16 March 2022 Breaking News LIVE Updates : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची महत्वपूर्ण बैठक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Mar 2022 07:33 PM
Raigad News : दहा लाख रुपयांची खंडणी मागत ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांना अटक

दहा लाख रुपयांची खंडणी मागत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्याकडे ही दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करत खंडणीची मागणी करण्यात आली होती. गणेश पोळ, जीवन महापुरे, महेंद्र बनसोडे, मुरलीधर पाटील यांना वडखळ पोलिसांनी अटक केली आहे.

पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून  आनंदाची धुळवड साजरी करू या- मुख्यमंत्री

पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि  नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले जाऊन सुविचारांची पेरणी केली जाते. हीच परंपरा आपण विविध स्वरूपात पुढे नेत असतो. २१ मार्च हा दिवस आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. आपण ज्याला वातावरणीय बदलाचे परिणाम म्हणतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करतो तेंव्हा त्याची सगळी उत्तरे आपल्याला “वनात”  मिळतात.  आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका दहनाचा विचार करतो तेंव्हा त्यासाठी वृक्षतोड होणार नाही, निसर्गरंगांची जपणूक होईल, याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.


 


 

Maharashtra News : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची महत्वपूर्ण बैठक

Maharashtra News :  कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा निवडणुक उमेदवार याबाबत भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली आहे.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुन्ना महाडीक, अमल महाडीक यांच्या समवते नेत्यांची बैठक सुरू आहे. उमेदवार कोण द्यायचा याबाबत खलबते होणार आहे.

Nanded News : हिमायतनगर-भोकर कार दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृ्तयू

नांदेडच्या हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर आता वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनांचा वेगही अधिक असल्याने भरधाव वेगात भोकरकडून हिमायतनगरकडे येणाऱ्या कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने, दोघेजण जागीच ठार झाले असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Sangli District Bank News  : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेप्रकरणी मुंबईत तातडीची बैठक सुरु

Sangli District Bank News  : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेप्रकरणी मुंबईत तातडीची बैठक सुरू झाली आहे. पालकमंत्री जयंत पाटील हे या बैठकीला उपस्थित आहे.  दि महाराष्ट्र स्टेट को-आॅप बॅंक लि., मुंबई फोर्ट परिसरातील मुख्यालयात बैठक सुरु आहे.  बॅंकेतील काही संचालक सदस्यांची देखील बैठकीला उपस्थिती आहे.

Kunal Raut : कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड

कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. 

Pravin Darekar :  प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार

Pravin Darekar :  प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची मागणी फेटाळली आहे.  अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

माजीमंत्री आणि ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या अंत्यविधीस थोड्याच वेळात सुरूवात

माजीमंत्री आणि ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या अंत्यविधीस थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांना अखेरचा निरोप ‌देण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित ओआहे. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री आशुतोष काळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी आ.चंद्रशेखर कदम, पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकूटे, बाळासाहेब मुरकूटे, शिवाजी कर्डीले असे अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत.

Temperature : पुण्यातील तापमान ४० अंशांजवळ, मगरपट्टा ३९ अंश सेल्सिअसवर
Temperature : राज्यातील तापमान वाढलं, विदर्भ आणि कोकणात आज देखील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा 

 

ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, उष्णतेच्या लाटेचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा 

 

विदर्भात आज आणि उद्या नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावतीत उष्णतेच्या लाटेचा इशारा, चारही ठिकाणी नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी 

 

पुण्यातील तापमान ४० अंशांजवळ, मगरपट्टा ३९ अंश सेल्सिअसवर
Ahmednagar News Update : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात उद्यापासून सहा दिवस प्रतिबंधात्मक आदेश

Ahmednagar News Update : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात उद्यापासून सहा दिवस प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे. होळी, धुलीवंदन, शिवजयंती आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार 17 ते 22 मार्च या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. 

 MLA Fund : आमदार निधी  चार कोटी रुपयांच्या वरून पाच कोटी, तर ड्रायव्हरचा पगार 15 हजार वरुन 20 हजार रुपये

 MLA Fund :  आमदार निधी  चार कोटी रुपयांच्या वरून पाच कोटी करण्यांत आला आहे. ड्रायव्हरचा पगार 15 हजार वरुन 20 हजार करण्यांत आला आहे. तर पीएचा पगार 25  हजारावरुन 30 हजार करण्यांत आला आहे. 

Yawatmal News : जवळपास 5 लाखांची बनावट दारु जप्त

होळीच्या तोंडावर बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर अवधुतवाडी पोलिसांनी धाड टाकली आहे. शहरातील गोदनी परिसरात बनावट दारूचा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्याठिकाणी धाड टाकत पोलिसांनी अंदाजे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 5 जणांना अटक केली आहे.

विधान परिषदेत उपसभापती विरोधकांना बोलू देत नसल्याचा विनायक मेटे यांचा आरोप


Maharashtra Legislative Council :   विधानपरिषदेत विनायक मेटे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांची जोरदार खडाजंगी. विधान परिषदेत उपसभापती विरोधकांना बोलू देत नसल्याचा विनायक मेटे यांनी आरोप केला आहे. 

Akola : नितीन देशमुख हे श्रीरंग पिंजरकरांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

Akola : अकोला जिल्ह्यातील शिवसेनेतील वाद टोकाला. शिवसेनेचे अकोला सहायक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांवर आमदार नितीन देशमुख ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांनी केले होतेय खंडणीखोरीचे आरोप. पिंजरकरांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची आमदार देशमुखांची 'एबीपी माझा'ला माहिती.

Congress News : काँग्रेसमधल्या अंतर्गत असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर आज जी 23 चे नेते पुन्हा कपिल सिब्बल यांच्या घरी भेटणार

काँग्रेसमधल्या अंतर्गत असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर आज जी 23 चे नेते पुन्हा कपिल सिब्बल यांच्या घरी भेटणार, या बैठकीला होली मिलन असं नाव देण्यात आलं आहे, पक्षाकडून वेगळ्या बैठकांमुळे कारवाई होऊ नये म्हणून, राहुल गांधींनी काही काळ पूर्णपणे बाजूला राहावं अशी या गटाची मागणी, पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधींना उतरून न दिल्यामुळे देखील खंत


महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव नेते या बैठकीत हजर असतील


मुकुल वासनिक सुरुवातीला जी23 चे सदस्य मानले जात होते पण पक्षांतर्गत रचनेत त्यांना पुन्हा सामावून घेतला आहे त्यामुळे ते आता या बैठकांना नसतात

Nanded News : नांदेड: माहूरच्या जंगलात दोन दिवसांपासून धगधगतोय वनवा,वणव्यामुळे वनसंपदेची मोठी हानी

Nanded News :  माहूर जंगलात  दोन दिवसांपूर्वी  पेटलेल्या वणव्यावर आज सकाळपर्यंत नियंत्रण मिळवण्यास वन विभागाला यश आले नाही. त्यामुळे या वणव्यामुळे वनसंपत्तीची प्रचंड हानी झाली आहे.

Dhule News : धुळे: जिल्ह्याचा पारा 36 अंश सेल्सिअसवर; तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

Dhule News : धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. जिल्ह्यातील तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. हिवाळ्यात 2.8 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद जिल्ह्यात झाली होती मात्र अवघ्या काही दिवसांतच जिल्ह्यातील तापमान मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  तापमान वाढीचा परिणाम जनजीवनावर झाला असून सकाळी अकरा वाजे नंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर नेहमी दिसणारी वर्दळ काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sangli maharashtra News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

Sangli maharashtra News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांचा तडकाफडकी पदाचा राजीनामा.  जिल्ह्यातील बड्या नेत्याची बँकेतुन एकरकमी कर्ज फेड योजना, व्याजमाफीचा निर्णय होण्याच्या शक्यता असतानाच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राजीनामा दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या संस्थाच्या कर्जाचे सुमारे 110 कोटी रूपये व्याज माफ करण्याबरोबर याच नेत्याच्या संस्थांचे 76 कोटी रुपये कर्ज राईट ऑफ करण्याचा निर्णय ही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे

Pune Vaccination Updates : 12 ते 14 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी नाही, कोविन ॲप चालत नसल्यामुळे लसीकरण अद्याप सुरू नाही

लसीकरण पुन्हा खोळंबलं, आजपासून 12 ते 14 वर्षाच्या मधील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार होतं. त्यासाठी ऑनलाईन बुकींग करावी असा आदेश शासनाकडून आला होता. पण लसीकरणासाठी असलेले कोविन ॲप चालत नसल्यामुळे लसीकरणासाठी या मुलांची नोंदणी झालीच नाही. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. पुण्यात कुठल्याच लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू झालं नाही..  

अहमदनगर : कृषी पंपाच्या वीज तोडणीविरोधात डीपीवर जाऊन तार पकडत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कृषी पंपाच्या वीज तोडणीविरोधात अहमदनगरच्या शेतकऱ्याने डीपीवर जाऊन तार पकडत आत्महत्येचा प्रयत्न केला. रब्बीच्या पिकाची काढणी सुरु आहे. त्याबरोबरच फळबागा फळांनी बहरलेल्या असताना महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्याच काम सुरु आहे. हाताशी आलेलं पीक वीज पुरवठा नसल्याने पाण्यावाचून हातातून जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या जामखेड तालुक्यातील खुरदैठण येथील लक्ष्मण कदम या शेतकऱ्याने कृषी पंपाच्या वीज तोडणी विरोधात आक्रमक कोण शेता शेजारी असलेल्या डीपीवर जाऊन हाय होल्ड विजेची तार हातात घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने या डीपीची वीज सुरु नव्हती त्यामुळे अनर्थ टाळला. मात्र कृषी पंपाच्या वीज तोडणी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Raigad News latest Updates : उरण येथील पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक, मोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सागर पवार यांना लाच घेताना अटक

Raigad News latest Updates : (रायगड) उरण येथील पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक, मोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सागर पवार यांना लाच घेताना अटक, दहा हजार रुपयांची लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत विभागाची कारवाई, मंगळवारी रात्रीची घटना 

Shankarrao Kolhe Passes Away : ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन,आज संध्याकाळी 4.30 वाजता अंत्यविधी

Shankarrao Kolhe Passes Away : ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन... वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन, सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम, कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली,  सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क मंत्रिपदी काम, आज संध्याकाळी 4.30 वाजता अंत्यविधी

Maharashtra Nashik Crime News - पोलीस चौकीतच पोलिसांची ऑन ड्युटी दारू पार्टी

 Maharashtra Nashik News : दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणं गाठावं तर पोलिसच दोन तीन पेग मारून टाईट झालेले सापडावेत, हा अनुभव आहे नाशिककरांचा. नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के.नगर चौकीत पोलीसच ऑन ड्युटी दारु पार्टी करताना आढळून आलेत. परिसरातील टवाळखोर दारु पिऊन धिंगाना घालत होते. याची तक्रार करण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस चौकीत गेले. यावेळी पोलिसच दारु पिताना आढळून आले. या घटनेची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. 


Aurangabad Kannad News ; शेतमालाला भाव देण्यावरून दोन व्यापाऱ्यात तुफान हाणामारी

शेतमालाला भाव देण्यावरून दोन व्यापाऱ्यात तुफान हाणामारी .


व्यापारी लिलावात जास्त भावाने माल घेत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून मारहाण .


कन्नड तालुक्यातील करंजखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घटना .


मारहाणीची घटना सीसीटीव्ही कैद .


घटना घडून तीन दिवस उलटले असतानाही आरोपींना अटक नाही.

पुनर्वसित गावांच्या नागरी सोयीसुविधेमध्ये घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप, चौकशीसाठी कार्यकारी अभियंत्यांना पत्र

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात होत असलेला भ्रष्टाचाराबाबत आरोप केले आहेत आणि त्या आरोपाबाबत तसे पुरावेही संबंधित तपास यंत्रणेला दिल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. आता सोमय्या यांनी हिंगोलीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी हिंगोली जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवले आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात बाधित झालेल्या गावांना पुनर्वसनाबाबत नागरी सुविधा देताना घोटाळा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठीचे पत्र किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पुनर्वसन केलेल्या गावांच्या नागरी सोयीसुविधामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्या गावांच्या सोयीसुविधांसाठी 10.24 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत, ती कामे तत्काळ थांबवावी आणि यामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Corona Vaccnation : आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात

Corona Vaccnation : आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होतेय. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचं लसीकरण करण्‍यात येणार आहे. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे. लाभार्थ्‍यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्‍या अंतराने देण्‍यात येणार आहेत.

Milk Price Hike : 'महागाईचे चटके', महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ

Milk Price Hike : आधी पेट्रोल, डिझेलनंतर गॅस या सगळ्याच गोष्टी महाग होत असताना पुणेकरांना आणखी एक महागाईचा फटका बसला आहे. या सगळ्याबरोबरच आता दूध देखील महाग झाले आहे.  महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Vaccination For Children : 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींचं आजपासून लसीकरण


12 to 14 years Vaccination : आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात होत आहे. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचं लसीकरण करण्‍यात येणार आहे. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे.. लाभार्थ्‍यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्‍या अंतराने देण्‍यात येणार आहेत.


केंद्र सरकारकडून 12 ते 14 या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे.  एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती.  


भारतात 12-14 वर्षांच्या मुलांना जास्त धोका?
लसीकरण सुरू होण्यापूर्वी, कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष आणि लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) यांनी सांगितले होते की, आम्ही 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे कारण त्यांना जास्त धोका आहे. ते म्हणाले, "चीन आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असले तरी कोणतीही हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो.


Milk Price Hike : 'महागाईचे चटके', महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ


Milk Price Hike :  आधी पेट्रोल, डिझेलनंतर गॅस या सगळ्याच गोष्टी महाग होत असताना पुणेकरांना आणखी एक महागाईचा फटका बसला आहे. या सगळ्याबरोबरच आता दूध देखील महाग झाले आहे.  महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे. 


ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर 33 रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर 52 रुपये असणार आहे. या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्चपासून करण्यात आली आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.