Maharashtra Breaking News 07 June 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jun 2022 11:36 PM
'एबीपी माझा' ठरली मराठीतली सर्वोत्तम वृत्तवाहिनी

एबीपी माझाला मराठीतली सर्वोत्तम वृत्तवाहिनी म्हणून आज सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी सोहळ्यात गौरवण्यात आलं. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मराठी चित्रपट, रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी 'सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा'नं गौरवण्यात येते. हा गौरव सोहळा आज मुंबईत संपन्न झाला. या सोहळ्यात एबीपी माझाची वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदमला सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदिका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. एबीपी माझाची प्रतिनिधी राखी शेळके-पाटोळे हिला मनोरंजन विश्वातील सर्वाेत्कृष्ट वार्ताहर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन, बैठकीला 12 अपक्ष आमदार उपस्थित

राज्यसभा निवडणुकांसाठी पुन्हा मविआची एकजूट दाखवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते एच के पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक सुरु आहे. यात राज्यसभा निवडणुकीत कशाप्रकारे मतदान करायचं याबाबत माहिती दिलीय जातेय..

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक 

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी  महाविकास आघाडीचे सर्व आमदार मुंबईत दाखल होत होत आहेत. 

satara News Update : युवकाच्या त्रासाला कंटाळून महाबळेश्वरमधील झांजवड येथील युवतीची आत्महत्या

युवकाच्या त्रासाला कंटाळून महाबळेश्वरमधील झांजवड येथील युवतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.  सृष्टी शिंदे  (वय 17) असे  आत्महत्या करणाऱ्या  युवतीचे नाव आहे. संशयीत आरोपी नितेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nashik News Update : पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून पतीची आत्महत्या 

पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत पतीने स्वतः बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली आहे. नाशिकमधील मखमलाबाद परिसरात ही घडना घडली आहे. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. म्हसरूळ पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. राजू रतन सिंग ठाकूर असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव असून संध्या ठाकू असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रश्नांवर उद्याच्या सभेमध्ये बोलावं : गोपीचंद पडळकर

औरंगाबादमध्ये उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. उद्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोललं पाहिजे. मी औरंगाबादमध्ये एक दिवस मुक्कामाला होतो, तर त्या ठिकाणी तोंड धुण्यासाठी देखील पाणी नव्हतं. राज्यात सध्या सत्तेचा गैरवापर होत असून चौंडी याठिकाणी अहिल्यादेवी यांच्या वाड्यावर राष्ट्रवादीने पोस्टर लावून वाडा विद्रूप केला होता. मात्र रायगडावर शिवराज्याभिषेक झाला त्यावेळी कोणाचीही पोस्टर लावण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे राज्यातील प्रश्नांवर उद्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे असं पडळकर यांनी म्हटले आहे. 

Breaking News : दूरदर्शनचे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

Breaking News : दूरदर्शनचे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालक म्हणून भिडे यांना ओळखलं जात होतं. 

HSC Result on ABP Majha: आसा पाहा बारावीचा निकाल

Nagpur News Update : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नसल्याच्या नैराश्यातून नागपुरात तरुणाची आत्महत्या 

नागपुरात तरुणाने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नाही या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. ब्लेसन चाको असे या 28 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. ब्लेसन याने 5 जून रोजी जरीपटका परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी फक्त दोन ओळींची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामध्ये ब्लेसन याने स्वतःच्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. मात्र, पोलीस तपासात तो स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्यामुळे नैराश्यात असल्याचे समोर आले आहे. त्याच कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. 

Beed News Update : बीडमध्ये आरोग्य विभागाकडून छापेमारी सुरू, गेवराईची महिला एजंट पोलिसांच्या ताब्यात 

अवैध गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बीडमध्ये आरोग्य विभागाकडून छापेमारी सुरू झाली आहे. या छापेमारीदरम्यान गेवराईमधील एक महिला एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी ही कारवाई केली आहे.  

Amravati Congress : अमरावती काँग्रेसचे मडकी फोडो आंदोलन

आज महराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय अमरावती येथे अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर विलास इंगोले यांचे नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन कार्यालय बाहेर मडकी फोडो आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी अमरावती शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शेवटचा अल्टीमेटम देत सांगितले की, शहरातील नागरिकांकरिता तक्रार नियोजन केंद्र सुरु करावे. ऐकत नसलेल्या ठेकेदारांना म.जी.प्रा.द्वारे अल्टीमेटम देण्यात यावं.शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा महत्वाचा आहे, यानंतर नागरिकांसोबत छळ झाल्यास आम्ही कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करून असे सांगितले.

Amravati Congress : अमरावती काँग्रेसचे मडकी फोडो आंदोलन

आज महराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यालय अमरावती येथे अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर विलास इंगोले यांचे नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन कार्यालय बाहेर मडकी फोडो आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी अमरावती शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शेवटचा अल्टीमेटम देत सांगितले की, शहरातील नागरिकांकरिता तक्रार नियोजन केंद्र सुरु करावे. ऐकत नसलेल्या ठेकेदारांना म.जी.प्रा.द्वारे अल्टीमेटम देण्यात यावं.शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा महत्वाचा आहे, यानंतर नागरिकांसोबत छळ झाल्यास आम्ही कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करून असे सांगितले.

Aurangabad: आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यावर 'एसीबी'ची कारवाई

Aurangabad: औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी एसबीच्या जाळ्यात अडकला आहे. महाराष्ट्र बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी सुरु असलेल्या तपासाप्रकरणात लाच मागितल्याच समोर आले आहे. पाच हजारांची लाच मागितली असता तीन हजार देतांना एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


 

अनिल देशमुख यांच्याविरोधातील खटल्यात सचिन वाझे आता अधिकृतरित्या माफीचा साक्षीदार

Mumbai News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील खटल्यात सचिन वाझे आता अधिकृतरित्या माफीचा साक्षीदार झाला आहे. वाझेने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष #CBI कोर्टापुढे हजर राहत कागदांवर स्वाक्षरी केली. न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांनी वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अटी व शर्तींची माहिती दिली. गृहमंत्रीपदावर असताना भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहे. सचिन वाझेने आपला जामीन अर्ज कोर्टापुढे सादर केला आहे. दरम्यान कोर्टाने सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश देत वाझेच्या जामीनावरील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब केली आहे.

उजनीत अवैद्य वाळू उपसा करणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांची कारवाई, दोन बोटींसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्‍त

Indapur News : उजनी जलाशयात बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणार्‍या वाळू माफियांवर इंदापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा सुरु केला आहे. शहा गावातील दोन बोटींसह वाळू उपशासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीसह जवळपास 43 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तीन जणांना अटक केली असल्याची माहिती इंदापूर पोलिस स्टेशन पोलिसांनी दिली. शहा गावातील भीमा नदीत अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहा गावात जाऊन पोलिसांनी दोन क्रेनच्या साहाय्याने भीमा नदीत दोन मोठ्या बोटी आणि इतर यंत्रसामग्री असा 43 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन तारिक उल इस्माइल, शफिक शेख, नवाब शरिफ या तीन आरोपींना अटक केली आहे. तर बोट मालक महमंद हा फरार आहे. या बोट चालकांवर देखील गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितलं. 

Nashik Crime : नाशिकच्या अंबड परिसरात उद्योजकाची भोसकून हत्या

Nashik Crime : नाशिकची औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड परिसरातील किर्लोस्कर कंपनीजवळ एकाची भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. नंदकुमार आहेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. २० दिवसांत आठवी हत्या असून तीन ते चार जणांच्या टोळक्याकडून हि हत्या झाल्याचे समोर आले आहे. 

Aurangabad: उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीसा

Aurangabad: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस देण्यात आलेल्या सर्वांना आज दुपारी सिटी चौक पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर पाण्याच्या मुद्यावरून आंदोलन करू नयेत म्हणून पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा भाजपकडून आरोप करण्यात आला आहे.


 

पुण्यात पर्वती परिसरातील सोसायटीच्या पार्किंगमधून 18 लाखांची फॅार्च्युनर कार चोरली

Pune News : सोसायटीच्या पार्किंगमधून 18 लाखांची फॅार्च्युनर ही महागडी मोटार चोरट्यांनी लांबवल्याची घटना पर्वती परिसरात घडली. याबाबत सुरेंद्र वीर (अष्टविनायक सोसायटी, लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मीनगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरासमोर अष्टविनायक सोसायटी आहे. वीर यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांची महागडी मोटार लावली होती. मध्यरात्री चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. मोटार लांबवून चोरटे पसार झाले. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव तपास करत आहेत.

..तर महाविकास आघाडीने उघडपणे पाठींबा मागवा: ओवेसी

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा पराभव व्हायला हवा असेल तर, महाविकास आघाडीने उघडपणे पाठिंबा मागावा: ओवेसी

Monsoon Updates : मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला, महाराष्ट्रातील आगमनासाठी 12 जूनचा नवा मुहूर्त

Monsoon Updates : यंदाच्या वर्षी लवकर येणार म्हणता म्हणता मान्सूनं हवामान खात्याला चांगलंच तोंडघशी पाडलंय. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन करणार  आहेत. देशभरातील 100 हून अधिक आदिवासी कारागीर आणि आदिवासी नृत्य मंडळे त्यांची स्वदेशी उत्पादने यामध्ये दाखवणार आहेत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ज्ञानवापीतील शिवलिंगाची पूजा करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं राजकीय भवितव्य ठरणार..अविश्वास ठरावावर मतदान

जून 2020 मध्ये लॉकडाऊन असताना जॉन्सन यांच्या पत्नीनं बोरिस यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमांमध्ये दोनपेक्षा अधिक नागरिकांना जमण्याची परवानगी नसताना या पार्टीत 30 नागरिक उपस्थित होते. याच प्रकरणावरुन जॉन्सन यांना दंड ठोठावण्यात आला होता. तसेच, याला पार्टी गेट घोटाळा असं नाव देण्यात आलं होतं. यावरुन ब्रिटनमधील राजकारण तापलं. या पार्टीमुळे सरकारची, प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली. जॉन्सन यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांनी देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याच प्रकरणावरुन बोरिस जॉन्सन यांना अविश्वासदर्शक ठरावाचा सामना करावा लागतोय.

पुणतांबा आंदोलकांची मंत्रालयात महत्वाची बैठक...बैठकीवरुन आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

पुणतांब्यातील 10 सदस्य आणि मंत्र्यांची बैठक आज दुपारी 3 वाजता मंत्रालयातील अजित पवारांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर पुणतांबा येथे ग्रामसभेत पुढील निर्णय जाहीर होणार आहे.

Akola News : अकोला महामार्गाचं बांधकाम आज विक्रमी वेळेत पूर्ण होणार

Akola News : अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे विक्रमी बांधकाम 3 जून पासून सुरू झाले असून आज  हा 75  किमीचा रस्ता बांधून पूर्ण होत आहे.  या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असून महामार्गावरील लोणी ते बोरगाव मंजू या 75 किमी रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रिट पद्धतीने होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता या प्रकल्पाचा समारोप होणार असून यावेळी गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी एमआयएमची भूमिका काय?

Rajya Sabha Election : ओवेसींची आज नांदेडमध्ये बैठक आहे तर लातुरात जाहीर सभा आहे अससदुद्दीन ओवैसी यांची सकाळी 11 वाजता नांदेडमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर, संध्याकाळी 6.30 वाजता ओवेसींची जाहीर सभा होणार आहे.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाचा मुक्काम कुठल्या हॉटेलमध्ये?

Rajya Sabha Election 2022 : काँग्रेसच्या सर्व आमदारांना, मंत्र्यांना, अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांना आजपासून मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेस आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. तर, भाजपच्या आमदारांना 9 तारखेला ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. कालपासून शिवसेना आमदारांचा मुक्काम मढमधील रिट्रीट हॉटेलमध्ये आहे.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री तिन्ही पक्षाच्या आमदारांशी संवाद साधणार

Rajya Sabha Election 2022 : आज मुख्यमंत्री महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांसह समर्थक अपक्ष आमदारांची बैठक घेणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतील घोडाबाजार टाळण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे. ही बैठक हॉटेल ट्रायडंटला होणार आहे. शिवसेनेकडून आमदारांना व्हीपही जारी करण्यात आला आहे. 

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री तिन्ही पक्षाच्या आमदारांशी संवाद साधणार

Rajya Sabha Election 2022 : आज मुख्यमंत्री महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांसह समर्थक अपक्ष आमदारांची बैठक घेणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतील घोडाबाजार टाळण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे. ही बैठक हॉटेल ट्रायडंटला होणार आहे. शिवसेनेकडून आमदारांना व्हीपही जारी करण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


राज्यसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री तिन्ही पक्षाच्या आमदारांशी संवाद साधणार


आज मुख्यमंत्री महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांसह समर्थक अपक्ष आमदारांची बैठक घेणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीतील घोडाबाजार टाळण्यासाठी ही महत्वाची बैठक आहे. ही बैठक हॉटेल ट्रायडंटला होणार आहे. शिवसेनेकडून आमदारांना व्हीपही जारी करण्यात आला आहे. 
 


राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाचा मुक्काम कुठल्या हॉटेलमध्ये? 


काँग्रेसच्या सर्व आमदारांना, मंत्र्यांना, अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांना आजपासून मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर काँग्रेस आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. तर, भाजपच्या आमदारांना 9 तारखेला ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. कालपासून शिवसेना आमदारांचा मुक्काम मढमधील रिट्रीट हॉटेलमध्ये आहे.


राज्यसभेसाठी एमआयएमची भूमिका काय? 


ओवेसींची आज नांदेडमध्ये बैठक आहे तर लातुरात जाहीर सभा आहे अससदुद्दीन ओवैसी यांची सकाळी 11 वाजता नांदेडमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर, संध्याकाळी 6.30 वाजता ओवेसींची जाहीर सभा होणार आहे.


विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते?


विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 जून असली तरीही भाजपकडून 8 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते. यात कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 


अकोला महामार्गाचं बांधकाम आज विक्रमी वेळेत पूर्ण होणार


अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे विक्रमी बांधकाम 3 जून पासून सुरू झाले असून आज हा 75  किमीचा रस्ता बांधून पूर्ण होत आहे.  या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असून महामार्गावरील लोणी ते बोरगाव मंजू या 75 किमी रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रिट पद्धतीने होत आहे. आज संध्याकाळी 5 वाजता या प्रकल्पाचा समारोप होणार असून यावेळी गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने यावेळी उपस्थित राहणार आहेत.


पुणतांबा आंदोलकांची मंत्रालयात महत्वाची बैठक...बैठकीवरुन आंदोलनाची पुढची दिशा ठरणार


पुणतांब्यातील 10 सदस्य आणि मंत्र्यांची बैठक आज दुपारी 3 वाजता मंत्रालयातील अजित पवारांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर पुणतांबा येथे ग्रामसभेत पुढील निर्णय जाहीर होणार आहे.


आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचं राजकीय भवितव्य ठरणार..अविश्वास ठरावावर मतदान


 जून 2020 मध्ये लॉकडाऊन असताना जॉन्सन यांच्या पत्नीनं बोरिस यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमांमध्ये दोनपेक्षा अधिक नागरिकांना जमण्याची परवानगी नसताना या पार्टीत 30 नागरिक उपस्थित होते. याच प्रकरणावरुन जॉन्सन यांना दंड ठोठावण्यात आला होता. तसेच, याला पार्टी गेट घोटाळा असं नाव देण्यात आलं होतं. यावरुन ब्रिटनमधील राजकारण तापलं. या पार्टीमुळे सरकारची, प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली. जॉन्सन यांच्या पक्षाच्या अनेक खासदारांनी देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याच प्रकरणावरुन बोरिस जॉन्सन यांना अविश्वासदर्शक ठरावाचा सामना करावा लागतोय.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन 


 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्‌घाटन करणार  आहेत. देशभरातील 100 हून अधिक आदिवासी कारागीर आणि आदिवासी नृत्य मंडळे त्यांची स्वदेशी उत्पादने यामध्ये दाखवणार आहेत.


  स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ज्ञानवापीतील शिवलिंगाची पूजा करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.