Maharashtra Breaking News LIVE Updates : इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास सुरुवात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Apr 2022 11:20 PM
साई पालखीचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू

साई पालखीचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री घाटकोपर च्या भटवाडी विभागातून शिर्डीकडे साई पालखी रवाना झाली होती.या पालखीचा पहिला मुक्काम ठाणे येथे होता. त्यामुळे ठाणे पर्यंत घाटकोपर मधील अनेक साई भक्त पालखी सोबत गेले होते. मध्य रात्री एक वाजताच्या दरम्यान पालखी चे दर्शन घेऊन साई भक्त घाटकोपरकडे रवाना होऊ लागले.यात संकेत आणि त्याची मैत्रीण श्रेया हे केटीएम दुचाकी वरून निघाले. भरधाव वेगात ते घाटकोपर च्या दिशेने येत असताना चालक संकेत चा दुचाकीवरील तोल गेला आणि तो एका माणसानी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर बस समोर कोसळला.टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्नांन गाडी वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो टेम्पो ट्रॅव्हलर ही रस्त्यात उलटला.या भीषण अपघातात संकेत आणि श्रेया हे दूर वर दुचाकीसह फरफटत गेले आणि गंभीर जखमी झाले.या वेळी त्यांच्या मागून येणाऱ्या इतर साई भक्तांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सायन च्या टिळक रुग्णालयात दाखल केले.तर टेम्पो ट्रॅव्हलर मधील प्रवासी देखील जखमी झाले होते त्यांना देखील सायन च्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मात्र संकेत वर उपचार करण्या आधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तर श्रेया वर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज  तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे घाटकोपर मध्ये आणि साईभक्तांमध्ये मात्र शोककळा पसरली आहे.


 


 

Ramadan 2022 :  इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास सुरुवात

Ramadan 2022 :  इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास सुरुवात झाली आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने रमजान महिन्यास सुरुवात झाली. उद्या असेल रमजानचा पहिला रोजा (उपवास) आहे.  सोलापूरच्या रुयते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी ही माहिती दिली आहे. 

Sangli News Update : सांगलीतील विजयनगरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते  लोकार्पण

Sangli News Update : सांगली : सांगलीतील विजय नगर मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते  लोकार्पण, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात,  , शिवसेनेचे उदय सामंत, शंभूराजे देसाई यासह अनेक मंत्री उपस्थित

Prabhakar Sail Death: प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे माहिती

Prabhakar Sail  Death:  आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. 

पुण्यात राज्यातील पहिली पर्यायी इंधन परिषद, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

पुण्यामध्ये राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचे आयोजन करण्यात आला आहे. या परिषदेचं उद्घाटन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी देखील केली. त्याचप्रमाणे पुण्यात बनलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या इका इ 9 या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन देखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मराठी भाषेचा ठसा कुणी पुसायचा प्रयत्न केला तर त्याला अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

मराठी भाषेचा ठसा कुणी पुसायचा प्रयत्न केला तर त्याला अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी जनसंबोधन करताना त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीत घरवापसी

शरद पवार यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी पुन्हा हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवाजीराव नाईक यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाचं कौतूक केलं. केवळ शरद पवारचं महाराष्ट्राचं विकास करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्राला बदनाम करु नका, आम्ही सर्वजण एकत्र : मुख्यमंत्री ठाकरे

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं वातावरण तयार केलं जातं सरकारमध्ये अजिबात मतभेद नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. आज जीएसटी भवनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली यावेळी ते बोलतं होते. गेले काही दिवस राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात फूट पडल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. यावर भाष्य करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडले. 

दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ मालगाडी रुळावरुन घसरली, रेल्वे वाहतूक काही तास ठप्प 

दौलताबाद रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे रुळावरुन 8 डब्बे घसरल्याची घटना घडली. त्यामुळे रेल्वे वाहतूक काही तास ठप्प राहणार आहे. जालना-दादर जनशताब्दी औरंगाबाद ते दादर रद्द करण्यात आली आहे. सर्वांना तिकिटं रद्द करुन पूर्ण रक्कम परत करण्यात येणार आहे. नरसापूर नगरसोल एक्सप्रेसवरच्या प्रवाळांना महामंडळच्या बसने नगरसोल किंवा शिर्डी येथे पोहचविण्यात येणार आहे. DRM नांदेड यांच्यासह इतर अधिकारी दौलताबाद येथे दाखल झाले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड , सिकंदराबाद मुख्यालय येथे घटनेची आणि घटनास्थळी CCTV बसवून थेट माहिती घेत आहेत.


कोणती गाडी कुठे


रोटेगाव काचीगुडा पैसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर


जालना दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर


निजामाबाद पुणे पैसेंजर औरंगाबाद स्टेशनवर 


अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर


 रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


 

Janshatabdi Train Update : जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द,  सर्वांना तिकिटं रद्द करून पूर्ण रक्कम परत 

Janshatabdi Train Update : जालना-दादर जनशताब्दी औरंगाबाद ते दादर रद्द करण्यात आली आहे.  सर्वांना तिकिटं रद्द करून पूर्ण रक्कम परत करण्यात येणार आहे.  नरसापूर नगरसोल एक्सप्रेसच्या प्रवाशांना महामंडळच्या बसने नगरसोल किंवा शिर्डी येथे पोहचविण्यात येणार आहे.  DRM नांदेडसह इतर अधिकारी दौलताबाद येथे दाखल झाले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड , सिकंदराबाद मुख्यालय येथे घटनेची आणि घटनास्थळी CCTV बसवून थेट माहिती घेत  आहेत.

मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांचे हाल, पेट्रोल पंप बंद असल्यानं गैरसोय

मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांचे हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरभर फिरुनही इंधन मिळत नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
दुचाकीला धक्का मारण्याची वेळ येत आहे.

मातृभाषेच्या मंदिराचं भूमिपुजन करत असल्याचे समाधान : मुख्यमंत्री

मातृभाषेच्या मंदिराचं भूमिपुजन करत असल्याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. काही जबाबदाऱ्या अशा असतात की, आयुष्याचं सार्थक होतं असं हे काम आहे. 
मुंबई लढून मिळवली आहे. मराठी म्हटले की संघर्ष आलाच असे ठाकरे म्हणाले. माझे आजोबा पहिल्या पाच लढवय्यांमध्ये होते. शिवसेनाप्रमुख व्यंगचित्रकार होते. मला आज आनंद होतो की माझं नाव आज या पाठीवर लागले, ज्यांच्या कुटुंबियांचं योगदान मराठी आणि महाराष्ट्रासाठी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. 

पैसे मागितल्याची व्हिडिओ क्लिप; बीडीओंचा प्रभार काढला

Washim news  :  वाशिमच्या मानोरा ग्रामपंचायतीच्या सभामंडपाच्या 2 लाख रुपयांच्या बिलाची रक्कम सब कंत्राटदारला अदा करण्यासाठी बिडीओ सुधाकर पंडे यांनी 8 हजार रुपयांची लाच मागितली आहे. पैसे मागितल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान पंचायत समितीचे बिडीओ सुधाकर पंडे यांनी पैसे मागितल्याचा व्हिडिओ समाधान जाधव यांनी तयार केला आहे. दरम्यान, पंडे यांचे सोमनगर नागरिकांशी उद्धट वागणे व पैसे मागितल्याचे पुरावे सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत सादर केले होते. त्यामुळे सुधाकर पंडे यांचा प्रभार तातडीने काढण्यात आला आहे. तसेच सोमवारी सखोल चौकशी करण्यात येईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये घोटाळा, खोटी नोंद करुन लसीकरणाचे प्रमाणपत्र वाटप

औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये आणखी एक घोटाळा समोर आला आहे. कोविन अॅपवर खोटी नोंद करुन लसीकरणाचे प्रमाणपत्र वाटप केल्याचे समोर आले आहे. जवळपास 70  ते 80 नागरिकांना लस न घेताच कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिली आहेत. कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हा घोटाळा केला आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivajirao Naik NCP : शिवाजीराव नाईक यांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, शरद पवार यांच्या उपस्थितीत घरवापसी

शिवाजीराव नाईक यांचा शरद पवार यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

थोड्यात वेळात शरद पवारांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

आज माजी मंत्री आणि भाजपचे नेते शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याचे त्यांनी सांगितले होते. 

Aurangabad News : औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये आणखी एक घोटाळा आला समोर, कोविन अॅपवर खोटी नोंद करून लसीकरणाचे प्रमाणपत्र वाटप 

Aurangabad News : औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये आणखी एक घोटाळा आला समोर, कोविन अॅपवर खोटी नोंद करून लसीकरणाचे प्रमाणपत्र वाटप 


जवळपास ७० ते ८० नागरिकांना लस न घेताच कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले


कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केला मिळून घोटाळा


सिडको एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल

Nashik News : नाशिकात आज पेट्रोलपंप बंद असल्यानं पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

नाशिकात आज पेट्रोलपंप बंद असल्यानं पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या निषेधार्थ पेट्रोल पंप चालकांचा एकदिवसीय संप 

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणार

सांगली : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. नाईक यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे.

जावयाकडून सासऱ्याचा दगडाने ठेचून खून, पत्नी सासरी पाठवत नसल्याचा राग

यवतमाळ : पत्नीला सासरी नांदायला पाठवत नाही म्हणून चक्क जावयाने सासऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळमधील बाभूळगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथे ही घटना घडली आहे. पत्नीचे वडील तिला सासरी पाठवत नाहीत याचा राग मनात ठेवून जावयाने सासऱ्याची दगडाने ठेचून हत्त्या केली. प्रेम विवाहानंतर पत्नीवर संशय घेत असल्याने पत्नी माहेरी गेली होती. सुधाकर शिवणकर असं आरोपी जावायाचे नाव असून विश्राम वयले असं (55 वर्ष) मृत सासऱ्याचे नाव आहे.

Aurangabad News: औरंगाबाद: औरंगाबाद-मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत, दौलताबाद स्टेशनजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले

Aurangabad News: औरंगाबाद: दौलताबाद स्टेशनजवळ मालगाडीचे 8 डब्बे रुळावरून घसरले; औरंगाबाद-मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत, सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारासची घटना

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पार्श्वभूमी

Mumbai Metro 7 And Mumbai Metro 2A : गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. 


पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू
मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत. 


 

शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई 
मेट्रोच्या उद्घाटनाआधीच श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजपच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून 'काम केलंय मुंबईने पाहिलंय' असं लिहिण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना काळात सुरू झालं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय.


मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार


'मेट्रो 2 अ' हा  18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत. 


'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके 


मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.