Maharashtra Breaking News 03 June 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jun 2022 10:11 PM
Nashik : नाशिकच्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा उपअभियंता दीड लाखाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात 

नाशिकच्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा उपअभियंता दीड लाखाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला आहे. अमोल घुगे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता अमोल घुगे उपअभियंता कामाची टक्केवारी घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक, सुधीर मुनगंटीवार यांचे निधन 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे वयाच्या 93 व्या वर्षी नागपुरात निधन झाले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विदर्भातील जुन्या पिढीतील प्रख्यात डॉक्टर होते.  

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाकरता परवानगी अर्ज कोर्टात दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाकरता परवानगी अर्ज कोर्टात दाखल


नवाब मलिकही राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याकरिता परवानगी अर्ज सादर करणार


6 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात होणार सुनावणी


राज्यसभेच्या 6 जागांकरता 10 जूनरोजी विधानभवनात होणार मतदान


अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत

रोहित पवारांनी आपल्या उंची प्रमाणे बोलावं ; प्रवीण दरेकरांचा टोला 

रोहित पवारांनी आपल्या उंची प्रमाणे बोलावं. आता त्यांची सुरुवात झाली आहे. गोपीनाथ मुंडे आता हयात नाहीत. त्यांच्या संदर्भात वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अजित पवार नेहमी म्हणतात वाद-विवाद करु नका त्यापेक्षा लोकांचे कामं करा. त्यामुळे तुम्ही देखील तसं काही करु नये. तुम्ही तुमच्या घरातील काळजी घ्या. सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेत आहेत, त्यासाठी त्या अभिषेक करत आहेत. अजित पवार देखील त्याच रांगेत आहेत. त्यामुळे पवारांमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे तुम्ही आधी पक्क करा, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. 

Ashadhi Wari 2022 : आज रुक्मिणी मातेची पालखी सासरी पंढरपूरला निघणार

आषाढी एकादशीला दरवर्षी रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. 400 वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे. कोरोना नंतर प्रथमच आज सायंकाळी 5 वाजता पायदळी पालखी निघणार आहे. 10 पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीची माहेरची पालखी आहे. टाळ मृदंग, वीणाच्या गजरात भगवा पताका घेऊन आणि श्री नामाच्या जयघोषात वारकरी बांधव यात सहभागी होणार आहे. या पालखीचे जागोजागी स्वागत आहे.

बूस्टर डोस बाबत गैरसमज पसरवणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले

बूस्टर डोस ही घ्या. मी आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेनी ही घेतला. तर मगाशी मला माजी महापौर योगेश बहलांनी विचारलं, बूस्टर डोस घेतला की खूप त्रास होतो. आता मला भीती दाखवत होता की शंका उवस्थित करत होता, हेच मला कळेना. आता मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन डोस घेतला. मी म्हटलं अरे योगेश डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यायची असते. उगाच काहीही गैरसमज पसरवायचे नसतात. (एकच हशा पिकला) आता मी डोस घेऊन चोवीस तास ही उलटले नाहीत अन हा मला असं सांगतोय. आता काहींना त्रास होत असेल पण डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस घ्यायलाच हवा

शरद पवारांवर टीका करणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले

अनेक जण उचलली जीभ लावली टाळ्याला असं करतात. पवार साहेबांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यावर काहीही उठसुठ आरोप करतात. देशातील मोठे नेते पवार साहेबांचं नाव सन्मानाने घेतात. अशा व्यक्ती वर नको ते आरोप करतात. अशांकडे लक्ष देऊ नका, असे अजित पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते. 

मिरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा दिलासा

मिरा भाईंदरमधून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा अंतरिम  दिलासा


15 जूनपर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना निर्देश


ठाणे सत्र न्यायलयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात  घेतली होती धाव


नरेंद्र मेहता यांच्याविरोधातील कथित बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल


मेहता आणि त्यांच्या पत्नीवर 19 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे


मेहता यांनी 8 कोटी पेक्षा अधिक रकमेची अपसंपदा जमा केल्याचा आरोप

Maharashtra Sangli News आटपाडी तालुक्यातील विभुतवाडीत छोटा हत्ती आणि बोरवेल वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू
Maharashtra Sangli News  - सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी  येथे कराड पंढरपूर महामार्गावर बोरवेल वाहतूक करणारा ट्रक व छोटा हत्ती यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. जखमींना मायणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.  
BJP : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा अंतरिम  दिलासा, 15 जूनपर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना निर्देश

मिरा भाईंदरमधून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा अंतरिम  दिलासा. 15 जूनपर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना निर्देश. ठाणे सत्र न्यायलयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात  घेतली धाव होती. नरेंद्र मेहता यांच्याविरोधातील कथित बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहता आणि त्यांच्या पत्नीवर 19 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.  मेहता यांनी 8 कोटी पेक्षा अधिक रकमेची अपसंपदा जमा केल्याचा आरोप आहे.

Nagpur Maharashtra News : उपराजधानीच्या वेशीवर दूषित पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा, अनेक वेळा तक्रार करून ही परिस्थिती जैसे थे..

Nagpur Maharashtra News : महाराष्ट्राची तहान भागवणारा आणि वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपराजधानीच्या सीमेवर वसलेल्या वाडी शहरातील पाणी पुरवठ्याबद्दल झोपी गेला आहे.. कारण गेले अनेक दिवस नागपूर-अमरावती महामार्ग लगत वसलेल्या वाडी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये फक्त दूषितच नाही... तर आरोग्यास अत्यंत अपायकारक असे जंत आणि किडे मिश्रित पाणी वाडीकरांना पुरवत आहे..ॲटॉमिक एनर्जी डेपो रोडवर वसलेल्या लाइफस्टाइल टाऊनशिप, लेकव्यू अपार्टमेंट आणि त्यालगतच्या आंबेडकर नगरात गेले अनेक दिवस पिण्याचा पाणी दूषित, मळकट आणि नारू सारखे जंत असलेला येत आहे.. अशीच स्थिती रमाबाई चौक, पंचशील चौक आणि सम्राट चौकच्या अवतीभवती वसलेल्या घरांची आहे... त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे... दूषित आणि किडलेल्या पाण्यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा अत्यंत गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे...


असे नाही की परिसरातील नागरिकांनी याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरनाच्या अधिकाऱ्यांना दिलेली नाही... अनेक वेळेला फोनवर नागरिकांनी दूषित पाण्याची माहिती दिली... काहींनी प्रत्यक्ष भेटून आणि दूषित पाण्याचे फोटो आणि व्हिडिओ अधिकाऱ्यांना पाठवूनही परिस्थिती जैसे थे आहे... त्यामुळे महाराष्ट्राची तहान भागवण्याचा दावा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाडीमध्ये पाण्यासह आजारांचा पुरवठाही करू पाहत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.. 


गेले अनेक दिवस तक्रार करूनही मुख्य पाईप लाईनमध्ये लिकेजची समस्या आहे, त्यात बाहेरचा दूषित पाणी मिसळला जात आहे आणि त्याच्या दुरुस्तीचे काम करत आहोत, एवढच प्रशासकीय उत्तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी देत आहे... त्यामुळे स्वतःच्या वातानुकूलित कार्यालयात बसलेले आणि शुद्ध पाणी पिणारे अधिकारी जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत आवश्यक मुद्द्यासंदर्भात कुंभकर्णी झोपेत आहे का असा सवाल वाडीतील नागरिकांनी विचारत आहे...

Muktai Palkhi Updates : मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे मुक्ताईचे जयघोषात मोठ्या उत्साहाने पंढरपूर कडे प्रस्थान

वारकरी संप्रदायात महत्वाचे स्थान असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे मुक्ताईचे जयघोषात मोठ्या उत्साहाने पंढरपूर कडे प्रस्थान झाले आहे.  आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या दर्शन सोहळ्यात सात संतांच्या मानाच्या पालख्या या दाखल होत असतात,यातील स्त्री संत म्हणुन संत मुक्ताई पालखीचं एक वेगळ महत्व आहे. जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर तालुक्यातील कोठली या संत मुक्ताई चे समाधी स्तळ पासून ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असते. यावेळी सातशे किलोमीटर आणि चौतीस गावांचा पाई प्रवास करीत हजारो वारकरी या मध्ये पंढरपूर कडे दर्शना साठी वारी मध्ये सहभागी होत असतात. आज पहाटे पासूनच पालखी प्रस्थान सोहळ्याची विधिवत जय्यत तयारी करण्यात आली होती,यावेळी दर्शना साठी मोठ्या संख्येने वारकरी संत मुक्ताई चे समाधी स्थळी दाखल झाले होते

Nana Patole LIVE : गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पेटून उठेल : नाना पटोले
Nana Patole LIVE : जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर जायची वेळ येते तेव्हा तेव्हा गांधी परिवाराला आणि नेहरु परिवाराला टार्गेट करण्याचा  प्रयत्न भाजप कडून केला जातो असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते अमरावतीत बोलत होते..

 

भाजप गांधी परिवाराला बदनाम करण्यासाठी या पद्धतीचा एक यशस्वी प्रयत्न आहे असही पटोले म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदीच भाजप सरकार करत आहे, केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात येत आहे, सातत्याने 2014 पासून आपण या सरकारची भूमिका पाहिली आहे आणि त्याच्यामुळे गांधी परिवारातील साधा हातही लावू शकत नाही, या परिवाराची त्यागाची भूमिका या देशातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे आणि ज्या दिवशी या लोकांनी गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रासह देशातल्या काँग्रेस कार्यकर्ता आणि सामान्य माणूस पेटून उठेल आणि मग किती लोकांना जेलमध्ये जावे लागणार आहे म्हणून त्याच्या वाटेला जाऊ नका हा आमचा प्रामाणिक आणि प्रेमाचा सल्ला केंद्रात मोदी सरकारला आहे असं वक्तव्य पटोले यांनी अमरावतीत केलं..

 
Chandrapur Maharashtra News : वाघांच्या हल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा पुढाकार
Chandrapur Maharashtra News :  

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात सुरू असलेल्या वाघांच्या हल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. शोभाताई आज स्थानिक ग्रामस्थांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात पोचल्या आणि वाघांच्या हल्ल्यांवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मूल तालुक्यात वाघांचे हल्ले सुरु असलेल्या करवन, काटवल आणि आजूबाजूच्या गावांमध्ये वनविभागाने सोलर कुंपण, झुडपांची कटाई, गस्त वाढविणे आणि रस्त्यांची डादडुजी सारख्या उपाययोजना तातडीने करण्याचे मान्य केले आणि ग्रामस्थांनी वनविभागाला या कामासाठी १० दिवसांची मुदत दिली. सोबतच वाघाचा बंदोबस्त करण्यात न आल्यास वाघाला मारण्याची मागणी करू असा देखील शोभाताई फडणवीस यांनी इशारा दिलाय.
गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावर दर्शन घेताना खासदार प्रीतम मुंडे यांना अश्रू अनावर

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन गोपीनाथ मुंडे यांनी हयातभर बहुजनांचे आणि वंचितांचे अश्रू पुसण्याच काम केलं. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातून त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल झालेत. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांना समाधीस्थळावर दर्शन घेताना अश्रू अनावर झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावरील समाधीस्थळावर गोपीनाथ मुंडे यांच्या काही दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जो संघर्ष केला त्याच संघर्षाची साक्ष देणारे फोटो या ठिकाणी लावण्यात आले आहेत गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हे फोटो पाहून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची आठवण होत आहे.

Nashik Maharashtra News : मेंढपाळ करणाऱ्या आई आणि लेकीचा विहिरीत पडून मृत्यू

Nashik Maharashtra News : मेंढपाळ करणाऱ्या आई आणि लेकीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या ईगतपुरी तालुक्यात घडलीय. तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात मोनिका गोयकर ही पंधरा वर्षीय मुलगी आपल्या आईसमवेत गुरुवारी दुपारी मेंढ्यांची तहाण भागवण्यासाठी काठोकाठ भरलेल्या एका विहिरीवर गेली होती याचवेळी मोनिकाचा पाय घसरल्याने ति विहिरीत पडली आणि हे बघताच तिला वाचविण्यासाठी आई पपाबाई गोयकारने प्रयत्न सुरू करताच त्या देखिल विहीरीत पडल्या. हे बघताच मोनिकाच्या लहान भावाने आरडाओरड सुरू करताच गावकरी इथे गोळा तर झाले मात्र त्यापूर्वीच या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वाडीवर्हे पोलिसांनी याबाबत घटनास्थळी येऊन पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय.

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी

#BREAKING : महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी, राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा, फडणवीसांसह मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांची उपस्थिती 



Sanjay Raut : कलम 370 हटवूनही काश्मीरमधील परिस्थिती गंभीर; शिवसेना नेते संजय राऊत यांचे वक्तव्य

Sanjay Raut : कलम 370 हटवूनही काश्मीरमधील परिस्थिती गंभीर आहे. सध्या इतर पक्षांचे सरकार असते तर भाजपने मोठा कांगावा केला असता अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटायला निघालं, राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चेसाठी भेट

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटायला निघालं, राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चेसाठी भेट

पिंपरी-चिंचवडमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे हॉकी अकादमीचे उदघाटन

पिंपरी-चिंचवडमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे हॉकी अकादमीचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हॉकी खेळण्याचा मोह आवरता आला नाही, हॉकी स्टिकने अजित पवार यांनी तीन गोल केले

मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील इन्सुलीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

Sindhudurg News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली कुडवटेम्ब येथे पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने पादचाऱ्याना धडक दिली. या धडकेत इन्सुली कुडवटेम्ब येथील महादेव झाट्ये या जागीच मृत्यू झाला. तर विलास कुडव हे गंभीर जखमी झाले. जखमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. कारमधील युवक पर्यटनासाठी गोवा येथे जात होते. तर पादचारी दोघेही रस्त्याच्या कडेला उभे होते. उभ्या पादचाऱ्यांना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या कारने धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी बांदा पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू, कोल्हापुरातील उचगावमधली घटना

Kolhapur News : वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील उचगावमध्ये घडली. आमेश काळे अस मृत रुग्णाचं नाव आहे. या प्रकरणी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा भरपावसात सीपीआर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आमेशवर गेल्या वर्षभरापासून सुरु होते. तो घरीच व्हेंटिलेटरवर होता. वीजबिल थकीत असल्याने 30 मे रोजी आमिशच्या घरचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला होता. गेल्या दोन दिवसापासून शेजार्‍यांकडून वीज घेऊन व्हेंटिलेटर सुरु होतं. मात्र बुधवारी सायंकाळी सर्वच वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर बंद होऊन आमिशचा मृत्यू झाला.

Kolhapur Maharashtra News : वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू, कोल्हापुरातील उचगावमधील धक्कादायक घटना

Kolhapur Maharashtra News : वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णाचा मृत्यू, कोल्हापुरातील उचगावमधील धक्कादायक घटना, आमेश काळे असं मृत रुग्णांचं नाव, महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा भरपावसात सीपीआर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या श्‍वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात, फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आमेश वर गेल्या वर्षभरापासून सुरू होते घरीच व्हेंटिलेटरवर उपचार, वीजबिल थकीत असल्याने 30 मे ला आमिशच्या घरचा  वीजपुरवठा महावितरणने केला होता खंडित, गेल्या दोन दिवसापासून शेजार्‍यांकडे वीज घेऊन सुरु होतं व्हेंटिलेटर , मात्र बुधवारी सायंकाळी सर्वच वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर बंद होऊन झाला आमिशचा मृत्यू

गोंदियात जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकल थॉनचे आयोजन
Gondia News : गोंदियात जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून नेहरु युवा मंचच्या वतीने आज सायकल थॉनचे आयोजन करण्यात आले. गोंदिया शहरातील शेकडो सायकलपटूंनी या उपक्रमात सहभाग घेत सायकल चालविण्याचा आनंद लुटला. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडत असताना याचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्य सुदृढ राहावे म्हणून लोकांनी दर दिवशी आर्धा तास तरी सायकल चालवावे हा या मागचा उद्देश आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी या सायकल थॉनला हिरवा झेंडा दाखवीत सुरुवात केला.
जागतिक सायकल दिनानिमित्त केडीएमसीकडून सायकल रॅली

Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आज 'जागतिक सायकल दिन' निमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होण्यासाठी सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचया उद्देशाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. ठाकुर्ली म्हसोबा चौक ते कल्याण पश्चिम गांधारी चौकपर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली होती. या सायकल रॅलीमध्ये महापालिका अधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली शहरातील विविध सायकलिंगच्या संस्थांनी भाग घेतला होता.

बेळगाव : नाटकात महादेवाची भमिका करणाऱ्या पात्राची गळ्यात जिवंत नाग साप गळ्यात घालून रंगमंचावर एन्ट्री
Belgaon News : नाटकात महादेवाची भूमिका करणाऱ्या पात्राने गळ्यात जिवंत नाग साप गळ्यात घालून रंगमंचावर एंट्री घेतल्याने सहकलाकार गर्भगळीत झाले. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील संकोनटी गावात घडली आहे. संकोनटी येथील इंचगेरी मठामध्ये जगज्योती बसवेश्वर नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी रंगमंचावर संगीताची साथ देणारे कलाकार देखील उपस्थित होते. जेव्हा महादेवाचे पात्र करणाऱ्या कलाकाराने एन्ट्री घेतली त्यावेळी सगळ्यांना धक्काच बसला. महादेवाच्या वेशभूषेतील कलाकाराने गळ्यात चक्क जिवंत नाग घातलेला प्रेक्षकांना आणि सहकलाकारांना पाहायला मिळाले. रंगमंचावरील कलाकार देखील घाबरले पण महादेवाची भूमिका करणाऱ्या पात्राने मात्र गळ्यात जिवंत नाग घालून संवाद म्हटले. सध्या या कलाकाराची आणि नाटकाचीच चर्चा अथणी तालुक्यात सुरु आहे.
Wardha Maharashtra News : मलातपूर शेतशिवारात  कुक्कुटपालनातील तब्बल 1 हजार 340 कोंबड्यांच्या मृत्यू

Wardha Maharashtra News :  देवळी तालुक्यातील मलातपूर शेत शिवारात असलेल्या विजयगोपाल येथील युवा शेतकरी सागर पजगाडे यांच्या अचानक तब्बल 1 हजार 340 कोंबड्यांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मलातपुर गावाजवळ सागर पजगाडे यांचे 8 हजार पक्ष्यांचे कुक्कुट पालनाचे शेड असून सायंकाळच्या सुमारास त्यांना अनेक पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला याबाबत सांगितले.. तसेच पुलगाव पोलीस स्टेशनला देखील माहिती दिली.. उष्णतामान वाढल्याने ह्या कोंबड्यांच्या मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून 1 जून रोजी दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत वीज वितरण विभागाने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे हा अनर्थ घडला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. मरण पावलेल्या कोंबड्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले असून अचानक मोठे नुकसान झाल्याने शेतकरी सागर पजगाडे हे पुरते हवालदिल झाले आहेत

काश्मीरमधील टार्गेट किलिंगवर अमित शाह यांनी उच्चस्तरिय बैठक बोलवली

काश्मीरमध्ये गोळीबाराच्या घटना सुरुच आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह टार्गेट किलिंगचा आढावा घेणार आहेत. काल मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बाहेरुन आलेल्या दोन नागरिकांवर गोळीबार केला आहे. दोघंही जखमी आहेत. काल कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली होती. गेल्या 21 दिवसांत काश्मीरमध्ये सात टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

आज सकाळी 10 वाजता मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान जळगावहून पंढरपूरकडे होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संकटामुळे ही पालखी केवळ चाळीस वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूर रवाना झाली होती. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शेकडो दिंड्या, पालख्या आणि हजारो वारकरी संत मुक्ताईच्या पालखीसह पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहेत. 

मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

आज सकाळी 10 वाजता मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान जळगावहून पंढरपूरकडे होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संकटामुळे ही पालखी केवळ चाळीस वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूर रवाना झाली होती. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शेकडो दिंड्या, पालख्या आणि हजारो वारकरी संत मुक्ताईच्या पालखीसह पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहेत. 

मास्कबाबत येत्या 15 दिवसांत निर्णय

निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या, असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. काल राज्यात 1045 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर, मुंबईत 704 रुग्णांचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच्या टास्कफोर्सच्या बैठकीत केलंय. मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली.

राज ठाकरेंच्या आदेशानुसार भोंग्याबाबत पत्रवाटप

राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज भोंग्याबाबतचं पत्रवाटप होणार आहे. राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट करत मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या पत्रात 'मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा', असं म्हटलंय. हे पत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. 

गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन

भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असून या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडेही गोपीनाथ गडावर दर्शनाला जाणार आहेत.


 

राज्यसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सस्सीखेच सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर एका उमेदवारानं माघार घेतली नाही तर ही लढत अटीतटीची होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार का हे आज स्पष्ट होईल.

पार्श्वभूमी

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राज्यसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सस्सीखेच सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर एका उमेदवारानं माघार घेतली नाही तर ही लढत अटीतटीची होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार का हे आज स्पष्ट होईल.
 
गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन
भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असून या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडेही गोपीनाथ गडावर दर्शनाला जाणार आहेत.


राज ठाकरेंच्या आदेशानुसार भोंग्याबाबत पत्रवाटप
राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज भोंग्याबाबतचं पत्रवाटप होणार आहे. राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट करत मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या पत्रात 'मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा', असं म्हटलंय. हे पत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. 


मास्कबाबत येत्या 15 दिवसांत निर्णय
निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या, असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. काल राज्यात 1045 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर, मुंबईत 704 रुग्णांचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच्या टास्कफोर्सच्या बैठकीत केलंय. मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली.


मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
आज सकाळी 10 वाजता मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान जळगावहून पंढरपूरकडे होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संकटामुळे ही पालखी केवळ चाळीस वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूर रवाना झाली होती. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शेकडो दिंड्या, पालख्या आणि हजारो वारकरी संत मुक्ताईच्या पालखीसह पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहेत. 


काश्मीरमधील टार्गेट किलिंगवर अमित शाह यांनी उच्चस्तरिय बैठक बोलवली
काश्मीरमध्ये गोळीबाराच्या घटना सुरुच आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह टार्गेट किलिंगचा आढावा घेणार आहेत. काल मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बाहेरुन आलेल्या दोन नागरिकांवर गोळीबार केला आहे. दोघंही जखमी आहेत. काल कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली होती. गेल्या 21 दिवसांत काश्मीरमध्ये सात टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.


आएनएस निःशंक आणि आयएनएस अक्षय सेवामुक्त होणार
भारतीय नौदलात पराक्रम, शौर्य गाजविण्याऱ्या आयएनएस निःशंक, आयएनएस अक्षय या दोन युद्धनौका सेवामुक्त होणार आहेत. भारतीय नौदलात 32 वर्षे गौरवशाली सेवा बजावणाऱ्या आणि भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या या दोन युद्धनौकाना नेव्हल डॉकयार्ड येथे सूर्यास्ताच्या वेळी निरोप दिला जाणार आहे.


पुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस
पुणतांबा धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज मोफत दूध वाटप सह शिल्लक उसाची होळी करत शेतकरी सरकारचा निषेध करणार आहेत. याशिवाय पथनाट्यातून कृषीकन्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहेत. कृषीमंत्री दादासाहेब भुसे येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 
 
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्योगपतींचा भव्य ग्राऊंड ब्रेकींग सेरेमनी
आज लखनऊ या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्योगपतींचा भव्य ग्राऊंड ब्रेकींग सेरेमनी होणार आहे. यावेळी सगळे बडे उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे


‘सम्राट पृथ्वीराज’ आज रिलीज 
अक्षय कुमार आणि मनुशी छिल्लरचा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ आज रिलीज होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.