Maharashtra Breaking News 10 May 2022 : मुंबई पालिकेकडून नवनीत राणा यांच्या घराला पुन्हा नोटीस

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 May 2022 06:49 PM
Devendra Fadnavis : राज ठाकरे राज्य सरकारकडून एवढी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : राज ठाकरे राज्य सरकारकडून एवढी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह : शरद पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. 

Chiplun News Update : आता मशिदींवरील भोंगे देखील देणार पुराच्या धोक्याचा इशारा, चिपळूण नगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्णय 

मशिदींवरील भोंग्यावरुन राज्याचे वातावरण तापलेले असतानाच चिपळूण नगरपालिका प्रशासनाने मात्र एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आपत्ती काळात या भोंग्यांचा वापर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी करुन घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. अतिवृष्टी, पूर आणि महापुरात उद्भवणाऱ्या धोक्याची माहिती मिळून नागरिकांनी वेळीच सतर्क व्हावे यासाठी पालिकेच्या भोंग्यांबरोबरच मशिदींवरील भोंग्यांद्वारेही माहिती देण्यात येणार आहे. 

मुंबई पालिकेकडून नवनीत राणा यांच्या घराला पुन्हा नोटीस

मुंबई पालिकेकडून नवनीत राणा यांच्या घराला पुन्हा नोटीस देण्यात आला आहे. घराचं अवैध बांधकाम का तोडू नये, असा सवाल राणा
दाम्पत्याला पालिकेने केला आहे.

Bhandara News Update : भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपची युती ; अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजपचा 

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपची युती झाली झाली आहे. जिल्हापरिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष तर भाजपचे उपाध्यक्ष झाले आहेत. काँग्रेसच्या गंगाधर जिभकाटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असून उपाध्यक्षपदी भाजपचे संदीप टाले यांची निवड झाली आहे. भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने युती केली आहे.  

Dhule News Update : आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर 

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्या संदर्भात नारायण राणे यांचे वकील  अॅड. अनिकेत निकम  यांच्याकडून धुळे सत्र न्यायालयात 4 मे रोजी अटक पूर्व जामीन प्रकरणी अर्ज दाखल करण्यात आला होता. आज जिल्हा व सत्र न्यायधीश आर. एच. मोहंमद यांनी नारायण राणे यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला.  

Crime News : वृद्ध दाम्पत्याचे साडे तीन लाखाचे दागिने चोरणारा चोरटा अटकेत

पहाटेच्या लोकलने लग्नाला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याचे 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स चोरणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी 18  दिवसानंतर बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याकडून चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. राजेश बबन घोडविंदे  असे आरोपीचे नाव आहे.


टिटवाळ्यात राहणारे 74 वर्षीय भगवत डावरे आणि त्यांची पत्नी सत्यभामा  हे दोघे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी टीटवाळ्यातून नाशिकला निघाले होते. सकाळी 6 वाजताच्या लोकलची टीटवाळा स्थानकातील फलाट एकवर प्रतीक्षा करत थांबलेल्या डावरे यांनी आपल्या बॅग कठड्यावर ठेवल्या होत्या. ही संधी साधून चोरट्याने त्यांची दागिने असलेली पर्स चोरून पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. मात्र चोरटा सीसीटीव्हीत दिसत नसल्याने त्याला पकडण्याचे आव्हान होते. पोलिसांनी स्टेशन परिसरातील आसपासचे सीसीटीव्ही तपासले. अखेर  बातमीदाराच्या मदतीने इतर सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीचा माग काढत पोलिसांनी 18 दिवसानंतर वाशिंद रेल्वे स्थानकाजवळून आरोपीला ताब्यात घेतले.  

Nagpur : नागपूर महानगर स्पोर्ट्स घोटाळ्याचा निकाल, सर्व 103 नगरसेवक निर्दोष

साल 2000-2002 मधला गाजलेल्या 103 नगरसेवकांना दोषी पकडलेल्या नागपूर महानगर स्पोर्ट्स घोटाळ्याचा निकाल लागला आहे. यात सर्व नगरसेवकांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. यामध्ये सर्व नगरसेवक ज्यात भाजपचे अधिक  होते जेल मध्ये गेले होते. महापालिका बरखास्त झाली होती. या नगरसेवकातील दोघेजण आज आमदार आहेत - कृष्णा खोपडे, विकास कुंभारे. 


 

Sangli News Update : सांगलीत कर्नाटक पासिंग गाडीतून 75 लाख रुपयांची रोकड जप्त, तिघे जण ताब्यात 

सांगलीत कर्नाटक पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीत 75 लाख रुपयांची रोकड सापडलीय. एका गाडीतून मोठी रक्कम  मिळालेल्या माहितीच्या आधारे  सांगली शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदी करून ही गाडी पकडली. गाडीतील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे या रकमेबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केलीय. सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेल समोर ही कारवाई  करण्यात आली.   आकाश नारायण केंगार, सूनील शहाजी  कदम आणि महिंद्र लक्ष्मण जावीर असे रक्कम घेऊन जाणाऱ्या तिघांची नावे असून हे तिघेही आटपाडी येथील आहेत.  

शरद पवार यांचे बेळगावात आगमन, दोन दिवस विविध कार्यक्रमात सहभागी होणार
Belgaum News : माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन दिवसाच्या बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याला प्रारंभ झाला असून दुपारी बारा वाजता त्यांचे बेळगावात आगमन झाले. बेळगावात आल्यावर त्यांनी हिंदवी वाडी येथील दिवंगत अरविंद गोगटे यांच्या निवासस्थानी भेट दिली. काही महिन्यांपूर्वी उद्योगपती अरविंद गोगटे यांचे निधन झाले असल्याने गोगटे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. शरद पवार यांनी गोगटे कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील उपस्थित होते. चिकोडी येथील साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन आणि अंकली येथील वीर राणी कीत्तुर चन्नमा पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी चिकोडी येथे जाहीर कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. बुधवारी सकाळी मराठा बँकेच्या अमृत महोत्सव कार्यक्रम आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सव सांगता कार्यक्रमात शरद पवार सहभागी होणार आहेत.
मध्य प्रदेशातील ओबीसी राजकीय आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मध्य प्रदेशातील ओबीसी राजकीय आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; 'दोन आठवड्यात पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढा' सुप्रीम कोर्टाचा आदेश

शिवसेना आमदार मनिषा कायंदे आणि नेते राहुल कनल वांद्रे पोलीस स्थानकात दाखल, लिलावती रुग्णालयाविरोधात तक्रार नोंदवणार
Mumbai News : शिवसेना आमदार मनिषा कायंदे आणि राहुल कनल वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाले असून लिलावती रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार नोंदवणार आहे. एमआरआय करताना नवनीत राणा यांचे फोटो लीक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली जाणार आहे. फोटो लीक झाल्याप्रकरणी लिलावती रुग्णालय दोषी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
सांगलीतील विटा पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल 13 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादींना परत केले
Sangli News : विटा पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांनी चोरलेले तब्बल 12 लाख 71 हजार 55 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने फिर्यादीकडे सुपूर्द केली आहे. विटा उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आला. खानापूर तालुक्यातील चिखलहोळ, विटा शहरात अशा पाच ठिकाणी चोरी झाल्या होत्या. त्यामध्ये 299.6 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 588.76 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिन्यांची चोरी झाली होती. या चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांना काही दिवसात पकडत त्यांच्याकडून पोलिसांनी सर्व चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी

पोलीस ठाण्यातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यातील किंमती जप्त मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
Kolhapur Sharad Pawar PC : केंद्र सरकारविरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं : शरद पवार

Sharad Pawar PC : केंद्र सरकारविरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याबाबतची प्रोसेस सुरु आहे, काँग्रेसचे देखील शिबीर सुरु आहे. आमच्या देखील बैठका सुरु आहेत, पण आमच्यात देखील मतभेद आहेत ते लवकर दूर केले पाहिजे : शरद पवार

Kolhapur Sharad Pawar PC : विरोधकांच्या बाबतीत ईडीचा कार्यक्रम, सरकार असलेल्या पक्षाच्या नेत्यांची नावं यात नाहीत : शरद पवार

Sharad Pawar PC : ईडीचा कार्यक्रम विरोधकांच्या बाबतीत सुरु आहे. मात्र केंद्रात सरकार असलेल्या पक्षाच्या नेत्यांची यात नाव दिसत नाहीत : शरद पवार

Kolhapur Sharad Pawar PC : हनुमान चालीसा म्हणून काही होत नाही, सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत : शरद पवार

Sharad Pawar PC : हनुमान चालीसा म्हणून काही होत नाही. परंतु सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत. या सर्व मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे पुढे आणले जात आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती वाढले आहेत बघा. याबाबत लोकांनी चळवळ उभी केली पाहिजे : शरद पवार

Kolhapur Sharad Pawar PC : संभाजीराजे यांच्याबाबत अजून चर्चा झालेली नाही; आम्हाला काँग्रेस, शिवसेनेला विचारावं लागेल : शरद पवार

Sharad Pawar PC : संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अजून काही चर्चा झालेली नाही. आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावं लागेल. पण दिल्लीत राज्याच्या संदर्भात चर्चा करत असताना संभाजीराजे यांचे आम्हाला खूप सहकार्य लाभले आहे : शरद पवार

Kolhapur Sharad Pawar PC : कोण अयोध्येला जाणार आहे मला माहित नाही. माझा नातू देखील अयोध्येत आहे : शरद पवार

Sharad Pawar PC : कोण अयोध्येला जाणार आहे मला माहित नाही. माझा नातू देखील अयोध्येत आहे : शरद पवार

Kolhapur Sharad Pawar PC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवाव्यात की स्वतंत्र याबाबत महाविकास आघाडीत पूर्ण चर्चा झालेली नाही : शरद पवार

Sharad Pawar PC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जिथून तयारी केलीय तिथून पुढे तयारी करा, असं कोर्टाने सांगितलं असं मला वाटतं. 15 दिवसात सुरुवात करा असं कोर्टाने म्हटलं असं मला वाटत नाही. मतदान प्रक्रियेला किमान दोन ते अडीच महिने लागतील. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या असं काही जणांचं मत आहे तर काहीजण स्वतंत्र लढावं आणि नंतर एकत्र यावं असं म्हणतात. याबाबत महाविकास आघाडीमध्ये याबाबत पूर्ण चर्चा झाली नाही.

Kolhapur Sharad Pawar PC : राजद्रोह कायद्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेत असेल तर चांगली गोष्ट : शरद पवार

Sharad Pawar PC : भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मला देखील समन्स बजावला होता. त्यावेळी मला विचारण्यात आलं होतं त्यावेळी मी राजद्रोह या कायद्याबाबत बोललो होतो. राजद्रोहाचा कायदा हा ब्रिटिशकालीन 1890 सालचा आहे. एखाद्या प्रश्नबाबत आवाज उठवण्याचा अधिकार आहे म्हणून या कायद्याबाबत फेरविचार करण्याबाबत मी बोललो होत. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत असेल तर चांगली गोष्ट आहे : शरद पवार 

मुंबई पोलीस राणा दाम्पत्याला चौकशीसाठी नोटीस जारी करण्याची शक्यता : सूत्र

Mumbai News : मुंबई पोलीस राणा दाम्पत्याला चौकशीसाठी नोटीस जारी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांनी बोलावल्यास राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागेल, असाही उल्लेख होता. पोलिसांना राणा दाम्पत्याला चौकशीसाठी बोलवायचं असल्यास 24 तास आधी नोटीस द्यावी लागणार आहे.

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या शस्त्रक्रियेचा आज फैसला

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या शस्त्रक्रियेचा आज फैसला.खांद्यावरील शस्त्रक्रिया खाजगी रूग्णालयात करू देण्याची देशमुखांची मागणी. मात्र  ईडीचा देशमुखांच्या मागणीला विरोध, जेजेत ही शस्त्रक्रिया होऊ शकते. देशमुखांवर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज नाही, असा डॉक्टरांचा अहवालही कोर्टात सादर. देशमुखांच्या अर्जावर कोर्टाने निकाल राखून ठेवला, आज निकाल येणार आहे.

Mumbai News : जेल की, बेल? मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला

Mumbai News : मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना बेल मिळणार की अटक होणार ?  आज दोघांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दोघांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. 

Mumbai News : लिलावती रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Mumbai News : खासदार नवनीत राणांचा एमआरआय टेस्ट करताना फोटो समोर आले आहे. यानंतर लिलावती रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे वांद्रे हिल रोड पोलिसात तक्रार करण्याची शक्यता आहे मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लिलावती रुग्णालयाकडून अहवाल मागवला आहे.  अशातच आता सिटीस्कॅन करताना फोटो काढणे नियमांचे उल्लंघन असल्याने पालिकेच्या एच पश्चिम विभागाने लीलावती रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पालिकेने रुग्णालयाला पुढील 48 तासांत नोटीसीचे उत्तर द्या, असे निर्देश दिले आहेत.




 


OBC Reservation : सु्प्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठा फैसला

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? याचा फैसला आज होणार आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने देखील हा दिवस आणि निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत मध्यप्रदेश सरकार ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागत होते. मध्य प्रदेश सरकारला हा अधिकचा वेळ मिळणार का? की तिथेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचे आदेश कोर्ट देणार का? याचा निर्णय आज होणार आहे. शुक्रवारी मध्यप्रदेशच्या सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठा फैसला


ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचा फैसला आता आज होणार आहे.  महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने देखील हा दिवस आणि निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत मध्यप्रदेश सरकार ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागत होते. मध्य प्रदेश सरकारला हा अधिकचा वेळ मिळणार का? की तिथेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचे आदेश कोर्ट देणा याचा फैसला मंगळवारी होणार आहे. शुक्रवारी मध्यप्रदेशच्या सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.


लिलावती रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता 
 
खासदार नवनीत राणांचा एमआरआय टेस्ट करताना फोटो समोर आले आहे. यानंतर लिलावती रुग्णालयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे वांद्रे हिल रोड पोलिसात तक्रार करण्याची शक्यता आहे मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लिलावती रुग्णालयाकडून अहवाल मागवला आहे.  अशातच आता सिटीस्कॅन करताना फोटो काढणे नियमांचे उल्लंघन असल्याने पालिकेच्या एच पश्चिम विभागाने लीलावती रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत पालिकेने रुग्णालयाला पुढील 48 तासांत नोटीसीचे उत्तर द्या, असे निर्देश दिले आहेत.


मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना बेल की जेल


मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना बेल मिळणार की अटक होणार ?  आज दोघांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दोघांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. 


अनिल देशमुखांच्या शस्त्रक्रियेचा आज फैसला


अनिल देशमुखांच्या शस्त्रक्रियेचा आज फैसला.खांद्यावरील शस्त्रक्रिया खाजगी रूग्णालयात करू देण्याची देशमुखांची मागणी. मात्र  ईडीचा देशमुखांच्या मागणीला विरोध, जेजेत ही शस्त्रक्रिया होऊ शकते. देशमुखांवर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज नाही, असा डॉक्टरांचा अहवालही कोर्टात सादर. देशमुखांच्या अर्जावर कोर्टाने निकाल राखून ठेवला, आज निकाल येणार आहे.


आज पहिल्या क्रमांकासाठी लढत 


लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पुण्याच्या एमसीए मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. विजेता संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकवर पोहचणार आहे. तसेच जिंकणारा संघ प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करणार आहे. 


1927 : भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म.


1993 : : संतोष यादव या दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणार्‍या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.