Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"आम्ही युतीत असताना निवडणूक लढवली, बाळासाहेब, मोदी यांचा फोटो लावून निवडणूक लढवली त्यानंतर महाविकस आघाडी झाली आणि बाळासाहेबांचा आदेश मानणारे आम्ही होतो म्हणून आम्ही ते सहन केले. नंतर खच्चीकरण सुरू झाले. आम्ही सगळं पाहत होतो. मी उध्दव ठाकरे यांना समजावून सांगितले, आमदारांची भावना सांगितली".
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात होणार, मुख्यमंत्री यांची मंजुरी
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील मेळाव्या दरम्यान भरत गोगावले म्हणाले की, शरद पवारांनी काय कुठं लिंबू फिरवला, कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही. भाजपसोबत युती करून सत्ता चालवू अस सांगितलं असत तर आम्ही पाच पावलं मागे आलो असतो.
हार्बर रेल्वे मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या पुलाला एका कंटेनरची जोरदार धडक बसून अपघात झालाय. रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. कंटेनर माती काढण्याचा जेसीबी घेऊन वडाळयाच्या दिशेने जात होता. मात्र, ब्रीजला कंटेनरवर असणारा जेसीबी लागला आणि हा अपघात झाला. यामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मात्र पोलीस, वाहतूक पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने कंटेनर बाजूला काढला जात आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास विलंब होईल, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली. सुदैवान या अपधातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर सावंतवाडी मधील गांधी चौकात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''माझं शरद पवारांवर खूप प्रेम होतं. शरद पवार यांनी काँगेस पक्षाचा प्रचार करायला आले, तेव्हा मला त्या उमेदवाराचा प्रचार करायचा नसल्याने मी राजीनामा दिला. माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अपमान झाल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. मनोहर परिकर यांनी दिल्लीत नेलं होतं. त्यांना मला त्यावेळेस भाजप मध्ये घ्यायचं होत.''
कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर केल्यामुळे आता एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. कालपासून घाटात अडकलेली अवजड वाहने मार्गस्थ झाली आहेत. मात्र अजूनही दरडीचा मोठा ढीग रस्त्यावर आहे. शुक्रवारी दुपारी भुईबावडा घाटात डोंगराचा मोठा भाग कोसळला. जवळपास वीस मिटर रस्ता दरड ढीगा-याने व्यापला होता. तर दरीकडील संरक्षक भिंत व कठडा यात कोसळला आहे. दुसरीकडे करुळ घाट जड व अवजड वाहतूकीस बंद आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्यात बंद खोलीमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीत भारती विद्यापीठला भेट दिली. यावेळी दोघांमध्ये बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा घेतला. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत करण्याचे आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
आमदार विकास निधीसाठी 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाखाचा निधी मिळाला आहे. हा निधी जिल्ह्यातल्या विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. सर्व पक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाखांचा विकास निधी मिळणार आहे.
सांगली-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यात बंद खोलीमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगलीत भारती विद्यापीठला भेट दिली...यावेळी दोघांमध्ये बंद खोलीत अर्धा तास चर्चा
Eknath Shinde : विरोधकांचे कामच आहे टीका करण्याचे. आमचं काम आहे सरकार चालवण्याचं ते आम्ही करीत आहोत. महिन्याभरात लोकहिताचे किती निर्णय घेतलेत हे विरोधकांने पहावे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावलाय. शिवसेनेच्या शिंदे गटातील खानापूर-आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या पत्नी सौ. शोभाताई बाबर यांचे मागच्या आठवड्या मध्ये निधन झाले. आज आमदार बाबर आणि कुटुंबाच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी विटा येथे आले होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलत होते. सांगली, कोल्हापुरातील अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून आम्ही शेतकऱ्यांना सर्व ती मदत करू असे आश्वासन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले. सांगली, कोल्हापुरातील अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सर्व ती मदत आम्ही करणार आहोत. एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. शहर भागामधील काही लोकांचे पुनर्वसन आम्ही केले आहे आणखी गरज पडल्यास त्या त्या भागातील पूर परिस्थिती पाहून त्याचे योग्य नियोजन करू कुठेही कोणालाही अडचण येऊ देणार नाही असे असेही शिंदे यांनी सांगितले.
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर आणि उर्से टोलनाक्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतांच्या रांगा लागल्या आहेत. सलगच्या सुट्ट्या आल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलीय.
जालना-भांबेरी गावातील आमरण उपोषण, 3 जणांची प्रकृती खालावली, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 दिवसापासून आमरण उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील भांबेरी गावांमध्ये गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेल्या 3 आंदोलकांची प्रकृती खालावलीय ,यापूर्वीच दोन आंदोलकांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आलं असून आज 3 जणांची प्रकृती खालावलीय , दरम्यान आंदोलकांनी उपचारासाठी नकार दिला असून आपल्या मागण्यांनसाठी ते उपोषणावर ठाम आहेत. 8 ऑगस्ट रोजी मराठा समाजाला आरक्षण द्यावं तसेच ,मुख्यमंत्री यासाठी काय पाऊल उचलत आहेत याची माहिती त्यांनी उपोषणस्थळी येऊन सांगावी अशी मागणी या आंदोलकांनी केलीय.
Kolhapur News : कोल्हापूर: शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार पोलिसांच्या ताब्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात करणार होते निदर्शने
कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आले आहेत...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर शिवसैनिक आंदोलन करणार होते
कोल्हापूर पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केली
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आदिवासी पाड्यावरील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत आहे, त्रंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा मधील एका गर्भवती महिलेला झोळीत घालून नातेवाईकांना 3 किलोमीटर ची पायपीट करावी लागली,गावात आरोग्याची सुविधा नाही. त्यामुळे अशाच पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. महिलेला आंबोलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे समस्या पासून मुक्ती देण्याची आणि खरा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ व्यक्त करतो.
रायगड : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहनांची मोठी गर्दी, खालापूर टोलनजीक सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांची रांग, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग, सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी
पालघर ; वाडा शहरातून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली. पोलिसांनी 12 तासांच्या आत लावला छडा
शुक्रवार (12 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान झालं होत अपहरण
वाडा शहरातील अशोकवन भागातील बिल्डींगमधून झाले होते अपहरण
थोड्याच वेळात पालघर पोलीस अधीक्षक पत्रकार परीषद घेवून गुन्ह्याची सविस्तर माहिती देणार
आरोपीला गाडीसह ताब्यात घेतल आहे अजून पुढील तपास सुरू आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलीला सुखरूप आणले
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात आजपासून होत आहे. यावर्षी आपण सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठबळ देऊया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा, या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील असेही मोदी म्हणाले.
पार्श्वभूमी
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
Har Ghar Tiranga Abhiyan : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते पदक विजेत्यांचा सन्मान
कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी पदक जिंकलं आहे त्यांचा आज पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज कोल्हापूर आणि सांगली दौरा
मुख्यंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर जाणार आहेत.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासंदर्भात आज आपची पत्रकार परिषद
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासंबंधित मुंबईत आज आप पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे. संजय पांडे यांना फसवण्यात येत आहे, त्यांच्या विरोधात खोटी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आपने या आधी केला आहे. त्याच संदर्भात आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -