Maharashtra Breaking News LIVE Updates : सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार, मुख्यमंत्र्यांची दांडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
माजी राज्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असून आज नाईक यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली आहे तर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
Amravati News : अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज न्यायालयात जमिनावर पूर्ण युक्तीवाद झाला. उद्या सरकारी वकील आणि पोलीस जवाब सादर करणार आहेत. आमदार रवी राणा यांचे वकील दीप मिश्रा यांनी ही माहिती दिली.
Maharashtra News : नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा नाही. मलिकांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीनं वेळ मागितला आहे. नवाब मलिकांच्या याचिकेवर हायकोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.
Maharashtra Budget Session : उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra Budget Session) सुरुवात होतेय. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर रंगल्याचं चित्र आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना अजित पवारांना टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही. अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही. पण आता कनेक्शन कापले जात आहेत. यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
(सविस्तर बातमी वाचा- https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-budget-session-devendra-fadnavis-on-ajit-pawar-in-mumbai-bjp-meeting-1037409)
Aurangabad News : औरंगाबाद वाळूज MIDC भागातील IAPA ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आग, आगीचे कारण समजू शकले नाही, अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
Mumbai News : उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra Budget Session) सुरुवात होतेय. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर रंगल्याचं चित्र आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना अजित पवारांना टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही. अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही. पण आता कनेक्शन कापले जात आहेत. यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
Buldana : बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 09 विध्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेली होते. सध्या 07 विध्यार्थी अडकलेले आहेत. 02 विध्यार्थी भारतात परत आले आहेत. त्यातील एक घरी पोहचला तर दुसरा मुंबईतील नातेवाईकांकडे आहे.
Pune News : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्यासोबत पालकांची पुण्यात बैठक, ज्यांची मुलं युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्यासोबत बैठकीचे आयोजन, बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद उपस्थित, परराष्ट्र राज्यमंत्री सर्व पालकांचे म्हणणं एकूण घेणार
एसटी विलीनीकरण संदर्भातील तीन सदस्यीय समितीचा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार, या अहवालाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळण्याची शक्यता
हा अहवाल उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर मंत्रीमंडळांची काय भुमिका अशी विचारणा न्यायालयाने केली होती
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात हा अहवाल सादर करणार
Nashik Breaking - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक , शालिमार परिसरात शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेचा रास्ता रोको, जय भवानी जय शिवाजी, राज्यपाल चले जाव, राज्यपाल हाय हायच्या घोषणा, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख, शहराध्यक्षांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित, पोलिस बंदोबस्तही तैनात, पोलिसांची बघ्याची भूमिका
Pune News Updates : राष्ट्रीय महामार्ग नंबर चार अर्थात जुना पुणे-मुंबई महामार्ग भाजपने रोखून धरला. शेतकऱ्यांना विना नोटिसा देत वीज कनेक्शन तोडल्याचा आरोप करत भाजप ने रास्ता रोको केलाय. वडगाव मावळच्या प्रवेश द्वारावर हा मोर्चा येऊन धडकला आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे. मावळ तालुका प्रशासन भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढत आहे.
Maharashtra Amravati News : अमरावती : आमदार रवी राणा यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल, अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांचा अटकपूर्व जामिनासाठी अमरावती जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे अर्ज दाखल...आज दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी त्या अर्जावर होणार सुनावणी...
Pune News Updates : शौचालयाची टाकी साफ करताना तीन तरुण टाकीत पडले, तिघांचाही मृत्यू झाल्याचं समोर, लोणी काळभोर परिसरातील हॉटेल प्यासा जवळील घटना, पोलिस घटनास्थळी दाखल, एका तरुणाला वाचवण्यात पोलिस आणि अग्निशामक दलाला यश
Mumbai News : शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे यांना त्यांच्या वृद्ध आईला भेटण्यास हायकोर्टाची परवानगी, सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात असलेले तेलतुंबडे यांना 8 आणि 9 मार्च रोजी आईला चंद्रपूरमध्ये भेटण्यास हायकोर्टानं परवानगी दिली, तेलतुंबडे यांना पोलीस सुरक्षेत पुन्हा 11 मार्चला तळोजा तुरुंगात परत आणण्याचे निर्देश, जाण्या येण्याचा खर्च तेलतुंबडे यांनी स्वत: करावा, तर पोलीस सुरक्षेचा खर्च राज्य सरकारनं करण्याचे निर्देश
Sachin Vaze News : चांदिवाल आयोगाविरोधातील याचिका सचिन वाझेनं बिनशर्त मागे घेतली, सचिन वाझेनं वकिलांना लेखी परवानगी दिली, मुंबई उच्च न्यायालयाच्या तंबीनंतर वाझेची माघार, आयोगाला दिलेले चार अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात वाझेनं केली होती हायकोर्टात याचिका, मात्र योग्य माहिती लपवत असल्याबद्दल खंडपीठानं वाझेच्या वकिलांना झापलं, न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाचे ताशेरे
#BREAKING OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही; सुनावणी उद्या होण्याची शक्यता, ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या विकास गवळी यांच्या वतीने अजून एक याचिका दाखल
यूक्रेन-रशियाच्या युद्धामुळे भारतीय शेअर बाजाराची आज पुन्हा खराब सुरुवात, सेन्सेक्सचा निर्देशांक ६९२ अंकांनी खाली, तर निफ्टी देखील १७३ अंकांनी घसरला
Russia-Ukraine War : युक्रेनच्या सीमा ओलांडून शेजारील देशांमध्ये सुटकेच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांसाठी आता वायूदल सक्रीय झालंय. वायूदलाचं सी-17 ग्लोबमास्टर हे विमान आज पहाटे 4 वाजता रोमानियाची राजधानी बुखारेस्टकडे रवाना झालंय. रोमानिया, पोलंड, हंगेरी या देशांच्या सीमांवर हजारो भारतीय कडाक्याच्या थंडीत मदचीची प्रतीक्षा करत आहेत. खासगी विमान कंपन्यांच्या विमानांसोबत आता वायूदलही मिशन गंगामध्ये सक्रीय झालंय. काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीही सी-17 ग्लोबमास्टर या विमानाचा वापर करण्यात आला होता.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Mumbai School Reopen : आजपासून मुंबईतील सर्व शाळा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेनं सर्व शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. आजपासून म्हणजेच, 2 मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ आणि पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक काही दिवसांपूर्वी बीएमसीकडून जारी करण्यात आलं आहे.
परिपत्रकात पालिकेनं म्हटलं आहे की, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमांच्या नगरबाह्य विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्यात याव्यात.
मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -