Maharashtra Breaking News LIVE Updates : शिवसेना आमदार संजय राठोड वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याच्या भेटीला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra News : राज्यातील विज टंचाईचा मुद्यावर मुख्यमंत्री यांनी ऊर्जा विभागाची बैठक बोलावली. उद्या 12 वाजता बैठक होणार आहे. राज्यातील अनेक विद्युत निर्मिती केंद्रांवर कोळशाचा तुटावडा जाणवत आहे. नाशिक आणि भुसावळ विज निर्मिती केंद्रांवर फक्त दिड दिवस पुरेल एवढाच कोळाशाचा साठा तर इतर केंद्रांवर दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या आढावा बैठक घेणार आहेत. राज्य अंधारात जाऊ नये यासाठी करणार उपाययोजना करण्यात येणार आहेत
Sanjay Rathod : शिवसेना आमदार संजय राठोड मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत.
महाराष्ट्रात गावोगावच्या जत्रा आणि यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत भरवण्याची परंपरा आहे. अशाच पद्धतीने कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे बैलगाडा शर्यतीचा धुराळा उडाला. जिल्ह्यात झालेली ही पहिलीच शर्यत असल्याने हजारोंच्या संख्येने हौशी प्रेक्षकांनी ही शर्यत पाहण्यासाठी गर्दी केली होती. वेळापूर येथील अर्धनारी नटेश्र्वर यात्रेनिमित्त पंच कमिटीचे उत्तमराव जानकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या शर्यतीत पहिल्या क्रमांकाला बुलेट गाडीचे बक्षीस तर इतर विजेत्यानाही 5 मोटारसायकलचा बक्षीस स्पर्धा कमिटीने जाहीर करण्यात आले होते. यामुळे अनेक वर्षांनंतर सर्जा-राजा, ढवळ्या-पवळ्या या शर्यतीत तुफान वेगाने पळाले. भिर्र-भिर्रच्या आवाजात धुरळा उडवत अनेक बैलगाडा मालकांनी यात सहभाग घेतला. बैलगाडा मालकांना अशा शर्यतीची ओढ लागलेली असते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला असताना सोलापूरमध्ये सुद्धा आता या बैलगाडा शर्यतीचा पहिला धुरळा उडला आहे.
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी नारायण राणे यांना पालिकेकडून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हळदीचा लिलाव व्हावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी हळद भरून गाड्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दाखल केले आहे परभणी नांदेड यवतमाळ वाशिम या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी हळद विक्री साठी घेऊन आले आहेत मोठ्या प्रमाणात हळद आवक झाल्याने हळदीच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अनेक शेतकरी कालपासून हळद घेऊन आले आहेत या शेतकऱ्यांना 2 दिवसाचं वाहनाचा भाडे सुद्धा द्यावे लागत असल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय.
Mangesh Kudalkar : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर (वय, 42) असे त्यांचे नाव आहे. मुंबईतील कुर्ला नेहरू नगर येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.
भारतातील पहिली ट्रेन शनिवारी 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली .भारतीय रेल्वे ने 16 एप्रिल रोजी 170 व्या वर्षात प्रवेश केला .भारतातील रेल्वेच्या 'पहिल्या प्रवासा'च्या प्रित्यर्थ, 'आझादी' का अमृत महोत्सव', रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवसाच्या निमित्ताने, मध्य रेल्वे, युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या हेरिटेज इमारतीवर एक अनोखा ध्वनी-प्रकाश परफॉर्मन्स शो सादर करण्यात येतोय .नवरसंगम – एक गाथा सीएसएमटी की”, रेल्वे कर्मचारी असलेल्या 70 कलाकारांद्वारे भारतीय सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन केले जाणार आहे. या शो च्या माध्यमातून रेल्वे चा इतिहास उलगडण्यात येणार आहे .134 वर्ष जूने असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा व्हिक्टोरिया टर्मिनस ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यत चा प्रवास या शो च्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे
किरीट सोमय्या सोमवारी सकाळी 11 वा. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय EOW येथे हजेरी लावणार आहेत. मुंबई मनपा कोव्हीड केस संदर्भात आझाद मैदान पोलिस स्टेशन येथे केस तिथं जाणार आहेत.
आता मुंबईतील भ्रष्टाचाराचा आपण पोलखोल करायचा आहे. आता आपण जिथं जिथं शिवसेनेची भ्रष्टाचाराची ठिकाण आहेत तिथं जाऊन सेल्फी काढायचा आहे आणि तो पोस्ट करायचा आहे. पत्राचाळीत देखील मराठा कुटुंबियांवर अनन्या झाला आहे. स्थानिक आमदार सुभाष देसाई यांनी याबाबत काहीच केलं नाही. त्यामुळें आम्हला इथ सभा करू देत नव्हते परंतु आम्ही सांगितल जर गोरेगाव येथे सभा करू दिली नाही तर अख्खी मुंबई भाजपची सभा होईल. तेव्हा आम्हाला परवानगी देण्यात आली, असे अमित साटम म्हणाले.
BEED : भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित करणे मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 153 अ 295 अ आणि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी सदावर्ते यांना तात्काळ अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा स्वप्निल गलधर यांनी दिला आहे. डंके की चोट पर आम्ही सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे देखील यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
Aditya Thackeray : आम्ही निवडणुकीसाठी कामे करत नाही, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईत व्ह्युविंग डेकचं लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आदित्य ठाकरेही उस्थित होते.
Uddhav Thackeray : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस.... महाविकास आघाडीचं एक वेगळा रसायन तयार झाले असून हे सर्व जीवाला जीव लावणारे माझे सहकारी आहेत.. नितीन राऊत यांनी पुस्तक लिहिलंय, याचा बराच आनंद आहे. राजकारणी आणि अभ्यासू ही दुर्मिळ बाब, मात्र नितीन राऊत यांनी तो समज खोटा ठरविला आहे.
Gunratan Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, मराठा समाजाला अत्याचारी समाज असे संबोधित करणे, मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचा अपमान करणे, त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसांत दिली होती.
गलधर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदावर्ते यांना तत्काळ अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वप्निल गलधर यांनी दिला आहे.
Beed News Update : बीडच्या गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका शिवसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
साक्षळपिंपरी येथील रहिवासी असलेले शिवसैनिक दत्ता काशीद हे आपल्या अन्य दोन सहकाऱ्यांसह औरंगाबादहून बीडकडे येत असताना बाग पिंपळगाव फाट्याजवळ त्यांची स्कॉर्पिओ गाडी डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दत्ता काशीद यांचा मृत्यू झाला. इतर दोघे जण जखमी झाले. जखमींना बदामराव पंडित यांनी तत्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. दत्ता काशीद हे अनेक वर्षापासून शिवसेनेचे काम करतात होते.
Buldhana News Update : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावातील काही घरांना भीषण आग लागली. या आगीत 30 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग जास्तच पसरली. या आगीत 30 बकऱ्यांसह चार घरे जळून खाक झाली. मेहेकर येथील अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे.
Devendra Fadnavis : कोल्हापूर पोटनिवडणुकीत मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. कोल्हापुरात एकटे लढून आमच्या मतात वाढ झाली आहे. 2024 मध्ये कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही नक्की जिंकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापुरात महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. योगिनी सुकुमार पवार असं आत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलचं नाव असून कौटुंबिक वादातून राहत्या घरी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
एसटी आंदोलनामुळे वादग्रस्त ठरलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एसटी कामगार संघटनेचे वकील आणि सध्या अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी आंदोलन केले. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी खळबळजनक वक्तव्य केले. सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले.
Amravati Breaking : आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल..
अमरावती मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाईफेक प्रकरण...
आमदार रवी राना वर दाखल असलेल्या कलम 307 च्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग अमरावतीत दाखल..
आमदार रवी राणा आणि खासदार राणा नवनीत राणा चौकशीसाठी अमरावती पोलीस आयुक्तांलयात दाखल..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुणे येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.
Amravati Breaking : अमरावतीत शिवसैनिक आक्रमक, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरावर मोर्चा, राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-17-april-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1051153
Amravati Breaking : अमरावतीत शिवसैनिक आक्रमक, शिवसैनिक राजापेठ इथं जमा होण्यास सुरुवात...
राजापेठ वरून शिवसैनिक आमदार रवी राणा यांच्या घरी जाणार आणि आंदोलन करणार...
आमदार रवी राणा यांच्या घरासमोर अमरावती महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं आंदोलन होणार आहे..
हनुमान जयंतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचली नाही तर अमरावतीचे शिवसैनिक आमदार रवी रानाच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा दिला होता.
आमदार रवी राणा हे मुंबईला गेले नाही त्यामुळे आज शिवसेना रवी राणा यांच्या घरासमोर जाऊन कोणतं आंदोलन हे पाहावं लागेल...
Parabhani News : राष्ट्रीय महामार्ग 361 वरील परळी ते गंगाखेड या दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, यासाठी जुन्या आणि मोठ्या विविध झाडांची तोडणी सुरू आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांना ही वृक्ष तोडणी सुरु असल्याचे दिसल्याने त्यांनी थेट तिथे जात वृक्षांची तोडणी थांबवली. याबाबत कंत्राटदारांशी याबाबत चर्चा करून माहिती घेतली व ही जुनी झाडे तोडण्यात येऊ नयेत अशी मागणी केली.
परभणीच्या कोल्हा ते नुसरतपूर राष्ट्रीय महामार्ग 222 चे काम तब्बल पाच वर्षापासुन सुरु आहे. हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. वारंवार बैठका घेऊनही काही उपयोग होत नसल्याने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी थेट राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियत्यांना चांगलाच दणका दिला आहे. येत्या 7 जूनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर अपघात अथवा इतर काही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून थेट फोजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर सोमय्या यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडून कारवाई होण्याआधीच सोमय्या यांनी विविध विभागांना पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट केली आहे. सोमय्या यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. किरीट सोमय्या यांनी नगर विकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना त्यांनी पत्र लिहीले आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला.
देशात कोरोना संसर्गबाधितांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून आले. देशात मागील 24 तासात कोरोना विषाणूचे 1150 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तर, चार संसर्गबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून 11 हजार 558 इतकी झाली आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात शनिवारी मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक आणि तोडफोडवरून आता राजकारण सुरू झाले आहे. चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील दंगलीचा निषेध केला, तर दुसरीकडे सुरक्षेच्या जबाबदारीवरून केंद्राकडे बोट दाखवलं आहे. तर भाजपने केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे. दिल्लीतील परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी सुरक्षेची जबाबदारी केंद्रावर टाकत दिल्लीची सुरक्षा केंद्राच्या हातात असल्याचं म्हटलंय.
उल्हासनगर शहरात कोटी रुपये खर्च करुन दुमजली प्रांत कार्यालय उभारण्यात आलं. मात्र हे कार्यालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्यानं गेल्या वर्षभरापासून त्याला कुलूप आहे. कार्यालय वापरात नसल्याने अस्वच्छता पसरली आहे. खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. स्थलांतरण रखडल्याने नागरिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना छोट्याशा जागेत प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकावा लागतोय. इमारत बांधून तयार असताना जुन्या प्रांत कार्यालयाचं नव्या इमारतीत स्थलांतरण कधी होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. दरम्यान मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने आणि उदघाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने स्थलांतरण थांबले असावे अशी चर्चा शहरात सुरू आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज ठाकरेंची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद
राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये महाआरती केली. मशिदींचे भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन राज्यातील राजकारण तापलं असताना राज ठाकरेंवर अनेकांकडून टीका केली जातेय. त्या टीकेला आज राज ठाकरे उत्तर देणार असून त्यासंबंधी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आहे.
आज मुंबईत मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील अपघातामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. आजही प्रवाशांचे मेगा हाल होऊ शकतात. मध्य रेल्वेने आज मेगा ब्लॉक घेतला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावरील गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
जम्मूमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग परिसरात काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक जवान शहीद झाला. अजूनही या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
प्रशांत किशोर आणि काँग्रेसमध्ये महत्वाची बैठक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे झालेल्या एका हायप्रोफाईल बैठकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंबंधी चर्चा झाली आहे. यावर प्रशांत किशोर यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीत राजकीय पक्षांना सल्ला देणारी खाजगी संस्था IPAC चे माजी प्रमुख प्रशांत किशोर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसमोर PPT Presentation केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी त्यांची योजना स्पष्ट केली. या बैठकीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटनी, अंबिका सोनी, जय राम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह, अजय माकन आणि केसी वेणू गोपाल हेही उपस्थित होते.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा कर्नाटक दौऱ्यावर
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
मॉरिशसचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे त्यांच्या पत्नीसोबत दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा 24 एप्रिलपर्यंत असणार आहे.
'हुनार हाट'च्या 40 व्या कार्यक्रमाचे आज मुंबईत उद्धाटन
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या आणि स्थानिक कारागिरांना तसेच शिल्पकारांच्यां कलेला संरक्षण देणाऱ्या 'हुनार हाट'च्या 40 व्या कार्यक्रमाचे उद्धाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम मुंबईमध्ये होत आहे.
आएपीएलच्या (IPL 2022) आज दोन लढती आहेत
PBKS vs SRH : आज रंगणार पंजाब विरुद्ध हैदराबाद
यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2022) 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना दुपारी तीन वाजता वेळेत होणार आहे, त्यामुळे उष्णता अधिक असल्याने दवाची अडचण अधिक होणार नाही. दवाची अडचण नसल्याने नाणेफेक आजच्या सामन्यात मोठा प्रभाव पाडणार नसल्याचं ही तज्ज्ञांचं मत आहे.
GT vs SCK : गुजरात विरुद्ध चेन्नईमध्ये रंगणार आजची लढत
ही लढत संध्याकाळी साडेसात वाजता पुण्यातील एमसीए मैदानावर होणार आहे. गुजरात आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहे तर चेन्नईचा संघ दुसऱ्या विजयासाठी दोन हात करणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -