Maharashtra Breaking News LIVE Updates : मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात, 4 ठार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Mar 2022 08:26 AM
Chitra Ramkrishna : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयकडून अटक

Chitra Ramkrishna : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 

Malegaon News : मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात, 4 ठार

मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून यात चारजण ठार झाले आहेत, तर 12 हून अधिकजण जखमी झाले आहेत.

हातकणंगले इथं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  बंटी पाटील यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवत काळे झेंडे दाखविले. 

हातकणंगले इथं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  बंटी पाटील यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवत काळे झेंडे दाखविले. 


शेतीपंपास दिवसा १० तास वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी गेल्या १३ दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत


महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करू लागल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना हातकंणगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून काळे झेंडे दाखवित निदर्शन करण्यात आले.

राजकिय हेतू ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन; रोहित पवारांची भाजपवर टीका
ANC- पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूका नजरेसमोर ठेवून स्थानिक भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन केल्याचे आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे...जामखेड येथे लघु उद्योगांच्या मशिनरींचे प्रदर्शन आणि 151 बचत गटांना कर्ज वितरण  कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते... यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो मात्र, राजकीय हेतू ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यात आले... दरम्यान कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही  पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका केली होती...अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडून आणण गरजेचं आहे असं शरद पवार यांनी म्हटले होते...तर खऱ्या अर्थाने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असतानाच मेट्रोच्या कामाला मंजुरी मिळाली होती असं रोहित पवार यांनी म्हटले...

 
परभणीच्या पालममध्ये 100 एकर ऊसाला आग 

परभणीच्या पालम तालुक्यातील फळा शिवारात तब्बल 100 एकरवर उस जाळून खाक झाल्याची घटना आज घडली असुन 10 ते 15 शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे वर्षभर रात्र दिवस कष्ट करून जोपासलेली पीक डोळ्यासमोर जळून जाताना हताश होऊन पाहण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.ही आग मात्र नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.


पालम तालुक्यातील फळा शिवारात या वर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली होती  770 एकरवर उस लागवड करण्यात आली होती साखर कारखान्यानी यातील 350 ते 400 एकर वरील ऊस गाळप केले आहे मात्र अजूनही जवळपास 300 एकर ऊस शेतात उभा राहिला आहे.त्यातच आज अचानक दुपारी 12 वाजता या परिसरात उसाला आग लागली.पाहता पाहता ही आग 100 एकरात पसरली आणि आगडोंब उसळला.शेतकऱ्यांनी जेसीबी शेतात घालून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला पण ही आग आटोक्यात आली नाही उसाचा चक्क कोळसा झाला आहे याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे..

मुंबईच्या डबेवाल्याना अखेर हक्काचे डबेवाला भवन मिळाले

अखेर हक्काचे डबेवाला भवन मिळाले आहे. वांद्रे येथे मुंबईचा डबेवाला भवन उभे राहिले आहे.मुंबई मनपा च्या वतीने ही जागा डबेवाल्याना देण्यात आली आहे.या भवनाचे उद्घाटन आज मुंबई उपनगर चे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.ता वेळी मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर ,परिवहन मंत्री अनिल परब, पालिका आयुक्त इकबाल चहल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मुंबई डबेवाल्यांचा १३० वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे.चोख व्यवस्थापनामुळे जगभरात नावलौकिक मिळाल्यामुळे जगभरातून अनेक पर्यटक व महाविद्यालयीन विद्यार्थी डबेवाल्यांचे व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी मुंबई मध्ये डबेवाल्यांना भेटण्यासाठी येत असतात. अश्या पर्यटकांना व विद्यार्थ्यांना व्यवस्थापणेचे धडे शिकवण्यासाठी व डबेवाला कामगारांच्या कल्याणासाठी डबेवाल्यांच्या सन्मानार्थ मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांद्रा- पश्चिम येथे मुंबई डबेवाला भवन तयार करण्यात आले आहे.याचा आढावा घेत या डबेवाल्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी....

PM Modi in Pune : पुणे : भारताने कोरोना काळात, संपूर्ण देशाला लसीकरणातून आपले सामर्थ्य दाखवले; पंतप्रधान मोदी

PM Modi in Pune :  भारताने कोरोना काळात, संपूर्ण देशाला लसीकरणातून आपले सामर्थ्य दाखवले. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवत देशात आणले. इतर देशांना ते जमले नाही, हे भारताच्या वाढत्या शक्तीचे प्रतीक असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

Raigad News : रायगड: खालापूर येथील केमिकल कंपनीमध्ये आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, दोन कामगार जखमी

Raigad News :  रायगड: खालापूर येथील केमिकल कंपनीमध्ये आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, दोन कामगार जखमी

Pune News : पुणे: सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी भाजपकडून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर आंदोलन

Pune News : पुणे: सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी सोलापूर जिल्हा भाजपकडून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील घरासमोर आंदोलन

Latur News : लातूर शहरातील कुंटणखान्यावर छापा, पश्चिम बंगालमधील दोन तरुणींसह तीन मुलींची सुटका, दोन महिलाना पोलिसांनी केली अटक

Latur News : लातूर शहरातील कुंटणखान्यावर छापा, पश्चिम बंगालमधील दोन तरुणींसह तीन मुलींची सुटका, दोन महिलाना पोलिसांनी केली अटक, पाच तरुणही ताब्यात

Amravati News: अमरावतीत 10 किलो सोनं आणि 5 लाख 39 हजारांची रोकड जप्त, हवाला प्रकरण असल्याचा संशय

Amravati News: अमरावतीत 10 किलो सोनं आणि 5 लाख 39 हजारांची रोकड जप्त, दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अमरावतीच्या राजापेठ पोलिसांची रात्री उशिरा मोठी कारवाई, सोनं आणि रोख रक्कम हवालाची असल्याचा संशय

PM Modi in Pune : पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या फेट्यातून राजमुद्रा वगळली

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात एमआयटी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या राजबिंडा शाही फेटा घालण्यात येणार होता.आणि या फेट्यावर राजमुद्रा देखील लावण्यात आली होती.पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे फेट्यामधील राजमुद्रा काढण्यात आली आहे.आत्ता जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेटा घालण्यात येणार आहे त्यात राजमुद्रा नसणार 

PM Modi in Pune : पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या फेट्यातून राजमुद्रा वगळली

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात एमआयटी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या राजबिंडा शाही फेटा घालण्यात येणार होता.आणि या फेट्यावर राजमुद्रा देखील लावण्यात आली होती.पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे फेट्यामधील राजमुद्रा काढण्यात आली आहे.आत्ता जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेटा घालण्यात येणार आहे त्यात राजमुद्रा नसणार 

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा: शरद पवारांच्या टिकेला भाजपचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या दैऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. पंतप्रधानांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी येत आहेत, असे शरद पवार म्हणालेत. शरद पवारांच्या या टीकेला भाजपने उत्तर दिले आहे.


नेमकं काय म्हटलंय भाजपने


आदरणीय शरद पवारजी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? असा सवाल भाजपने केला आहे. आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, 'मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही'

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, पुणे मेट्रोसह  पुणे महापालिकेच्या योजनांचे करणार लोकार्पण

Nagpur News : महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज नागपूर दौऱ्यावर

Nagpur News : महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपूरच्या दौऱ्यावर येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर बरेच दिवस हे पद रिक्त होते. महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संपर्क मंत्री म्हणून वळसे पाटील यांचा दौरा महत्वाचा आहे. यावेळी खासदार प्रफुल पटेल हे सोबत असणार आहे.

Beed News : बीड: गेवराईत वाळू वाहतूकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील गाडीचा अपघात, मंडळ अधिकारी जागीच ठार, तहसीलदार जखमी

Beed News:  बीड: गेवराईत वाळू वाहतूकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील गाडीचा अपघात झाला. या अपघातात मंडळ अधिकारी जागीच ठार झाले आहे. तर, तहसीलदार जखमी झाले आहेत.  गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर आज पहाटे हा अपघात घडला. 

PM Modi In Pune :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील वाहतूक मार्गातील प्रत्येक दुकानं बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद असणार 

PM Modi In Pune :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील वाहतूक मार्गातील प्रत्येक दुकानं बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद असणार 

PM Modi In Pune : आज पंतप्रधान मोदी पुण्यात; मेट्रो उद्घाटनासह इतर कार्यक्रमांना उपस्थिती

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे (Pune Metro) उद्घाटन करणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे. 

पार्श्वभूमी

आज पंतप्रधान मोदी पुण्यात; मेट्रो उद्घाटनासह 'या' कार्यक्रमांना उपस्थिती 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे. सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे  उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील.


मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं : नारायण राणे


सुशांतसिंह, दिशाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा नारायण राणेंनी यावेळी केला. तर अमित शाहांना फोन केल्यानंतर पोलिसांनी सोडलं असंही नारायण राणे यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुलगा नितेश राणे यांची मुंबईतील मालवणी पोलिसांकडून नऊ तास चौकशी करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशी सॅलियनच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 


बीडमधील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्याचा फेरतपास करण्याचे आदेश


बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्याचा फेरतपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांचा सी समरी अहवालही न्यायालयाने फेटाळला आहे. जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यांचा तपास गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृषी विभागातील अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.  


राज्यपालांना टार्गेट करणं अतिशय चुकीचे, देवेंद्र फडणवीसांनी केली कोश्यारींची पाठराखण


 छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांवर टीका होत आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गोंधळ झाला त्यामुळे राज्यपाल अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले, त्याचा मंत्रिमंडळाने निषेध केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांवर टीका केली. सत्ताधारी पक्षांकडून होत असणाऱ्या टीकेला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडले. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.