Maharashtra Breaking News 11 June 2022 : अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2022 09:58 PM
Akola Earthquake : अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के

Akola Earthquake : अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के. 5 वाजून 41 मिनिट आणि 18 सेकांदांनी  बसला 3.5 रिश्टर स्केलचा धक्का. राष्ट्रीय भूकंपमापक केंद्राच्या संकेत स्थळावर भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद. भूकंपाचं केंद्र अकोल्यापासून 21 किलोमीटर अंतरावर असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. भूकंपामूळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप नोंद नाहीय, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची माहिती.

देहू येथील संत तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद

देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद ठेवल जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहूत येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देहू संस्थांनकडून देण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा पथकाने देहू संस्थानला तशा सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी उद्या सकाळपासून केली जाणार आहे. रोज 20ते  25 हजार भाविका दर्शनासाठी येतात. तर सुट्टी दिवशी हा आकडा वाढतो. या सर्व भाविकांना 14 जुनच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शन घेता येणार नाही.

Congress : केंद्र सरकार विरोधात 13 जूनला ईडीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

Congress : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,  राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे असा आरोप काँग्रेसनं केलाय. याचा विरोध करण्यासाठी 13 जूनला मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर धरणे काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार आहे या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , मंत्री सहभागी होणार आहेत. 

नवी मुंबईतील नेरुळमध्ये इमारतीचा भाग कोसळला, 6 जखमी, 15 जणांना वाचवण्यात यश

Navi Mumbai News : नेरुळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क सोसायटीमधील स्लॅब कोसळल्याने सहा जण जखमी झाले आहेत. सहाव्या मजल्यावरील रुममध्ये लादी बसवण्याचे काम सुरु होते. हॅाल मध्ये काम सुरू असतानाच सहाव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला. वरुन पडलेल्या स्लॅब च्या वजनाने खालच्या माळ्यापर्यंत संपूर्ण हॅालचा भाग कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अडकलेल्या 15 जणांना अग्निशमन विभागाच्या जवानांनी बाहेर काढले. यातील सहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सहा मजल्यावरुन खालचे सगळे स्लॅब पडल्याने खिडकीत अडकून बसलेल्यांना ग्रील कापून बाहेर काढण्यात आले. ही इमारत 1994 साली बांधलेली आहे. अजून 30 वर्षेही पूर्ण न झालेल्या इमारतींचा भाग पडल्याने बांधकामाबाबत शंका उपस्थितीत होत आहे. त्यामुळे ही इमारत बांधलेल्या बिल्डरने शहरात अजून किती ठिकाणी बांधकाम केले आहे याची चौकशी करुन स्ट्रक्चरल ॲाडिट केलं जाणार आहे. दरम्यान पावसाळ्यात घरातील कामे काढून इमारतीला धोका पोचविणार्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्याच कार्यक्रमात आपत्ती, कार्यक्रम सुरु असताना वीज गेल्याने उकाड्याने मंत्र्यांसह सर्वच हैराण

Buldhana News : आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वेडीट्टीवार हे आज बुलढाणा दौऱ्यावर असताना शहरातील गर्दे हॉलमध्ये ओबीसी संघर्ष मेळाव्या दरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे काही काळ कार्यक्रम थांबवण्यात आला होता तर बराच वेळ वीज पुरवठा सुरु न झाल्याने स्टेजवरील मंत्र्यांसह अनेक मान्यवर उकाड्याने हैराण झाले होते तर वाट बघूनही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने मंत्री विजय वडेट्टीवार यांना भाषण सुद्धा काहीशा अंधारात करावं लागलं. जवळपास एक तासाच्या कालावधीनंतर विद्युत प्रवाह सुरळीत झाला. मात्र आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्याच कार्यक्रमात आपत्ती आल्याने सर्वच हैराण झाल्याच दिसले.

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून केलाय. मद्यपान करून आरोपी  पत्नीला मारहाण करायचा. यातूनच ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अवंतीका शर्मा असं खून झालेल्या महिलेच नाव असून आरोपी शिवम पचौरी याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत. दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे. शिवम याने अवंतीकाचं डोकं भिंतीवर, किचनवर आपटून तिचा गळा आवळत खून केला. यानंतर स्वतः पोलीस कंट्रोलला फोन करून या घटनेची माहिती दिली. तीन वर्षीय चिमुकली समोरच ही घटना घडली आहे. 

नवी मुंबई -  नेरूळच्या शनिमंदीर जवळील इमारत दुर्घटना,  जिमी पार्क इमारतीमधील भाग कोसळला

नवी मुंबई - नेरूळ शनिमंदीर जवळील इमारत दुर्घटना, जिमी पार्क इमारती मधील भाग कोसळला, इमारती मधील एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळला, नऊ माळ्यापासून खाली बेडरूमचा भाग कोसळला, काही जण जखमी झाल्याची शक्यता 


नेरूळ अग्निशमन विभाग घटनास्थळी

रत्नागिरीपासून गणपतीपुळेकडं जाणाऱ्या बसचा अपघात, 

रत्नागिरीहून गणपतीपुळेकडं जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली. बसणी गावच्या वळणावर सकाळी 10 वाजता एसटीचा अपघात झाला. दोन बस समोरासमोर एकमेकांना धडकल्याची घटना घडली. सुरु असलेला पाऊस आणि वळणाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघात कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. पण दोन्ही एसटी गाड्याचे नुकसान झाले.

अपेक्षेप्रमाणं मतं मिळू शकली नाहीत ही खेदाची बाब : अशोक चव्हाण

Ashok Chavan : राज्यसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणं मतं मिळू शकली नाहीत ही निश्चितच खेदाची बाब असल्याचं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. अपक्ष मतदारांकडून अपेक्षेप्रमाणं मतं मिळू शकली नाहीत अस खुद्द संजय राऊत यांनी सांगितल्याचे चव्हाण म्हणाले.

सिंधुदुर्गमधील वैभववाडीतील सोनाळी इथल्या अपघातात कोळपे इथल्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उंबर्डे-वैभववाडी राज्य मार्गावर मोटर सायकल आणि काँक्रिट मिक्सर वाहनात झालेल्या भीषण अपघात सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वैभववाडीतील सोनाळी वाणेवाडी येथे हा अपघात झाला. मुख्तार महंमद थोडगे आणि मोमीना उस्मानगणी नावळेकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्तार हा येथील अर्जुन रावराणे उच्च महाविद्यालयात बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होता. तर मोमीना ही विवाहित असून तिला दोन महिन्यांची मुलगी आहे. मुख्तार हा आज बहिणीला घेऊन वैभववाडी येथे डॉक्टरकडे जात होता. या अपघाताने कोळपे गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर मिक्सर वाहन चालक गाडी तेथेच सोडून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताने राज्य मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

संजय राठोड प्रकरणात बंजारा समाज पुन्हा आक्रमक होणार, महंतांची फौज पुण्यात दाखल

Sanjay Rathod : संजय राठोड प्रकरणात बंजारा समाज पुन्हा आक्रमक होणार  आहे. बंजारा समाजाचे महंत थोड्याच वेळात पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात धडकणार आहेत. सर्व महंतांची फौज पुण्यात दाखल झाली आहे. संजय राठोड प्रकरणांचं काय झालं? आजच्या आज अहवाल सादर करा अशी मागणी महंत करणार आहेत. पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुजा चव्हाण प्रकरणी सजंय राठोड यांचा अहवाल सादर करण्यावर महंत ठाम आहेत.

अकेला देवेंद्र क्या करेगा असं विचारणाऱ्यांना दणदणीत उत्तर : चित्रा वाघ

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा शानदार विजय झाला आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा असं विचारणाऱ्यांना हे दणदणीत उत्तर असल्याचं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. मला काल शिवाजीनगर पोलीसांचे पत्र आले आहे. या पत्रात शिवसेना नेते रघुनाथ कुचीक ज्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याच म्हटलय. कुचीकांच्या विरोधातील पुरावे न्यायालयात सादर  करण्यात येतील. मुंबई पोलीसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधाकाऱ्याची परवानगी लागेल असा नवा आदेश काढला आहे. हा तुघलकी आदेश असल्याते वाघ यांनी म्हटले आहे. असा आदेश काढण्याचे अधिकार मुंबई पोलीस आयुक्तांना आहेत का? कारण हा कायदा संसदेने संमत केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


पोस्कोचे गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी काढलेली ही पळवाट आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाला राष्ट्रीय बालहक्क आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून  स्पष्टीकरण मागवल असल्याचे वाघ म्हणाल्या.

मुस्लिम समाजाच्या मोर्चा प्रकरणी सोलापुरात 10 जणांवर गुन्हा दाखल 

शुक्रवारी सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मुस्लिम समाजाच्या मोर्चा प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दि यांच्यासह एकूण 10 जणविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात भांदवि कलम 143, 147, 188, सार्वजनिक संपत्ती नुकसान  प्रतिबंधक अधिनियमचे कलम 3, महाराष्ट्र पोलीस  अधिनियम कलम 135 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार अजितसिंह देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या आदेशाला बालकल्याण आयोगाचा आक्षेप

Sanjay Pandey : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी (Sanjay Pandey)  जारी केलेला आदेशावर बालकल्याण आयोगानं आक्षेप घेतला आहे. त्यांनी जारी केलेला आदेश बेकायदेशीर असून, दोन दिवसात आदेश मागे घ्या, असं बालकल्याण आयोगानं म्हटलं आहे. यापुढं पॉक्सो (Pocso) किंवा विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यापूर्वी डीसीपी दर्जाच्या (DCP) अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचा आदेश संजय पांडेंनी दिला आहे. यावर बालकल्याण आयोगानं आक्षेप घेत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Nashik Accident : नाशिकमध्ये रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा करुण अंत 

Nashik Accident : नाशिकमध्ये रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. नाशिकच्या आयटीआय सिग्नजवळ हा अपघात झाला. यामध्ये रिक्षाचालक व एक प्रवाशी महिलेचा करुण अंत झाला. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. दरम्यान अद्याप या दोघांचेही नाव समजू शकलेले नाही. 

सिंधुदुर्गातील फोंडाघाट इथे दोन कंटेनरचा अपघात, कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास ठप्प

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट बस स्टँडवरील उतारावर दोन कंटेनरची सकाळी सातच्या सुमारास समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यामुळे कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने फोडाघाटातून जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. कोल्हापूरच्या दिशेने भंगार घेऊन जाणारा कंटेनर आणि गोव्याला पॅकिंग पॉलिथिन मटेरियल घेऊन जाणारा कंटेनर यांची फोंडाघाट बसस्थानकावरील उतारावर समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही कंटेनरचे एक्सेल पार्ट तुटल्याने दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली. मात्र ,सकाळीच कामावर जाणाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला आहे.

नांदेडमध्ये सायकलवर फिरवण्याचे बहाण्याने सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये दोन जणांनी सायकल वर फिरवतो असं सांगून  एका सात वर्षाच्या मुलाला शेतात नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लैंगिक अत्याचार करणारे दोघेही 16 वर्षांचे आहेत. तर सात वर्षीय मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रसंग आईला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आईने तातडीने पोलीस ठाणे गाठून मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

Nagpur News : नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील काटोल शहरात धंतोली भागातआज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विराज जयवार हा पाच वर्षीय मुलगा मोठ्या बहिणीसह घरासमोर फिरत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. पाहता पाहता दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी विराजवर हल्ला केला आणि काही अंतरापर्यंत ओढत नेलं. वस्तीतील नागरिक विराजला वाचवण्यासाठी धावत त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात 

आजपासून दोन दिवस सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाला पालघरमध्ये सुरुवात होणार आहे.  या संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. 

लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन आज

भक्तांचे आराध्य दैवत लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन आज केलं जाणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे.


 

आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन

आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत असून रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. 11 आणि 12 तारखेला रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.

कोकण, मुंबईत मान्सूनचं आगमन

मान्सूनचं कोकणात दमदार आगमन झालं आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला. काल कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. संपूर्ण मुंबई, उपनगरांमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही चांगला पाऊस झाला. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


कोकण, मुंबईत मान्सूनचं आगमन
मान्सूनचं कोकणात दमदार आगमन झालं आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला. काल कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. संपूर्ण मुंबई, उपनगरांमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली. पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही चांगला पाऊस झाला. 


आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन
आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत असून रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. 11 आणि 12 तारखेला रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.


लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन आज
भक्तांचे आराध्य दैवत लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन आज केलं जाणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे.


 


सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात 
आजपासून दोन दिवस सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाला पालघरमध्ये सुरुवात होणार आहे.  या संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. 


पश्चिम क्षेत्रीय परिषदेची आज बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची बैठक होणार आहे. दीवमध्ये सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून यासाठी गुजरात, महाराष्ट्र, गोवा येथील मुख्यमंत्री आणि दादरा, नगर हवेली, दमन, दीव येथील प्रशासक सहभागी होणार आहेत. सीमा, सुरक्षा, रस्ते, उद्योग, ऊर्जा याबाबत बैठक होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.