Maharashtra Breaking News 02 September 2022 : Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घेतली भेट

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Sep 2022 11:02 PM
साताऱ्यात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू 

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तासवडे गावातील धक्कादायक घटना घडलीय. विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तीघांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये माय लेक आणि चुलत्यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने तासवडे गावावर शोककळा पसरली आहे.  

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घेतली भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. 



Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घेतली भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. 



जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला. सकाळपासून तिसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवला. जायकवाडी धरणाचे आणखी सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. 


एकूण 25 दरवाज्यातून 79 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. गोदावरी नदीकाठच्या गावांची चिंता वाढली, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

नागपूर वर्धा रोडवर चिचभुवन परिसरात कारचा अपघात, एकाचा मृत्यू  

नागपूर वर्धा रोडवर चिचभुवन परिसरात कारचा अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी असून ते आज दुपारी खापरी परिसरातील कॉलेजमधून नागपूरच्या दिशेने येत होते. यावेळी हा अपघात झाला.  

 पुण्यात 14 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

पुण्याच्या धायरी परिसरात एका 14 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. प्रणव रोहिदास निवंगुणे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Raigad Rope way : रायगड रोपवे तांत्रिक देखभालीसाठी 5 ते 10 सप्टेंबर कालावधीत बंद राहणार

Raigad News :  किल्ले रायगडावर जाण्यासाठी अत्यंत सोयीची असलेली रायगड रोपवे (Raigad Rope way) ही सुविधा दुरुस्तीच्या कामासाठी 5 ते 10 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे

Vasai News : वसईत वृत्तपत्र आणि टिश्यू पेपरपासून साकारली बाप्पांची मूर्ती; पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आगळी वेगळी संकल्पना

Vasai News : यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा होत असताना, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ही अनेक मंडळं पुढे आली आहेत. त्यातीलच वसईच्या बाभोळानगर येथील बाभोळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वृत्तपत्र आणि टिश्यू पेपरपासून बाप्पांची मूर्ती साकारली आहे. चार फुटांच्या या मूर्तीचं वजन हे अवघं 19 ते 20 किलो आहे. या मंडळाचं यंदाचं हे 19 वं वर्ष आहे. आणि यावेळी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी त्यांनी ही आगळी वेगळी संकल्पना मांडली आहे. 

नाशिकच्या कॉलेजरोडवरील HPT कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी

नाशिकच्या कॉलेजरोडवरील HPT कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. संत कबीर नगर आणि शरणपूर रोडवरील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यातून दोन्ही गटात मारहाण झाली. हाणामारीत धारदार शस्त्रांचा देखील वापर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  
 

Vasai News : वसईतील कामण गावात 'एक गाव एक गणपती' संकल्पना; 34 वर्षांपासूनची अविरत परंपरा

Vasai News : वसई पश्चिमेकडील कामण गावात गेल्या 34 वर्षांपासून 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना अविरतपणे आजही सुरु आहे. कामणचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारं हे मंडळ यंदा आपलं 34 वं वर्ष पूर्ण करत आहे. येथील ग्रामीण भागातील गणेशभक्तांना मुंबईच्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणं अधिक खर्चिक होत असल्याने येथील मंडळाने 2009 पासून लालबागच्या राजाची प्रतिकृती विराजमान करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातून अनेक गणेशभक्त या ठिकाणी येत असतात. आणि आपल्या राजाला नारळाचा नवस अर्पण करुन, आपल्या इच्छा पूर्ण करण्याची साद घालत असतात. या गावात प्रत्येक सण एकत्रितच साजरे केले जातात. अशी गावची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. 

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश

सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. तपासात सहकार्य करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 

Mumbai Bhandup Rape: 9 वर्षीय चिमुकलीवर दोन 65 वर्षीय नराधमांकडून अत्याचार, दोघे पोलिसांच्या ताब्यात

भांडुप पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 9 वर्षीय चिमुकलीवर दोन 65 वर्षीय नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 9 वर्षीय निराधार बालिकेच्या गरीबीचा फायदा घेत आप्पा उर्फ अशोक एकनाथ वारुंगसे, दिनेश रामजी ठक्कर आणि एक अनोळखी इसम यांनी लैंगिक अत्याचार केले असल्याचं समोर आहे. या अत्याचाराची माहिती एका समाजसेवी संघटनेला कळल्यावर त्यांनी पुढाकार घरात त्या बालिकेला विश्वासात घेत माहिती घेत याबाबत भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला . गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे

Mumbai Goa Highway Accident : मुंबई- गोवा हायवेवर कशेडी घाटात ट्रकचा अपघात...

Mumbai Goa Highway Accident : मुंबई- गोवा हायवेवर कशेडी घाटात ट्रकचा अपघात...मुंबईच्या दिशेने येणारा ट्रक सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला.. क्लोरीन सिलेंडर घेऊन रोह्याच्या दिशेने येणारा ट्रक दरीत कोसळला... आज सकाळच्या सुमारास ट्रकचा अपघात, ट्रकचालक गंभीर जखमी...जखमी ट्रक चालकाला मुंबई येथील रुग्णालयात नेण्यात आले...

Pune E bus : पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन, ई-बसेसचे लोकार्पणही यावेळी केले जाणार 

पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन, ई-बसेसचे लोकार्पणही यावेळी केले जाणार 

NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्लीत दोन दिवसीय अधिवेशन, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्लीत दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये 10 आणि 11 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी औपचारिक निवडणूक पार पडणार आहे.  शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. पक्षाची पुढची रणनीती काय असावी याबाबत अधिवेशनात चर्चा होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी प्रमुख पदाधिकारी बैठक आणि 11 सप्टेंबर रोजी शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. 

ऐन गणेशोत्सवात बेस्टच्या कंत्राटी चालकांचं अचानक काम बंद आंदोलन तर बेस्ट सेवा सुरळीत झाल्याचा बेस्ट प्रशासनाचा दावा

ऐन गणेशोत्सवात आज बेस्टच्या कंत्राटी चालकांनील अचानक काम बंद आंदोलन केल्यानं मुंबईतल्या काही भागात बेस्ट वाहतुकीवर परिणाम झाला. विक्रोळी, कुलाबा, वडाळा, कुर्ला डेपोतील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती कंत्राटी बस चालकांनी दिली. बेस्टचा पास मिळत नसल्यानं त्यांनी हे आंदोलन केल्याचं सांगण्यात येतंय. तर बेस्ट सेवा सुरळीत झाल्याचा दावा बेस्ट  प्रशासनानं केलाय. 

Raigad News Live: उरणनजीक एसटी बसचा अपघात, तीन म्हशींचा मृत्यू

Uran ST Bus Accident News Live: उरणनजीक एसटी बसचा अपघात, तीन म्हशींचा मृत्यू, पनवेल-उरण मार्गावर एसटीची म्हशींना धडक, दास्तान फाट्याजवळ 4 म्हशी आणि एका रेड्याला धडक, गुरुवारी रात्रीच्या सुमारास एसटीचा अपघात , उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

एनडीआरएफची एक टीम लालबागच्या राजाच्या मंडळासाठी तैनात

एनडीआरएफची एक टीम लालबागच्या राजाच्या मंडळासाठी तैनात करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईत ५-६ टीम आहेत. मात्र, लालबागच्या राजा परिसरात होणारी गर्दी बघता कोणती प्राकृतिक आपदा घडू नये यासाठी सुरक्षा कर्मचारी आणि मुंबई पोलिस तैनात आहेत. मात्र, कोणती प्राकृतिक आपदा घडल्यास त्याकरीता एनडीआरएफची एक टीम तैनात केली गेली आहे. 

Jalna News : भाजप नगरसेविकेच्या पतीकडून MSEB च्या ऑफिसची तोडफोड





जालना जिल्ह्यातील मंठा येथील भाजप नगसेविकेच्या पतीने वार्डातील ट्रान्सफार्मर विद्युत कर्मचारी दुरुस्त करत नसल्याच्या तक्रारीवरून MSEB च्या ऑफिस मध्ये धुडगूस घालून तोडफोड केली. शेषेराव दवणे असे नगरसेविकेच्या पतीचे नाव असून जवाहर कॉलनी भागात ऐन गणपतीमध्ये दोन दिवस ट्रान्सफार्मर दुरूस्त होत नसल्याने कार्यालयात जाऊन हा धुडगूस घातला. 


 

 



 


चंद्रपूर : बल्लारपूर शहरात भाजपनेत्यावर विनयभंगाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल

चंद्रपूर : बल्लारपूर शहरात भाजपनेत्यावर विनयभंगाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल, आपल्या कंप्यूटर इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर विनयभंगाचा केला प्रयत्न, संजय वाजपेयी असे बल्लारपूर भाजपच्या शहर सचिवाचे नाव, बल्लारपूर पोलीस ठाण्यात संजय वाजपेयी विरोधात छेडछाड व पोक्सोचा गुन्हा दाखल, घटनेची माहिती कळताच वाजपेयीच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन स्थानिकांनी संजय वाजपेयी याची केली धुलाई, या घटनेनंतर बल्लारपूर शहरात काही काळ होते तणावाचे वातावरण, बल्लारपूर पोलीस करत आहेत घटनेचा अधिक तपास

Mumbai High Court: बिल गेट्स आणि अदार पूनावाला यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. कोरोना लसीचा दुष्परिणाम झाल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका

Mumbai High Court: बिल गेट्स आणि अदार पूनावाला यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. कोरोना लसीचा दुष्परिणाम झाल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका

मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं  दर्शन

यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं  दर्शन करवण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून 2 सप्टेंबर आणि 7  सप्टेंबर या तारखांची निवड करण्यात आलेली आहे. आज एमटीडीसी च्या वतीने लालबागच्या राजाचं यासोबतच गिरगावच्या राजाचं आणि माटुंगेच्या जीएसबी गणपतीचं या सर्व कॉन्सिलेट जनरल यांना दर्शन करवण्यता येईल. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा स्वतः लालबागचा राजाच दर्शन घेते वेळी या सर्व शिष्टमंडळासोबत उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती देताना एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय महासंचालक जयश्री भोज म्हणाल्या की या उपक्रमाचं हे पहिलं वर्ष आहे. या उपक्रमामुळे नक्कीच परदेशातील नागरिकांपर्यंत गणेशोत्सवाबाबत माहिती पोहचेल आणि या उपक्रमाला पुढील वर्षी मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळेल

स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचे धाेरण ठरवा, खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश

भाषा संचालनालयाच्या माध्यमातून यापुढील काळात प्रत्येक परीक्षा मराठीतूनच घेण्याविषयीचे धाेरण राज्य शासनाने ठरवावे. त्याअनुषंगाने पुढील तारखेपर्यंत शपथपत्र दाखल करावे. तर यासंदर्भाने महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगानेही राज्य शासनाशी सल्लामसलत करावी: औरंगाबाद खंडपीठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांतचे अनावरण

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर असून आज भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौकेचे अनावरण करणार असून ही नौका आज नौदलाच्या ताफ्यात सामिल होणार आहे. पंतप्रधान कोची शिपयार्ड लिमिटेडमध्ये पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांत देशाला समर्पित करणार आहेत. या कार्यक्रमात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 1.30 वाजता मंगळुरूतील 3800 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्धाटन करणार आहेत. 

आशिया चषकमध्ये पाकिस्तान आणि हॉंगकॉंग भिडणार

आशिया चषकमध्ये आज पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्यामध्ये करो या मरो अशी लढत होणार आहे. विजेता संघ सुपर 4 साठी पात्र ठरेल तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे. अ गटामध्ये भारताने पहिल्या क्रमांकारवर विराजमान आहे. ब गटामध्ये अफगाणिस्तान अव्वल स्थानी आहे. 

तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी 

तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी 2 वाजता होणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन देण्याचे संकेत दिले होते. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमध्ये तिस्ता सेटलवाड यांनी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दंगे घडवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या दोन महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत. 


 

पार्श्वभूमी

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांतचे अनावरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर असून आज भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौकेचे अनावरण करणार असून ही नौका आज नौदलाच्या ताफ्यात सामिल होणार आहे. पंतप्रधान कोची शिपयार्ड लिमिटेडमध्ये पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांत देशाला समर्पित करणार आहेत. या कार्यक्रमात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 1.30 वाजता मंगळुरूतील 3800 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्धाटन करणार आहेत. 


उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नोंदणी आणि मुद्रांक भवनाचे भूमिपूजन 


पुण्यातीलविधान भवनासमोरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी आणि मुद्रांक भवनाचे भूमिपूजन आणि मोबाईल ॲप, नवीन संकेतस्थळ तसेच इतर ई-सुविधांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 3.15 वाजता होणार आहे. 


जम्मू काश्मीरमधील हिंदूंच्या झालेल्या हत्येसंबंधी SIT च्या मागणीवर सुनावणी


जम्मू काश्मीरमध्ये 1990 ते 2003 या दरम्यान हिंदूंच्या झालेल्या हत्यांची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी करत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 









तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी 


तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी 2 वाजता होणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन देण्याचे संकेत दिले होते. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीमध्ये तिस्ता सेटलवाड यांनी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दंगे घडवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या दोन महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत. 


आशिया चषकमध्ये पाकिस्तान आणि हॉंगकॉंग भिडणार


आशिया चषकमध्ये आज पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्यामध्ये करो या मरो अशी लढत होणार आहे. विजेता संघ सुपर 4 साठी पात्र ठरेल तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे. अ गटामध्ये भारताने पहिल्या क्रमांकारवर विराजमान आहे. ब गटामध्ये अफगाणिस्तान अव्वल स्थानी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.