Maharashtra Breaking News 10 June 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jun 2022 03:48 PM
Aurangabad: एमआयकडून औरंगाबादेत आंदोलन; जलील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

Aurangabad Mim Protest: भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी खासदार जलील सुद्धा उपस्थित असून, शेकडो कार्यकर्ते आंदोलनास्थळी जमा झाल्याने दिल्ली गेट परिसरात ट्राफिक पूर्णपणे जाम झाली आहे. तर घटनास्थळी खुद्द पोलीस आयुक्त दाखल झाले आहेत.

Solapur Nws Update : सोलापुरात एमआयएमच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा

सोलापुरात एमआयएमच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाने भव्य मोर्चा काढलाय. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात मोर्चा काढून नुपूर शर्मा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर मुस्लिम बांधवांची यावेळी मोठी गर्दी झाली आहे. 

Monsoon Updates : मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणातील वेंगुर्लापर्यंत मान्सून पोहोचला

वाशिममधील पिकनिकसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा तलावात बुडून मृत्यू

Washim News : वाशिमच्या  कारंजा तालुक्यातील म्हसनी गावालगत असलेल्या पिंपरी फॉरेस्ट तलावात पिकनिकसाठी आलेल्या एका तरुणीचा पाय घसरुन पाण्यात बडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. शाळेला सुट्ट्या लागल्याने तलाव परिसरात फिरण्यासाठी चार तरुण आणि दोन तरुणी असे सहा जण आले होते. यापैकी ईश्वरी गजानन भागवत (रा. तिवसा, अमरावती) या तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान अकरा दिवसांपूर्वी याच तलाव क्षेत्रात कारंजा शहरातील मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने  हळहळ व्यक्त होत आहे. 

नंदुरबारमधील ग्रामीण भागात घरफोडीच्या घटना, तीन शेतकऱ्यांच्या घरात चोरी, बियाण्यांसाठी जमा केलेले पैसे चोरल्याने शेतकरी अडचणीत

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद आसलेल्या घरांचे कुलूप तोडून बियाण्यांसाठी जमा केलेल्या भांडवलाच्या पैशांची चोरी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शहादा तालुक्यातील कळबु गावातील शेतकरी भास्कर दगा बोरसे यांच्या घरातून पाच लाखांची रोकड लंपास केली तर नंदुरबार तालुक्यातील विखरन गावातील दोन शेतकऱ्यांचे घर चोरट्यांनी फोडले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भांडवलासाठी जमा केलेले पैसे चोरट्यांनी हात साफ केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

नुपूर शर्मा यांच्या अटकेच्या मागणीसाठी मुस्लीम बांधवांकडून अहमदनगर बंदची हाक

Ahmednagar News : नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज मुस्लीम बांधवांनी अहमदनगर बंदची हाक दिली आहे. नगर शहरात मुस्लीम बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांनी कोणत्याही व्यावसायिकावर बंद पाळण्यासंदर्भात सक्ती केली नाही. दरम्यान यावेळी देशात कोणत्याही महापुरुषांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी मुस्लीम बांधवांनी केली आहे.

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचं काऊंटडाऊन सुरु

Maharashtra Monsoon Updates : गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची (Monsoon) गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. काही तासांतच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यासोबतच राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. काल (गुरुवारी) राज्यातील अनेक भागांत पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली. मुंबईसह (Mumbai) उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यातही पावसाची हजेरी दिसून आली. 

PM Modi : पंतप्रधानांचा आज गुजरात दौरा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून ते 'गुजरात गौरव अभियान' या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. अहमदाबाद येथे मोदींच्या हस्ते IN-SPACe च्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे. 

Monsoon Updates : राज्यात पुढील 48 तासामध्ये मान्सून सक्रिय होणार

Monsoon Updates : पुढील 48 तासात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रात परिस्थिती अनुकूल आहे. राज्याच्या दक्षिण भागात पुढील दोन दिवसांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काल राज्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व जोरदार पाऊस कोसळला. नागपूर, बुलढाणा, नाशिकचा ग्रामीण भाग, औरंगाबाद, मुंबई, कल्याण- डोंबिवली, भिवंडी या ठिकाणी पाऊस पडला. 

Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रासोबत राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणात राज्यसभेसाठी मतदान

Rajya Sabha Election 2022 :  महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणा या तिन्ही राज्यांमध्ये राज्यसभेसाठी अटीतटीची निवडणूक होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. राजस्थानमध्ये 4 जागांसाठी 5 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राजस्थानमधून रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रां यांच्यामुळे तिसऱ्या जागेसाठी अटीतटीची लढत होणार आहे. 


हरयाणात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसनं अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकात चार जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपनं घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांचा समावेश आहे.  

Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रासोबत राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणात राज्यसभेसाठी मतदान

Rajya Sabha Election 2022 :  महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणा या तिन्ही राज्यांमध्ये राज्यसभेसाठी अटीतटीची निवडणूक होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. राजस्थानमध्ये 4 जागांसाठी 5 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राजस्थानमधून रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रां यांच्यामुळे तिसऱ्या जागेसाठी अटीतटीची लढत होणार आहे. 


हरयाणात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसनं अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकात चार जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपनं घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांचा समावेश आहे.  

Rajya Sabha Election 2022 : एमआयएमची भूमिका आज 9 वाजता स्पष्ट होणार

Rajya Sabha Election 2022 : एमआयएमची भूमिका आज सकाळी 9 वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून पक्षाचे अध्यक्ष ओवैसी हे ट्वीटच्या माध्यमातून मत कुणाल देणार हे स्पष्ट करणार आहेत. काल रात्री वरळीतल्या हॉटेल ‘ब्लू सी’वर राष्ट्रवादीच्या डिनरला खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी नेते आणि इम्तियाज यांच्यात खलबतं झाली.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान आणि निकाल

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. कुणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार हे आज स्पष्ट होणार असून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकांचं सत्र सुरू असून सिल्वर ओकवर काल रात्री काँग्रेस, शिवसेना नेते पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यात दोन स्वतंत्र बैठका पार पडल्या. भाजपचीही बैठक झाली. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान आणि निकाल
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. कुणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार हे आज स्पष्ट होणार असून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकांचं सत्र सुरू असून सिल्वर ओकवर काल रात्री काँग्रेस, शिवसेना नेते पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यात दोन स्वतंत्र बैठका पार पडल्या. भाजपचीही बैठक झाली. 


एमआयएमची भूमिका आज 9 वाजता स्पष्ट होणार
एमआयएमची भूमिका आज सकाळी 9 वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून पक्षाचे अध्यक्ष ओवैसी हे ट्वीटच्या माध्यमातून मत कुणाल देणार हे स्पष्ट करणार आहेत. काल रात्री वरळीतल्या हॉटेल ‘ब्लू सी’वर राष्ट्रवादीच्या डिनरला खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी नेते आणि इम्तियाज यांच्यात खलबतं झाली.


उद्या लवकर उठा, लवकर निघा, वेळेत विधानभवनात पोहोचा असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी आमदारांना दिला आहे. विधानभवनात पोहोचल्यानंतर आधी राष्ट्रवादी आमदारांना अजित पवारांच्या केबिनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आलेत. 


अनिल देशमुख मतदान करणार का याचा आज फैसला 
अनिल देशमुखांच्या मतदानासाठीच्या आशा कायम असून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे. अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयानं मतदानाची परवानगी नाकारल्या नंतर त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. यावर आज सकाळच्या सत्रात तातडीची सुनावणी होणार आहे.
 
महाराष्ट्रासोबत राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणात राज्यसभेसाठी मतदान
महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणा या तिन्ही राज्यांमध्ये राज्यसभेसाठी अटीतटीची निवडणूक होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. राजस्थानमध्ये 4 जागांसाठी 5 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राजस्थानमधून रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रां यांच्यामुळे तिसऱ्या जागेसाठी अटीतटीची लढत होणार आहे. 


हरयाणात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसनं अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकात चार जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपनं घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांचा समावेश आहे.  
 
राज्यात पुढील 48 तासामध्ये मान्सून सक्रिय होणार
पुढील 48 तासात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रात परिस्थिती अनुकूल आहे. राज्याच्या दक्षिण भागात पुढील दोन दिवसांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काल राज्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व जोरदार पाऊस कोसळला. नागपूर, बुलढाणा, नाशिकचा ग्रामीण भाग, औरंगाबाद, मुंबई, कल्याण- डोंबिवली, भिवंडी या ठिकाणी पाऊस पडला. 
 
पंतप्रधानांचा आज गुजरात दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून ते 'गुजरात गौरव अभियान' या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. अहमदाबाद येथे मोदींच्या हस्ते IN-SPACe च्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.