Maharashtra Breaking News 8 June 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jun 2022 10:14 PM
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक 

राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक 

मतदानासाठी येण्यापूर्वी लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीतील आमदारांना वरिष्ठ पातळीवरून निर्देश

10 तारखेला राज्यसभेच्या 6 जागांसाठी पार पडणार निवडणुका पार पडणार आहेत. 

हॅाटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरु 

हॅाटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरु 

आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल नाना पटोले उपस्थित

मुंबईतील हॅाटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरु

मुंबईतील हॅाटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरु झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल नाना पटोले उपस्थित या बैठकीला उपस्थित आहेत. 

कुरुंदा-गिरगाव शिवारात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
आज हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा गावाच्या शिवारात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे .

जोरदार झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होते तर उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे .

परंतु वारे जोरदार असल्याने मोठ्या प्रमाणावर झाडे मोडून पडली आहेत रस्त्यावर उभा असलेला एक ऑटोरिक्षा सुध्धा या वाऱ्यामुळे रस्त्याच्या खाली जाऊन पडला आहे. जोरदार झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

तर या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुरुंदा गिरगाव भाग म्हणजे केळीचे उत्पादन घेणारा शेतीचा भाग आहे .परंतु या वादळी वाऱ्याने या भागातील शेतात उभा केळीच्या अनेक बागा भुई सपाट झाल्या आहे. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदी  राजेंद्र माने यांची नियुक्ती

सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदी  राजेंद्र माने यांची नियुक्ती

राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून होते कार्यरत

हरीश बैजल यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांच्याकडे होता पदभार

मात्र राजेंद्र माने यांची सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्तीचे आदेश

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती थोड्याच वेळात बैठक होणार

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल देसाई, अनिल परब यांची हाँटेल ट्रायडंटमध्ये थोड्याच वेळात बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यसभा निवडणूक नियजोना संदर्भात चर्चा केली जाणार आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे चार उमेदवारांचे अर्ज दाखल

विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय व प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आशीष शेलार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.  वरील उमेदवारांखेरीज पक्षातर्फे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष मा. उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अर्ज उद्या दिनांक 9 रोजी दाखल करण्यात येईल. 

Amravati : अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावरच्या टोल प्लाझाचा छप्पर पहिल्याच पावसात उडाला

समृद्धी महामार्गावरील धामणगाव रेल्वे जवळ टोल प्लाझाचा छप्पर पहिल्याच वादळात उडाला.

दुपारी 2.30 वाजता धामणगाव रेल्वे शहराच्या परिसरात वादळी वारा आणि मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस झाला. 

समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वी अनेक अडचणी येत आहेत, त्यात आता ही अजून एक भर.

महामार्ग सुरू होण्यापूर्वीच टोल प्लाझाचा छप्पर उडाल्याने चर्चेला उधाण.

Pune News Update : सौरभ महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक 

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील फरार असलेल्या सौरभ महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांत दाखल झालेल्या मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.  

Ratnagiri News Update : रत्नागिरीत रिफायनरी विरोधक आक्रमक, रिफायनरीच्या ड्रोन सर्वेक्षणचे काम रोखले

रत्नागिरीत रिफायनरी विरोधक आक्रमक झाले आहेत. राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात सुरु असलेलं रिफायनरीच्या ड्रोन सर्वेक्षणचे काम रोखण्यात आलं आहे.   

ईडीनं संजय छाब्रिया यांचा ताबा घेतला, सीबीआय कोर्टाच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या छाब्रिया यांचा ताबा ईडीकडे

ईडीनं संजय छाब्रिया यांचा ताबा घेतला, सीबीआय कोर्टाच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या छाब्रिया यांचा ताबा ईडीकडे

काल कोर्टानं दिल होती मंजुरी

अनिल देशमुखांच्या मतदान परवानगीचा मार्ग खडतर , ईडी, कोर्टानंतर सीबीआय कोर्टातूनही जामीन मिळवणं आवश्यक

अनिल देशमुखांच्या मतदान परवानगीचा मार्ग खडतर, ईडीकोर्टानंतर सीबीआय कोर्टातूनही जामीन मिळवणं आवश्यक, अनिल देशमुख दोन्ही कोर्टाच्या न्यायालयीन कोठडीत , त्यामुळे दोन्ही कोर्टाकडून परवानगी आवश्यक, अनिल देशमुखांच्यावतीनं सीबीआय कोर्टातही परवानगीसाठी अर्ज दाखल

Rajya sabha Election :  आशिष शेलारही शिवतिर्थावर राज ठाकरेंच्या भेटीकरता,

Rajya sabha Election :  आशिष शेलारही शिवतिर्थावर राज ठाकरेंच्या भेटीकरता, 

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत राज्यसभा निवडणूकीकरता महत्वाचे ठरणार आहे 

या पार्श्वभूमीवर राद ठाकरेंचे निवासस्थान शिवतिर्थ येथे आशिष शेलार राजठाकरेंची भेट घेतील...

दरम्यान मनसेचे आमदार राजु पाटीलही शिवतिर्थावर दाखल झालेत

Maharashtra MLC Election : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा; प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी

Maharashtra MLC Election : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा; प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हिप जारी

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. पक्षाने दिलेल्या निर्देश आणि आदेशानुसार मतदान करण्याचे शिवसेना आमदारांना सांगण्यात आलं आहे. 10 जून रोजी मतदानात सहभागी होण्यासाठी विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी आठ वाजता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

सिंधुदुर्गमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी, शेतीच्या कामांना वेग

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील आंबोली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला असून शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची जमवाजमव सुरु केली आहे. 

Kolhapur News : जिल्हा परिषद मतदारसंघ रचनेवरून ईडीकडे तक्रार केली जाणार

जिल्हा परिषद मतदारसंघ रचनेवरून ईडीकडे तक्रार केली जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाची अर्थपूर्ण तोडफोड?

मतदारसंघ बचाव कृती समिती ईडीकडे तक्रार करणार

ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार

नांदेड रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव बालंबाल बचावला, घटना CCTV कॅमऱ्यात कैद

Nanded News : नांदेड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर काल मध्यरात्री रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव बालंबाल बचावला आहे. काल रात्री 10:30 च्या सुमारास नांदेड धनबाद कोल्हापूर एक्सप्रेस पकडण्याच्या गडबडीत ही अपघाताची घटना घडली आहे. ज्यात प्रवाशाने धावत्या धनबाद एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाय घसरुन रेल्वे खाली जाण्याची शक्यता होती. त्याच वेळी प्रसंगावधान दाखवत आणि धावत येत रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल संदीप संभाजी गावंडे यांनी प्रवाशाचे प्राण वाचवले. दरम्यान ही सर्व घटना CCTV कॅमऱ्यात कैद झाली आहे.

खीर भवानीमातेच्या यात्रेसाठी 200 हून अधिक काश्मिरी पंडित रवाना होणार

जम्मू कश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यातील खीर भवानीमातेच्या जत्रेसाठी 200 हून अधिक काश्मिरी पंडित जम्मूहून रवाना होणार आहेत. कडक सुरक्षेत या भाविकांना जत्रेसाठी नेलं जाईल. विस्थापित काश्मिरी पंडितांच्या सगळ्यात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी हा एक जत्रोत्सव आहे.  

अविनाश भोसलेंना आज सत्र न्यायालयात हजर करणार

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची सीबीआय कोठडी आज संपणार आहे. भोसलेंना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा फेटाळत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. येस बँक आणि डिएचएफएल प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरणात अविनाश भोसलेंना अटक करण्यात आलंय.

ईडीच्या चौकशीसाठी सोनिया गांधी उपस्थित राहणार नाहीत

कोरोनाची बाधा झाल्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहणार नाहीत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉंड्रींगच्या आरोपांबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीनं समन्स पाठवलं आहे. सोनिया गांधींना आज ईडीकडून चौकशीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, सोनिया गांधी कोरोना संक्रमित असल्यानं त्या चौकशीला जाणार नाहीत. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार ईडीला चौकशीसाठी पुढची तारीख देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या राज्यसभेच्या मतदानाचा निर्णय आज

कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. ईडीनं कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात हे स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला यांना मतदानाचा अधिकार देऊ नये याबाबत कळवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी होणाऱ्या मतदानाआधी महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.

विधानपरिषदेसाई सचिन अहिर आणि आमशा पाडवी अर्ज दाखल करणार

शिवसेना विधानपरिषदेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार विधान भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

भाजपच्या आमदारांची बैठक

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताज प्रेसिडेंसी या ठिकाणी भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा निवडणूक प्रभारी आश्विनी कुमार वैष्णवी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असतील.

महाविकास आघाडी पॅटर्न 2.0, आमदार एकत्रित हॉटेलमध्ये

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांना एकत्रित करण्यात आलं असून त्यांना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेल रेनेसॉमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आज त्यांना राज्यसभेसाठी कशाप्रकारे मतदान करायचं याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आज बारावीचा निकाल

राज्यातील विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता वाढवणारा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या परीक्षेला 14,85,197 विद्यार्थी बसले होते. यापैकी 8,17,188 मुलं असून मुलींची संख्या 6,68,003 इतकी आहे. उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आज संध्याकाळी सहा वाजता औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. त्यामध्ये नामांतरण, राज ठाकरे, राज्यसभा निवडणूक या विषयांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आज संध्याकाळी सहा वाजता औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. त्यामध्ये नामांतरण, राज ठाकरे, राज्यसभा निवडणूक या विषयांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. 

आज बारावीचा निकाल
राज्यातील विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता वाढवणारा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या परीक्षेला 14,85,197 विद्यार्थी बसले होते. यापैकी 8,17,188 मुलं असून मुलींची संख्या 6,68,003 इतकी आहे. उद्या दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

महाविकास आघाडी पॅटर्न 2.0, आमदार एकत्रित हॉटेलमध्ये
राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांना एकत्रित करण्यात आलं असून त्यांना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबोधित केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेल रेनेसॉमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आज त्यांना राज्यसभेसाठी कशाप्रकारे मतदान करायचं याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

भाजपच्या आमदारांची बैठक
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताज प्रेसिडेंसी या ठिकाणी भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा निवडणूक प्रभारी आश्विनी कुमार वैष्णवी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असतील.

विधानपरिषदेसाई सचिन अहिर आणि आमशा पाडवी अर्ज दाखल करणार
शिवसेना विधानपरिषदेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार विधान भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या राज्यसभेच्या मतदानाचा निर्णय आज
कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. ईडीनं कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात हे स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला यांना मतदानाचा अधिकार देऊ नये याबाबत कळवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी होणाऱ्या मतदानाआधी महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. आज मुंबई सत्र न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.

ईडीच्या चौकशीसाठी सोनिया गांधी उपस्थित राहणार नाहीत
कोरोनाची बाधा झाल्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहणार नाहीत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉंड्रींगच्या आरोपांबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीनं समन्स पाठवलं आहे. सोनिया गांधींना आज ईडीकडून चौकशीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, सोनिया गांधी कोरोना संक्रमित असल्यानं त्या चौकशीला जाणार नाहीत. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार ईडीला चौकशीसाठी पुढची तारीख देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

अविनाश भोसलेंना आज सत्र न्यायालयात हजर करणार
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंची सीबीआय कोठडी आज संपणार आहे. भोसलेंना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा फेटाळत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. येस बँक आणि डिएचएफएल प्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरणात अविनाश भोसलेंना अटक करण्यात आलंय.

खीर भवानीमातेच्या यात्रेसाठी 200 हून अधिक काश्मिरी पंडित रवाना होणार
जम्मू कश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यातील खीर भवानीमातेच्या जत्रेसाठी 200 हून अधिक काश्मिरी पंडित जम्मूहून रवाना होणार आहेत. कडक सुरक्षेत या भाविकांना जत्रेसाठी नेलं जाईल. विस्थापित काश्मिरी पंडितांच्या सगळ्यात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी हा एक जत्रोत्सव आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.