Pankaja Munde LIVE : गोपीनाथ गडावरुन प्रत्येक घडामोडींचे LIVE Updates

Gopinath Munde Birth Anniversary : गोपीनाथ गडावरुन LIVE Updates, समर्थकांची गर्दी, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स पाहा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jun 2022 04:05 PM
मध्यप्रदेश सरकारकडून महाराष्ट्र सरकरने काहीतरी शिकावे : पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे कोतुक केले. परंतु, याचवेळी राज्य सरकारवर देखील त्यांनी टीका केली. मध्य प्रदेश सरकारकडून महाराष्ट्र सरकारने काही तरी शिकावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

Pankaja Munde : पराभव खूप काही शिकवून गेला : पंकजा मुंडे

'सध्या सुरू असलेलं राजकारण पाहून मन व्यथित होतं. मला काही मिळेल अशी अपेक्षा मी कधीच केली नाही. परंतु, माझा जो पराभव झाला, त्यातून मी खूप काही शिकले अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Pankaja Munde गोपीनाथ मुंडे नाहीत याची खंत : पंकजा मुंडे

मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, गोपीनाथ मुंडे नाहीत याची खंत आहे, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. 

Pankaja Munde : ओबीसी आरक्षणावरून शिवराज सिंह सरकारकडून पंकजांकडून कौतुक

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे कौतुक केले. मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली,  पण मुंडे साहेब नसल्याची खंत वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. 

गोपीनाथ गडावर शिवराजसिंह चौहान यांची उपस्थिती

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. 

Pritam Munde : : गोपीनाथ गड समाधीस्थळावर दर्शन घेताना खासदार प्रीतम मुंडे यांना अश्रू अनावर



Pritam Munde : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन गोपीनाथ मुंडे यांनी हयातभर बहुजनांचे आणि वंचितांचे अश्रू पुसण्याच काम केलं. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातून त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल झालेत. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांना समाधीस्थळावर दर्शन घेताना अश्रू अनावर झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावरील समाधीस्थळावर गोपीनाथ मुंडे यांच्या काही दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जो संघर्ष केला त्याच संघर्षाची साक्ष देणारे फोटो या ठिकाणी लावण्यात आले आहेत गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हे फोटो पाहून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची आठवण होत आहे.




Gopinath Munde Birth Anniversary : संधी मिळाली तर सोनं करणार, भाषणापूर्वी पंकजा मुंडेंचे सुचक वक्तव्य

Pankaja Munde Live : विधान परिषदेची अपेक्षा नाही, मात्र संधी मिळाली तर सोनं करणार, भाषणापूर्वी पंकजा मुंडेंचे सुचक वक्तव्य केले आहे.

Pankaja Munde LIVE : गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे कोणती घोषणा करणार?

Pankaja Munde LIVE :  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतिदिन, त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातून त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल झालेत. यावेळी पंकजा मुंडे काय घोषणा करणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय

Gopinath Munde Birth Anniversary : गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतीदिनी गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे Live

Gopinath Munde Birth Anniversary : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतिदिन, त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातून त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल झालेत. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांना समाधीस्थळावर दर्शन घेताना अश्रू अनावर झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावरील समाधीस्थळावर गोपीनाथ मुंडे यांच्या काही दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आलं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जो संघर्ष केला त्याच संघर्षाची साक्ष देणारे फोटो या ठिकाणी लावण्यात आले आहेत गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हे फोटो पाहून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची आठवण होत आहे.

पार्श्वभूमी

Gopinath Munde Birth Anniversary : भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असून या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडेही गोपीनाथ गडावर दर्शनासाठी हजर झाले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.