Maharashtra Breaking News 08 September 2022 : मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात कंटेनर ट्रेलरचा अपघात, एकाचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Sep 2022 11:05 PM
Nagpur Breaking : गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी गेलेल्या वृद्धेचा वीजेचा शॉक लागून मृत्यू

नागपूरः शहरातील भेंडे लेआउट परिसरात एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मध्ये दर्शनासाठी गेलेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. कमलाबाई रेवडे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

रायगड  येथील पेण येथे पतीकडून पत्नीची हत्या

रायगड  येथील पेण येथे पतीने पत्नीची हत्या केली आहे. पत्नीच्या डोक्यात सिलेंडर मारून हत्या केल्या करण्यात आलीय. या प्रकणी संशयित आरोपी संजय दळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. 

Mumbai- Pune Express Way Accident :  मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात कंटेनर ट्रेलरचा अपघात, एकाचा मृत्यू

Mumbai- Pune Express Way Accident :  मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात कंटेनर ट्रेलरचा अपघात झाला आहे.  मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर कंटेनर ट्रेलर आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 24 वर्षीय परशुराम आंधळे याचा  मृत्यू झाला आहे.  तीव्र उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे

अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांचा भाजप प्रवेश 

अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये राजेश वानखडे यांनी भाजपमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केलाय. 

दहिसर नदीत गणेश विसर्जनाला हायकोर्टाची मनाई

दहिसर नदीत गणेश विसर्जनाला हायकोर्टाने मनाई केलीय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावर हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. दरम्यान, कुणालाही परवानगी दिलेली नसल्याची राज्य सरकारची माहिती.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. पुत्र खासदार श्रीकांत शिंदेही सोबत आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी लालबागच्या राजाला चांदीचा हार अर्पण करण्यात आला. 

दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द 

दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासह 9 बड्या सरकारी अधिका-यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला. 


सिव्हासा येथील जिल्हाधिकारी संदिप कुमार सिंह यांनाही आरोपी बनवण्यात आलं होतं. मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये 22 फेब्रुवारी रोजी पंख्याला लटकून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती.

Bhiwandi News : भिवंडीत अवचित पाडा चाविंद्रा येथील यंत्रमाग कारखान्यावर पडली वीज, सुदैवाने मनुष्यहानी टळली

Bhiwandi News : भिवंडी शहरांमध्ये बुधवारी सायंकाळनंतर पावसानं दमदार हजेरी लावली. ग्रामीण भागासह भिवंडीत ही विजेच्या कडकडात पाऊस पडला. त्यामुळे काही सकल भागांत पाणीसुद्धा साचलं होतं. भिवंडीत सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाटानंतर भिवंडी शहरातील अवचित पाडा चाविंद्रा येथे मोहम्मद सईद अन्सारी यांच्या कारखान्यावर वीज पडली असून यात त्यांच्या कारखान्यातील यंत्रमागावर लावलेले धाग्यांचे 20 भीम जळून खाक होतं. आग लागली होती. वीज कारखान्यात पडली असता, या कारखान्यांमध्ये काही कामगार काम करत होते. पण सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर स्थानिकांनी ही आग विझवली. दरम्यान या घटनेत कारखान्यामधील लाखोंचा माल जळून नुकसान झालं आहे.

Beed News : शेकडो महिलांनी अथर्वशीर्ष पठनात घेतला सहभाग

Beed News : बीडच्या पेठबीड भागातील आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीनं श्री गणेश अथर्वशीर्ष पठनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेकडो महिलांनी या अथर्वशीर्ष पठनात सहभाग नोंदवला होता.


दरवर्षी आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात सकाळी त्यांनी श्री गणेश अथर्वशीर्ष पाठनाच आयोजन केलं होतं. यात शहरातील महिला एकाच रंगाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. 

 
Amravati News : पोलीस कुटुंबियांकडून नवनीत राणाचं निषेध

Amravati News : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीच अपहरण झाल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला होता, पोलिसांना अपमानास्पद वागणूक खासदार नवनीत राना यांनी दिली. तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे आज राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं आणि त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यवतमाळच्या वणी शहरात अवैध धंदे जोरात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात अवैध व्यवसाय तेजीत सुरू आहे. या बाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाचा कर्तव्य शून्य कारभार चाव्हट्यावर आला. 


वणी शहरातील  मुख्यवस्थित असलेल्या एकतानगर, बीएसएनएल ऑफिसच्या मागे आणि तहसीलदार यांच्या निवस्थासमोर जुगार खुलेआम सुरू आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळेच या जुगाऱ्यांच फावत आहे. अवैध व्यवसायामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास आहे. मात्र व्यावसायिकांच्या दादागिरीमुळे कोणीही बोलण्यास पुढे येत नाही. पोलिसांकडे याबाबत तक्रार केली तर पोलीस अशा प्रकारचे अवैध व्यवसाय असल्याचं मान्यच करत नाही. त्यामुळे एका जागृत नागरिकानं या जुगार, मटक्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे आता पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली. आता जिल्हा पोलिस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेते याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नवीन सरकार आल्यानंतर आता रिफायनरीच्या मुद्द्यावर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, दौऱ्यांना वेग

नवीन सरकार आल्यानंतर आता रिफायनरीच्या मुद्द्यावर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, दौऱ्यांना वेग


11 सप्टेंबर रोजी नाना पटोले कोकणातील रिफायनरी भागातील गावांमध्ये

 

रिफायनरी विरोधक आणि समर्थक घेणार नाना पटोले यांची भेट

 

तर रिफायनरी विरोधक आमदार विनोद निकोले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांची घेणार भेट

 

रिफायनरीच्या मुद्यावरून आता सर्व पक्षीय राजकीय नेते ऍकशन मोडमध्ये

 

2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षीय नेते होतायत सक्रिय
Sangli News : जीपचा टप एकीकडे, खालचा भाग दुसरीकडे; सांगली-नांद्रे रोडवर भीषण अपघात, 8 पैकी 2 तरुण ठार

Sangli News : मिरज तालुक्यातील नांद्रे  येथील सांगली-नांद्रे राज्यमार्गवरील नांद्रे येथील दर्गाह चौक येथे भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मध्यरात्री सुमारे दीड वाजता झाला आहे. महिंद्रा या जीपमधून एकूण आठ तरूण मध्यरात्री सांगलीहून खटावकडे भरधाव वेगानं जात असताना ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यानं नांद्रेमधील दर्ग्या समोरील बाहुबले यांच्या घरासमोरील लोखंडी पोलवर जीपनं जोरदार धडक दिली. यामध्ये लोखंडी पोल वाकवत गाडी फरफटत जाऊन दर्ग्याच्या भिंतीवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, जीपवरील टप एका बाजूस निघून पडला. तर जीपच्या खालच्या बाजूचा भाग दुसऱ्या बाजूला पडला. या भीषण धडकेत खटाव गावचे दोन 21 वर्षांचे तरूण जागीच ठार झाले. तर इतर 6 जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश, आज जामीन अर्जावर सुनावणी नाहीच

Yakub Memon : याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी दिवे हटवले, मुंबई पोलिसांची कारवाई

Yakub Memon:  याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी दिवे हटवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Gadchiroli News: गडचिरोलीतील हत्ती गुजरातमध्ये स्थलांतर करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल

Gadchiroli News: गडचिरोलीतील हत्ती गुजरातमध्ये स्थलांतर करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे...वन विभागाच्या आदेशानं आतापर्यंत १३ पैकी नऊ हत्तीचे गुजरातमध्ये स्थलांतर करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.. आज न्यायालयात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे...दुसऱ्या राज्यातून हत्ती गडचिरोलीच्या जंगलात येणे... हे गडचिरोलीचा जंगल चांगल्या दर्जाचा आहे, हे दर्शविणारी होती... मात्र गडचिरोलीतील हत्ती परराज्यात हलवणे ही वनविभागाची कृती वन आणि वनामध्ये राहणाऱ्या आदिवासींच्या हिताच्या विरोधातली असल्याचे याचिकेत म्हटले आहे...

Aurangabad News: औरंगाबादमध्ये आयकर विभागाची दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरू

Aurangabad News: औरंगाबाद आयकर विभागाचे दुसऱ्या दिवशीही छापे सुरू. औरंगाबाद ज्योती नगरमध्ये राहणाऱ्या सतीश व्यास यांच्या घरावर छापे सुरू. आयकर विभागाच्या 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचे तीन ठिकाणी छापे. देशभरात मिड डे मिल प्रकरणी धान्य व्यापाऱ्यावर छापे सुरू आहेत. सतीश व्यास यांच्याकडे राजस्थानच्या धान्य पुरवठ्याची जबाबदारी..

मुंबईतील सायन आणि बोरीवली परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु, सायनमधील एका झोपडपट्टीत छापेमारी करण्यात आल्याची माहिती 

दोन दिवसांपासून देशभरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे... आज मुंबईतील सायन आणि बोरीवली परिसरात आयकर विभागानं छापेमारी सुरु केली आहे.. विशेष म्हणजे सायनमधील एका झोपडपट्टीत ही छापेमारी करण्यात येतेय.. 

Cruid Oil : कच्च्या तेलाच्या किंमती 8 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच 90 डॉलर प्रति बॅरल खाली 

Cruid Oil : कच्च्या तेलाच्या किंमती 8 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच 90 डॉलर प्रति बॅरल खाली 


जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट, तेलाच्या किंमती 88 डॉलर प्रति बॅरलवर 


5 सप्टेंबर रोजी ओपेककडून मागणीत होत असलेली घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या सावटाच्या भीतीनं उत्पादन ऑक्टोबरपासून 1 लाख बॅरल प्रति दिवस कमी करण्याचा निर्णय 


तेलाचे भाव स्थिर करण्याचा ओपेकचा प्रयत्न, मात्र कच्च्या तेलाच्या भावात मोठी अस्थिरता 


ओपेकनं घेतलेल्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीत मोठी उसळी, मात्र मागणीत घट होत असल्यानं पुन्हा किंमती अस्थिरत होण्यास सुरुवात 


दरम्यान, ओपेककडून उत्पादनात केलेली घट ही जागतिक बाजारातील विचार करता 0.1 टक्के असल्यानं येत्या काळात तेलाच्या भावात मोठी उसळी बघायला मिळणार नाही 


मात्र तेलाच्या भावात मोठी वाढ झाल्यास थेट भारतावर परिणाम, भारत मोठ्या प्रमाणात कच्चं तेल ओपेक संघटनेकडून आयात करतो 


अशात आयातीचं तेल महाग झाल्यास भारताला अधिकचे पैसे मोजावे लागणार


महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न भारत करतोय, अशात संपूर्ण प्रयत्नांना खिळ बसणार 


संपूर्ण जगात सध्या महागाईचा भस्मासूर, गॅसच्या किंमतीत मोठी वाढ, अमेरीकेत मागील काही महिन्यात गॅसचे दर 130 टक्क्यांनी वाढले तर युरोपात 120 टक्क्यांची उसळी 


रशियाच्या ऊर्जा साठवणुकीस कॅप लावण्याचा विचार, ज्यामुळे जागतिक स्तरावरील ऊर्जेचे भाव वाढताना बघायला मिळू शकतील


ज्याचा थेट भारतावर देखील परिणाम होणार

Jalna Mantha Bank : जालन्यातील 'या' बँकेत 12 कोटी 18 लाखांचा अपहार; 14 जणांवर गुन्हा

Maharashtra Jalna News : जालन्यातील (Jalna) मंठा अर्बन को. ऑप. बँकेत (Mantha Urban Cooperative Bank) 12 कोटी 18 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) निर्बंध लादण्यात आलेल्या मंठा अर्बन बँकेच्या (Mantha Urban Bank) विशेष लेखा परीक्षण अहवालात 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2021 या काळात नियमबाह्य पद्धतीनं व्यवहार आणि कर्ज वाटप केल्याचा अहवाल विशेष लेखा परीक्षकांकडून देण्यात आला आहे. त्यानंतर बँकेतील 14 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तत्कालिन सीईओ, शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसरसह 14 जणांवर मंठा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत

IND vs AFG : आशिया चषकात आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघाला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.


दिल्ली दौरा आटोपून नितीशकुमार बिहारमध्ये परतणार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज पटनासाठी रवाना होणार आहेत. ते चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. सकाळी साडेअकरा वाजता नितीशकुमार बिहारसाठी रवाना होणार आहेत. आज दिल्लीमध्ये त्यांचा कोणत्याही नेत्याशी भेटण्याचा प्लॅन नाही. बुधवारी नितीशकुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

BCCI आणि राज्य क्रिकेट संघातील वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

BCCI आणि राज्य क्रिकेट संघातील वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. बीसीसीआयकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. बीसीसीआयनं आपल्या नियमात बदल करण्याची परवानगी मागितली आहे. कोर्टाकडून बीसीसीआयला परवानगी मिळाल्यास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढू शकतो.

काँग्रेसच्या कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेला सुरुवात

कॉंग्रेसच्या 'भारत जोडो' या यात्रेला आज सुरुवात झाली आहे. आज राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सात वाजता पदयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. यात्रा सुरू करण्यासाठी राहुल गांधींकडे तिरंगा सोपवण्यात आला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असं 3500 किमी अंतर ही यात्रा असणार आहे. आतापर्यंतची ही देशातील सर्वात मोठी यात्रा असणार असल्याचं म्हटलं जात आहे. देशाला एकत्र करणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश असून बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोकांसोबत जोडलं जाण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्ममातून होणार आहे.

योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्यापासून दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. सायंकाळी योगी आदित्यनाथ बीएचयू मध्ये पाहणी करणार आहेत. येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियम आणि भुल्लनपुर पीएसी येथे तयार होणाऱ्या बॅरेकचीही ते पाहणी करणार आहे. त्यानंतर श्रीकाशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'कर्तव्य पथा'चे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 8 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथा' चे उद्‌घाटन करणार आहेत. सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून बदलले जाणार आहे. याप्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आज सुनावणीची शक्यता

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी मनी लाँड्रींगच्या आरोपांत केली आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आज सुनावणीची शक्यता 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी मनी लाँड्रींगच्या आरोपांत केली आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'कर्तव्य पथा' चे उद्‌घाटन 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 8 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 'कर्तव्य पथा' चे उद्‌घाटन करणार आहेत. सत्तेचे प्रतीक असलेले पूर्वीचे राजपथ हे आता कर्तव्य पथाकडे अर्थात जनतेची मालकी आणि त्यांच्या सशक्तीकरणाचे प्रतिक म्हणून बदलले जाणार आहे. याप्रसंगी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे.


योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्यापासून दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. सायंकाळी योगी आदित्यनाथ बीएचयू मध्ये पाहणी करणार आहेत. येथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियम आणि भुल्लनपुर पीएसी येथे तयार होणाऱ्या बॅरेकचीही ते पाहणी करणार आहे. त्यानंतर श्रीकाशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत.


काँग्रेसच्या कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेला सुरुवात


कॉंग्रेसच्या 'भारत जोडो' या यात्रेला आज सुरुवात झाली आहे. आज राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सात वाजता पदयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. यात्रा सुरू करण्यासाठी राहुल गांधींकडे तिरंगा सोपवण्यात आला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असं 3500 किमी अंतर ही यात्रा असणार आहे. आतापर्यंतची ही देशातील सर्वात मोठी यात्रा असणार असल्याचं म्हटलं जात आहे. देशाला एकत्र करणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश असून बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यांवर लोकांसोबत जोडलं जाण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्ममातून होणार आहे.


BCCI आणि राज्य क्रिकेट संघातील वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी 


BCCI आणि राज्य क्रिकेट संघातील वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. बीसीसीआयकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. बीसीसीआयनं आपल्या नियमात बदल करण्याची परवानगी मागितली आहे. कोर्टाकडून बीसीसीआयला परवानगी मिळाल्यास बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढू शकतो.


दिल्ली दौरा आटोपून नितीशकुमार बिहारमध्ये परतणार 


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज पटनासाठी रवाना होणार आहेत. ते चार दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. सकाळी साडेअकरा वाजता नितीशकुमार बिहारसाठी रवाना होणार आहेत. आज दिल्लीमध्ये त्यांचा कोणत्याही नेत्याशी भेटण्याचा प्लॅन नाही. बुधवारी नितीशकुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.


 भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत 


आशिया चषकात आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघाला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.