Maharashtra Breaking News LIVE Updates : सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांची तडीपारी रद्द

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Mar 2022 06:27 PM
Pm Visit to pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी करणार आंदोलन, परंतु, राजशिष्टाचारानुसार अजित पवार पंतप्रधान मोदींच्या स्वागताला राहणार उपस्थित   

Pm Visit to pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 मार्च रोजीच्या पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. परंतु, राजशिष्टाचारानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान मोदींच्या स्वागताला उपस्थित राहणार आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. परंतु, फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करणे म्हणजे महाराजांचा अपमान असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणं आवश्यक असल्याची राष्ट्रवादीने मागणी केली आहे.फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय न बदलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय. 

Ukraine: रायगड जिल्ह्यातील आणखी 4 विद्यार्थी युक्रेनहून मायदेशी परतले

युक्रेनमध्ये अडकलेले कर्जत, पेण, पनवेल आणि तळा येथील चार विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले. अनुजा जायले - कर्जत, प्रेरणा दिघे - पेण, अद्वैत गाडे -पनवेल, यश काळबेरे- तळा हे चार विद्यार्थी आज मायदेशी परतले आहेत. आजमितीस रायगड जिल्ह्यातील एकूण दहा विद्यार्थी युक्रेन येथून परतले. अद्याप 22 विद्यार्थी युक्रेनमधून परत येणे बाकी आहेत.

Solapur : सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांची तडीपारी रद्द

Maharashtra Solapur :  सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांची तडीपारी रद्द करण्यात आले आहे.  पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तडीपारी रद्द करण्याचे  आदेश  दिले होते.  भाजप नगरसेवक आणि विद्यमान उपमहापौर असलेल्या राजेश काळे यांच्यावर सोलापूर शहर पोलिसांनी केली होती 

Beed News Update : बीडमधील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश पवारच्या पोलीस कोठडीत वाढ

Beed News Update : बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणातील बीडमधील माजी नगरसेवक सतीश पवार याची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी ( 5 मार्चपर्यंत) वाढविण्यात आली आहे. सतीश पवार याला पोलिसांनी 2 मार्च रोजी अटक केली होती.  

Palghar : केळवे समुद्रात पाच जण बुडाले, तिघांना बाहेर काढण्यात यश दोघांचा मृत्यू

Palghar : केळवे येथील समुद्रात पाच जण बुडाले असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे मात्र यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही दोन जण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, बेपत्ता असलेल्या दोघांना शोधण्यासाठी स्थानिक पर्यटक व्यवसायिक व मच्छिमारच समाजातील मंडळी युद्ध पातळीवर शोध घेत आहेत,

नवाब मलिक यांना जामीन नाकारला, 7 मार्चपर्यंत ईडी कस्टडी

नवाब मलिक यांना न्यायालायने जामीन नाकारला आहे. त्यांना आता 7 मार्चपर्यंत ईडी कस्टडी ठेवण्यात येणार आहे. 

बुलढाण्यातील सर्वात मोठी सैलानी यात्रा यंदाही रद्द

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली सैलानी यात्रा या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे सलग तिसऱ्या वर्षीही सैलानी यात्रा रद्द झाली आहे. हिंदू-मुस्लीम एकतेचं प्रतिक असलेल्या सैलानी यात्रेला देशभरातून लाखो भाविक येतात. होळीच्या दिवशी रायपूर सैलानी याठिकाणी सैलानी दर्ग्याच्या परिसरात ही यात्रा भरवली जाते. भाविकांनी यात्रेला येऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Chandrapur News Updates : कन्यका बॅंकेच्या 16 संचालकांवर गुन्हे दाखल, बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्कवार आणि चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा समावेश
Chandrapur News Updates : कन्यका बॅंकेच्या 16 संचालकांवर गुन्हे दाखल, बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्कवार आणि चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा समावेश

 

विदेशात राहणाऱ्या व्यक्तीचा नागपूर येथील भूखंड तोतया व्यक्ती आणि बोगस कागदपत्र तयार करुन गहाण ठेवल्या प्रकरणी चंद्रपूर येथील कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या ६ संचालकांसह एकूण १६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. यात बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्कवार आणि चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा देखील समावेश आहे. इलेक्ट्रिक अभियंता असलेले मनोहर कऱ्हाळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांच्या मालकीचा खामला परिसरात भूखंड होता. १९६५ ला नोकरीनिमित्त ते अमेरिकेत स्थायिक झाले. मात्र जून २०२० ला कन्यका नागरी सहकारी बँकेच्या सीताबर्डी  शाखेने मनोहर कऱ्हाडे यांचा भूखंड लिलावास काढला. त्यानंतर बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलीस तपासात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्निल भोंगाडे याने बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून मनोहर कऱ्हाडे नावाची तोतया व्यक्ती उभी करून तो भूखंड गहाण ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्या भूखंडावर १ कोटी २५ लाखांची उचल करण्यात आली. मात्र कन्यका बँकेने हे सर्व आरोप फेटाळले आहे. त्यांच्या मते सरकारी यंत्रणेने कर्जबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावरच कर्जाची रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेने या प्रकरणात कुठलाच गैरव्यवहार केलेला नाही.
Chandrashekhar Bawankule : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी सोबत बेईमानी केली.

Chandrashekhar Bawankule : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी सोबत बेईमानी केली. आधीच न्यायालयाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करा आणि आरक्षण द्या असे सांगितले होते.. महाविकास आघाडी सरकारने ते केले असते तर आज ही वेळ आली नसती...

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन; कोपरगाव आणि वैजापूर तालुक्याच्या सीमेवर शेकडो शेतकरी एकवटले

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन करत आहेत. कोपरगाव आणि वैजापूर तालुक्याच्या सीमेवर शेकडो शेतकरी एकवटले आहेत. धोत्रे गावाजवळ ट्रॅक्टर घेऊन कुटुंबासह शेतकरी महामार्गावर पोहोचले. प्रस्तावित नवनगर ( कृषी समृद्धी केंद्रासाठी ) गट नंबर वगळावेत या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. महामार्गालगतची सुमारे साडे पाच हजार एकर जमीन होणार भूसंपादन. या भूसंपादना विरोधात शेतकरी आक्रमक झाले.
मागण्या लवकर पूर्ण न केल्यास महामार्गाचे काम बंद पाडण्याचा आंदोलक शेतक-यांचा इशारा.

Nawab Malik : मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टापुढे नवाब मलिक हजर ; रिमांड वाढवून मागण्याची शक्यता

Nawab Malik :  नवाब मलिकांना रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टापुढे हजर केलं. पुढील चौकशीसाठी ईडी रिमांड वाढवून मागण्याची शक्यता. पहिल्या रिमांडमधले काही दिवस मलिक रूग्णालयात दाखल होते या आधारावर कस्टडी वाढवून मागण्याचा ईडीचा प्रयत्न असणार. 

ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला

नवी दिल्ली : देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाही, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

Shirdi : समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, भूसंपादनाला विरोध

समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. कोपरगाव आणि वैजापूर तालुक्याच्या सीमेवर शेकडो शेतकरी एकवटले आहेत. धोत्रे गावाजवळ ट्रॅक्टर घेऊन कुटुंबासह शेतकरी महामार्गावर आले आहेत. प्रस्तावित नवनगर ( कृषी समृद्धी केंद्रासाठी) गट नंबर वगळावेत या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. महामार्गालगतची सुमारे साडे पाच हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. परंतु या भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागण्या लवकर पूर्ण न केल्यास महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

नांदेडमधील माहूरगड इथल्या श्रीरेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी भीषण आग

नांदेडमधील माहूरगड येथील श्रीरेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी भीषण आग लागली. नगरपंचायतीचे अग्निशमन पथक वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर गडाच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून पातळखण, ओटी, विडा प्रसाद विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची 110 दुकाने आहेत. तर मंदिराच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल असल्याने उन्हाळ्यात पानझड होऊन उन्हामुळे सुकलेल्या झाडांच्या पानांना आग लागून वनवा पेटण्याच्या घटना नेहमीच्याच आहेत. या आगीत वन संपत्तीसह वन्य प्राण्यांंचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. दरम्यान काल रात्री दहा वाजताच्या सुमारास मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दुकानाच्या मागील बाजूस आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले होते. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी या घटनेची माहिती नगरपंचायतीच्या अग्नीशमन दलास देऊन अग्निशमन वाहनांसह  पथक घटनास्थळी दाखल झाले. यात नगर पंचायतच्या पथकासह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळलीय.


 
Jhund : सोलापुरातील चित्रकार प्रतिक तांदळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तुरीच्या भुसकटचा वापर करत झुंडची भव्य प्रतिमा साकारली

Jhund : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित चित्रपट झुंडचं अनेकांकडून कौतुक होतय. प्रत्येकाला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. उद्या रिलीज होणाऱ्या या चित्रपटला सोलापुरातील कलाकारांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यात. सोलापुरातील चित्रकार प्रतिक तांदळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तुरीच्या भुसकटचा वापर करत झुंडची भव्य प्रतिमा साकारली आहे. जवळपास 35 फूट बाय 50 फूट एवढी आकराची ही प्रतिमा बनवली आहे. तुरीच्या भुसकटाचा वापर करून बनवलेल्या प्रतिमा साकरण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी लागला लागला असल्याची माहिती चित्रकार प्रतीक तांदळे याने दिली.


 

बेळगावात गॅरेजला भीषण आग, लाखोंचं नुकसान
बेळगाव शहरातील येडियुरप्पा मार्गावरील गॅरेजला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागून त्यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याचे पाहून नागरिकांनी लगेच अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी लगेच दाखल झाले आणि त्यांनी प्रयत्नांची शर्थ करुन आग विझवली. गॅरेजमध्ये ऑईल, ग्रीस आदी साहित्य असल्याने आग लगेच भडकली. शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांचे देखील आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. गॅरेजच्या आजूबाजूला बरीच दुकाने आहेत. अग्निशामक दलाने लगेच धाव घेऊन आग विझवल्यामुळे अन्य दुकानांना आगीची झळ पोहोचली नाही.

 

 
Prayagraj : गोष्ट अमिताभ यांनी लढवलेल्या निवडणुकीची! काय आहेत अमिताभ वेळचे किस्से? ABP Majha

Pawankhind: 'पावनखिंड'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पावनखिंडच्या कलाकारांशी गप्पा ABP Majha

Maharashtra Corona Guidelines : राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक

Maharashtra Corona Guidelines : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकारनं 14 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील (Maharashtra Unlock) करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश नाही. त्यामुळं ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार इत्यादी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांना राज्य सरकारच्या नव्या निर्णयाचा लाभ होणार नाही. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Budget Session 2022 : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

Maharashtra Budget Session 2022 : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Maharashtra Corona Guidelines : राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक; काय सुरु, काय बंद?


Maharashtra Corona Guidelines : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकारनं 14 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील (Maharashtra Unlock) करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश नाही. त्यामुळं ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार इत्यादी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांना राज्य सरकारच्या नव्या निर्णयाचा लाभ होणार नाही. 


मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांसह 14 जिल्ह्यांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून म्हणजेच, 4 मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून राज्य सरकारचा नवा निर्णय लागू होईल. या निर्णयानुसार, 14 जिल्ह्यांत नाट्यगृहं, सिनेमागृहं, रेस्टॉरंट्स-बार, व्यापारी संकुलं, क्रीडा संकुलं, जलतरण तलाव, धार्मिक स्थळं, पर्यटनस्थळं आणि मनोरंजन पार्कस 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे.


मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्यानं आता केंद्र सरकारनं नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे.  इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम होणार आहे. 


Maharashtra Budget Session 2022 : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत


Maharashtra Budget Session 2022 : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. 


राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे. काल (बुधवारी) दोन्ही बाजूंकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची बैठकही मुंबईत झाली. या बैठकीत भाजपनं अधिवेशनाची रणनीती आखली असून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. 


महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर विरोधी पक्षाच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक असणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहामध्ये गाजणारा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. यासह, आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचारचे आरोप, भाजप नेते किरीट सौमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर या आणि अशा अनेक मुद्द्यांवर यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.