Maharashtra Breaking News 09 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूर : गेले सहा दिवस मी नागपुरातच असून दिल्लीत माझ्या घरी शिवसेनेच्या 10 खासदारांची बैठक झाल्याची माहिती चुकीची माहिती रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेचे बहुतांशी खासदार मुंबई किंवा त्यांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्यांची दिल्लीत बैठक झाल्याची माहिती निराधार असल्याचे कृपाल तुमने म्हणाले.
भविष्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्रित यायला हवे आणि कदाचित भविष्यात असे घडेल, असा विश्वास तुमाने यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती पदासंदर्भात शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला हावा या आशयाच्या राहुल शेवाळे यांच्या मागणी संदर्भात बोलणार नाही. मात्र, बहुतांशी खासदारांनी आपापली भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे लवकरच भूमिका जाहीर करतील असे तुमाने म्हणाले.
सोलापुरात ईदच्या नमाजवर पावसाचे सावट आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील सोलापुरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने ईदगाह मैदानात नमाज होण्याची शक्यता कमी आहे. रंगभवन अहले हदिस ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने नमाज व्यवस्था रद्द करण्यात आली. घराजवळील मशिदीमध्ये नमाज पठण करण्याचे आवाहन शहर काझी अब्दुर्र राफे यांनी केलं आहे. तर आलमगीर ईदगाहमध्ये सकाळी पाऊस नसल्यास सामूहिक नमाज पठण होणार आहे. उद्या देशभरात मुस्लीम बांधव साजरी करणार आहेत. ईद उल अझहा अर्थात बकरी ईद आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी मुस्लीम बांधव ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करत असतात.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावात सकाळी भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने गावातील काही घरांना भूकंपाच्या धक्क्याने तडे गेले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.सकाळी 06.22 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. पाच ते सहा सेकंद भूकंपामुळे जमीन हादरली. भूकंपाच्या धक्क्याने गावातील लोक मात्र भयभीत झाले. भूकंप झाल्याचे कळताच तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिरहट्टी गावाला भेट देत पाहणी केली.
डीएचएफएल घोटाळ्याशी निगडीत असलेल्या वादवान कुटुंबाचा महाबळेश्वर येथील बंगला सील करण्यात आला आहे. शुक्रवारपासून सीबीआयची छापेमारी सुरुच आहे. सीबीआयचे अधिकारी सिल करण्यासाठी पोहचले असून त्यांच्या बंगल्याची सध्या झाडा झडती सुरु आहे. करोडो रुपयांच्या अफरातफरी प्रकरणी अनेक वादवान बंधूंवर अनेक गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारपासून सीबीआयचे अधिकारी हे महाबळेश्वरमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी आज दुपारी महाबळेश्वर पोलिसांच्या मदतीने सीबीआयने या बंगल्याचा ताबा ताबा घेतला आहे.
नवी मुंबई : घणसोली रेल्वे स्थानकात ट्रेन थांबल्याने ट्रान्स हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या ठाणे - वाशी आणि वाशी - ठाणे दोन्ही मार्गीकेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वीजपुरवठा बंद पडल्याने वाशीवरून ठाण्याला जाणारी ट्रेन घणसोली रेल्वे स्थानकात बंद पडली. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
Sanjay Raut In Nashik : 100 आमदार आणि 25 खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे, चार पाच खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली अस होत नाही : खासदार संजय राऊत
Sanjay Raut In Nashik : शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ नये, चाळीस आमदार म्हणजे शिवसेना नाही , असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील कार्यकर्ता मेळाव्यात केला आहे.
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकपंचे सौम्य धक्के
सकाळी 6.22 वाजता काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती
कर्नाटकतील विजापूर पासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू
त्याठिकाणी 4.6 रेक्टर स्केल इतकी होती भूकंपाची तीव्रता
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही भागात सौम्य धक्के जाणवल्याची माहिती
सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिला आहे बातमीला दुजोरा
दिल्लीत मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत खलबतं केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिवस भेटीगाठींचा
संध्याकाळी साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
त्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता
मध्यरात्री अमित शाह यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, कायदेशीर लढाई, सरकारची पुढची दिशा या संदर्भात सविस्तर खलबतं
Maharashtra Rain Updates : पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Amarnath Cloudburst : अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या असून वेगाने बचावकर्य सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे 8 जुलै 2022 रोजी निधन झाले. दिवंगत आबे यांना आदरांजली म्हणून, आज देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दुखवटा असताना, देशभरात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही औपचारिक मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शुक्रवारपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दोघांनीही अमित शाह यांची भेट घेतली. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांची देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शुक्रवारपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दोघांनीही अमित शाह यांची भेट घेतली. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांची देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील.
जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे 8 जुलै 2022 रोजी निधन झाले. दिवंगत आबे यांना आदरांजली म्हणून, आज देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दुखवटा असताना, देशभरात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही औपचारिक मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.
अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, 10 जणांचा मृत्यू
अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या असून वेगाने बचावकर्य सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अती मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
अंकित सेरसा कोर्टात हजर करणार
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला अंकित सेरसा याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार. पाच दिवसांपोसून अंकित आणि सचिन भिवानी पोलिसांच्या ताब्यात होते.
काँग्रेसची आज पत्रकार परिषद
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर आता महाविकास आघाडीतील पक्ष संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागलेत. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी होऊ नये याची विशेष काळजी घेतली जातेय. काँग्रेसमध्ये विधानपरिषद निवडणुकीत 7 मते फुटली. या फुटीर मतांचा शोध घेतला गेला असून चौकशी आणि अहवाल सादर करण्याकरता कॉँग्रेस हायकमांडनं निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. आज ऑल इंडीया काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अजॉय कुमार याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतील.
वारी अपडेट
मान्याच्या पालख्यासह इतर सर्व महत्वाच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होतील. दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागे शेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज, डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोय झाली आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज
सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी20 मध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर आज दुसरी टी20 खेळवली जाणार आहे. हा सामना भारत जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेईल? की इंग्लंड सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधतो, हे पाहावं लागेल. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -