Maharashtra Breaking News LIVE Updates : जव्हार नाशिक रोडवर मोरचुंडी येथे भीषण अपघात, दोन लहान मुलांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Mar 2022 04:51 PM
चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या २ नगरसेवकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या २ नगरसेवकांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश केल्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसलाय. वसंता देशमुख आणि सतीश घोनमोडे अशी काँग्रेस मध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावं असून भिवापूर प्रभागातून भाजपचे हे दोन्ही नगरसेवक निवडून आले आहेत. वसंता देशमुख यांना स्थायी समिती अध्यक्षपद न दिल्याने त्यांची पक्षावर गेल्या अनेक दिवसांपासून नाराजी होती. वसंता देशमुख हे भाजप चे माजी गटनेता असून ४ वेळा नगरसेवक म्ह्णून निवडून आले आहेत. आज संध्याकाळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

Hingoli News : हिंगोली ग्रामीण भागात अवकाळी पाऊस
Hingoli News : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील डीग्रस कऱ्हाळे गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतातील हरभरा ज्वारी कापूस गहू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वातावरणातही गारवा पसरला आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  प्रा. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी  प्रा. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Beed News Update : बीडमधील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्याचा फेर तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश 

Beed News Update : बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्यानंतर या प्रकरणी परळी पोलिसांत कंत्राटदार आणि अधिकारी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले होते. यातील अधिकाऱ्यांविरुध्दच्या गुन्ह्यात पोलिसांनी दोषारोप पाठविले होते. मात्र, कंत्राटदारांविरुध्दचा गुन्हा सी समरी देत बंद केला होता. पोलिसांचा हा सी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळला असून या प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश दिले आहेत.  

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती .सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मालगाडी वरील ताडपत्री उडून ती ओव्हर हेड वायरला अडकली होती. त्यामुळे डाऊन मार्गावरील कल्याण ते आसनगाव दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच तत्काळ ही ताडपत्री बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले तासभरात ही ताडपत्री बाजूला करत वाहतुक पूर्ववत करण्यात आली..

टिटवाळा ते खडवली दरम्यान ओव्हर हेड वायर ला अडकली ताडपत्री मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती .सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली .मालगाडी वरील ताडपत्री उडून ती ओव्हर हेड वायरला अडकली होती .त्यामुळे डाऊन मार्गावरील कल्याण ते आसनगाव दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती .घटनेची माहिती मिळताच तत्काळ ही ताडपत्री बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले तासभरात ही ताडपत्री बाजूला करत वाहतुक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


 

 
रवी राणा यांचा जिल्हा न्यायालयाने केला सशर्त जामीन मंजूर...

आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. रवी राणा यांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. रवी राणा यांचे वकील दिप मिश्रा यांची माहिती..दरम्यान, रवी राणा यांच्यावर मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी आहेत 307 चा गंभीर गुन्हा दाखल आहे..पोलीसांनी आमदार रवी राणा यांनीच कट रचण्याचा आरोप करत केला होता गुन्हा दाखल..


 

ऊस तोड कामगारांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यु, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील घटना 

ऊसतोडीच्या कामासाठी आलेला कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे घडली. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणूका अंकुश जाधव आणि अजय बाळू जाधव अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. हे तिघेही  मूळचे परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर येथील रहिवासी आहे. मोहोळ येथे ते परिवार ऊस तोडीला आल्याने ते त्यांच्यासह आले होते. घरातील सदस्य ऊस तोडीच्या कामासाठी गेल्यानंतर मयत दोन मुली आणि एक मुलगा असे तिघे काल दुपारी आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.

कोणत्याही शेतकऱ्याचा उस शिल्लक राहणार नाही - अजित पवार

कोणत्याही शेतकऱ्याचा उस शिल्लक राहणार नाही यासाठी साखर आयुक्तांना सुचना दिल्या आहेत - अजित पवार उपमुख्यमंत्री

Palghar Accident : जव्हार नाशिक रोडवर मोरचुंडी येथे भीषण अपघात, दोन लहान मुलांचा मृत्यू

Maharashtra Palghar Accident : जव्हार नाशिक रोडवर मोरचुंडी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.  मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे

राणे पिता-पुत्राची आज चौकशी, मालवणी पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

दिशा सालियन प्रकरणात चौकशीसाठी खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे मुंबईतील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आहेत. परंतु त्याआधीच राणे समर्थकांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळालं.

उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, एकाच दिवशी 15 जणांना चावा

उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. सुभाष टेकडी परिसरात एकाच दिवशी 15 जणांना भटक्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. विशेष म्हणजे यात लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सुभाष टेकडी नालंदा शाळेजवळील रस्त्यावर ही मोकाट कुत्रे टोळीने फिरत असल्याने कुत्र्यांच्या या दहशतीमुळे नागरीकांना रस्त्यावरून जाणेही कठीण झाले आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात सिद्दी पठारे, विराज रुपवते, परंजल सुर्यकांबळे, मदन डमके, विशाल म्हस्के, वाल्मिक वाघ, हर्षीत भाटि आणि अहरव सावंत अशी जखमी झालेल्या लहान मुलांची नावे आहेत. जखमी झालेले मुलांवर खाmगी रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


 

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, हवालाची 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त

Nagpur police action : नागपूर पोलिसांनी छापा टाकून हवालाची 4 कोटी 20 लाख रुपययांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी  पोलिसांनी तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतलं आहे. झोन 3 चे  पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासोबतच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

रशियाकडून तात्पुरता युद्धविराम

रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धबंदीची घोषणा करण्यात करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सुरक्षित कॉरिडोर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

IND vs SL LIVE Update : रविद्र जाडेजाचं शानदार शतक, कसोटीतलं दुसरं शतक झळकावलं, भारत मजबूत स्थितीत

IND vs SL LIVE Update : रविद्र जाडेजाचं शानदार शतक, कसोटीतलं दुसरं शतक झळकावलं, भारत मजबूत स्थितीत

नवी मुंबई महापालिकेकडून सायक्लोथॉन 2022 स्पर्धा संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका आणि सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायक्लोथॉन 2022 ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पामबीच मार्गावरील मोराज सर्कल ते नवी मुंबई मनपा मुख्यालय या मार्गावर ही स्पर्धा संपन्न झाली. नवी मुंबई शहरातील शेकडो नागरिकांनी या सायक्लोथॉन स्पर्धेत सहभागी होत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवण्याचा निश्चय केला. नवी मुंबई महानगर पालिकेने गेल्या काही वर्षात स्वच्छ भारत अभियानात 'टॅाप फाय'मध्ये स्थान मिळवले आहे. मात्र या वर्षी पहिला नंबर पटकावण्यासाठी विविध पद्धतीने जनजागृती करुन नागरिकांचा सहभाग वाढवला जात आहे.

कोल्हापुरातील 14 वर्षीय पठ्ठ्याचा विक्रम, सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला 97 किमी अंतर 19 तास 33 मिनिटं सलग पोहून पार केलं
कोल्हापुरातील एका 14 वर्षीय पठ्ठ्याने सिंधुदुर्ग किल्ला ते विजयदुर्ग किल्ला पोहून जागतिक विक्रम नोंदवला आहे. गुरुप्रसाद मोरे असं या शालेय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने 19.33 तास सलग पोहून 97 किलोमीटरचे अंतर पार केलं आहे. सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग या जलमार्गावर पहिल्यांदाच हा विक्रम झाला आहे. सलग 19 तास 33 मिनिटे पोहून एक साहसी टप्पा पूर्ण केला आहे. गुरुप्रसादच्या या विक्रमाची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. इतक्या कमी वयात अशा पद्धतीचा जलमार्ग पार करणारा गुरुप्रसाद हा देशातील एकमेव जलतरणपटू आहे.

 
विना परवाना जिलेटीन ची वाहतूक करणे महागात पडले;  83 जिलेटीन कांड्या सह  42 हजारांचा मुद्देमाल जप्त

Hingoli : विनापरवाना 83 जिलेटिन च्या कांड्यांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी दोघांना नाटक सुद्धा केली आहे.रात्री गस्ती दरम्यान वसमत पोलिसांनी वसमत कुरूंदा रोडवर एका दुचाकीस्वाराला अडवून काय वाहतूक करत असल्याची विचारणा केली उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता दुचाकीवरील पिशवीमध्ये 83 जिलेटिन च्या कांड्या असल्याचं आढळून आला आहे या काढण्यासाठी कुठलाही परवाना नव्हता आणि कोणतीही सुरक्षा न बाळगता या कांद्याची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यावरून पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात वसमत पोलिस गुन्हा दाखल केला आहे तर दोघे जणांना पोलिसांनी केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारुसह 51 लाखांचा मुद्देमाल जप्त



गोव्यातून अनधिकृतपणे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक करताना इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर अवैध दारु वाहतुकीच्या कारवाईत 41 लाख 40 हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण 50 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र चालक फरार झाला. गोव्यातून मध्यप्रदेशच्या दिशेने जाणार्‍या सहा चाकी वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला. गाडीमध्ये एकूण 552 बॉक्स (27600 बाटल्या) आढळून आल्या. एकूण 41 लाख 40 हजार रुपये आहे. दारु वाहतुकीसाठी वापरलेली 9 लाख 50 हजार रुपयांची गाडी असा एकूण 50 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




 
दौंडमध्ये पाच इसमांकडून 4 गावठी पिस्तुल, 1 रिवॉल्व्हर, 13 जिवंत काडतुसे जप्त
गेल्या काही दिवसापासून विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्यविरोधात पुणे पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. काल दौंड तालुक्यातील पाच इसमांकडून चार गावठी पिस्तुल, 1 रिवॉल्व्हर, 13 जिवंत काडतुसे असा एकूण 2 लाख 91 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल यवत पोलिसांनी जप्त केला आहे. दौंड तालुक्यातील राहू गावात काही इसम गावठी पिस्तुल घेऊन उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दिनेश मोरे, अभिषेक शिंदे, अमोल नवले, सचिन चव्हाण आणि परमेश्वर कंधारे यांची झडती घेतली. त्यांच्याकडून 4 गावठी पिस्तुल, 1 रिवॉल्व्हर आणि 13 जिवंत काडतुसे सापडली. 2 लाख 91 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल यवत पोलिसांनी जप्त केला आहे. यासर्व आरोपींना यवत पोलिसांनी अटक केली आहे. तसेच ही गावठी पिस्तुल कशासाठी आणले होते? कुठून आणले होते? आधी याची विक्री केली आहे का यांचा तपास यवत पोलीस करत आहेत. 

 
माझे फोन आताही टॅप होत आहेत. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न, संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : माझे फोन आताही टॅप होत आहेत. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न, संजय राऊतांचा आरोप https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Raigad : महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची सांगता; मंदीर परीसरात  शेकडो भाविकांची गर्दी

Raigad : महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची सांगता झाली आहे. मंदीर परीसरात  शेकडो भाविकांची गर्दी उसळली. श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची मध्यरात्री सांगता झाली.सासण काठी, पालखीसह वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवामध्ये सहभागी झाला होता.

पार्श्वभूमी

Weather : उत्तर भारतात पावसाची शक्यता, तर महाराष्ट्रात तापमानात झालेल्या वाढीमुळं उकाडा वाढला


India Weather : सध्या देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असल्याचे दिसत आहे.


महाराष्ट्रात चंद्रपूर, अहनदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. याठिकाणी ताापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. तापमान वढल्याने उकाडा वाढला आहे. काही ठिकाणी ढगाळ वतावरण झाल्याने सोमवारी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.


नेत्यांच्या विरोधातील फौजदारी खटल्यांची माहिती सादर करा; हायकोर्टाचे राज्य सरकारला


 


मुंबई : राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित असलेल्या आणि हायकोर्टानं स्थगिती दिलेल्या खटल्यांची तपशीलवार माहिती द्या, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आजी-माजी सर्व खासदार व आमदारांच्या विरोधातील प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या प्रश्नावर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं स्युमोटो याचिका दाखल केली आहे. सोमवारपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील चार विभागातील कनिष्ठ न्यायालयात लोकप्रतिनिधींविरोधात 51 खटले प्रलंबित आहेत.  त्यात  प्रमुख्याने मुंबई 19, नागपूर 9, औरंगाबाद 21, गोवा 2 आदींचा समोवश आहे. 


राज्यातील जिल्हा पातळीवर कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटले

मुंबई 201 ,नागपुर 126 औरंगाबाद 157 गोवा 20


जिल्हानिहाय सर्वाधिक खटले अमरावती  45 परभणी 40 तर सर्वात कमी खटले गडचिरोली 0, लातूर 1 जिल्ह्यामध्ये आहेत.


Russia Ukraine War : मोदीजी आम्हाला वाचवा नाहीतर आमचा जीव जाईल, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आर्त विनवणी


Russia Ukraine Conflict :  युक्रेन-रशियामध्ये (Ukraine-Russia War)युद्ध सुरू आहे,  युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनच्या सुमी शहरात तब्बल 900 भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत. या शहरात दर तासाला रशियाकडून बॉम्बहल्ले होत असल्यानं विद्यार्थी धास्तावले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्न तर सोडाच, पण साधं पाणीही  प्यायला नसल्यानं रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  त्यामुळं हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आले असून मोदीजी आम्हाला वाचवा, अन्यथा आमचा जीव जाईल, अशी आर्त विनवणी  युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.