Maharashtra Breaking News : उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात उद्यापासून आंदोलन पेटणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आर्वी तालुक्यातील सावळापूर परिसरातील पुलावरून चारचाकी खाली कोसळली आहे. चारचाकी अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला आहे. सहा महिन्यांच्या चिमुकलीसह गाडीतील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे हिने जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल केली, ते अतिशय चुकीचं आहे. पवार साहेब हे जेष्ठ नेते असून सगळे जण त्यांचं आदर करतात. मी याचा निषेध करते. केतकीने माफी मागितली पाहिजे, अशी मी मागणी करते, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात उद्यापासून आंदोलन पेटणार आहे. इंदापूर, बारामती साठी मान्यता देण्यात आलेल्या लाकडी-निंबोडी विरोधात सोलापूर जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे.
तेलंगणा राज्यातील बासर येथे गोदावरी नदीत बुडून अकोल्यातील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतकांमध्ये भौरद येथील प्रतिक गावंडे आणि आणखी एका युवकाचा समावेश. भानसा येथील शासकीय रूग्णालयात दोघांच्याही मृतदेहांची उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले आहे. दोघांचेही नातेवाईक बासरला दाखल झाले आहेत.
चंद्रपूर येथील ब्रह्मपुरी शहरातल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. देलनवाडी परिसरात असलेल्या एटीएमला आगीमुळे मोठी हानी झाली आहे. आज सकाळच्या सुमारास एटीएममधून धूर निघत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. समोरच्या पेट्रोल पंपावरील नागरिकांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा केला प्रयत्न. काही वेळातच ब्रह्मपुरी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर प्रचंड आगीमुळे मोठे नुकसान झाले. हे एटीएम बँक ऑफ बडोदाच्या शाखेला लागूनच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे शहर तापमानाच्या बाबतीत राज्य व देशात आहे अग्रेसर आहे.
Devendra Fadnavis : अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. यावर आता विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अलिकडे सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर भाषा वापरली जाते. अशी भाषा कोणीही भाषा वापरू नये. भाषेचं सर्वांना भान असायला हवं, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
Pune News : भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकरांना पुण्यात मारहाण झाली आहे. कसबा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. विनायक आंबेकरांनी नुकतीच फेसबुकवर एक कविता पोस्ट केली, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना उद्देशून होती. याच कवितेतील शेवटच्या दोन ओळी आमचे नेते गिरीश बापटांच्या सांगण्यावरून काढून टाकल्या, असं म्हणत नव्यानं ती कविता पोस्ट केली. मात्र सुधारित कविता ही आक्षेपार्ह आहे, असा आरोप कसबा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंबेकरांच्या कार्यलयात घुसले. त्यांना जाब विचारले तेव्हाच आंबेकरांना मारहाण ही करण्यात आली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो अद्याप होऊ शकला नाही. त्यांना नेमकी का मारहाण करण्यात आली
परभणी महानगरपालिकेची विहित मुदत आज संपली आहे. मनपा आयुक्त देविदास पवार यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेची निवडणुक होईपर्यंत आयुक्त राहणार प्रशासक पदावर राहणार आहेत. याबाबत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी आदेश काढले आहेत.
Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणं केतकी चितळेला भोवल आहे.
Mumbai News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला बिकेसीमध्ये येणाऱ्या शिवसैनिकांना माघारी फिरताना मात्र मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. कारण पूर्व द्रुतगती मार्गावर जेव्हीएलआर जंक्शनचा असलेला पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील दहा दिवस हा पूल पूर्णपणे वाहतुकीस बंद असणार आहे. यामुळे या मार्गावर सकाळपासून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणत खोळंबा झाला आहे. अगदी घाटकोपरपासून कांजूरमार्गपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मुंबई पूर्व उपनगरातून शिवसैनिक सभेला तर वेळेत पोहोचतील, मात्र माघारी फिरल्यावर त्यांना काही तास या वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची शक्यता आहे.
Tripura CM Resign : आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांचा राजीनामा; भाजप नेतृत्वाकडून होणार नवीन मुख्यमंत्र्याची निवड
उत्तर प्रदेश: वाराणसीतील ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात मुर्तीचे भग्नावेष आढळले असल्याची माहिती; उद्या पुन्हा सर्वेक्षण होणार
जालना शहरातील लोधी मोहल्ला भागात रात्री मटनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन दोन गटात मोठा वाद झाला. या वादात चार जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती नाजूक असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.. रात्री 11 च्या सुमारास तक्रारदार मटण विक्रेता आणि आरोपीमध्ये वाद झाला. पुढच्या काही वेळात त्या ठिकाणी जमाव एकत्रित होऊन दोन गट एकमेकांसमोर भिडले. यात आरोपींनी कोयत्याने वार केल्याने 5 जण जखमी झाले,या प्रकरणी सहा आरोपींविरोधात सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला असून 3 जणांना अटक करण्यात आलाय.
Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांतील लाचखोर पोलीस निरीक्षकासह तिघांवर एसीबीने कारवाई केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनवर हा छापा टाकण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे अद्याप एसीबीच्या हाती लागलेले नाहीत. एएसआय आणि इतर व्यक्तीला बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर दोन लाखांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने ही बाब एसीबीला कळवली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सापळा रचत एसीबीने ही कारवाई केली. तक्रारदार गॅस वितरक असल्याची माहिती आहे.
शरद पवारांच्या बद्दल समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे आणि निखील भामरे या दोघांविरुद्ध पुणे सायबर पोलीस स्वतंत्र गुन्हे दाखल करणार आहेत. निखील भामरेने ट्विटरवर शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती तर केतकी चितळेने एडव्होकेट नितीन भावे या व्यक्तीची पोस्ट शेअर केली होती ज्यामधे आक्षेपार्ह मजकूर होता. पुणे राष्ट्रवादीकडून या दोन्ही पोस्ट बद्दल सायबर सेलला तक्रार देण्यात आलीय. त्यानंतर पोलीसांनी केतकी चितळे आणि अॅडव्होकेट नितीन भावे यांच्याविरुद्ध एक आणि निखील भामरे विरुद्ध एक असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करायच ठरवलंय. 153 अ या कलमाच्या अंतर्गत हे गुन्हे दाखल होत असून दोन वर्गांमधे शत्रुत्व निर्माण करण्याच्या आरोपाखाली हे कलम वापरण्यात आलय. या कलमानुसार दाखल गुन्हा हा अजामीनपात्र ठरतो. याशिवाय बदनामी करणे, धमकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांचा देखील या दोन गुन्ह्यांमधे वापर करण्यात आलाय. पुणे सायबर पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केलीय.
मुंबईतल्या सभेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार
महाराष्ट्रात विभागवार सभा आखण्याचं काम सुरु
उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या सर्व विभागात जाणार
शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार
नांदेड येथे शरद पवारांच्या सभेत अनेकांच्या पाकिटावर डल्ला मारणारा पाकीटमार पोलिसांच्या तावडीत.सभेतील नागरिकांचे पाकीट मारून पलायन करताना सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Mumbai News : पूर्व द्रुतगती मार्गावर जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ज्या ठिकाणी सुरु होतो, त्या ठिकाणी असलेला ब्रिज हा दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून पुढील 10 दिवस बंद असणार आहे. आता याचा फटका पूर्वद्रुतगती मार्गवरील ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. आज सकाळपासूनच पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीपासून ते घाटकोपरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा फटका रुग्णवाहिकांना देखील बसला आहे. यात एका रुग्णवाहिकेतून रुग्णांचे नातेवाईक वाहतूक कोंडीत वाहन चालकांना विनंती करीत रुग्णवाहिका बाहेर काढत रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी झाली आहे, त्याबाबत वाहतूक पोलिसांचे बळ या ठिकाणी तैनात नसल्याने मोठ्या समस्येला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. सुमारे एक तासांचा हा जाम लागला आहे.
Chandrapur News : ताडोबा व्याघ्रप्रकल्पात तेंदूपता तोडायला गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली जंगलातील ही घटना असून जाईबाई जेंगठे असं हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. आज सकाळी मोहर्ली गावातील 8 ते 10 महिला जयश्रिया रिसॉर्ट च्या मागे असलेल्या जंगलात तेंदू पत्ता तोडायला गेल्या होत्या. याच दरम्यान वाघाने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. गावात घटनेची माहिती पसरताच घटनास्थळावर एकच गर्दी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहे. सध्या तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू आहे. गावातील सर्व नागरिक जंगलात तेंदूपत्ता संकलन करायला जातात.
पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून उद्घाटन
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे यांची उपस्थिती
भारताला क्रूझ हब बनविण्यासाठी केंद्र सरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि फिक्कीकडून परिषदेचे आयोजन
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीजवळील लाइट हाऊसचे देखील आॅनलाइन अनावरण
मुंबई -स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले आहे.अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, 'स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून शंभुराजे यांनी अतुलनीय असा पराक्रम गाजवला. शिवबाच्या या छाव्याने आपल्या पराक्रमाने मुघलांना गुडघे टेकायला भाग पाडले. औरंगजेबाला जेरीस आणून, त्याचा दख्खन बळकावण्याचा मनसुबा मातीत गाडून टाकला. युद्धनीती, शास्त्र, कला यांसह अनेक भाषांमध्ये विविधांगी लेखन करून शंभुराजेंनी विद्वत्तेचा परिचय करून दिला. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी साकारलेल्या स्वराज्यासाठी त्यांनी प्राणपणाने लढा दिला. महान योद्धा, धुरंधर, प्रजाहितदक्ष, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा आणि जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!'
Pune News : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पुरंदर किल्ल्यावर साजरी होत आहे. सकाळी दहा वाजता महिलांनी पाळणा जोजवला. पुरंदर किल्ला संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. ढोल-ताशांचा गजर, हलगीचा नाद, मर्दानी खेळ, मल्लखांब असे विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत. काही वेळाने खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत.
Navneet Rana & Ravi Rana : महाआरतीसाठी रवी राणा आणि नवनीत राणा दिल्लीतील हनुमान मंदिरात पोहोचले, राणांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू... ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली परिसरातील जंगलातील घटना, जाईबाई जेगठे (60) असं वाघाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या महिलेचं नाव, आज सकाळी मोहर्ली गावातील 8 ते 10 महिला जयश्रिया रिसॉर्ट च्या मागे असलेल्या जंगलात गेल्या होत्या तेंदू पत्ता तोडायला, याच दरम्यान वाघाने केलेल्या हल्ल्यात झाला मृत्यू, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल
Mumbai News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राजकीय सभा होत असलेल्या बीकेसी मैदानावरील सभास्थळी सॅनिटायझेशनचं काम हाती घेण्यात आलं आहे. कोविड नियमांचं पालन करावं असं वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आवाहन करण्यात आल्याचं बघायला मिळालं आहे. अशात सभास्थळी देखील त्याचं पालन होताना दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून कोविड परिस्थिती बघता दसरा मेळावा सोडला तर मोठी भव्य अशी राजकीय सभा झाली नव्हती. अशात शिवसंपर्क अभियानाच्या सभेत मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Mumbai Pune Express : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी.विकेंड असल्याने, द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली असल्याने ही वाहतूक कोंडी बोरघाटात झाली आहे. मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झाली आहे.त्यामुळे वाहने ही संथगतीने पुढे सरकत आहे..
Shivsena : महाराष्ट्रात तयार झालेले गढूळ वातावरण आजच्या शिवसेनेच्या सभेनंतर दूर होणार; शिवसेना नेते संजय राऊत यांचा विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. यानंतर निखिल भामरेला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं आहे. दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आणखीही काही आक्षेपार्ह मजकूर मोबाईलमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Baramati News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी बारामतीतील सकाळी विविध विकास कामांची पाहणी केली आणि सध्या बारामती विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी यांचा जनता दरबार सुरु आहे. बारामती मतदारसंघातील लोकांना पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागू नये यासाठी अजित पवार दर आठवड्याला जनता दरबार घेत असतात. नागरिकांच्या समस्या समजून घेत असतात आणि त्यावर ती तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न अजित पवार करतात. आज बारामतीतील विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडल विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल ठाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे या युवकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. कलम 153 कलम 107 कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद
अंगडिया व्यवसायिक खंडणी प्रकरणात आशुतोष मिश्रा आणि प्यारेलाल गौड यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल
दोघांविरोधात हे पुरवणी आरोप पत्र मुख्य महानगर दिंडाधिकारी कोर्टात दाखल केलं गेलं
फरार डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचे आशुतोष मिश्रा हे नातेवाईक तर प्यारेलाल गौड हा नोकर
दोघांचा अंगडिया खंडणी प्रकरणात सहभाग असल्याने मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली होती अटक
आशुतोष यांना हवालाद्वारे 5 लाख रुपये मिळाले होते
प्यारेलाल गौड याला 35 लाख रुपये मिळाले होते
या प्रकरणात सौरभ त्रिपाठी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे
तर अन्य तीन पोलीस अधिका-यांना नुकताच जामीन मंजूर झालाय
रत्नागिरी - दापोली पोलीस स्टेशनला लागली आग
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
आगीत कोणतीही जीवितहानी नाही
आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश
छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने पुरंदर किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असून खासदार सुप्रिया सुळे आणि ना. विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच नाशिकमध्ये शंभू मुद्रेची प्रतिकृती साकारली जाणार आहे. तसेच राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंती शिवसेनेकडून जल्लोषात साजरी होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नशिकमध्ये शंभू मुद्रेची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. 450 किलो वजनाची, 16 फूट उंच 12.5 फूट रुंद फायबर पासून बनवलेली प्रतिकृती आहे. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलीय.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीमध्ये सभा आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. घर पेटवणारं नाही, तर चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व आहे, हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे असे शिवसेनेने पोस्टर्स लावले आहेत
राजस्थानमधील उदयपूरल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर सुरू असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. या शिबिरात काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेस आला आहे. कायम सक्रिय असलेल्या नेत्याकडे अध्यक्षपद असायला हवं अशी मागणी अनेकांनी केली. राहुल गांधी यांच्या नावाचाही काही नेत्यांकडून पुनरुच्चार करण्यात आला. शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही काँग्रेस पक्षाची अंतर्गत चर्चेची फेरी सुरू राहणार. आज पी. चिदंबरम, भूपिंदर सिंग हुड्डा आणि सलमान खुर्शीद यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा होतील.
महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात आरती आणि हनुमान चालीसा पठण करणार. राणा दांम्पत्य घरापासून मंदिरापर्यंत पायी जाणार. सकाळी 8.30 वाजता हे हनुमान चालीसा पठण करण्यात येणाार आहे. खासदार नवनीत राणा यांना प्रतिउत्तर देण्यासाठी अमरावती शिवसेनेने त्याच वेळी राणा यांच्या मतदारसंघातच महाआरती आयोजित केली होती. मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
नांदेड येथे महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उदय सामंत यांच्यासह तब्बल 13 मंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या "सहकार सूर्य"या गोदावरी बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उदघाटन – सकाळी 11 वाजता.
माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रम. वेळ- सायंकाळी 5 वाजता.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेणार आहेत. पहिल्यांदाच गृहमंत्री नांदेडात येऊन आढावा घेत आहेत. बियाणी यांची हत्या, मराठवाड्यात वाढलेली गुन्हेगारी यासह कायदा आणि सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केलेल्या या योजनेला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्व पक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कुर्डूवाडी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
फिक्की, केंद्र सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होईल. भारताला येणाऱ्या काळात क्रूझ हब विकसित करण्यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. स्थळ –हॉटेल ट्रायडेंट, नरीमन पॉईंट, मुंबई. वेळ - सकाळी 10 वाजता
अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबुक पेजवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट खाली ॲड. नितीन भावे यांनी ती पोस्ट लिहील्याचा उल्लेख आहे. यावरून आता वाद निर्माण होऊ शकतो .
वाराणसीतील ज्ञानवापी -श्रृंगार गौरी प्रकरणात कोर्ट कमिशनरकडून सर्वेक्षणसाठी व्हिडिओग्राफीचे काम आजपासून सुरू होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वेक्षणाची वेळ न्यायालयाने निश्चित केली आहे. तसेच याचा अहवाल 17 मे रोजी न्यायालयात सादर केला जाणार आहे.
पार्श्वभूमी
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती
छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने पुरंदर किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असून खासदार सुप्रिया सुळे आणि ना. विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच नाशिकमध्ये शंभू मुद्रेची प्रतिकृती साकारली जाणार आहे. तसेच राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंती शिवसेनेकडून जल्लोषात साजरी होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नशिकमध्ये शंभू मुद्रेची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. 450 किलो वजनाची, 16 फूट उंच 12.5 फूट रुंद फायबर पासून बनवलेली प्रतिकृती आहे. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलीय.
उद्धव ठाकरेंची आज बीकेसीवर सभा
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीमध्ये सभा आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. घर पेटवणारं नाही, तर चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व आहे, हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे असे शिवसेनेने पोस्टर्स लावले आहेत.
उद्धव ठाकरे आज विरोधकांचा समाचार घेणार आहेत, तसं त्यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. एमआयएमचा औरंगाबादचा मुद्दाही चर्चेत आला आहे. यावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत.
काँग्रेस चिंतन शिबिराचा आजचा दुसरा दिवस
राजस्थानमधील उदयपूरल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर सुरू असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. या शिबिरात काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेस आला आहे. कायम सक्रिय असलेल्या नेत्याकडे अध्यक्षपद असायला हवं अशी मागणी अनेकांनी केली. राहुल गांधी यांच्या नावाचाही काही नेत्यांकडून पुनरुच्चार करण्यात आला. शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही काँग्रेस पक्षाची अंतर्गत चर्चेची फेरी सुरू राहणार. आज पी. चिदंबरम, भूपिंदर सिंग हुड्डा आणि सलमान खुर्शीद यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा होतील.
दिल्लीतील इमारतीला मोठी आग, 26 जणांचा होरपळून मृत्यू
दिल्लीतल्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला मोठी आग लागली आहे. या आगीत इमारतीतील 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आजही या ठिकाणचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अनूसुची जाहीर
महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे.
राणा दाम्पत्याचं दिल्लीतही हनुमान चालीसा पठण
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात आरती आणि हनुमान चालीसा पठण करणार. राणा दांम्पत्य घरापासून मंदिरापर्यंत पायी जाणार. सकाळी 8.30 वाजता हे हनुमान चालीसा पठण करण्यात येणाार आहे. खासदार नवनीत राणा यांना प्रतिउत्तर देण्यासाठी अमरावती शिवसेनेने त्याच वेळी राणा यांच्या मतदारसंघातच महाआरती आयोजित केली होती. मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या 13 मंत्र्यांची मांदियाळी
नांदेड येथे महाविकास आघाडीतील मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उदय सामंत यांच्यासह तब्बल 13 मंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या "सहकार सूर्य"या गोदावरी बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उदघाटन – सकाळी 11 वाजता.
माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रम. वेळ- सायंकाळी 5 वाजता.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेणार आहेत. पहिल्यांदाच गृहमंत्री नांदेडात येऊन आढावा घेत आहेत. बियाणी यांची हत्या, मराठवाड्यात वाढलेली गुन्हेगारी यासह कायदा आणि सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील उजनीचा पाणीप्रश्न पेटला, आज आंदोलनाची दिशा ठरणार
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केलेल्या या योजनेला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्व पक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कुर्डूवाडी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
मुंबईत पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ कॉन्फरन्सचे आयोजन
फिक्की, केंद्र सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडून पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होईल. भारताला येणाऱ्या काळात क्रूझ हब विकसित करण्यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. स्थळ –हॉटेल ट्रायडेंट, नरीमन पॉईंट, मुंबई. वेळ - सकाळी 10 वाजता
केतकी चितळेची शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट
अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबुक पेजवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट खाली ॲड. नितीन भावे यांनी ती पोस्ट लिहील्याचा उल्लेख आहे. यावरून आता वाद निर्माण होऊ शकतो .
वाराणसी ज्ञानवापी प्रकरणी सर्व्हेक्षणाचे व्हिडीओग्राफीचे काम आजपासून
वाराणसीतील ज्ञानवापी -श्रृंगार गौरी प्रकरणात कोर्ट कमिशनरकडून सर्वेक्षणसाठी व्हिडिओग्राफीचे काम आजपासून सुरू होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वेक्षणाची वेळ न्यायालयाने निश्चित केली आहे. तसेच याचा अहवाल 17 मे रोजी न्यायालयात सादर केला जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -