Maharashtra Breaking News 12 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jul 2022 11:30 PM
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. उद्या दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वांद्रे पश्चिम पाली हिल येथील नार्वेकर कुटुंबीयांच्या घरी, पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सांताक्रुज पश्चिम येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या रालोआच्या उमेदवारास पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका...

शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या रालोआच्या उमेदवारास पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका...


राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.


जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. 


शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?


शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे.


शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे निवेदन

राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. 


शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?


शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही.

मुंबई महापालिकेत शिवसेनेत फुट पडण्यास सुरुवात 

दहिसरमधील माजी नगरसेविका, सेना प्रवक्त्या शितल म्हात्रे आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. पश्चिम उपनगरांतील शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी  शिंदे गटात जाणार आहेत. शितल म्हात्रे या महापालिकेतील शिवसेनेच्या रणरागिणी , आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. ठाण्यापाठोपाठ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महापालिकेतील शिवसेना गटात फुट पडण्यास सुरुवात झाल्याचं बोललं जातेय. 

Nagpur Covid Update : जिल्ह्यात दिवसभरात 146 नवे कोरोनाबाधित, सक्रीय बांधित संख्या 863 वर

Nagpur : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना (Covid) बाधितांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात 146 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात शहरातील 100 आणि ग्रामीणमधील 46 नव्या बाधितांचा समावेश आहे. आज 92 लोकांनी कोरोनावर मात केली. सध्या 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 842 बाधित गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील सक्रीय बाधितसंख्या 863वर पोहोचली आहे.

पुण्यात रस्त्यावर पडलेल्या हायटेन्शन वायरला पाय लागल्याने 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Pune News : पुण्यात एका 20 वर्षाचा तरुणाचा हायटेन्शन वायरला पाय लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही हायटेन्शन वायर रस्त्यावर पडली होती. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दत्तवाडी या भागात मुलाचा मृत्यू झाला. रोहित थोरात असे मुलाचे नाव तो भाजी विक्रेता होता. सकाळी दूध आणायला गेला असता रोहितचा पाय रस्त्यावर पडलेल्या हायटेन्शन वायरला लागला आणि तो जागीच मृत्यू पावला

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार?

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलांय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहीती जाहीर केली जाणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात एनडीएची बैठक, शिंदे गटाला निमंत्रण, दीपक केसरकर सहभागी होणार

President Election 2022 : राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आली आहे. आता या बैठकीला शिंदे गट सहभागी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत. एनडीएच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरणार आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सेनेचा भाजपच्या मुर्मूंना पाठिंबा?

लोकभावना काय आहे हे समजून सेना निर्णय घेणार : संजय राऊत

Hingoli News : हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना सकाळीच साडेसहा वाजता आणि साडेआठ वाजताच्या सुमारास दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वसमत कळमनुरी आणि औंढा तालुक्यातील अनेक गावांना हा भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळीच भूकंपाचा धक्का जाणवल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत. भूकंपाच्या भीतीनं घराबाहेर निघाला तर बाहेर पाऊस आणि घरात राहावं तर भूकंपाची भिती, अशा द्विधा परिस्थिती नागरिक आहेत. शिरळी, वापटी, कुपटी, पांगरा, शिंदे राजवाडी, खापरखेडा, खांबाळा, चोंडी-बहिरोबा या गावांना भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. परंतु नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाच्या तीव्रतेबाबत अद्याप तरी माहिती समोर आलेली नाही आणि प्रशासनाकडून या घटनेला अद्याप तरी अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 

Kerala : केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी आज; न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात 15 नंबर वर आहे


न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या पीठापुढे ही सुनावणी


बांठिया आयोगाचा 800 पानी अहवाल कोर्टाला सादर झाला आहे.


राज्यातल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय किती आरक्षण असावे असा हा सविस्तर अहवाल आहे.


लोकसंख्या निहाय जास्तीत जास्त सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस


ज्या भागांमध्ये ओबीसी लोकसंख्या कमी तिथे कमी राजकीय आरक्षणाची शिफारस 


राज्यामध्ये साधारण 37 ते 40 टक्के ओबीसी असल्याचा आयोगाचा निर्वाळा

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी आज; न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात 15 नंबर वर आहे


न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या पीठापुढे ही सुनावणी


बांठिया आयोगाचा 800 पानी अहवाल कोर्टाला सादर झाला आहे.


राज्यातल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय किती आरक्षण असावे असा हा सविस्तर अहवाल आहे.


लोकसंख्या निहाय जास्तीत जास्त सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस


ज्या भागांमध्ये ओबीसी लोकसंख्या कमी तिथे कमी राजकीय आरक्षणाची शिफारस 


राज्यामध्ये साधारण 37 ते 40 टक्के ओबीसी असल्याचा आयोगाचा निर्वाळा

IND vs ENG : भारत-इंग्लंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता हा सामना होणार आहे. 

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर अंतिम संस्कार

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज अंतिम संस्कार होणार आहेत. शुक्रवारी भाषण देताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यामुळे रक्तस्राव झाल्यानं त्यांचं निधन झालं होतं. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.  

आदित्य ठाकरेंची निर्धार सभा

शिवसेनेच्या वतीने साकीनाका, जंगलेश्वर मंदिर सभागृह येथे आज निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. चांदीवली विधानसभा सेना आमदार दिलीप लांडे हे बंडखोरी करत शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे ही सभा महत्त्वाची असून या सभेला आदित्य ठाकरे, अनिल परब उपस्थित राहणार आहेत.

Aurangabad News : औरंगाबादच्या नामकरणाविरोधात एमआयएमचा मोर्चा

Aurangabad News : औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाला विरोध करण्यासाठी एमआयएमकडून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. भटकल गेट ते हमखास मैदान असा मोर्चा निघणार आहे. एमआयएमसोबत नामकरण विरोधी कृती समिती या मोर्च्यात सहभागी होणार आहे.

Maharashtra Rain Updates : आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

Maharashtra Rain Updates : रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि गडचिरोलीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.


पुणे- पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. 

OBC Reservation : ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

OBC Reservation : राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीची संख्या आणि राजकिय मागासलेपण यावर आधारित जयंतकुमार बांठीया यांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये जर राज्यात ओबीसीची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं तर आरक्षण मिळणार आहे. अन्यथा ओबीसी आरक्षण कायमस्वरुपी जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीची संख्या आणि राजकिय मागासलेपण यावर आधारित जयंतकुमार बांठीया यांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये जर राज्यात ओबीसीची संख्या जास्त आहे हे सिद्ध झालं तर आरक्षण मिळणार आहे. अन्यथा ओबीसी आरक्षण कायमस्वरुपी जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.


आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार


रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि गडचिरोलीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.


पुणे : पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. 


नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा आज बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पावसाचा जोर कायम असून धरणांमधून विसर्ग सुरू झालाय. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. प्रशासनाने खबरदारीचे आदेश दिलेत.


धुळे : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.


पालघर : जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आलाय. आठ गावांचा संपर्क तुटला आहे.


गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट


मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी- गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे. 


औरंगाबादच्या नामकरणाविरोधात एमआयएमचा मोर्चा


औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाला विरोध करण्यासाठी एमआयएमकडून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. भटकल गेट ते हमखास मैदान असा मोर्चा निघणार आहे. एमआयएमसोबत नामकरण विरोधी कृती समिती या मोर्च्यात सहभागी होणार आहे.


आदित्य ठाकरेंची निर्धार सभा


शिवसेनेच्या वतीने साकीनाका, जंगलेश्वर मंदिर सभागृह येथे आज निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. चांदीवली विधानसभा सेना आमदार दिलीप लांडे हे बंडखोरी करत शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे ही सभा महत्त्वाची असून या सभेला आदित्य ठाकरे, अनिल परब उपस्थित राहणार आहेत.


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर अंतिम संस्कार


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज अंतिम संस्कार होणार आहेत. शुक्रवारी भाषण देताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यामुळे रक्तस्राव झाल्यानं त्यांचं निधन झालं होतं. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.  


भारत-इंग्लंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना


भारत आणि इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता हा सामना होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.