Maharashtra Breaking News 12 August 2022 : शिंदे गट दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Aug 2022 10:10 PM
मुंबई पाठोपाठ पुण्यात होणार प्रति शिवसेना भवन, शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची माहिती

मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील प्रति शिवसेना भवनहोणार  आहे. शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 
श्रावणात या सेना भवनची पूजा होणार आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात सेना भवन होणार आहे.  

सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेचा भ्रष्टाचार; आशिष शेलारांचा आरोप 

सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील शेलार यांनी दिलाय. 

सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेचा भ्रष्टाचार; आशिष शेलारांचा आरोप 

सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्ट कारभाराला हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील शेलाल यांनी दिलाय. 

कोल्हापुरात अभिनेता आमिर खान याच्या विरोधात भाजप आक्रमक, लालसिंग चड्डा चित्रपटाच्या पोस्टरला काळ फासत आंदोलन 

कोल्हापुरात अभिनेता आमिर खान याच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. लालसिंग चड्डा चित्रपटाच्या पोस्टरला काळ फासत आंदोलन करण्यात आलंय.  सचिन तोडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील पद्मा टॉकीज या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे. 


 

बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो! धरणातून 800 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग

बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो झालं आहे. धरणातून 800 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. आमदार किसन कथोरे यांनी जलपूजन केलं असून धरण भरल्याने ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. 

शिंदे गट दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार 

शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे.  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

BJP : चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलार मुंबई प्रदेशाध्यक्ष

भाजपने नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली असून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Azadi Ka Amrit Mahotsav: समाजकंटकांनी हर घर तिरंगा प्रचार वाहन फोडले

अमरावतीः अमरावती शहरातील चौधरी चौक, आदर्श हॉटेल जवळ काही समाजकंटकांनी हर घर तिरंगा प्रचार वाहन फोडले. भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियानासाठी जनजागृती साठी 10 वाहनांमधून प्रचार सुरू होता. आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान एका वाहनावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोस्टर काही समाज कंटकांनी फाडल्याने भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेते पदाधिकारी सिटी कोतवाली पोलिसात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

तळकोकणातील दोडामार्ग-पणतुर्ली इथे गव्याला विजेचा शाॅक देऊन मारलं, एकाला तीन दिवसांची वन कोठडी

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पणतुर्ली गावात सुनील गवस यांनी स्वतःच्या शेतात गवा रेड्याला विजेचा शॉक देऊन मारल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार दोन दिवसापूर्वी पणतुर्ली येथे उघड झाला. आपल्या शेतात आलेल्या गव्याला त्याने विजेचा झटका दिला होता. यात गव्याचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्या शेतात गवा रेड्याचा मृत्यू झाला अशी तक्रार घेऊन तो पोलीस ठाण्यात गेला. मात्र हा बनाव चौकशीत उघड झाला. त्यामुळे सुनील गवस याला अटक करत न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस वन कोठडी देण्यात आली आहे.

भाजप मुंबई अध्यक्षपदाची माळ पुन्हा आशिष शेलार यांच्या गळ्यात पडणार : सूत्र

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची माळ पुन्हा आशिष शेलार यांच्या गळ्यात पडणार- सूत्र


प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरू


दोन्ही पदासाठी लवकरच अधिकृत घोषणा होणार


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार यांना पसंती


भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहरा देणार- सूत्र

Pune : अमित ठाकरे यांच्या पुणे संपर्क दौऱ्याला सुरुवात

Pune News : अमित ठाकरे यांच्या पुणे संपर्क दौऱ्याला सुरुवात


अमित ठाकरे 3 दिवस पुणे जिल्ह्याचा दौरा करणार 


राजमहाल या निवस्थानी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत 


15 फुटाहून मोठा हार घालत कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांचे स्वागत


कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर


महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा निश्चित


तसच अमित ठाकरे सगळ्या मतदार संघात जाऊन पक्ष बांधिलकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार


पुण्यात 8 आणि शिरूर मधील 5 मतदार संघात जाऊन तिथल्या पदाधिकारी यांची भेट घेणार

Parbhani : परभणीत अभाविपची 375 फुट भव्य तिरंगा यात्रा

Parbhani : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं परभणीत तब्बल 375 फुट भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील शनिवार बाजार मैदान परिसरातून निघालेली ही यात्रा प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या प्रमाणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी शाळकरी विद्यार्थी, शिक्षक आणि परभणी कर सहभागी होते.

Parbhani : परभणीत अभाविपची 375 फुट भव्य तिरंगा यात्रा

Parbhani : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं परभणीत तब्बल 375 फुट भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील शनिवार बाजार मैदान परिसरातून निघालेली ही यात्रा प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या प्रमाणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी शाळकरी विद्यार्थी, शिक्षक आणि परभणी कर सहभागी होते.

देड जिल्हाधिकारी कार्यालया समोर भरला आरोग्यदायी, रसायनमुक्त रानभाजी महोत्सव
Nanded News : नांदेड येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जिल्हा अधिकारी परिसरात रानभाजी महोत्सवाचे अयोजन करण्यात आलंय .या महोत्सवात शेतकर्‍यांचा आणि नांदेड शहरातील नागरिकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. जंगलातील,डोंगर माथ्यावर, कडी कपारीवर,पावसाळ्यात नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या, रसायन मुक्त, आरोग्यदायी रानभाज्या येथे ठेवण्यात आल्या आहेत. तर या रानभाजी महोत्सवातून ग्रामीण भागातील वाडी, तांडयावरील नागरिकांच्या हातालाही रोजगार उपलब्ध झालाय. हायटेक जीवनशैलीच्या नादात आणि फास्टफूडच्या फुसक्या आहारामुळे आरोग्याचे तीनतेरा झाले आहेत. पण रानभाज्या सारख्या महोत्सवामुळे आजीच्या बटव्यातील आरोग्यदायी ठेवा चाखण्याची संधी नांदेडकराना मिळालीय.

 

या प्रसंगी आदिवसी महिलां शेतकऱ्याचा सन्मान भाजीपाला बियाणाचे पाकीटे देऊन करण्यात आला. या रानभाजी महोत्सवाचे आयोजन गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे खरचटले, वाघाटे, आघाडा,अळू, कुंजर,कुर्डू,लाल माठ, घोळ, चुका, करवंद, तोटा, सुरकंदतांदुळजा, नाय,तरवटा भाजी, गुळाचा इत्यादी रानमेवा विक्रीसाठी उपलब्ध होता. याचबरोबर सेंद्रिय भाजीपाला, गुळ, दाळ, मोसंबी, लोणचे, पापड, हळद, मिरची पावडर, विविध मसाले, ज्वारी, गहू, गाईचे तुप विक्री साठी उपलब्ध होते. जिल्ह्यातील विविध विविध भागातून शेतकरी, महिला गट, शेतकरी गट, याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या सर्व उत्पादनाला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी होती. दिवसभरात साधारणतः 4 ते 5 लाखांची उलाढाल झाली आहे.
Independence Day : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याणमध्ये अभूतपूर्व 'तिरंगा रॅली'

Independence Day : यंदा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून केंद्र सरकारतर्फे हर घर तिरंगा उपक्रमानं त्यांचा प्रारंभ होणार आहे. याच अमृत महोत्सवी वर्षांच्या पार्श्वूमीवर कल्याणात आज केडीएमसी, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्थांतर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजपासून या तिरंगा रॅलीची सुरुवात होऊन खडकपाडा सर्कल, आधारवाडी सर्कल, दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महापालिका मुख्यालयाकडून सुभाष मैदान येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत कल्याणातील विविध कॉलेजेस, शाळेचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, डॉक्टर असे तब्बल पाच हजार जणांनी सहभाग घेतला होता. या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विविधतेतील एकता सांगणारे चित्ररथ, विविध वेशभूषा, कला संस्कृती यांचंही दर्शन घडवण्यात आलं. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर घोषण देत परिसरात दणाणून सोडला होता. विशेष म्हणजे, अधूनमधून जोरदार पावसाची सर कोसळत असताना पावसाची तमा न बाळगता  विद्यार्थी या रॅलीत अधिक उत्साहात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 

UPSC CDS 2021 Final Result : यूपीएससी सीडीएस 2 चा निकाल जाहीर

Union Public Service Commission Result : यूपीएससी Combined Defence Services, CDS II Exam 2021 या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.  शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी आणि अंतिम निकाल upsc.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत बसलेले विद्यार्थी UPSC च्या अधिकृत साईट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण उपलब्ध करून दिले जातील, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Share Market : सेन्सेक्स घसरून 59200 अंकांवर, निफ्टीची घसरण

Stock Market Opening : आज आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सह निफ्टीही घसरला. बाजारात मंद सुरुवाता पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सुमारे 100 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय बाजारेपेठेवर होताना दिसत आहे. यामुळेच शेअर बाजारात संथ सुरुवात पाहायला मिळतेय.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Covid 19 : धोका वाढतोय; देशात नवे 18053 कोरोनाबाधित

Corona Updates : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. 11 ऑगस्ट रोजी देशात 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेनं आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.53 टक्के आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...


गणपतीच्या मिरवणुकीत डीजे बंदी आणि आवाजाच्या मर्यादेवर सुनावणी
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदी आणि आवाजाच्या मर्यादेविरोधात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर काही वर्षांपूर्वी राज्य सरकारनं गणपती मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात वाजवल्या जाणाऱ्या डिजेवर बंदी आणली होती. त्या विरोधात या व्यवसायातील संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. आगामी सणासुदीचा काळ पाहता या विषयावर हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश आज अपेक्षित आहे.


सायनच्या विद्यार्थ्यांची अवयवदानासंबंधी शपथ
जागतिक अवयवदान दिनानिमित्तानं सायनच्या एसआयईएस कॉलेजमध्ये 200 हून अधिक विद्यार्थी अवयवदानासंदर्भात शपथ घेणार आहेत. अवयवदानाचे महत्त्व वाढावा आणि जागरुकता निर्माण व्हावी यासाठी अनेक डॉक्टर्स देखील सहभागी होतील.


केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज ग्रामीण सहकारी बँकेच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्धाटन करणार
दिल्लीमध्ये आज देशभरातील ग्रामीण सहकारी बँकांचे राष्ट्रीय संमेलन होणार असून त्याचे उद्धाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. सहकार मंत्रालय आणि राज्य सहकारी बँकांच्या राष्ट्रीय संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. 


स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचं स्नेहभोजन 
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केलं असून आज रात्री आठ वाजता ताज हॉटेलमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्नेहभोजनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मंत्री, महाधिवक्ता, न्यायाधीश, कुलगुरू ,तिनही दलाचे पदाधिकारी आणि राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.