Maharashtra Breaking News 13 September 2022 : बीडमध्ये साडेचार लाख रूपयांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Sep 2022 08:26 PM
रक्ताने पत्र लिहून हिंगोलीच्या शेतकऱ्याची नुकसानीच्या मदती मागणी 

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीला मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु, या मदतीत जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येणाऱ्या अनेक मंडळ नुकसानीच्या कक्षेत बसत नसल्याने त्यांना मदत मिळणार नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नामदेव पतंगे यांनी रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आपली व्यथा मांडली आहे. 

बीडमध्ये साडेचार लाखाचा गुटखा जप्त 

बीडच्या परळी शहरात विद्यानगर भागात एका टेम्पोतून गुटका विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी टेम्पोवर कारवाई करून 4लाख 59 हजार रुपयांचा गुटखा जप्त  केला. या प्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे.  

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन, पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास  

सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.   

नांदेडमध्ये विषय शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे शाळेतच ठिय्या आंदोलन 

नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाहीये. त्यामुळे  विषय शिक्षक तत्काळ उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी  मांजरम येथील जि.प. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

कणकवली मधील ओसरगावात 48 लाखांच्या दारुसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कणकवली मधील ओसरगावात 48 लाखांच्या दारुसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क कणकवली विभागाच्या पथकाने ही कारवाई केलीय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली जवळील ओसरगाव पोस्ट बस थांब्याजवळ गोवा बनावटीचा मद्यासाठा जप्त केला आहे.  

परभणीच्या सोनपेठमध्ये दोन सराफा दुकाने फोडली, आठ लाख 25 हजारांचे दागिने आणि रोकड लंपास 

परभणीच्या सोनपेठ शहरातील दोन सराफा दुकान चोरट्यांनी काल रात्री फोडली. दोन्ही दुकानांतील तब्बल 7 लाख 75 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि पन्नास हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण सव्वा आठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय.  

निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडले, वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडण्यात आले आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान होत असल्याने आणि प्रकल्पात पाणी साठा वाढल्याने प्रकल्पाचे सर्व 31 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीजच्या माजलगावमध्ये विकास कामाववरून आमदार आणि नगरसेवकांच्या विरोधात बॅनरबाजी 

बीडच्या माजलगावमध्ये शहरातील खराब रस्त्यांवरून आमदार आणि नगरसेवकांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि इतर नगरसेवकांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. एमआयएमच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. 

Aaditya Thackeray : फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरेंची टीका

Aaditya Thackeray  : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला फॉक्सकॉन प्रकल्प  प्रकल्प गुजरातमध्ये गेला : आदित्य ठाकरे

Mumbai News: स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबासह आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन 

स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक बेमुदत उपोषणाला सुरवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक,त्यांच्या पत्नी, पाल्य व नामनिर्देशित पाल्य विविध मागण्यासाठी बेमुदत संपाला सोमवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी मुंबई येथील "आझाद मैदानात" गांधीवादी मार्गाने सुरवात झाली. देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना  दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील स्वातंत्र्यसैनिक आझाद मैदानावर  उपोषणाला बसले आहेत. राज्यातील विविध खेडयातून जवळपास 200 ते 300 वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी आंदोलनात हजेरी लावली आहे. 


 

Mumbai News : मढ मार्वेचे 49 अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरू, किरीट सोमय्यांचा दावा

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; ठाण्यातून एका महिलेला अटक

Amruta Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या एका महिलेला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. एका पुरुषाच्या नावाने या महिलेने बनावट खाते सुरू केले होते. 

29 सप्टेंबरला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक; उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते उपस्थित राहणार

Maha Vikas Aghadi Meeting : 29 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार; शिंदे-फडणवीस सरकार दिवाळी गिफ्ट देणार

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा आहे. 

Mumbai News : मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २० टक्के बोनस देण्याची मागणी, महापालिका आयुक्तांना म्युनिसिपल युनियनचे पत्र

Mumbai News : मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २० टक्के बोनस देण्याची मागणी महापालिका कर्मचाऱ्यांची संघटना म्युनिसिपल युनियनने केली आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना याबाबत पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे. 

Palghar News : पालघर: वाडा तालुक्यात दाढरे येथे बस आणि कारचा भीषण अपघात

Palghar News:  दाढरे येथे वाड्याहुन सकाळी आठ वाजताच्या सुमारास येणाऱ्या वाडा-ढाढरे या बसचा व वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या व्हर्ना कारची वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमध्ये बसलेल्या तिघांपैकी दोघेजण किरकोळ जखमी झाले.

Maharashtra News : मॉस्कोतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची पहिली झलक

Maharashtra News : स्वातंत्र्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या,, अन्याय  विरूध्द लढणाऱ्या व  जागतिक समुदायाची स्पंदने टिपणाऱ्या आणि त्यातून ‘लेनिनग्राडचा पोवाडा’ या सारखी प्रतिभासंपन्न काव्य निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे आणि पुतळ्याचे येत्या 14 सप्टेंबरला मॉस्कोत अनावरण होणार आहे


या कार्यक्रमला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी  भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुध्दे हे असणार आहेत


 'रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. एक अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायमस्वरूपी असे स्मारक तेथे उभे राहिले आहे. या पुतळ्याचे अनावरणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. 


तर तैलचित्राचे अनावरण भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात होणार आहे


अण्णा भाऊंनी आपलं काही लिखाण रशियाबद्दल केलेले आहे, त्यामध्येसुद्धा स्टालिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि अण्णा भाऊंच्या रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या अनेक कथा आणि कादंबर्‍या यांचा समावेश आहे. यामुळे अण्णा भाऊ रशियामध्येसुद्धा प्रसिद्ध झाले होते.


निमित्ताने शेकडो अण्णाभाऊ साठे-प्रेमींच्या उपस्थितीतीत जे अन्य अनेक कार्यक्रम मॉस्कोत १४ व १५ सप्टेंबरला होऊ घातले आहेत

Shirdi Sai Mandir : शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल 

Shirdi Sai Mandir : राज्यातील प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला असून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय येत्या दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे अशा सूचनाही हायकोर्टाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेले शिर्डी साई मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

नातेवाईकावर अंत्यसंस्कार करुन परत येताना मायलेकाचा अपघाती मृत्यू
Yavatmal News : नातेवाईकावर अंत्यसंस्कार करुन परत येणाऱ्या मायलेकाचा अपघाती मृत्यू झाला. यवतमाळमध्ये ही घटना घडली. पांढरकवडा तालुक्यातील उमरी इथे पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेखा महादेव बताले (वय 40 वर्षे) आणि शुभम महादेव बताले (वय 20 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे मायलेक आपल्या नातेवाईकाचे अंत्यसंस्कार करुन दुचाकीने गावाकडे परत जात होते. दरम्यान उमरी रोडजवळ समोरुन येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उमरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या दोघांचाही मृत्यू झाला. 
Sada Sarvankar: मुंबई: शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल पोलिसांनी जप्त केले. पोलीसांनी घटना स्थळावरून सापडली एक गोळी

Sada Sarvankar:  मुंबई: प्रभादेवी राडा प्रकरणात शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीसांनी घटना स्थळावरून एक गोळी आहे. सरवणकर यांच पिस्तुल ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. 

Mumbai Crime News : आगामी BMC निवडणुकीत मनसेच्या वतीने तिकीट देण्याचे आमिष दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर मनसेच्या विभागप्रमुखाने बलात्कार

Mumbai Crime News : आगामी बीएमसी निवडणुकीत मनसेच्या वतीने तिकीट देण्याचे आमिष दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर मनसेच्या विभागप्रमुखाने बलात्कार केला.


पीडित महिलेने व्हीपी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376, 500 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या कालावधीत आरोपी वृशांत वडके याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.


याप्रकरणी पोलिसांनी वृशांत वडकेला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

सव्वा महिन्यानंतरही भाजप शहर सरचिटणीस अनिल जाधव यांच्या हत्येचा सूत्रधार मोकाट, शिवनेरी मंडळाचा तासगाव पोलीस ठाण्यावर मशाल मोर्चा
Sangli News : तासगावमधील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे शहर सरचिटणीस अनिल जाधव यांची हत्या होऊन सव्वा महिना झाला, मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराच्या निषेधार्थ आणि फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी शिवनेरी मंडळाच्या सदस्यांनी सोमवारी (12 सप्टेंबर) तासगाव पोलीस ठाण्यावर मशाल मोर्चा काढला. सायंकाळी 7 वाजता शिवनेरी चौकातून हा मोर्चा सुरु होत शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला. रात्री उशिरा हे आंदोलन सुरु होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना जेरबंद केले आहे. मात्र, या हत्येचा प्रमुख सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचा आरोप शिवनेरी मंडळाच्या सदस्यांनी केला आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करणार, 18 सप्टेंबरला पूल पाडणार

Pune News : पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल पाडण्यासाठी पुलाच्या अंतर्भागात स्फोटकं भरावी लागणार आहेत. त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रिलिंग करणं सुरु आहे. ड्रिलिंगमुळे पूल कमकुवत होणार असल्याने आजपासून तो वाहतुकीला बंद करण्यात येणार आहे. ड्रिलिंगचे काम वेळेत झाल्यास येत्या रविवारी, म्हणजे 18 सप्टेंबरला चांदणी चौकातील हा पूल पाडण्यात येणार आहे.

Amravati Murder Case : उमेश कोल्हे खून प्रकरण, आरोपीची माहिती देणाऱ्याला NIA कडून दोन लाखांचे बक्षीस

Amravati Murder Case : अमरावतीच्या उमेश कोल्हे (Umesh Kolhe) खून प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद (Shamim Ahmed) उर्फ ​​फिरोज अहमद याच्याविरुद्ध एनआयएने (NIA) रोख बक्षीस जाहीर केले आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे NIA कडून सांगण्यात आले आहे. 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Latur News : हासोरी गावात भूगर्भातून आवाज, गावकरी भयभीत, भूकंपाची नोंद नसल्याचं प्रशासनाकडू स्पष्ट

Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी येथे सात दिवसात चार वेळा भूगर्भातून आवाज येत आहेत. या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण असून गावकरी रात्र जागून काढत आहेत. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भूगर्भातून जोरदार आवाज आला. दिवसभर थकून आलेले लोक झोपण्याच्या तयारीतच असताना या आवाजाने त्यांची अक्षरश: भीतीने गाळण उडाली होती. हातातल्या वस्तू जिथल्या तिथे टाकत लोकांनी घरातून बाहेर पळून जाणेच सोयीस्कर समजले आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पृथ्वीला विशाल लघुग्रह धडकणार?

एक मोठा लघुग्रह (एस्टेरॉयड) पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडक देऊ शकतो असं वैज्ञिनिकांच म्हण आहे. मात्र हा ग्रह पृथ्वीच्या वातावरणात येण्याची शक्यता कमी आहे. या ग्रहाला 2008 RE असं नावं आहे. साधारण 3 ते 4 वर्षातून एकदा असा ग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असतो. हा ग्रह आतापर्यंतच्या ग्रहापेक्षा पृथ्वीच्या जास्त जवळ आहे. 13 सप्टेंबरला 1.50 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. साधारण 10 किलोमिटर प्रति तास असा वेग आहे. 


श्रीकृष्ण जन्मभूमी शाही इदगाह मशिदीच्या वादावर आज सुनावणी

मथुरेच्या न्यायलयात आज श्रीकृष्ण जन्मभूमी शाही इदगाह मशिदीच्या वादावर आज सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आज पर्यंतची स्थगिती दिली होती.

Maharashtra Rain Updates : विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधारेचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता तर कोकणात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग अधिक असल्यानं समुद्र खवळलेला असणार आहे अशात मच्छिमारांना पुढील 2 दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

एमसीएची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

एमसीएची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत शरद पवार, आशिष शेलार, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर सदस्या उपस्थित राहणार आहे. 

Dasara 2022 : दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी बोलवली आज बैठक

Dasara 2022 : दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलवली आहे. बैठकीला सर्व मंत्री, आमदार नेते उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा यावर चर्चा होणार आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 


दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी  बोलवली आज बैठक 


दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलवली आहे. बैठकीला सर्व मंत्री, आमदार नेते उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा यावर चर्चा होणार आहे. 


एमसीएची आज वार्षिक सर्वसाधारण सभा 


एमसीएची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत शरद पवार, आशिष शेलार, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर सदस्या उपस्थित राहणार आहे.


विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा


विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधारेचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता तर कोकणात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग अधिक असल्यानं समुद्र खवळलेला असणार आहे अशात मच्छिमारांना पुढील 2 दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.


 सुप्रीम कोर्टात बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी 


 सुप्रीम कोर्टात बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेत बीसीसीआयने आपल्या संविधानात काही बदलांची परवानगी मागितली आहे. कोर्टाने बीसीसीआयची याचिका मान्य केली तर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढवता येणार आहे.


श्रीकृष्ण जन्मभूमी शाही इदगाह मशिदीच्या वादावर आज सुनावणी


मथुरेच्या न्यायलयात आज श्रीकृष्ण जन्मभूमी शाही इदगाह मशिदीच्या वादावर आज सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आज पर्यंतची स्थगिती दिली होती.


पृथ्वीला विशाल लघुग्रह धडकणार?


 एक मोठा लघुग्रह (एस्टेरॉयड) पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडक देऊ शकतो असं वैज्ञिनिकांच म्हण आहे. मात्र हा ग्रह पृथ्वीच्या वातावरणात येण्याची शक्यता कमी आहे. या ग्रहाला 2008 RE असं नावं आहे. साधारण 3 ते 4 वर्षातून एकदा असा ग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असतो. हा ग्रह आतापर्यंतच्या ग्रहापेक्षा पृथ्वीच्या जास्त जवळ आहे. 13 सप्टेंबरला 1.50 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. साधारण 10 किलोमिटर प्रति तास असा वेग आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.