Maharashtra Breaking News LIVE Updates : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी यांनी राज ठाकरेंच्या भेटीला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Apr 2022 07:24 PM
maharashtra kesari  2022 : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी

maharashtra kesari  2022 : कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत झाली.   

Maharashtra Kesari  : महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीला सुरूवात,

Maharashtra Kesari  : महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीला सुरूवात झाली आहे. विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये लढत सुरू आहे. 

Maharashtra News : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी यांनी राज ठाकरेंच्या भेटीला

Maharashtra Breaking News LIVE Updates : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली

महाराष्ट्र केसरी अंतिम लढतीला काही वेळात सुरुवात

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर आमने-सामने आहेत. या मानाच्या स्पर्धेला उदयनराजे, शिवेंद्रराजे उपस्थित राहिले आहेत.

Wardha News Update : वर्ध्यामधील आर्वी पाचोड मार्गावर वऱ्हाडाच्या वाहनाचा अपघात, 18 जण जखमी

Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील पाचोड ते आर्वी रस्त्यावर  लग्नसमारंभासाठी आर्वीकडे येणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात 18 जण जखमी झाले असून जखमींना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Pune Mumbai Expressway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका महिलेचा सहभाग आहे. पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे.  सव्वा चारच्या सुमारासची घटना घडली आहे. स्कोडा कंपनीची कार चालक अतिशय सुसाट वेगात हाकत होता. मुंबईच्या दिशेने जात असतानाच गहूंजेच्या क्रिकेट स्टेडियम समोरच एक ट्रक बंद अवस्थेत होता. मार्गाच्या बाजुला असलेल्या या ट्रकच्या खाली ही कार घुसली. पन्नास मीटर पासूनच ब्रेक लावल्याने चाकाचे व्रण मार्गावर स्पष्ट दिसतायेत. यावरून गाडी अतिशय सुसाट वेगात असल्याचा अंदाज यंत्रणांनी वर्तविला आहे. शिवाय ही टक्करच्या इतकी जोराची होती की कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर तर झालाच, गाडीतील चौघांचा ही जागीच मृत्यू झाला.

Covishield Vaccine : कोविशील्ड लस खाजगी हॉस्पीटलना आता 225 रुपयांना मिळणार

कोविशील्ड लस खाजगी हॉस्पीटलना आता 225 रुपयांना मिळणार. आतापर्यंत ती 600 रपयांना मिळत होती. कोविशील्ड लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक अदर पुनावाला यांची घोषणा.

Pravin Darekar : संजय राऊत वैफल्यग्रस्त वक्तव्य करत आहेत ; प्रविण दरेकरांची टीका   

Pravin Darekar : "संजय राऊत हे भ्रमिष्ट झाले असून गेल्या काही दिवसांपासून ते वैफल्यग्रस्त वक्तव्य करत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून असे वाटते की त्यांनीच हे कृत्य केले असावे असा आरोपही प्रविण दरेकर यांनी केला आहे. सरकारला त्यांच्या नेत्याच्या सुरक्षेची काळजी घेता येत नाही ते महाराष्ट्रची काय काळजी घेणार? असा हल्लाबोलही दरेकर यांनी केला आहे.  

दहावी 100 टक्के मार्क्स, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC पास करणाऱ्या मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

धारणीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी (IAS) वैभव वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिली घटना आहे. वैभव वाघमारे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे राजीनामा पाठवला आहे. वैभव यांनी स्वत: पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहेत. वाघमारे यांना दहावीमध्ये 100 टक्के मार्क्स मिळाले होते. तसेच त्यांना दुसऱ्या प्रयत्नात UPSC पास केले. 'काल देशाच्या सर्वोत्कृष्ट नोकरीचा राजीनामा दिला.' असं वैभव यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'हे जीवनात काहीतरी अजून चांगलं आणि उदात्त करण्याच्या शोधापोटी केलं. निर्णय घेणे थोडेसे कठीण होते. या धाडसामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार.'

राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनावट! तपासासाठी समिती स्थापन करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या त्रिस्तरीय समितीमध्ये निवृत्त न्यायाधीशांसह एक वकील आणि एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा समावेश असणार आहे. राज्यात 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस असल्याचं आणि 29 लाख विद्यार्थ्यांची विनाआधारकार्ड नोंदणी असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. 

किरीट सोमय्यांचे वकील विवेकानंद गुप्ता ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये दाखल

किरीट सोमय्यांचे वकील विवेकानंद गुप्ता ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये दाखल


ही सर्व लढाई कायद्याने लढली जाईल आणि त्यासाठी आम्ही सामोरे जाऊ


पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे


त्यामुळे चौकशीला सुद्धा सामोरे जावे लागेल


आधी पोलिसांनी नेमकं म्हणणं काय आहे ते आम्ही समजून घेऊ


किरीट आणि निल यांना चौकशीसाठी येण्याची गरज आहे का? हे आता आम्ही बघू, किरीट सोमय्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांची माहिती

किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी

किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार 


किरीट सोमय्या विरोधात ट्रॉमबे पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर काल किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे


या प्रकरणावर सत्र न्यायालयात सोमवारी सुनावणी होईल

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सिंदखेडराजा शहर बंद

बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहेत. सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून हल्ल्याच्या निषेधार्थ सिंदखेडराजा शहर बंद ठेवण्यात आलं आहे.

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरात पुन्हा 12 डुक्कर बॉम्ब सापडले

पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरात पुन्हा 12 डुक्कर बॉम्ब सापडले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे बॉम्ब बनविण्यात आले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दिघी पोलिसांकडून हे बॉम्ब बनविणाऱ्यांचा शोध सुरुये. याआधी याच परिसरात खेळत असताना लहानग्यांच्या हाती डुक्कर बॉम्ब लागले. त्यासोबत खेळतानाच त्याचा स्फोट झाल्याने 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. तेंव्हा 30 डुक्कर बॉम्ब सापडले होते. त्यावेळी दिघी पोलिसांनी दोघांना अटक ही केली होती. शुक्रवारी त्याच परिसरात पुन्हा हे बॉम्ब आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या आज पोलीस स्टेशनला जाण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती

भाजप नेते किरीट सोमय्या आज पोलीस स्टेशनला जाण्याची शक्यता कमी. वकिलामार्फत आपलं म्हणणं ते पोलिसांना सांगतील, अशी सूत्रांची माहिती

चंद्रपूर शहरालगतच्या शक्तीनगर परिसरातून बिबट्या जेरबंद

चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगतच्या शक्तीनगर परिसरातून बिबट्या जेरबंद झाला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडची कामगार वसाहत असलेल्या शक्ती नगर भागातून बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. शक्तीनगर - दुर्गापुर- ऊर्जानगर या भागातून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने पिंजरे लावले होते. काही दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने शक्तीनगर परिसरात चार ठिकाणी पिंजरे लवले होते. आज पहाटे यातील एका पिंजऱ्यात बिबट्या  जेरबंद झाला. अल्पवयीन मुलांच्या मृत्यूस हाच बिबट कारणीभूत असल्याचा वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मात्र, या परिसरात आणखी काही दिवस आणखी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागानं केलं आहे.

शरद पवार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार नाहीत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार महाराष्ट्र केसरीच्याअंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. सध्या पावसामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. त्यामुळे आयोजकांच्या विनंतीवरुन शरद पवारांनी साताऱ्याचा दौरा रद्द केला आहे.

Maharashtra Kesari Updates : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गतविजेता हर्षवर्धन सदगीर पराभूत

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गतविजेता हर्षवर्धन सदगीर पराभूत
---------------
पहिल्याच उपांत्य लढतीत हर्षद कोकाटेकडून सदगीर ७ विरुद्ध ५ गुणांनी पराभूत
---------------
गतविजेता हर्षवर्धन सदगीर पराभूत, यावर्षी नवा महाराष्ट्र केसरी मिळणार

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला सुरूवात






Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीच्या कालच्या रद्द केलेल्या सर्व स्पर्धा या आज सुरू झाल्या आहेत. कालच्या लढती सकाळच्या सत्रात करण्याची तयारी सुरू झाली आहे. आखाड्याच्या मध्य भागातील मातीचे मिश्रण करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. कुस्ती शैकिन ही स्पर्धा पाहण्यासाठी आले आहेत. 






पोलीस विभाग कुठेतरी कमी पडला, मास्टरमाईंडचा शोध घेतला जाईल : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. 'हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, 'मला आश्चर्य वाटत की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कसं कळलं नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. पोलीस विभाग यामागच्या सूत्रधाराचा शोध घेतील.'

पावसानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पुन्हा सुरुवात

महाराष्ट्र केसरीच्या शुक्रवारी रद्द झालेल्या सर्व स्पर्धा काही वेळात सुरू होणार आहेत. शुक्रवारी या लढती पावसामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आतआ कालच्या रद्द झालेल्या लढती सकाळच्या सत्रात घेण्याची तयारी सुरू आहे. पावसामुळे स्पर्धेता स्टेज कोसळला असून आखाड्याचीही दुरावस्था झाली आहे. आखाड्याच्या मध्य भागातील मातीचे मिश्रण करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. कुस्ती शैकिन प्रेक्षा गॅलेरीत येण्यासही सुरुवात झाली आहे.





पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलं आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. 


किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांचं समन्स


किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स बजावले आहे.  संजय राऊतांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स देण्यात आले आहे.  शनिवारी सकाळी 11 वाजता सोमय्या पिता-पुत्रांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएस विक्रांत युद्धनौकेला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले. मात्र सोमय्यांनी हे पैसे राजभवनात जमाही केले नाहीत असा संजय राऊत यांचा आरोप आहे. 


नवी मुंबई, पुण्यात आयपीएलचे सामने



  • पहिली मॅच - चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदरबाद यांच्यात पहिला सामना दुपारी 3.30 वाजता

  • दुसरी मॅच - मुंबई इंडियन्स आणि रॉय चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता


आरोग्य मंत्रालयाकडून विश्व होमिओपॅथी दिवसानिमित्त दोन दिवसाचे  वैज्ञानिक संमेलन


आरोग्य मंत्रालयाकडून नवी दिल्लीत दोन दिवसीय वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात हे संमेलन होणार आहे


अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचाराविरोधातील उपोषणाची सांगता 


आजच्या दिवशी दहावर्षापूर्वी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारातील उपोषणाची सांगता केली होती. अण्णा हजारेंनी 2011 साली दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण केले होते. 


भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तीन दिवस हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर


भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तीन दिवसाच्या हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत


राहुल गांधी यांच्या हस्ते "द दलित ट्रूथ: द बॅटल्स फॉर रियलाइजिंग आंबेडकर्स व्हिजन" पुस्तकाचे अनावरण


कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते "द दलित ट्रूथ: द बॅटल्स फॉर रियलाइजिंग आंबेडकर्स व्हिजन" या पुस्तकाचे अनावरण होणार आहे. सकाळी 11 वाजता जवाहर भवन येथे पुस्तकाचे अनावरण होणार आहे.


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच गोरखनाथ दौऱ्याचा दुसरा दिवस 


उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच गोरखनाथ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.


राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय न्यायिक संमेलनाचे उद्घाटन होणार


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुजरात येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळ टेन्ट शहरात राष्ट्रीय न्यायिक संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. सुप्रिम कोर्टाचे जस्टिस डी. वाय. चंद्रचूड व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहे.


चैत्र नवरात्रातील  दुर्गाष्टमी


चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील दुर्गाष्टमी हे व्रत केले जाते. या दिवशी महागौरीची आराधना केली जाते.


दिल्लीत आजपासून एफसीआयचे गहू खरेदी अभियान


दिल्लीतील नरेला और नजफगढ़ बाजारात  गहू खरेदी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे गहू स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर उद्या मतदान होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता संसदेच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. इम्रान खान यांना पंतप्रधान पदवरून हटवण्यासाठी 342 सदस्यांच्या सदनामध्ये 172 मतांती आवश्यकता  आहे. सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांना 342 सदस्यांच्या संसदेत (राष्ट्रीय विधानसभा) 172 मतांची गरज आहे.
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे सभागृहात 155 खासदार आहेत. इम्रान यांना सुमारे दोन डझन खासदारांचे बंड आणि मित्रपक्षांच्या आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांना 342 सदस्यांच्या संसदेत (राष्ट्रीय विधानसभा) 172 मतांची गरज आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे सभागृहात 155 खासदार आहेत. इम्रान यांना सुमारे दोन डझन खासदारांचे बंड आणि मित्रपक्षांच्या आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या इतिहासात इम्रान खान हे पहिले पंतप्रधान असतील जे अविश्वास प्रस्तावाद्वारे हटवले जाणार आहे.


श्रीलंकेत विरोधी पक्ष उद्या अविश्वास प्रस्ताव मांडणार


आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. सत्ताधारी सरकारवर सातत्याने टीका होत आहे आणि आता श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरत आहे. सत्ताधारी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव मांडणर आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.