग राज्यात येत असताना त्याला लाल कार्पेट अंथरून वीज, पाणी, रस्ते, जमिनी या व्यवस्था एक खिडकीतून देतो हा विश्वास या उद्योगांना देणे गरजेचे असताना हे फक्त पंचट विनोद आणि शिव्यांची लाखोली वाहण्यात धन्यता मानत होते. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी आता हे तीनही पक्ष केंद्र सरकारवर आरोप करण्याचे काम करत असल्याचा टोला यावेळी ढोबळे यांनी लगावलाय. 

परभणीच्या जिंतूर येथे रास्ता रोको, वाहतूक ठप्प 

परभणीच्या जिंतूर औंढा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे महामार्गावर असलेल्या गावांमधील अनेक तरुणांचा अपघाती मृत्यू होतोय. तसेच प्रवासालाही मोठ्या अडचणींचा सामना या गावकऱ्यांना करावा लागतोय. वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने आज या महामार्गावरील अनेक गावकऱ्यांनी एकत्र येत आडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. एक ते दीड तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे जिंतूर-औंढा वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले, यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Raju Shetty : एफआरपी द्या नाही तर तुमच्या बापाला सोडणार नाही; राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा


एफआरपी द्या नाही तर तुमच्या बापाला सोडणार नाही, एफआरपी सोडून अधिकचे किती पैसे देणार ते आधी सांगा असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना केला आहे. एकरकमी एफआरपी देतो म्हणणारे तुकड्यांचा कायदा महाविकास आघाडीने केला त्या वेळी तोंड बंद करून का गप्प होते असंही म्हणत त्यांनी आमदार हसन मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर टीका केली आहे. यावर्षी जिल्ह्यातील सर्वच कारखानदार एकरकमी एफआरपी देणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या सभेत वक्तव्य केलं होतं. 

गंगोत्री-उत्तरकाशी महामार्गावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प 

गंगोत्री-उत्तरकाशी महामार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून भाविक अडकले आहेत. अंबरनाथहून साधारण अडीशे भाविक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या कुठलीही रेस्क्यू टीम या ठिकाणी पहोचलेली असून अडकलेले भाविक त्यांच्या गाड्यांमध्ये बसून आहेत.

Anurag Thakur : अनुराग ठाकूर यांनी मुंबईत लुटला क्रिकेटचा आनंद

केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत मिशन 45 अंतर्गत त्यांचा हा दौरा सुरू आहे. आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ते संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत आहेत. या दरम्यान चेंबूर मधील गांधी मैदानात अनुराग ठाकूर यांनी क्रिकेट खेळताना आनंद लुटला. गांधी मैदानात काही तरुण क्रिकेट खेळत होते. अनुराग ठाकूर यांची त्यांच्यावर नजर पडली त्यानंतर त्यांनाही क्रिकेट खेळायचा मोह आवरला नाही आणि मग जोरदार बॅटिंग सुरू झाली. क्रीडा मंत्र्यांनी यावेळी मैदानात अनेक चौकार षटकारही मारले. 

अमरावतीमधील तिवसा इथल्या पिंगळाई नदीत तीन मच्छिमार बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले, जिल्हा शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पिंगळाई नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन मच्छिमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले असता ते बुडल्याची माहिती आहे. तिन्ही मच्छिमार हे तिवसा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळतात तहसीलदार वैभव फरतारे घटनास्थळी दाखल झाले. तर जिल्हा आणि शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले असून तीनपैकी दोन मच्छिमारांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सध्या घेणे सुरु आहे.

दादर : सावित्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नपूर्णा पाककला स्पर्धा 2022

मुंबईच्या दादर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज सावित्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नपूर्णा पाककला स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली आहे. मनसेच्या या पाककला स्पर्धा-2022 मध्ये मोठा संख्या मध्ये महिलांनी भाग घेतलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.

वाहनांच्या व्हीआयपी नंबर शौकिनांसाठी महत्त्वाची बातमी! खिशाला लागणार अधिकची कात्री

राज्य परिवहन विभागानं (State Transport Department) शुक्रवारी महाराष्ट्रातील कार आणि बाईकसाठी व्हीआयपी नंबरसाठी शुल्क वाढवण्याची मसुदा अधिसूचना जारी केलीय. सर्वाधिक मागणी असलेला 'नंबर 1' आता अधिक महाग झाला आहे.  4 लाखांऐवजी आता 'नंबर 1' मिळवण्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील. आरटीओच्या सूत्रांनी सांगितले की सूचना आणि हरकतींसाठी ही एक मसुदा अधिसूचना आहे जी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयाकडून प्राप्त होऊन आणि त्यानंतर राज्य सरकार अंतिम अधिसूचना घेऊन येईल.


 

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत 56 इंच थाळी

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटने एका अनोख्या थाळीची स्पर्धा ग्राहकांसाठी आयोजित केली आहे. जे कुणी दोन व्यक्ती 56 इंच थाळी चाळीस मिनिटात संपवून दाखवतील त्यांच्यासाठी साडेआठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 56 इंच छाती या वक्तव्याने लोकसभा निवडणूक बरीच गाजली होती. त्या पार्श्वभूमी वरती दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस परिसरातल्या Ardor या हॉटेलच्या मालकाने ही थाळी आयोजित केली आहे.

नंदुरबारमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण, कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप, मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात 149 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून त्यापैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, उर्वरित 139 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 18 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या निवडणुकीसाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. अप्रिय घटना टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

जागतिक रोजगार दिन आणि प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Chiplun News : आज जागतिक बेरोजगार दिन आणि प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी या आंदोलनात महिला कार्यकर्त्या निषेधाचे फ्लेक्स अंगावर कापडासारखे परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. या सर्व कार्यकर्त्या बाजारपेठेतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या नसल्याने त्यांनी चहाच्या गाड्या टाकल्या आहेत, अशा चहा टपरीवर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी चहा विकून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक

डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीकडून दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले.काल मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र गद्दारांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक केलं.

महाराष्ट्र काॅग्रेसमध्ये 19 सप्टेंबरनंतर मोठ्या फेरबदलांची शक्यता  

महाराष्ट्र काॅग्रेसमध्ये 19 सप्टेंबरनंतर मोठ्या फेरबदलांची शक्यता  


येत्या 19 तारखेला काॅग्रेसच्या   काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींची बैठक


यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 3 वाजता होणार बैठक


या बैठकीत प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत चर्चा होणार 


एआयसीसी च्या शिष्ठमंडळाकडे चर्चेतील प्रस्ताव मांडले जाणार 


प्रदेशाध्यक्षपदासाठी यशोमती ठाकुर, सतेज पाटील, सुनील केदार यांची‌ नावं चर्चेत आहेत


अंतिम निर्णय काँग्रेस हाय कमांड घेईल

मुंबई : मानखुर्द येथे बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, 7 लाख 16 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त

मुंबई पोलिसांनी मानखुर्द येथील बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आहे.


पोलिसांनी 7 लाख 16 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.


बनावट नोटांसोबतच नोटा छापण्याचे मशीनही पोलिसांनी जप्त केले आहे.


याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

पालघर : एबीपी माझाच्या पाठपुराव्याचा दणका, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवायला सुरुवात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरी पुलावर खड्ड्यामुळे काल आणि आज अपघात घडल्यानंतर अखेर महामार्ग प्रशासनाने हे खड्डे मुरूम आणि मातीने तात्पुरते पुजायला सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग : जहाजातून तेलगळती सुरु, मच्छिमारांना सुरक्षित मासेमारी करण्याचं आवाहन

औरंगाबाद : शिवरायांच्या पुतळ्याखाली राष्ट्रवादीचं आंदोलन

बीड : विरोधी पक्षनेते अजित पवार लाईव्ह

महागाई, बेरोजगारी वाढतेय, शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला, शिंदे सरकारने वेदांतासाठी काहीही केलं नाही - अजित पवार

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यसाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या आहेत. 

सिंधुदुर्ग : तेल वाहू जहाज बुडाल्याने जहाजाला तेलगळतीला सुरुवात, समुद्रकिनारी तेलाचा तवंग

विजयदुर्ग समुद्रा नजीक आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सीमेवर पार्थ नावचं तेल वाहू जहाज बुडाल्याने त्या जहाजाला तेलगळतीला सुरुवात झाल्याने या तेलगळतीचा तवंग आता समुद्रकिनारी दिसायला लागला आहे. त्यामुळे या तेलगळतीचा परिणाम सागरी जीवांवर सुद्धा होणार आहे. तसेच मच्छीमारीवर सुद्धा होणार आहे. आधीच वादळ सदृश्य परिस्थिती त्यात हे अजून एक संकट आल्याने मच्छीमार संकटात सापडला आहे.

नांदेड : नोकरभरतीसाठी विद्यार्थ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केलीय. नांदेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे आले होते. यावेळी श्रीनगर भागात चित्रप्रदर्शन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीस यांच्या भाषणादरम्यान पोलीस भरतीच्या विध्यार्थ्यांनी पोलीस भरती, शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

परभणी : रेल्वेच्या विविध समस्यांबाबत शिवसेना आक्रमक 

परभणी जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध समस्येबाबत आज शिवसेनेचे खासदार संजय जाधव,आमदार राहुल पाटील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.दोन्ही नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनिक घेऊन परभणी रेल्वे स्थानकावर आंदोलन केले यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी स्वतः या दोन्ही नेत्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील रेल्वे समस्येबाबतच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.तरीही १ तासापेक्षा जास्त चाललेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची मात्र मोठी तारांबळ उडाली तसेच पोलीस अधीक्षक जयंत मीना आणि खासदार संजय जाधव यांच्यात बाचाबाची हि झाल्याचे पाहायला मिळाले..

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस शिवसेनेने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संपूर्ण देशात वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे देशभर आयोजन करण्यात आले आहे मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस धुळ्यात शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून घोषित करण्यात साजरा करण्यात आला शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक फोटोला चॉकलेट खाऊ घालत शिवसेनेच्या वतीने पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या सात वर्षात नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळलेले नाही यामुळे त्यांचा वाढदिवस शिवसेनेच्या वतीने बेरोजगार दिन म्हणून साजरा करत नरेंद्र मोदींना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्राच्या हक्काचा असणारा वेदांत प्रोजेक्ट गुजरातला पळवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाखो तरुणांच्या नोकऱ्या गमावल्या असल्याचा आरोप करीत शिवसेनेने पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

19 सप्टेंबरला काँग्रेस प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक, मोठ्या फेरबदलांची शक्यता

Raj Thackeray: रझाकार आणि 'सजा'कार दोघांचा बंदोबस्त मनसे करेल; खरमरीत पत्र लिहित राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray On Hyderabad: आज हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलं आहे.  राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Cheetah in India : भारतात 'चित्ता' परतला, पंतप्रधानांनी आठ चित्ते कुनो अभयारण्यात सोडले

तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं.


सविस्तर बातमी येथे वाचा.

वसई :  मुंबई अहमदाबाद महामार्ग मागच्या तीन दिवसांपासून जाम

सतत पडणारा पाऊस, महामार्गावर पडलेले खड्डे, खड्ड्यात साचलेले पाणी, तसेच वाहनांचे होणारे अपघात यामुळे वाहन संतगतीने सुरू आहे. घोडबंदर वर्सोवा पुला पासून गुजरात हून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वसई हद्दीत तर मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या लेनवर मिरारोड, काशीमीरा हद्दीत होत आहे ही वाहतूक कोंडी आहे. लांब पल्ल्याची वाहन 2 ते 3 तास या वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनधारकात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गावरील वसई हद्दीतील मालजीपाडा, ससुपाडा, वर्सोवा पुला जवळील आज सकाळी 11 वाजताची ही दृश्य आहेत.

अहमदनगर : लम्पीबाबत आता शाळेतही जनजागृती

जनावरांमधील लम्पी आजाराचा विळखा वाढताना दिसतोय. अशातच अहमदनगरच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लम्पी आजाराला रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि लसीकरणावर भर दिला जातोय. त्यातच आता पशुसंवर्धन विभागासोबतच शाळेतील शिक्षकांनी देखील जनजागृती करण्यास सुरुवात केलीय. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जनजागृती सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील  478 जनावरांना लम्पी आजाराची बाधा झालीये...पशुसंवर्धन विभागाने तातडीने यावर उपाय योजना करून 217 जनावरं उपचार करून बरी देखील केलीये... लम्पीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला जातोय... यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांमध्ये जनजागृती केली जात आहे...या आजाराच्या लढाईत आता जिल्हा परिषद शिक्षकांनी देखील आपलं योगदान देण्यास सुरुवात केलीये...अहमदनगरच्या गुंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू असून ज्यांचे घरचे जनावरांचे गोठे स्वच्छ असतील त्यांना शाळेच्या वतीने 101 रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे.

चित्त्यांना विलुप्त केलं हे आपलं दुर्भाग्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

भंडारा : मासेमारीसाठी गेलेल्या जावई आणि सासऱ्याचा वीज कोसळून मृत्यू

मासेमारीसाठी गेलेल्या जावई आणि सासऱ्यावर वीज कोसळल्यानंतर नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर (हमेशा) येथील धरणावर घडली आहे. दिनेश खुणे वय 48, रा. पुलपुट्टा मध्य प्रदेश आणि त्यांचे जावई बुधराम हांडके 48, रा. हिरापूर, हमेशा ता. तुमसर यांचा मृतकात समावेश झाला आहे.

जालना : राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित
त्यावेळी राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे तर अजित दादांनाच माहित असल्याचा टोमणा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावलाय.. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.. राज्याची तिजोरीत खडखडाट नसून ति सर्वांसाठी भरलेली आहे असं सत्तार यांनी म्हंटलंय.. त्याचबरोबर राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले असून त्यांच्या खात्यावर 3 हजार 500 कोटी रुपयांची मदतही पोहोचली असल्याची माहिती सत्तार यांनी दिलीये.. दरम्यान ऑनलाईन ई पीक पाहणीत बदल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचंही सत्तार यांनी म्हंटलंय..
Project Cheetah : भारतातील वातावरणाशी जुळवून घेण्याचं चित्त्यांपुढे आव्हान



#ProjectCheetah : नामिबियातून भारतात आणलेल्या 8 चित्त्यांना कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडलं

Project Cheetah : आठ आफ्रिकन चित्त्यांना कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आलं

यवतमाळ : 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील एका छोट्या गावात 11 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ऐका अल्पवयीन मुलासह 4 जना विरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी फरार असून महागाव पोलीस ठाणे शोध घेत आहे. 12 संटेंबरला अत्याचारित बालिकेचे आई वडील मजुरी करण्यासाठी शेतात गेले असता बालिका  घरी एकटीच होती. दरम्यान  यातील ऐका आरोपीने तिला घरी बोलावून आत घेऊन गेला आणि त्याच्या मित्रांनी दार लावून घेतले. त्या नंतर नराधम आरोपीने अमानुष अत्याचार केला. आणि या घटनेची कुठे वाच्छाता केली तर मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे दोन तीन दिवस मुलीने या बाबत कोणालाही सांगितले नाही. मात्र  या घटने नंतर मुलीची प्रकृती बिघडली तेव्हा आई वडील तिला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र दोन तीन दिवस झाले तरी प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शिवाय मुलगी मनोरुग्णा सारखी वागत असल्याने तिला उपचारासाठी  पुसद येथील रुग्णालय घेऊन गेले. तेव्हा डॉक्टरांनी मुलीची बरकाई ने चौकशी केली. तेव्हा तिने आई वडिलांना घडलेली घटना सांगितली. त्या नंतर पिडीत मुलगी आणि आई वडील यांनी महागाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या  तक्रारी वरून चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.
बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुन्हा पवारांना धक्का, बारामतीला होणारी बिबट सफारी जुन्नरला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा पवारांना धक्का दिलाय.. बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र याविरोधात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. मात्र बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु आता सत्ताबदल झाल्याने अजित पवार यांनी घेतलेला बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.

बुलढाणा : समृद्धी महामार्गाच्या अपूर्ण कामांचा विध्यार्थ्याना फटका

मेहकर जवळ असलेल्या डोनगाव जवळ समृद्धी महामार्गाच्या बाजूला गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात आज सकाळी सात वाजता एक स्कुल बस घसरल्याने आणि फसल्याने स्कुल बसमधील 15 आणइ हा मार्ग जाम झाल्याने एसटी बस मधील जवळपास 120 विध्यर्थी गेल्या तीन तासांपासून एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. यामुळे मात्र समृद्धी महामार्गाच्या अपूर्ण कामाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याचं समोर आलं आहे.

गोंदिया : रब्बी हंगामातील धान्य खरेदीचा घोळ प्रकरण, 38 धान खरेदीकेंद्रांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड
रब्बी हंगामातील धान्य खरेदीचा घोळ करणाऱ्या 38 धान खरेदी केंद्रांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा ठोठावला दंड तर इतर केंद्रांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीदरम्यान 7 जुलै रोजी एकाच दिवस 4 लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. हा मुद्दा लावून धरल्यानंतर शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अखेर चौकशीत दोषी आढळलेल्या 38 धान खरेदी केंद्रांवर प्रत्येकी 1 लाख रुपये तर उर्वरित 50 केंद्रांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
नवापूर : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांची प्रकृती ढासाळल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारपासून त्यांना उपचारासाठी नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचं निधन झाल्याने धुळे नंदुरबार जिल्ह्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या अंतिम संस्कार रविवारी सकाळी त्यांच्या शेतात करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
हिंगोली : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हिंगोली शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हुतात्म स्मारकाला आदरांजली अर्पण करण्यात आली. या ठिकाणी प्रशासकीय ध्वजारोहण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी हवेत गोळीबार करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबर पासून सुरु

नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्प 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यात येणार आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत बंद ठेवण्यात आला होता. पावसाच्या परिस्थितीनुसार पर्यटन रस्त्यांची स्थिती पाहून नवेगाव-नागझिरा प्रकल्पातील निसर्ग पर्यटन ऑफलाईन असणार आहे. 16 ऑक्टोबर 2022 पासून व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन ऑनलाईन पध्दतीने नियमीत सुरु करण्यात येणार आहे. 

वर्धा : रानडुकरची शिकार करणारे अटकेत
रानडुक्कराची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाकडून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मौजा कोटंबा शिवारात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनरक्षक मोहर्ले मौजा कोटंबा शिवारात गस्तीवर असताना त्यांना काही इसम संशयास्पद स्थितीत आढळून आले. रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या इसमांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळे, भाला आदि साहित्यासह वन्यजीव रानडुक्कराचे मांस आढळून आले. याप्रकरणी पाच जणांना मांस व शिकारीच्या साहित्यासह वनविभागाने ताब्यात घेतले. 
पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले पाहिजे : मुख्यमंत्री

'दुष्काळ कमी झाला पाहिजे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवले पाहिजे, विकास कामाचा आम्ही वार रूम मधून आढावा घेत आहोत.जो काही बॅकलॉक आहे तो भरून काढण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल. मराठवाडा वाटर ग्रीडसह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक समाजातील घटकाच सरकार आहे.', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सुरू असताना शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू असतानाच एका शेतकऱ्याने आपल्या मागण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शिरसाळा येथील शिवाजी उपाडे असं या शेतकऱ्याचे नाव असून अनेक दिवसापासून त्याच्या जमिनीचा वाद प्रलंबित आहे. अनेक वेळा मागणी करून देखील यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई होत नसल्याने शिवाजी उपाडे यांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात पोलिसांनी त्याच्या हातामधील रॉकेल व माचीस हिसकावून घेऊन या शेतकऱ्याला ताब्यात घेतला आहे.

बीड : अजित पवार यांच्या हस्ते मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते बीडच्या माजलगावमधील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झालं आहे. आमदार प्रकाश सोळंके, माजी आ मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार अमरसिंह पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मुंबई दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे मिशन 45 सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत कधीही न जिंकलेल्या 16 मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष दिलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर येणार आहेत. त्यांचा दोन दिवसाचा दौरा असेल. या दौऱ्या दरम्यान या लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या सायन सर्कल येथील कार्यालयापासून या दौऱ्याला सुरुवात होईल.

ठाणे : कापूर बावडी परिसरात गोळीबार, एका चार चाकी गाडीवर गोळीबार करून आरोपी फरार 

ठाण्यातील कापूर बावडी परिसरात गोळीबार झाला आहे. एका चार चाकी गाडीवर गोळीबार करून आरोपी फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. चार चाकी गाडीत दोन व्यक्ती होते मात्र कोणालाही दुखापत नाही. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी गोळी झाडली मात्र ती गाडीला लागली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही बाजूच्या व्यक्तींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

Project Cheetah : पंतप्रधान नरेंद्र मोदी कुनो अभयारण्यात दाखल

Project Cheetah : नामिबियाहून भारतात दाखल झालेले आठ चित्ते कुनो अभयारण्यात दाखल

नामिबिया येथून विशेष विमानानं आफ्रिकन आठ चित्त्यांचं भारतात आगमन झालं आहे. चित्त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येईल.






 

नामिबियातून आलेले चित्ते हेलिकॉप्टरद्वारे कुनो नॅशनल पार्कमध्ये दाखल

नागपूर : अग्नीवीर भरती प्रक्रियेला सुरुवात

सैन्याच्या अग्नीबीर भरती प्रक्रियेला नागपुरात सुरुवात झाली आहे... नागपूरच्या मानकापूर परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया होत आहे... विदर्भातील बुलढाणा वगळून इतर सर्व दहा जिल्ह्यांसाठीच्या या भरती प्रक्रियेत पुढील काही दिवसात 60 हजार तरुण सहभागी होण्याची शक्यता आहे... आज गोंदिया जिल्ह्यातील तरुणांना भरती प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील एक एक तालुक्यातील तरुणांना छोट्या छोट्या समूहमध्ये बोलावून भरती प्रक्रिया घेतली जात आहे. आधी भरती प्रक्रियेत गर्दी उसळायची मात्र एक एक जिल्ह्यातील एकेक तालुक्यातील तरुणांना भरती प्रक्रियेसाठी बोलावले जात असल्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू असल्याची प्रतिक्रिया तरुणांनी दिली... अशा नियोजनबद्धतेमुळे आमचा तणाव कमी झाल्याची प्रतिक्रिया ही काही तरुणांनी दिली... प्रशासन आणि सैन्य प्रशासनाने भरती प्रक्रियेत कुठलाही गोंधळ होणार नाही यासाठी भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या तरुणांना मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातच थांबवण्याचे नियोजन केले आहे.

नागपूर : व्हेंटिलेटरच्या अभावी तरुणीचा तडफडून मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील 17 वर्षीय तरुणीला तिच्या आईवडीलांनी उपचारकरीता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणले होते. मात्र, व्हेंटिलेंटर उपलब्ध नाही असे कारण देत तिथल्या डॉक्टर्सनी तब्बल 20 तासांपेक्षा जास्त वेळ तिला अंबू बॅगद्वारे कृत्रिम श्वास देत ठेवले. धक्कादायक म्हणजे या कामी आजारी तरुणीच्या आईवडिलांनाच लावल्याने वीस तासांपेक्षा जास्त अवधी तिचे आई-वडील अंबु बॅग दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते. 17 वर्षीय तरुणीवर तरुणीला अखेरपर्यंत व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. अखेरीस गुरुवारी व्हेंटिलेटरच्या अभावी तरुणीचा तडफडून मृत्यू झाला.

नवी मुंबई : विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षकाला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा

नवी मुंबईतील एका 44 वर्षीय कोचिंग क्लास शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा केला होता. यावर नवी मुंबई येथील जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून आरोपीला 20 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नंदुरबार : तोरणमाळ घाटात रस्ता खचला

सातपुड्याचा डोंगररांगांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे तोरणमाळ येथील सात पायरी घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. तर काही ठिकाणी झाले रस्त्यावर उमलून पडत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील झाडे दूर करून वाहतूक सुरू केली आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे वर्षा पर्यटनाचे आवडते ठिकाण असलेल्या तोरणमाळ घाटात  रस्ता खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच कोसळलेल्या दरडीचे ढीग रस्त्यावर असल्याने वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याकडे दुर्लक्ष केले जात असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्ता खचल्याने मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचल्याने एकाच वेळेस दोन वाहने जाऊ शकत नाही. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा जनसंपर्काचा हा रस्ता असून तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या ही मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गाड्या येजा करीत असतात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने राणीपूर पासून तोरणमाळ पर्यंत असलेल्या 22 किलोमीटर घाट मार्गाची ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्या ठिकाणची दुरुस्ती करावी मागणी परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे.

रत्नागिरी : जुलै 2011 मधील चिपळूणमधील महापूर मुसळधार पावसामुळेच

जुलै 2011 मधील चिपळूणमधील महापूर मुसळधार पावसामुळेच!


सरकारने स्थापन केलेल्या अभ्यास गटाचा निष्कर्ष

 

आलेल्या महापुरात कोळकेवाडी धरणातील पाण्याचा वाटा 3.81 टक्के असल्याचा देखील निष्कर्ष

 

अभ्यास गटाने अहवाल शासनाकडे सादर केला अहवाल
नांदेड :मंत्री सुधीर मुनगंटीवारांचे अप्रत्यक्ष रित्या अशोक चव्हाणांना भाजपचे आमंत्रण?

काँग्रेसमधून मुक्ती होण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा, ज्यांचे सूर्यावर प्रेम आहे त्यांनी सूर्याच्या दिशेनी झेप घ्यावी, प्रत्येकांनी स्वतःचा, स्वनिर्णय घेणे ही लोकशाहीची सुंदरता आहे. देशभक्तीचा झेंडा हाती घेऊन हरघर तिरंगा हरमन तिरंगा घेऊन, मोदींजींच्या विचारावर विश्वास घेऊन पुढे जावंं. रेडिओ ज्या गावचा असेल त्या गावचं स्टेशन लागतं. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून लवकर मुक्त होण्याचा निर्णय घ्यावा, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलंय. दरम्यान मराठवाड्यातील काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याने भाजपात लवकर येण्याचं आमंत्रण दिलंय, हे मात्र पाहावं लागेल.

सिंधुदुर्ग : दुबई ते बेंगलोर जलप्रवास करणारे पार्थ तेलवाहू जहाज बुडाले

दुबई ते बेंगलोर अशी पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रामार्ग अतिरराष्ट्रीय जलवाहतूक करणाऱ्या एमटी पार्थ हे विजयदुर्ग ते देवगड समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 40 ते 45 वाव समुद्रात जलसमाधी मिळाली. एमटी पार्थ जहाजावरील एकूण 19 कर्मचारी होते. यात 18 भारतीय, तर एक इथोपियन व्यक्तीचा समावेश होता. या 19 कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आलेले आहे.

नामिबियातून आठ चित्ते भारतात दाखल

नामिबियातून आठ चित्ते भारतात दाखल झाले आहेत.





सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिन

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने 5 जुलैपासून  75 दिवसांची  स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद् ही मोहिम सुरु करण्यात आली. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या 7500 किलो मीटर लांबीच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत देशभारातील 75 समुद्र किना-यांवर 75 दिवसांची मोहिम राबविण्यात आली. 

धुळे : पावसामुळे सुरत-धुळे महामार्गाची नवापूर जवळ दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गाची नवापूर तालुक्यात  प्रचंड दुरवस्था झाली आहे.महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक जणांना जायबंदी व्हावे लागत आहे. महामार्गावर दररोज होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातांमुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या महामार्गाच्या दुरावस्थेकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावयाची मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी केले आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
मुंबई - 70 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने केलेल्या अवयवदानातून पाच जणांना जीवदान

मुंबईत सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने केलेल्या अवयवदानातून पाच जणांना जीवदान मिळाले आहेदरम्यानया महिलेने टिश्यूकॉर्नियायकृतदोन्ही मूत्रपिंड दान केले आहेतया महिलेवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होतेपणतिला 15 सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलेयंदाच्या वर्षांतील मुंबईतील 29 वं यशस्वी अवयवदान असल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. या दिवशी संपूर्ण देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 

 आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन

हैदराबादला 1948 मध्ये भारत सरकारने निझामाच्या राजवटीविरुद्ध पोलीस कारवाई करून भारतात सामावून घेतले. वल्लभभाई पटेल यांनी पोलिस कारवाई करण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे हैदराबाद मुक्त केलं. त्याचं स्मरण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन पाळला जातो.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन


हैदराबादला 1948 मध्ये भारत सरकारने निझामाच्या राजवटीविरुद्ध पोलीस कारवाई करून भारतात सामावून घेतले. वल्लभभाई पटेल यांनी पोलिस कारवाई करण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे हैदराबाद मुक्त केलं. त्याचं स्मरण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन पाळला जातो.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस


 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. या दिवशी संपूर्ण देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींचा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यप्रदेश दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले चित्ते सोडतील. त्यानंतर, दुपारी 12 च्या सुमारा  ते कराहल, श्योपूर येथे महिला बचतगट सदस्य/सामुदायिक संसाधन व्यक्तींसोबत बचतगट संमेलनात सहभागी होणार आहेत


सात दशकानंतर भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा दिसणार चित्ता


जवळपास 70 वर्षांनंतर भारतातील जंगलात  चित्ता  परत येणार आहे. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान (Kuno Palpur  आफ्रिकी चित्त्यांच्या  स्वागतासाठी तयार आहे. उद्या सकाळी 8.30  वाजता हे चित्ते भारतात येणार आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 1200 हून अधिक स्मृतीचिन्हांचा आणि भेटवस्तूंचा ई-लिलाव   


संस्कृती मंत्रालयाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून  मिळालेल्या  1200 हून अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतीचिन्हांच्या आणि भेटवस्तूंच्या  ई-लिलावाचे चौथे पर्व 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान, आयोजित केले आहे. केंद्रीय संस्कृती , पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री  जी. किशन रेड्डी यांनी या आगामी लिलावाबद्दल प्रसारमाध्यमांना  माहिती दिली.


सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिन


पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने 5 जुलैपासून  75 दिवसांची  स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद् ही मोहिम सुरु करण्यात आली. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या 7500 किलो मीटर लांबीच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत देशभारातील 75 समुद्र किना-यांवर 75 दिवसांची मोहिम राबविण्यात आली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.