Maharashtra Breaking News 06 April 2022 : पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला भीषण आग
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नेरळ रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या धडकेत तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेरळ रेल्वे स्थानका जवळ हा अपघात झाला. सोनल शिवाजी कोकणे असं अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे.
आपल्या प्रियसीचे दुसर्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने प्रियकरानं तिला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. इतकच काय तर यासाठी त्याने एका निरपराध तरुणाची गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली आहे. त्याच्या खिशात आपल्या प्रियसीचे वोटर कार्ड आणि चिट्ठी ठेवली. जेणेकरुन पोलिसांच्या तपासात आपल्या प्रियसीने हत्या केली म्हणून तिला अटक होईल.
Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सहा ते सव्वा सहाच्या सुमारास ही घटना समोर आली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाची पाच वाहनं दाखल आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शरद पवार यांचा आभारी आहे, त्यांनी पंतप्रधानांसमोर भूमिका मांडली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या चुकीच्या कारवायांवर मोदींचं लक्ष वेधलं - संजय राऊत
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा केली. संत ज्ञानेश्वर महाराज ते भालचंद्र नेमाडेंसह अनेकांनी मराठी भाषेतच साहित्य लिहलं आहे. हे नमूद करताना केंद्र सरकारला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची आठवण बारणेंनी करून दिली.
Maruti Suzuki : मारुती सुझुकी 19 हजार 731 इको गाड्या परत बोलावणार आहे. इकोच्या व्हील रिमच्या आकारात त्रुटी आढळल्यानं तपासणी आणि दुरुस्तीसाठी माघारी बोलवल्या आहेत. 19 जुलै 2021 ते 5 आॅक्टोबर 2021 मध्ये उत्पादित केलेल्या गाड्या माघारी येणार आहे. दरम्यान, निकृष्ट व्हिल आकारामुळे गाड्याच्या कामगिरीवर आणि सुरक्षिततेवर परिणाम झालेला नाही
वर्धा : गेल्या तीन दिवसांपासून महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन बेमुदत संप पुकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे, पदोन्नत नायब तहसीलदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासह वाहन चालकांचाही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असून आजपासून आणखी 100 कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील 380 कर्मचारी संपावर गल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. रोज कर्मचारी आणि नागरिकांमुळे गजबजलेल्या कार्यालयात तीन दिवसांपासून कमालीची शांतता पसरली आहे.
राजापूर, रत्नागिरी : धोपेश्वर येथील रिफायनरीबाबतची निर्णय प्रक्रिया संपली आहे. रिफायनरीच्या विरोधात 466 मते तर रिफायनरी समर्थनकरता 144 मते मिळाली. तर तटस्थ म्हणून 23 जणांनी मतदान केलं. धोपेश्वर गावात सकाळी 11 वाजता निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामुळे कोकणातील बारसू रिफायनरी चर्चेत आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयच्या टीमने मुंबईतील आर्थर रोड तुरुंग जाऊन देशमुख यांचा ताबा घेतला.
Hingoli News : गोरेगाव येथे ज्युस सेंटर चालवणाऱ्या राजस्थान येथील लादू लाल तेली या 42 वर्षीय इसमाचा अज्ञात तीन जणांनी खून लाकूड आणि लोखंडी सराटाच्या साहाय्याने खून करण्यात आला आहे. ही घटना रात्री बारा ते एक वाजताच्या सुमारास घडली आहे, तर गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गतच येणाऱ्या गुगुळ पिंपरी येथील अमोल इंगोले या 25 वर्षीय युवकाचा रात्री दोन वाजताच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून गावातीलच नागरिकाने खून केला आहे. या दोनही खून प्रकरणांमध्ये आता गोरेगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खुनाच्या या दोन्ही घटना ने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे
Yavatmal News : यवतमाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील चिंतामणी कॉम्प्लेक्स मधील फोम हाऊस च्या गोडाऊन ला आग
आगीत दुकान जळून खाक, दुकानातील फोम,सोफासेट साहित्य असल्याची माहिती
शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल
Buldhana News : अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी एकलारा बानोदा गावकऱ्यांचा गायराणात ठिय्या आंदोलन. गावकरी आक्रमक झाले असून वन परिक्षेत्र अधिकारी कटारिया यांच्या संगनमताने अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. वन विभाग हाय हाय , कटारिया हाय हाय , अक्षय गजभिये हाय हाय च्या घोषणा करण्यात येत आहेत. वन अधिकारी याठिकाणी येऊन चोरट्यांवर कारवाई करत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहील. असे गावकरी म्हणाले
Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची संसदीय विशेषाधिकार समिती समोर आज सुनावणी पार पडणार आहे. आज होणाऱ्या सुनावणीसाठी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन उपायुक्त शशिकांत सातव उपस्थित राहणार आहेत. यासाठी खासदार नवनीत राणा अमरावतीत दाखल झाल्या आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Petrol diesel rate : मागच्या 16 दिवसांपासून रोज इंधनाचे दर वाढताहेत आजही पेट्रोल आणि डिझेल 83 पैश्यानी महागले असुन यामुळे परभणीत पेट्रोल 123 रुपये 01 पैशावर गेले आहे, तर डिझेल ही 105 रुपये 61 पैशावर पोचले असुन यामुळे आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शेतीमाल वाहतूक आणि दुध याचे दर वाढण्याची शक्यता आहे..
Shirdi News : उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे शिर्डी विमानतळावर आगमन, आज अजित पवारांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्धाटन करण्यात येणार आहे, शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कोपरगाव पोलिस वसाहत तसेच कोपरगाव येथे खा.शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे,
Maharashtra News : कोकणातील रिफायनरीच्या दृष्टीन् आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण धोपेश्वर गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आज रिफानरीबाबत ठराव होणार आहे. यावेळी जवळपास 850 लोक सहभागी होणार आहेत. गावात स्थायिक आणि मतदार असलेल्यांना या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. जवळपास 5 हजार एकर जमिन या गावची असून कोकणातील नवीन जागेची चाचपणी रिफायनरीसाठी सुरू झाल्यानंतर आता या ग्रामसभेच्या ठरावाकडे लक्ष लागून राहिलं आहे. यापूर्वी नाणार येथील प्रकल्प रद्द झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी असं या रिफानरीचं नामकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता धोपेश्वर रिफायनरी असं नाव या रिफायनरीला देण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच गावात होणारा ग्रामसभेचा ठराव लक्षवेधी आहे. सध्या समर्थक आणि विरोधक यांच्याकडून जोरदार मोर्चेंबांधणी आजच्या मतदानाच्या दिवशी करण्यात आली आहे.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याची माहिती आरटीआयमध्ये उघड झाली आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौका राज्यातच राहावी यासाठी, भाजप नेते किरीट सौमय्यांनी निधी जमा केला होता. मात्र हा निधी मिळाला नसल्याचं राज्यपाल कार्यालयाने म्हटलं आहे. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती.
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भुये आणि भुयेवाडी या गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सोमवारी रात्री इथल्या दोन घरावर दरोडे टाकून सहा लाख रुपयांचा ऐवज लुटला. गावातील सीसीटीव्हीत हे दरोडेखोर कैद झाले आहेत. विशेष म्हणजे अंगावर फक्त हाफ पॅन्ट घालून तोंडाला रुमाल बांधून हे दरोडेखोर गावात फिरत होते. याप्रकरणी करवीर पोलिसात नोंद झाली आहे.
Buldhana News : जिल्ह्यात अवैध वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे, आज भर दुपारी जिल्ह्यातील एकलारा बानोदा येथील शासकीय गायरान 35 एकर जमिनीवरील जवळपास 60 ते 70 वर्ष जुने निंबाचे भली मोठी झाडे अज्ञात लोक मेकॅनिकल कटर च्या साहायाने कापून चोरून नेत असताना गावातील जागरूक नागरीकांनी त्यांना हटकलं, त्यावेळी हे अज्ञात पळून गेले, पण त्यांनी पाच ते सहा जुने भले मोठे वृक्ष कापून टाकले होते. यावेळी जागरूक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास विचारणा केली असता त्यांना या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती अथवा त्यांनी परवानगी दिली नसल्याच निष्पन्न झालं. वैधपणे दिवसाढवळ्या भल्या मोठ्या झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी वन मंत्र्यांकडे केली आहे.
Nanded News : नांदेड येथे काल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांची नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे, जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होणार नाही तोपर्यंत व्यवसाय सुरू करणार नसल्याची व्यावसायिकांची भूमिका असणार आहे. बियाणी यांचे कोलंबी येथील गावकरी व जिल्ह्यातील व्यापारी आज पोलीस अधीक्षक कार्यलयात ठिय्या आंदोलन करणार आहेत .
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ, 16 दिवसांतील चौदावी दरवाढ, एक लिटरचे दर काय?
IOCL, Petrol-Diesel Price Today 6 April 2022 : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर 22 मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केवळ 16 दिवसांमध्येच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. आजची दरवाढ ही सोळा दिवसांत झालेली चौदावी वाढ आहे. 22 मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल 10 रुपयांनी महागलं आहे. तसेच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे.
Pune News : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो परंतु झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करत गावातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती.
राजलक्ष्मी नावाच्या मुलीचा जन्म 22 जानेवारी रोजी भोसरी येथे तिच्या आईच्या घरी झाला आणि बाळाला खेडमधील शेलगाव येथे तिच्या घरी नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले, असे मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले, जे व्यवसायाने वकील आहे. ते म्हणतात, "आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे, आमच्या मुलीचे स्वागत विशेष करण्यासाठी आम्ही 1 लाख रुपयांच्या चॉपर राइडची व्यवस्था केली आहे,” मुलीच्या जन्मानंतर तिला हेलिकॉप्टरमधून घरी आणण्यात आलंय
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -