Maharashtra Breaking News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात खाजगी बसचा भीषण आपघात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Sep 2022 11:14 PM
Nandurbar : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात खाजगी बसचा भीषण आपघात

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण आपघात झाला आहे. चरणमाळ घाटात तीव्र उतारावर चालकाचे नियत्रंण सुटल्याने बस पलटी झाल्याने आपघात झाला आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधील आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.  मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहे. अपघातस्थळी स्थानिक, नागरिक ,पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू  आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यसमितीत एकमताने ठराव मंजूर झाला आहे. 

बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात 

बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. आज दिवसभरात बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून  खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस , मका व इतर पिकांना हा पाऊस लाभदायक असणार आहे. जिल्ह्यातील शेगाव , खामगाव , नांदुरा , मोताळा तालुक्यात विजांसह मुसळधार पाऊस बरसत आहे.  

विधानपरिषद आमदारांच्या प्रलंबित नियुक्ती प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका

विधानपरिषद आमदारांच्या प्रलंबित नियुक्ती प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांच्या नियुक्तीवरून राज्यपालांनी कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ठाकरे सरकारनं सुचवलेल्या राज्यपाल नियुक्त जागांची यादी राज्यपालांनी रद्द केल्याचा विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात  याचिका दाखल करण्यात आली आहे

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जनावर बाजार, जत्रांवरही बंदी

  राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.  जनावरांच्या लंपी स्किन आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरात जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जनावरांचे बाजार आणि जत्रा पुढचा आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात  कोल्हापूरच्या करवीर आणि हातकणंगले तालुक्यात लंपी स्किनचा सर्वाधिक प्रादुर्भाव  वाढला आहे. 

बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, संशयितावर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगावच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजलगावच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने याच ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिला वारंवार व्हाट्सएपच्या माध्यमातून अश्लील मेसेज  पाठवून शरीर सुखाची मागणी केली होती. या प्रकरणानंतर या महिला पोलिसाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याने तिला त्रास देणं चालूच ठेवलं होतं. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. 

अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकमल चौकात आंदोलन

अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकमल चौकात आंदोलन करण्यात आलंय. जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. 

स्व विनायक मेटे यांच्या अस्थींचे गोदाकाठी विसर्जन

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या अस्थींचे गोदाकाठी विसर्जन करण्यात आले. काही दिवसांपासून विनायक मेटे यांच्या अस्थींची जिल्हाभर दर्शन यात्रा सुरू होती. आज विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या हस्ते विधिवत पूजा विधी करण्यात आली. स्वर्गीय विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे तसेच अन्य कुटुंबीय आणि  नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चचे पदाधिकारीच्या उपस्थितीत अस्थींचे  रामकुंडत विसर्जन करण्यात आले.  शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नातेवाईक भावूक झाले.  ज्योती मेटे यांनी समस्त मेटे परिवार आणि शिवसंग्रामच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले, तर विनायक मेटे यांच्या पश्चात ज्योती मेटे याना आमदारकी द्यावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली

Bindass Kavya: प्रसिद्ध यूट्युबर बिनधास्त काव्या अखेर सापडली; मध्यप्रदेशकडे जात असतांना सापडली

औरंगाबाद येथील प्रसिद्ध यूट्युबर बिनधास्त काव्य काल दुपारपासून दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होता. मात्र अखेर काव्या सापडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मनमाडमधून मध्यप्रदेशच्या इटारसीकडे जात असतांना काव्या मिळून आली आहे.

Parbhani News: 5 दिवसांनंतरही मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा मारेकरी फरार 

5 दिवसांनंतरही मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा मारेकरी फरार. विजय जाधव देतोय पोलिसांचा गुंगारा, 3 पथकांद्वारे जाधवचा शोध , किरकोळ वादातून ६ सप्टेंबर रोजी झाला होता सचिन पाटलांचा खून 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची आज संध्याकाळी पाच वाजता बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची आज संध्याकाळी पाच वाजता बैठक

उद्याच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज वर्किंग कमिटी मध्ये पास होणार ठराव

शरद पवार यांना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा ठराव आजच्या मीटिंगमध्ये मंजूर होईल, उद्या तो जाहीर केला जाईल

दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये संध्याकाळी पाच वाजता ही बैठक असणार आहे

आजच्या बैठकीला सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित असतील

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या सकाळी दहा वाजता सुरू होईल

हे पक्षाचं ८वं राष्ट्रीय अधिवेशन असेल

प्रिन्स चार्ल्स नवे महाराज 

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. महाराणी एलिजाबेथ यांनी 70 वर्ष सिंहासनाची धुरा सांभाळली. आता त्यांच्या निधनानंतर शाही परिवारात सत्तांतरण कसं होणार याकडे लक्ष लागून आहे. महाराणी एलिजाबेथ यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे येणार आहे.  भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता नवीन महाराज म्हणून घोषणा करण्यात येणार आहे. 

पंतप्रधान 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदे' चे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.  10-11 सप्टेंबर 2022 रोजी सायन्स सिटी, अहमदाबाद येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

आजपासून पितृपक्ष पंधरवडा

 हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.  पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. आजपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. 

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात 

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  इंडिया लिजेंड्सचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये  युवराज सिंह (Yuvraj Singh) हरभजन सिंह आणि पठाण बंधू यांच्यासह सर्व माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसतील. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांग्लादेश आणि श्रीलंकेचे माजी खेळाडू मैदानात दम दाखवतील.  इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे.

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाबाबत आमदार प्रशांत बंब यांची नवीन मागणी

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाबाबत आमदार प्रशांत बंब यांची नवीन मागणी. जोपर्यंत शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, तोपर्यंत संबंधित शिक्षकांचे मासिक वेतन देण्यात येऊ नये. आजपर्यंत शासन निर्णय न पाळणाऱ्या संबंधित शिक्षकांकडून वेतन वसुल करण्याची मागणी. जिल्हा परिषद सीईओ , शिक्षण आधिकारी , गट शिक्षण आधिकारी यांना बंब यांचे पत्र .

आमदार बंब यांच्या मागणीनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईतील नवसाचा गणपती अशी ओळख असणारा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10.30 वाजता निघाली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी  भक्तांची अलोट अशी गर्दी लोटलीय.. भक्तांच्या जनसागरामुळे गणपती बाप्पाच्या पुढच्या मिरवणुकीला मात्र उशीर होतोय. लालबागच्या राजाचे सकाळी 7 वाजता विसर्जन होण्याची शक्यता आहे

पंतप्रधान 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदे' चे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.  10-11 सप्टेंबर 2022 रोजी सायन्स सिटी, अहमदाबाद येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

 प्रिन्स चार्ल्स नवे महाराज 

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. महाराणी एलिजाबेथ यांनी 70 वर्ष सिंहासनाची धुरा सांभाळली. आता त्यांच्या निधनानंतर शाही परिवारात सत्तांतरण कसं होणार याकडे लक्ष लागून आहे. महाराणी एलिजाबेथ यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे येणार आहे.  भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता नवीन महाराज म्हणून घोषणा करण्यात येणार आहे. 

कॉंग्रेसचे गुजरात बंदचे आवाहन

काँग्रेसने (Congress) महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन उद्या गुजरात बंदचे आवाहन केले आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात 

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  इंडिया लिजेंड्सचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये  युवराज सिंह (Yuvraj Singh) हरभजन सिंह आणि पठाण बंधू यांच्यासह सर्व माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसतील. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांग्लादेश आणि श्रीलंकेचे माजी खेळाडू मैदानात दम दाखवतील.  इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे.

आजपासून पितृपक्ष पंधरवडा

 हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.  पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. आजपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.