Maharashtra Breaking News LIVE Updates : वाशिममध्ये भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 15 Feb 2022 08:55 PM
राज्याच्या मुख्य सचिव पदी देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती

राज्याच्या मुख्य सचिव पदी देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  देबाशिश चक्रवर्ती हे 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या नियुक्तीचा आदेश आज काढण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरला सिताराम कुंटे सेवानिवृत्त झाल्यानंतर देबाशीष यांना अतिरीक्त चार्ज देण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार त्या तारखेपासून मुख्य सचिव म्हणून आज ऑर्डर काढण्यात आली आहे.

Washim News : वाशिममध्ये भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Washim News : वाशिमच्या सोयता गावाजवळ ट्रॅक्टर आणि महिंद्रा या दोन वाहनांमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये 10 जण जखमी झाले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू असून वाशिम आणि अकोला येथे जखमींना हलविण्यात आले 
आहे.

Kolhapur: चंदगडमध्ये अस्वलाचा वावर, हल्ल्यात शेतकरी जखमी

दगड तालुक्यातील जंगमहट्टी गावाच्या शिवारात अस्वलाचा वावर आहे. तानाजी शेळके या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला असून या हल्ल्यात तानाजी शेळके हे किरकोळ जखमी झालेत. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. 

अहमदनगर - 6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसांसह दोन सराईत आरोपींना अटक 

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 गावठी  कट्टे आणि 12 जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केलंय... ऋषीकेश घारे आणि समाधान सांगळे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 1 लाख 86 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोल्हार येथे  ऋषिकेश घारे हा गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत  आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये गावठी कट्टे बाळगणार यांचे प्रमाण अधिक असल्याचं समोर येत आहे याबाबत लवकरच योग्य ती कारवाई करणार असल्याचा अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितलं.

Pune : पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य

Pune : पुणे शहरातून वाहत जाणाऱ्या मुळा-मुठा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालया समोर असलेल्या नदी पात्रात ही मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. खासदार सुप्रिया सुळे या आज कार्यालयात आले असताना त्यांनी या जलपर्णीची पाहणी केली आणि आणि फेसबुक लाईव्ह सुद्धा केलं. भाजपाकडून फक्त मोठी मोठी बॅनरबाजी केली जाते मात्र वास्तव्यात काहीही काम होत नाही. नदीची काय अवस्था झाली आहे ते पहा. भाजपकडून अशा पद्धतीने बॅनर लावून लोकांची दिशाभूल केली जाते.

Sindhudurg : कणकवलीत वातावरण तापल ; राणेसमर्थक कणकवलीत आक्रमक 

सिंधुदुर्ग :  कणकवलीतील नारायण राणेंच्या बांगल्याबाहेर समर्थक एकवटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात  काँग्रेसने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा काल दिला होता. मात्र काँग्रेसच्या आंदोलनापुर्वीच राणे समर्थक झाले आक्रमक झाले आहेत. राणेंच्या बांगल्याबाहेर समर्थकांची कॉंग्रेस आणि नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.  राणेंच्या घराबाहेर श्रीफळ वाढवून घातले मालवणीत गाऱ्हाणे घातले जात आहे. 'कॉंग्रेसला सद्बुद्धी देरे महाराजा' असं म्हणत देव रामेश्वराला घातले गाऱ्हाणे. 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात ईडीकडून छापेमारी

मुंबई आणि आसपासच्या परिसरात ईडीकडून छापेमारी सुरु आहे. दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या कराराबाबत छापेमारी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणाही मुंबईत दाखल झाल्या आहेत.


 





उद्योजकांना माफ, सर्वसामान्याना चाप; मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक एनपीए?

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

Sangli : म्हैसाळ भ्रूणहत्या केस वरुन भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांचा सरकारला सवाल

सांगली : म्हैसाळ भ्रूणहत्या केस वरुन भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांचा सरकारला सवाल


सरकारच्या वतीने 'बेटी बचाव, बेटी पढाओ' अभियान राबवले जाते अन भ्रूणहत्या केस मध्ये सरकार 5 वर्ष सरकारी वकील का नेमत नाही.तात्काळ वकील नेमून  ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आरोपींना जामीन मिळालाय त्यांना निलंबित करत सरकार स्त्री भ्रूणहत्याच्या बाबतीत  किती संवेदनशील आहे हे सरकारने दाखवून द्यावे; अन्यथा  आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असं  तृप्ती देसाई यांनी सांगितलं आहे. 

Mumbai Pune Expresswa : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर भिषण अपघात, चौघांचा मृत्यू

Mumbai Pune Expresswa :  मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर भिषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू  झाला आहे. कंटेनर ट्रेलर, ट्रक , टेम्पो आणि कारचा अपघात , सहा वाहनांचा अपघात झाला.  मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा बोरघाटात अपघात झाला. 3 प्रवासी गंभीर जखमी, 5 प्रवासी किरकोळ जखमी,  जखमींना नविमुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 



 

Sangli : सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीमधील इनकमिंग वाढणार; भाजपमधील दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला

Sangli : सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीमधील इनकमिंग वाढणार आहे. भाजप नेते खानापूर-आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.आपल्या सहकारी संस्थांच्या पुनर्जीवनासाठी हे दोन भाजप नेते राष्ट्रवादीत जाणार आहेत.

कोल्हापूर आणि मिरजेतून सुटणाऱ्या 6 एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द

प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर आणि मिरजेतून सुटणाऱ्या सहा एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर-मणगूर, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, मिरजेतून पंढरपूर आणि मिरजेतून सुटणारी हुबळी लिंक एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार

नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उपेंद्र नगर परिसरात घडली आहे. प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्या. प्रशांत जाधव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली तर दुसरी गोळी पोटाला घासून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.


 






Shirdi News : साईनगरी शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी; दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून शिर्डीत रेकी केल्याची कबुली

Shirdi News : साईबाबाच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिलीय. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे गुजरात एटीएसने म्हटलंय. शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्याने याआधीही साई मंदिराला धमकीचे निनावी पत्र तसेच मेल आलेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली दिलीय. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आलेत. 

Petrol-Diesel Price Today 15th February 2022 : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 15th February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. सात वर्षांतील सर्वाधिक दर असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीने आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर 2014 नंतर आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 96.16 डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. आधीपासूनच महागाईत होरपळत असलेल्या जनतेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेल आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. असं असलं तरीदेखील देशात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Sanjay Raut Press Conferance : शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा

Sanjay Raut Press Conferance : भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावं लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. आम्ही खूप सहन केलं आहे. त्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. दरम्यान भाजपचे हे साडेतीन नेते कोण? हे आजच्या पत्रकार परिषदेत कळणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाचे दर सात वर्षातील उच्चांकावर; देशातही पेट्रोल-डिझेलच्या किमती वधारणार?


Petrol-Diesel Price Today 15th February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. सात वर्षांतील सर्वाधिक दर असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीने आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर 2014 नंतर आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 96.16 डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. आधीपासूनच महागाईत होरपळत असलेल्या जनतेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेल आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. असं असलं तरीदेखील देशात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. 


सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Price Today) असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे.  कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपेक्षा अधिक होणार?



कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपेक्षा अधिक होणार असल्याचे म्हटले जात आहे. Goldman Sachs च्या मते, 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 100 पर्यंत पोहोचू शकते आणि 2023 मध्ये प्रति बॅरल $ 105 च्या पुढे जाऊ शकते. त्याच वेळी, जेपी मॉर्गन 2022 मध्ये $ 125 प्रति बॅरल आणि 2023 मध्ये प्रति बॅरल $ 150 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करत आहे.

 



Sanjay Raut Press Conferance : भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावं लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. आम्ही खूप सहन केलं आहे. त्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. दरम्यान भाजपचे हे साडेतीन नेते कोण? हे आजच्या पत्रकार परिषदेत कळणार आहे. 


आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. 
 
संजय राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं होतं. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.