Maharashtra Breaking News 7 April 2022 : नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे संजय राऊत यांच्या भेटीला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
माजी खासदार राजू शेट्टी उद्या राज्यपालांची भेट घेणार असून सकाळी साडेअकरा वाजता ही भेट होणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव असेल तर ते वगळावे अशी विनंती राजू शेट्टी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांचे नाव देण्यात आले होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यान आमदारकी ही नको स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
फेसबुक पोस्ट करत माजी मंत्री राम शिंदे यांनी अंबालिका कारखान्यावर आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीवरून हा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील कोथरुड भागात स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे हरवले आहेत असा मजकूर छापलेले पोस्टर्स अज्ञातांनी लावलेत. चंद्रकांत पाटील सध्या कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूरात तळ ठोकून आहेत. त्यामुळे बरेच दिवस ते त्यांच्या मतदारसंघात आलेले नाहीत. त्यामुळे हे पोस्टर्स लावण्यात आल्याची चर्चा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षानंतर सक्रिय कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर गेली आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्यांचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आभार मानले आहेत. यामुळे 18 हजार पेंशन धारकांना दिलासा मिळाला आहे.
आझाज मैदानात एसटी कर्माचाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे. 22 एप्रिलपर्यंत कर्माचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे संजय राऊत यांच्या भेटीला गेले आहेत. आज मंत्रीमंडळ बैठकीत दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद उमटले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीमंडळ बैठकीत पोलीस अधिकारी यांना असं पत्र लिहिण्याचा अधिकार कोणी दिला अस म्हणत दीपक पांडे वर नाराजी व्यक्त केली होती.
भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेनेवर बोचरी टिका केली आहे. संजय राऊत यांनी असे कोणते तिर मारले आहेत की त्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत सुरू आहे.स्वतःच्या बचावासाठी शरद पवारांना त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पाठवले, यासाठी हे स्वागत आहे का ?अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली, प्रवीण राऊतांना पैसे परत करावे लागले यासाठी हे स्वागत आहे का ? आज जे शिवसैनिक स्वागतासाठी आले आहेत ते उद्या ईडी ऑफिस पर्यंत सोडायला येणार नाहीत, असेही डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
Shivsena : केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून भाजप आमच्यावर हल्ला करत आहे. आमच्यावर कारवाया करून भाजपने स्वत:ची कबर खोदली आहे.
Sanjay Raut : सोमय्या उत्तर देत नाही म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला हे स्पष्ट आहे. पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरण्यात आला आहे. मीना सिडाम असे अल्पवयीन मुलीचे नाव आहे. गावातल्या एका तरुणाशी असलेल्या प्रेमसंबधातातुन हत्या करुन मृतदेह जमीनीत पुरण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Sanjay Raut : जंगी स्वागतयात्रेनंतर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत
Sanjay Raut : संजय राऊत मुंबई विमाळतळावर दाखल, स्वागतासाठी शिवसैनिकांची गर्दी आहे.
अंबरनाथ नगरपालिकेवर आज विविध विभागातील नागरिकांनी एकत्र येऊन मोर्चा काढला होता. अंबरनाथ पालिका झोपडपट्टी भागात पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला नागरिकांचा विरोध आहे. शिवाय ही योजना राबवताना पालिकेने कोणतीही सूचना दिली नाही. शिवाय योजनेच्या माध्यमातून आम्हांला बेघर करण्याचा दावा असल्याचा आरोप करीत शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढला होता.
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे गावच्या अक्षय पडवळची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अक्षयने मित्रांच्या सहकार्याने मुंबई ते गोवा हे 568 किमी अंतर 40 तास 14 मिनिटांत पूर्ण केले आहे. मुंबई, पुणे, गोवा यासांरख्या मोठ्या शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत अक्षयने आतापर्यंत 18 सुवर्ण आणि रौप्य पदके पटकावली आहेत.
वरवंटी कचरा डेपोला आग लागली असून ही आग गेल्या दहा तासांपासून धुमसत आहे. सर्वत्र धुराचे वातावरण झाले असून वरवंटी भागात नागरिकांना श्वास घेण्यास होत आहे. मनपा प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे आग आटोक्यात येत नाही अग्नीशनन गाड्या आहेत मात्र टाकीत पाणी नाही अशी स्थिती आहे.
लातूर शहरातील सर्व कचरा वरवंटी कचरा डेपोवर जमा केला जातो. एकूण 22 एकर परिसरात हा कचरा डेपो आहे. येथेच कचऱ्यापासून खत निर्मित प्रकल्प आहे. या भागात पहाटे चार वाजता आग लागली हळूहळू वाढत गेली. आज दुपारी याचे प्रमाण जास्त झाले. अग्निशमन दलाच्या सात गाड्या आतापर्यंत येऊन गेल्या आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. पाणी टाकले की धूर तयार होत आहे. कचऱ्यामुळे मिथेन गॅस तयार होत असतो. आगीमुळे त्यात वाढच झाली आहे. धुराचे लोट उठत असल्यामुळे वरवंटी आणि लातूर एमआयडीसी भागातील अनेक ठिकाणी धुरच धूर भरून राहिला आहे. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास हातोय.
यवतमाळ शहरांमध्ये अवैध रित्या आणलेल्या तंबाखूपासून खर्रा तयार करण्यात येते. त्यामुळे या पान ठेल्यावरील खर्रा तयार करण्याच्या
मशीन जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारपासून पानठेल्यावर तपासणी करून खर्रा तयार करण्याची मशीन जप्त करण्याचे धाडसत्र शहरातील मांईदे चौक व आजूबाजूच्या परिसरातील आणि गोधनी रोड भागातील पानठेल्यावर राबविण्यात आले. यात 6 मोठ्या मशीन तर 9 लहान अश्या 15 खर्रा मशीन जप्त करण्यात आल्या. यवतमाळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक गोपाळ माहूर अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
जिल्हाधिकारी अमोल शेडगे साहेब यांच्या आदेशानुसार फूड डिपार्टमेंट चे अधिकारी फूड माहूरे इन्स्पेक्टर व अवधूत वाडी पोलीस स्टेशन सोबत मिळून यवतमाळातील मांईदे चौक व त्या परिसरातील आणि गोधनी रोड या भागातील खराॅ घोटणारे रे मशीन प्रत्येक पानठेल्यावर जाऊन जप्त केल्या खराॅ विक्री करणार्या ची धावपळ सुरु झाली बरेच जण पानठेले दूकान बद करून गायब झाले मात्र एका घरात जाऊन त्यांच्या अंगातल्या मशीन जप्त केल्या. या धाड सत्रा मूळे पांनठेला चालकांचे धाबे दनानले आहे.
Maharashtra News : मुंबई-गोवा महामार्गावर ती अत्यंत अवघड अशा भोसले घाटातील अवघड वळणावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या केमिकलचा टँकर सहा फूट उंच संरक्षण भिंतीवर चढला. पहाटे सहा वाजता झालेला अपघात पाहता अंगावर काटे उभे राहतील. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गंभीर जखमी झालेल्या टँकर चालकाला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घाटातील अवघड वळणावर अपघातांचे प्रमाण वाढले असून याआधी देखील मोठमोठे टँकर, कंटेनर, आणि मालवाहू ट्रक चे अनेक अपघात या अवघड वळणावर झाले आहेत. घाटातील हे अवघड वळण मृत्यूचा सापळा बनत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे.
बुलढाणा : मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावातील शेतकरी सुखदेव वाघमारे यांनी आपल्या शेतातील गव्हाचा भुसा पेटवला. पण दुपारच्या सुमारास ही आग वाढत जाऊन शेजारील ऊसाच्या शेतापर्यंत गेली. सुखदेव वाघमारे यांनी जीवाची पर्वा न करता ऊसाच्या शेताला आग लागू नये म्हणून आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. परंतु आगीत गुदमरुन सुखदेव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी मात्र ऊसाच्या शेतीला आगीपासून त्यांनी वाचवलं. सुखदेव वाघमारे हे निवृत्त उपकोषागार अधिकारी होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
मुंबई : मुंबई NIA विभागाला काही दिवसांपूर्वी एक धमकीचा ई-मेल आला होता. यात पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याचा उल्लेख केला होता. यानंतर NIA कडून सर्व तपास यंत्रणांना या ई-मेलची गंभीर दखल घेण्यास सांगण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात धमकी देणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असून ती महाराष्ट्राच्या बाहेरची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तपासात हे देखील समोर आले की, ही व्यक्ती इंजिनिअर असून तो 'अटेन्शन सीकर' या आजाराने तो ग्रस्त असल्याचे सांगितले जाते. हा ई-मेल कुठून आला हे समजू शकत नसल्यामुळे सर्वच तपास यंत्रणांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले होते.
कल्याण : आयपीलएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोन सट्टेबाजांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील बोरगांवकर कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण महात्मा फुले पोलिसांनी छापा टाकला असता आयपीएलचा टी-20 मॅच सुरु होती. आरसीबी आणि आरआर या दोन संघामध्ये सुरु असलेल्या मॅचवर सट्टा लावला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईत येथील मुलुंडमध्ये राहणारा भावेन अमन आणि मुलुंड येथे राहणारा मयुर ब्यास या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना आरोपी केले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आाहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सात वेळा आवाहन करुनदेखील ते कामावर रुजू झाले नाहीत. पण कधीही कर्मचाऱ्यांची नोकरी जावी म्हणून राज्य सरकारने काम केलं नाही, आताही कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, त्यांनी कामावर रुजू व्हावं असं राज्य सरकारने कोर्टात सांगितल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
Sanjay Raut : मुंबई विमानतळावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आहे. संजय राऊत सध्या संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. त्यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते मुंबईत परतत आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात जोरदार वाक:युद्ध पाहायला मिळालं. दरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं म्हटलं की कोल्हापुरातील बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक भाजप पक्षालाच मतदान करेल. शिवसैनिकांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राजेश क्षीरसागर यांनी प्रवीण दरेकर यांना चांगलंच सुनावलं. कोल्हापूरचे शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांचा आदेश मानणारे आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई जाधव शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन विधीमंडळात प्रवेश करतील असा विश्वास देखील राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतमध्ये दोन दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोज यांना राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष विजय औटी यांनी समर्थकांसह मारहाण केली होती. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर नगरपंचायतीमध्ये पाणीपुरवठा अभियंता सचिन राजभोज आणि नगराध्यक्ष औटी यांच्यात पाणीपुरवठा विभागाच्या मोटारची माहिती मागवल्यावरून वाद झाला यावेळी औटी यांनी मोठ्याने आरडाओरडा करून अश्लील शिवीगाळ करत राजभोज यांना मारहाण केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
Jalna News : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या कुंभार जरी गावात रात्री बिबट्या विहिरीत पडला. त्याला आज दुपारी वनविभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले, दरम्यान कुंभार झरी शिवारात रात्री पाण्याच्या शोधात हा बिबट्या पडल्याचा अंदाज असून सकाळी ही बाब शेतकऱ्यांना लक्षात आल्या नंतर वनविभागाला कळवण्यात आले त्या नंतर पोलीस प्रशासन आणि वनविभागाने गावकऱ्यांच्या मदतनीने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.
Jalgaon News : राहत्या घरातच बनावट नोटा छपाई करणाऱ्या दोन संशयितांना शिरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. भरदुपारी पोलीसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळखळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस पथकाला गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहिती नुसार शहर पोलीसांनी शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे बनावट नोटा छपाई करणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली आहे. तालुक्यातील सावळदे येथील राहत्या घरातच बनावट नोटा छपाई करण्यात येत असल्याची गोपणीय माहिती शिरपूर पोलीसांना मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी शिताफीने सावळदे येथील घरावर छापा टाकत बनावट नोटा व छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटरसह इतर साहित्य पोलीसांनी जप्त केल्याचे सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.याबाबत शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील घराची झाडाझती करण्यात आली आहे.
Sangli News : सांगलीत शिवसैनिकांचे किरीट सोमय्याच्या विरोधात अनोखे आंदोलन
किरीट सोमय्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून तो मिरजेच्या कृपामाई हॉस्पिटलमध्ये दाखल केला ,कृपामाई हे मेन्टल हॉस्पिटल म्हणून आहे प्रसिध्द
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
शिवसैनिकानी सोमय्या यांचा पुतळा डॉक्टरांकडे सुपूर्द केला
Nandurbar News : नंदुरबार शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणातील 32 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मात्र दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत असून आणखीन काही महिनेच पुरेल एवढाच मुबलक पाणीसाठा शिल्लक असून. शहरातील जनतेला रखरखत्या उन्हात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून पालिकेच्या वतीने दोन दिवसांआड होणारा शहराचा पाणीपुरवठा टंचाईची टांगती तलवार दूर करण्यासाठी पालखीचे वतीने दोन दिवसाआड करून पाणीपुरवठा केला जात आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे दोन धरण आहे. आंबाबरी आणि विरचक धरण मात्र आंबाबरी धरणांमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे तिथला पाणीपुरवठा होत नसून सध्या विरचक धरणांमधून पाणीसाठा शहराला दिला जात आहे. मात्र विरचक धरणाच्या अवघ्या बत्तीस टक्क्यांवर पाणीसाठा असल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरावे असं आव्हान पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आहे.
Jalna News : जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाततील परिचरिका आणि आरोग्य सेवकांनी 2 महिन्याचा पगार थकल्या मुळे 3 तास काम बंद आंदोलन केलं, मागील बारा महिन्यातील वर्ग तीन आणि चार च्या कर्मचाऱ्यांचे टीडीएस कपात न केल्यामुळे त्यांना आर्थिक मुर्दंड सहन करावा लागत असल्याने प्रशासना विरोधात रोष व्यक्त करत हे काम बंद आंदोलन करण्यात आले दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्वसनानंतर तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून आपल्या मागण्यावर योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या परिचरिकांनी दिलाय.
Vasant More News : वसंत मोरेंची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष
Kirit Somaiya : जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी शेतकऱ्यांसह किरीट सोमय्यांनी घेतली ईडी अधिकाऱ्यांची भेट, साखर कारखाना शेतकऱ्यांकडे सोपवण्याची केली मागणी
OBC Reservation : ओबीसी आरक्षण संदर्भातील पुढील सुनावणी 21 एप्रिलला
Parbhani : उन्हाचे चटके सर्वांनाच बसु लागले आहेत त्यातच उन्हाचा फटका हा जास्त वन्य प्राण्यांना बसतो.पाण्याच्या शोधात 5 निल गायी ह्या विहिरीत पडल्या ज्यांतील 4 निलगायींना गावकऱ्यांना बाहेर काढण्यात यश आले असुन एका निलगायीचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या जिंतुर तालुक्यातील कोरवाडी येथे घडलीय.उन्हाचा पारा वाढला असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात आहेत. जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारातील शिवाजी बनसोडे यांच्या शेतामध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या पाच निलगाई विहिरीत पडल्या.या बाबतची माहिती सरपंचांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. गावकऱ्यांच्या मदतीने वन कर्मचाऱ्यांनी विहिरीतून निलगाई वर काढल्या.मात्र एका निलगाईचा दुर्देवी मृत्यू झाला.
#breakingnews आयएनएस विक्रांतबाबत देशभावना आहेत: संजय राऊत
INS Vikrant : INS विक्रांत प्रकरणातल्या आरोपांप्रकरणी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून स्थगन प्रस्तावाची नोटीस देण्यात आली आहे. नियम 267अंतर्गत चर्चेची मागणी केली आहे. आय एन एस वाचवण्याच्या नावाखाली जनतेकडून पैसे गोळा करून ते लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Sangali News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिकारीच्या उद्देशाने घुसलेल्यानी गाठला विकृतीचा कळस
व्याघ्र प्रकल्पात विनापरवाना घुसलेल्या आरोपीनी घोरपडीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर
आरोपींच्या मोबाईल वरील रेकॉर्डिंवरून वनाधिकाऱ्यांना या कृत्याबाबाबतची समजली माहिती
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या हद्दीतील व्याघ्र प्रकल्पात शस्त्रांस्त्रासह तीन आरोपीना वन विभागाने घेतले होते ताब्यात
Shiv Sena MP Sanjay Raut : संजय राऊत यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये अधिक तीव्र झालेल्या संघर्षाचे पडसाद आज रस्त्यावर उमटणार आहेत. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आज मुंबईत परतणार आहेत. तेव्हा जोरदार शक्तीप्रदर्शन करून त्यांचं स्वागत करण्याची तयारी शिवसेनेनं केलीय. मुंबई विमानतळापासून ते राऊत यांच्या भांडुपमधील घरापर्यंत त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. या शक्तीप्रदर्शनासाठी 40 बसेस आणि ढोल ताशा पथक अशी जय्यत तयारी करण्यात आलीय. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार आणि काही मंत्रीही विमानतळावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Nanar Project : मविआ नेत्यांना सळोपळो करुन सोडणाऱ्या ईडीनं आता थेट कोकणाकडे मोर्चा वळवला आहे. ईडीनं आपली नजर कोकणातील जमीन खरेदी व्यवहाराकडे वळवली आहे. सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्प चर्चेत आहे. आणि याच प्रकल्प परिसरात मागील दोन ते चार वर्षात झालेल्या जमीन खरेदीचा व्यवहार ईडीनं तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मार्चमध्ये महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याच्या भावाची आणि नातेवाईकांची ईडीनं चौकशी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी 'माझा'ला दिली आहे. 200 एकर जागा खरेदीबाबत चौकशी झाल्याचं कळतंय. 8 आणि 9 मार्च रोजी राजापूर शहरातील एका हॉटेलमध्ये पहाटे पाच वाजता ही चौकशी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा, राजापूर तालुक्यातील पश्चिम भाग, कोंड्ये गावातील जमीन व्यवहारांची चौकशी झाल्याचं कळतंय.
Kirit Somaiya : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.
काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
IOCL, Petrol-Diesel Price Today 7 April 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
देशात 22 मार्चनंतर आजपर्यंत 14 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर, 2021 नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्चं तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं होतं. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.
गुरुवारी दरवाढ न झाल्यानं राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर वर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे.
Kirit Somaiya : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.
काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट
कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आला आहे. माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -