Maharashtra Breaking News 06 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Satara News : महाबळेश्वर (Mahableshwar) बसस्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे सातारा पोलिसांना देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने गाडी क्रमांकासह पोलिसांना माहिती दिली . फोन आल्यानंतर खबरदारी म्हणून बसस्थानकात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सायंकाळी 6 वाजता पोलिसांना फोन करण्यात आला होता. परंतु हा फेक कॉल असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिली.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेणार आहेत. तसेच तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरी आणि मंडळात जाण्याची शक्यता आहे.
MMRDA चे काम सुरू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना विरारच्या काशीद कोपर येथे घडली आहे. काशीद कोपर येथे डोंगर खोदून सूर्या प्रकल्पाच्या 7 हजार 600 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भल्या मोठ्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या कामामुळे माळिण, तळईसारखी दुसरी घटना विरारच्या काशीद कोपर येथे घडू शकते असा आरोप काँग्रेस पर्यावरण समितीचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गावकऱ्यांनी केला. गावकऱ्यांनी या कामाला विरोध केला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याने स्थानिक राहिवाशांमध्ये भीतीचं वातावरणआहे. परंतु स्थानिकांचा विरोध झुगारून MMRDA कडून पाण्याच्या टाकीचे काम सुरूच असल्याने राहिवाशांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
MMRDA चे काम सुरू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना विरारच्या काशीद कोपर येथे घडली आहे. काशीद कोपर येथे डोंगर खोदून सूर्या प्रकल्पाच्या 7 हजार 600 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भल्या मोठ्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. या कामामुळे माळिण, तळईसारखी दुसरी घटना विरारच्या काशीद कोपर येथे घडू शकते असा आरोप काँग्रेस पर्यावरण समितीचे प्रदेश अध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गावकऱ्यांनी केला. गावकऱ्यांनी या कामाला विरोध केला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी दरड कोसळल्याने स्थानिक राहिवाशांमध्ये भीतीचं वातावरणआहे. परंतु स्थानिकांचा विरोध झुगारून MMRDA कडून पाण्याच्या टाकीचे काम सुरूच असल्याने राहिवाशांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांची आमदार अमोल मिटकरींना अब्रूनुकसानीची नोटीस. अब्रुनुकसानीच्या दाव्यापोटी मिटकरींना 1 रूपयाची दिली नोटीस. आमदार मिटकरींनी चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याने जनमाणसात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा नोटीसमध्ये आरोप करण्यात आला आहे. मिटकरींच्या कुवतीनुसार नोटीस दिल्याची शिवा मोहोड यांची प्रतिक्रिया. जास्त रक्कमेची नोटीस दिली असती तर मिटकरींना काळी कामं करावी लागली असती. या आधी मिटकरींनी शिवा मोहोडांना 5 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे.
Kalyan News : गोरगरीब गरजूंच्या पोटाची खळगी भरावी म्हणून आता तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतला आहे. तृतीय पंथीयांच्या ख्याहिश फाऊंडेशनच्या माध्यमातून अवघ्या एक रुपयांमध्ये नाश्ता आणि दहा रुपयात जेवण भुकेल्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या गरीब थाली केंद्राचा शुभारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदिवासी, गरीब गरजू, विधवा माहिला आणि तृयीतपंथीय यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Nashik Ganeshotsav : नाशिकच्या गणेशोत्सवात पोलिसांची सकारात्मक भूमिका असून त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळानी प्रबोधनात्मक विषयावरील देखावे सादरीकरणासह शांतता उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप द्यावा. तसेच विसर्जन हे रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण करावे असा निर्णय गणेश विसर्जन मिरवणूक नियोजन बैठकीत झाला. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणूकीत धुमशान पाहायला मिळणार आहे.
Maharashtra News : शस्त्रक्रियेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये आलेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. राज यांच्या या दौऱ्याचा श्रीगणेशा विदर्भापासून होणार आहे. 17 सप्टेंबरपासून राज ठाकरे 2 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळतेय.
Pune News : पुण्यात मांजरीमध्ये अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आलीय. बनावट पनीर कारखान्यावरछापा टाकून 899 किलो बनावट पनीर साठा जप्त करण्यात आलाय.
Pune Ganapati Visarjan Case : पुणे (Pune) गणपती विसर्जन (Ganapati Visarjan 2022) मिरवणूक याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तर विसर्जन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचं सरकारनं कोर्टात सांगितलं आहे.
Central Railway Updates : मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे. कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. सकाळी सव्वा सातच्या सुमारास रेल्वे रुळाचं काम पूर्ण करण्यात आलंय. मात्र त्यानंतरही मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोक उशिराने धावतायत. ऐन कामावर जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेच्या खोळंबा झालाय. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
ED Raid : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून दिल्लीसह देशभरात सहा ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यामध्ये मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आदी ठिकाणांचा समावेश आहे.
BJP : अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामतीत पाच ते सहा वेळा दौरा करणार; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
Asia Cup 2022 : आशिया कप 2020 च्या सुपर फोरमध्ये आज भारत आणि श्रीलंकेत सामना होणार आहे. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मोदींमध्ये आज चर्चा होणार आहे. त्यानंतर शेख हसीना राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेणार आहेत.
Pune Ganeshotsav 2022 : पुणे शहरात लक्ष्मी रोडवरून गणपती विसर्जन मिरवणुकीच्यावेळी शहरातील पाच मानाच्या गणपतींना प्रथम मार्गस्थ होण्याची परंपरा आणि रूढी आहे. त्यानंतर अन्य गणपती मंडळांना विसर्जन मिरवणुकीला रस्ता खुला केला जातो. मात्र, अशा अटी आणि परंपरा या संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. असा दावा करत 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात धाव घेत याचिका केली आहे.
Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांच्यावर सकाळी 11 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत
Maharashtra News : पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात ज्या कनेरी गावातील हनुमान मंदिरातून करतात त्याच मंदिराला भेट देऊन बावनकुळेंच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधणार आहेत.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
भाजपचं मिशन बारामती, बावनकुळे बारामती दौऱ्यावर
पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात ज्या कनेरी गावातील हनुमान मंदिरातून करतात त्याच मंदिराला भेट देऊन बावनकुळेंच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधणार आहेत.
सायरस मिस्त्रींवर अंत्यसंस्कार
सायरस मिस्त्री यांच्यावर सकाळी 11 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत
पुण्याच्या मानाच्या गणपती विसर्जनासंदर्भात हायकोर्टात सुनावणी
पुणे शहरात लक्ष्मी रोडवरून गणपती विसर्जन मिरवणुकीच्यावेळी शहरातील पाच मानाच्या गणपतींना प्रथम मार्गस्थ होण्याची परंपरा आणि रूढी आहे. त्यानंतर अन्य गणपती मंडळांना विसर्जन मिरवणुकीला रस्ता खुला केला जातो. मात्र, अशा अटी आणि परंपरा या संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. असा दावा करत 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात धाव घेत याचिका केली आहे.
बांग्लादेशच्या पंतप्रधानांसोबत मोदींची द्विपक्षीय चर्चा
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मोदींमध्ये आज चर्चा होणार आहे. त्यानंतर शेख हसीना राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेणार आहेत.
आज भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरो ची स्थिती
आशिया कप 2020 च्या सुपर फोरमध्ये आज भारत आणि श्रीलंकेत सामना होणार आहे. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -