Maharashtra Breaking News LIVE Updates : पिंपरी चिंचवडसह मावळात अवकाळी पावसाची हजेरी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Solapur News Update: अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कर्नाटकातील बळोरगी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. सर्व मृत हे अहमदनरचे असून ते अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी आले होते.
Unseasonal Rain : पिंपरी चिंचवडसह मावळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दोन दिवसांपासून तुरळक पाऊस ही बरसला. आज सायंकाळी मात्र मेघ गर्जनेसह तुफान पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय खरा पण शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Nagpur News: हवामान विभागाने मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीन दिवस विदर्भात पावसाचे अंदाज व्यक्त केलाहोता. पण तीन दिवस अनुपस्थित राहिलेला पाऊस आज नागपुरात पाहायला मिळाला. 15 मिनिटं मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला.
मुंबई पोलिसांनी मालवणी पोलीस स्थानकांत नोंदवलेला गुन्हा रद्द करा, राणे पितापुत्रांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
राणेंच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित
दिशा सॅलियन प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी
राजकीय सूडबुद्धीन गुन्हा दाखल करत गोवण्यात आल्याचा रोणेंचा दावा
Satara News : साताऱ्याच्या शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. बुधवारी रात्री वस्तीगृहात घुसून पोलिसांनी मारहाण केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. वसतिगृहातून रात्री मोठ्याने आवाज येतो असं कारण देत पोलिसांनी मारहाण केल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतंय. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी परभणी, नागपूर, मुंबई, शिरवळ आणि उदगीर या पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कामकाज विद्यार्थ्यांनी बंद पाडलं आहे. तसंच महाविद्यालयांच्या गेटबाहेर आंदोलनही सुरु केलं आहे.
Nawab Malik : नवाब मलिक यांच्या याचिकेवरील निर्णय हायकोर्टाने राखूुन ठेवला; 'ईडी'ने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिकांनी हायकोर्टात याचिका
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचं भाजपकडून मुंबईत स्वागत करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश राज्य भाजपचंच होतं. या निवडणुकीत सपाच्या जागा वाढल्या. भाजपच्या विजयात मायावतीचं योगदान आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसंच पंजाबमधील नागरिकांनी भाजपला नाकारलं, असंही ते म्हणाले.
नागपूर : हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस गाडीचे इंजिन नागपूर मेन स्थानकाजवळ ट्रॅकवरुन उतरले. नागपूरच्या डायमंड क्रॉसिंगवरुन यार्डकडे जाताना ही घटना घडली. गाडीचा कमी वेग आणि लोको पायलटच्या प्रसंगावधनाने मोठी दुर्घटना टळली. गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अपघातामुळे पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
Mumbai-Agra Highway : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ काल रात्री सेंधवाकडे जाणाऱ्या एका कंटेनरला शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली असून घटनास्थळी नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली.
- मुंबई मेट्रोने 1 ने 2013 पासून कोट्यावधींचा मालमत्ता कर थकविला आहे.
- नोटीस बजावल्यानंतरही कर भरणा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
- नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक, डी. एन. नगर मेट्रो स्थानस, वर्सोवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक, पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे. बी. नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश आहे.
- थकीत कराची रक्कम 21 दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.
- या कालावधीत थकबाकीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
- त्यानंतरही कर न भरल्यास मलनिस्सारण वाहिनी खंडित करण्यात येणार आहे.
- पालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील मुंबई मेट्रोच्या संबंधित मालमत्तांवर ही नोटीस चिकटवली आहे.
- यात के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा समावेश आहे.
पंजाबमधल्या दणदणीत विजयाचा पहिला बोनस आम आदमी पक्षाला तातडीने मिळणार आहे. 31 मार्च ला अवघ्या वीस दिवसात पंजाबमध्ये 5 राज्यसभा सदस्यांची निवडणूक आहे. या पाचही जागांवर आम आदमी पक्ष आपले खासदार निवडून आणू शकतो. त्यामुळे राज्यसभेत आम आदमी पक्षाच्या खासदारांची संख्या 3 वरुन थेट 8 वर जाणार आहे.
वाशिम : वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. दीपाली रमेश इंगळे आणि इतर कर्मचारी थकीत वीज बिल वसुलीसाठी चांधई येथे गेले असता, तेथील वीज ग्राहक लीलाधर गायकवाडने त्याच्या घरावर अवैध वीज घेतल्याचे लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करत सहकारी वीज कर्मचाऱ्याच्या डोक्यात काठी मारुन पुन्हा गावात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावण्यासाठी दगडफेक केली. यात वरिष्ठ तंत्रज्ञ दीपाली रमेश इंगळे यांना इजा झाली. त्यांच्या तक्रारीवरुन मंगरूळपीर पोलिसांनी विविध कलमानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला.
यवतमाळ जिल्ह्यातील एकाच रात्री आर्णी शहरातील आणि महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील हिताची कंपनीचे एटीएम फोडून 21 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. रहदारीच्या मार्गावरील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी गॅस कटरने फोडून 19 लाख 53 हजार पाचशे रुपये कॅश चोरुन नेली. महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील हिताची कंपनीचे एटीम अज्ञात चोरांनी फोडून दीड लाख रोख लंपास केली. हिवरा संगम आणि आर्णी हे एकाच राज्यमहामार्ग 361 वर आहे, तसेच एटीएम फोडण्याची पद्धत आणि वापरलेले साहित्य सारखेच आहे. चोरीच्या दोन्ही घटनांमधील गुन्हेगार एकच असावे असा संशय पोलिसांना येत आहे. एटीएममधील कॅमेरा स्क्रीनवर स्प्रे मारुन, गॅस कटरने एटीएम फोडण्यात आले आहे. घटनास्थळी हात ठसे तज्ञ आणि श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे. आर्णी पोलीस जवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासात आहेत. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एल्सिबीचे अधिकारी परदेशी, एसडीपीओ आडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या चोरट्यांचा शोध घेणे सुरु आहे.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांच्यावर वाळू तस्कराने प्राणघातक हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण केली आहे. शेवगाव बोधेगाव रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जखमी तलाठ्यास उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना अटक होईपर्यंत शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
Maharashtra Budget 2022 Date, Time : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Petrol Diesel Rate : निवडणुका संपल्या, इंधन दरवाढ होणार? देशातील आजचे दर काय?
Petrol-Diesel Price Today 11 March 2022 : देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांटे निकाल जाहीर झाले असून चार पैकी तीन राज्यांत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शक्यता वर्तवली जात होती की, निवडणुका संपताच देशात पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली जाऊ शकते. पण आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही भारतीय तेल कंपन्यांनी (Oil companies) पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या शक्यतेमागील मुख्य कारण म्हणजे, रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती. या दोन देशांतील युद्धानं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. असातच यामुळे कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता वर्तवण्यात येत होती.
तब्बल चार महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता असतानाच पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी 9 मार्च रोजी मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, इंधन दर यूपीए (UPA) सरकारनं नियंत्रणमुक्त केलं होतं आणि जेव्हा इंधन दर नियंत्रणमुक्त केले जाता, त्यावेळी त्यात मालवाहतूक शुल्क देखील जोडलं जातं.
Maharashtra Budget 2022 Date, Time : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -