Maharashtra Breaking News Live Updates : 'लायकीपेक्षा जास्त दिलं ही चूक', शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा; प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Sep 2022 06:25 PM
Pune News : नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा गोंधळ

Pune News : नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती आणि कालवा बचाव समितीसह विविध शेतकऱ्यांची आज बारामतीच्या जलसंपदा कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत जलसंपदा खात्याचे अधिकारी या संदर्भातील भूमिका मांडणार होते. तसेच शेतकऱ्यांच्या शंकांना उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या सूचनांचा परामर्श घेणार होते. प्रत्यक्षात अस्तरीकरण नको म्हणणाऱ्यांबरोबरच अस्तरीकरण हवे असे म्हणणारेही शेतकरी आल्याने शेतकऱ्यांमध्येच दोन गट पडले. सुरुवातीस कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी निरा डावा कालवा अस्तरीकरणासंदर्भात शासनाची म्हणजे जलसंपदा खात्याची भूमिका मांडली. त्यानंतर काही वेळातच या गोंधळाला सुरुवात झाली. एकाच बैठकीत दोन परस्परविरोधी विचारांचे शेतकऱ्यांचेच गट आल्याने पाहता पाहता गोंधळ वाढला आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. परंतु, पोलिसांनी वेळीच येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

 भारतीय तटरक्षक दलाचं मोठं बचाव कार्य,  रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रात 19 जीव वाचवले

आज एका जलद बचाव ऑपरेशनमध्ये, भारतीय तटरक्षक दलाने 18 भारतीय आणि 01 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर जहाजातून यशस्वीरित्या वाचवले.  रत्नागिरी किनार्‍यापासून सुमारे 41 मैल पश्चिमेला सकाळी 9 वाजून 23 मिनिटाला जहाज बुडत असल्याची माहिती दिली. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. जहाजातून मदतीचा कॉल मिळाल्यानंतर काही मिनिटांतच एमआरसीसी मुंबई कृतीत उतरली. ICGS सुजीत आणि ICGS अपूर्व या परिसरात आणि परिसरात गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळवण्यात आली. 

वाशिम : सोयाबीनच्या दरात मोठी घसरण

यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन वाशिम बाजार समिती मध्ये विक्री करिता येत आहे मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात मोठी  घसरण झाल्याचे पाहायला मिळत असून मागच्या वर्षी सोयाबीनला साडेसात हजार रुपये दर मिळत होता यावर्षी सुरवातीला पाच हजार ते पाच हजार चारशे रुपया पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीपासूनच शेतकरी चांगले उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो मात्र निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात कसे तरी उत्पादन घेतो या उत्पादनाला चांगले दर मिळावे हि शेतकऱ्याची आशा असते मात्र या वर्षी सुरुवातीलाच सोयाबीन दर घसरलेले दिसत आहेत पुढे हे दर वाढतील का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

जळगाव : उन्मेष पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

शिंदे गट आणि भाजप युतीतील सरकारच्या काळात राज्याचे महत्त्वाचे प्रकल्प राज्याच्या हातातून जात आहे असल्याची टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर जळगावातील भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकाने इंटेरियल टेस्कटाईल पार्कची संधी घालवली..सेमी कंटक्टर पॉलिसी केली, नाही, नॅशन बायोफियल पॉलीस सुध्दा केली नाही, याद्वारे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार होते. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असतांना आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष करत कोणताही निर्णय घेतला नाही, हे राज्याचे दुर्देव्य आहे.  तुम्ही नेमकं करता तरी काय आदित्य जी असं म्हणत गुजरातचा हेवा करता, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने तुमच्या पोटात गोळा येतो का अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

नागपूर : आशिष देशमुख यांचा पक्षाला घरचा आहेर
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली असताना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी खळबळजनक मागणी करत आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होत असताना सर्व प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीतील सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करावी... आता नेमणुकीची पद्धत बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे... राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी लोकशाहीची प्रक्रिया पक्ष अवलंबतो... मात्र प्रदेशाध्यक्षाची निवड करताना ती प्रक्रिया का अवलंबली जात नाही असा सवाल त्यांनी विचारला आहे... 
अमरावती : वेदांत प्रकल्प गुजरातला पळवल्याने राष्ट्रवादीचं आंदोलन
वेदांत प्रकल्प गुजरातला पळवल्याने अमरावतीतही राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे, आज अमरावतीच्या पंचवटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमले होते. स्वतःसाठी खोके, महाराष्ट्रातील बेरोजगारांना धोके असे फलक राष्ट्रवादीने झळकावले. यावेळी शिंदे फडवणीस सरकार विरुद्ध घोषणाबाजी दिली. यावेळी बेरोजगारांची प्रतिकात्मक दहीहंडी फोडली...
जळगाव : 22 बैल मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात सुकी नदी पात्रात 22 बैल मृत अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या गुरानवर लप्पी आजारच सावट आहे,या आजाराच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यात अनेक गुरांचा मृत्यू होत असल्याच्या घटना घडत असताना चीनावल गाव परिसरात असलेल्या सुकी नदी पात्रात तब्बल बावीस बैलांचे मृतदेह आढळून आल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रत्यक्ष दर्शीच्या मते या बैलॉना कोणताही अजाराची लक्षणे दिसून आलेली नाहीत,मात्र गळ्याला फास लागल्याच्या खुणा असल्याचं सागितले जात असल्याने या बैलांचा मृत्यू कसा झाला त्यात एवढ्या मोठ्या संख्येने नदी पात्रात बैल कोणी टाकले असावे या बाबत आता तर्क वितर्क लावले जात आहेत.
नंदुरबार : जिल्ह्यात लम्पी रोगाचा शिरकाव, 8 जनावरांना लागण
नंदुरबार जिल्ह्यात लम्पी या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून आठ अहवाल पाठविले आहेत,  जिल्ह्यातील सहापैकी चार तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
पालघर : बोईसरमध्ये एकाच रात्रीत चार दुचाकींची चोरी

बोईसर पूर्वेकडील बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग या सोसायटीमध्ये रहिवाशांनी इमारतीखाली पार्किंग करून ठेवलेल्या चार दुचाकी मंगळवारी मध्यरात्री 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चोरल्या.दुचाकी चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून अनोळखी चोरांचा बोईसर पोलीस शोध घेत आहेत.

बीड : रेल्वे पटरीवर आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा परळी पोलोसानी वाचावला जीव

परळीमध्ये कौटुंबिक वादातून तणावात असलेल्या एका युवकाने रेल्वे स्टेशनवर जाऊन आत्महत्या करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केला आणि हा तरुण चक्क रेल्वे पटरीवरच आडवा झाला. व्हिडीओ व्हायरल होताच ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांमध्ये रेल्वे स्थानकामध्ये जाऊन या तरुणाला ताब्यात घेतल आहे. कैलास सोळंके असे या तरुणाच नाव असून कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी तो परळीच्या रेल्वे स्टेशनवर आला होता मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला असून, कैलास सोळंकेला आत्महत्याच प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पालघर : मेंढवन खिंड येथे कारचा अपघात, एक जण किरकोळ जखमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंड येथे कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक जण किरकोळ जखमी जाला आहे. कारच्या पुढील एअरबॅग निघाल्याने प्रवासी बचावले. मुंबईहून गुजरातकडे जाताना मेंढवन खिंड येथील चढण चढत असताना जोरदार पाऊस आल्याने कार चालकाचा ताबा सुटून ट्रकला पाठीमागे ठोकल्याने अपघात घडला. या  अपघातात कारमधील एक जण किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर सोमता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. तर कारच्या पुढील दोन्ही एअरबॅगमुळे प्रवासी बचावले.

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील 9 सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील 9 विविध योजनांच्या कामांसाठी 58  कोटी रुपये खर्चास दिलेली स्थगिती उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. आमदार प्रकाश आबिटकर यांचेसह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, सचिव (लाभक्षेत्र विकास) विलास राजपूत आदी उपस्थित होते.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Aaditya Thackeray Live : जीत के हारनेवाले को खोके सरकार कहते हैं : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Live : लायकीपेक्षा जास्त दिलं ही चूक : आदित्य ठाकरे

गद्दारीला क्रांती समजायला लागले : आदित्य ठाकरे

स्वत:साठी खोके, महाराष्ट्राला धोके, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Aaditya Thackeray in Ratnagiri Live | आदित्य ठाकरे यांचं विमान रत्नागिरीत दाखल

आदित्य ठाकरे यांचं विमान रत्नागिरीत दाखल झालं आहे. आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत.





रोजगार निर्मितीसाठी पतंजलीची मोहीम : बाबा रामदेव

पतंजलीच्या बदनामीसाठी षडयंत्र, बाबा रामदेव यांचा आरोप

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणून दहावीतील विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले, पुण्याच्या लोणावळ्यातील फिल्मी स्टाईल राडा कॅमेऱ्यात कैद

Pune News : व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला. पुण्याच्या लोणावळ्यात भररस्त्यावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीने हे विद्यार्थी एकमेकांमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालं. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेतलं नाही, म्हणून सुरुवातीला अगदी खालच्या पातळीची शिवीगाळ सुरु झाली. यातून वाद शिगेला पोहोचला अन् अक्षरशः हे तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरु झाली. बघता बघता परिसरातील वातावरण तणावपूर्ण होऊ लागलं, मग उपस्थितांनी दोन्ही गटाला बाजूला केलं. दोन्ही गटाला तिथून हुसकावण्यात आलं. प्रकरण लोणावळा पोलिसांपर्यंत पोहोचलं. दोन्ही गटातील विद्यार्थी अन् पालकांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. तेव्हा हे विद्यार्थी लोणावळा स्टेशन लगतच्या व्हीपीएस शाळेचे विद्यार्थी असल्याचं अन् व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन हा तमाशा झाल्याचं समोर आलं. दहावीत असणाऱ्या या विद्यार्थ्यांची पोलिसांनी शाळा घेतली अन् अभ्यासाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. शिवाय पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची सूचना देण्यात आल्या.

Uber Cyber Attack : उबर अ‍ॅपवर सायबर हल्ला, कंपनीचं सॉफ्टवेअर हॅक केल्याचा दावा

उबर (Uber) अ‍ॅपवर सायबर हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. उबर कंपनीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सायबर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

मुंबई-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गारवर धानिवरी इथे कंटेनर-ट्रकचा अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी
Palghar News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे कंटेनरचा अपघात झाला. रोडवर खड्डे असल्याने पुढच्या ट्रकने अचानक ब्रेक घेतला आणि मागचा कंटेनर ह्या ट्रकला मागून ठोकला त्यामुळे हा अपघात घडला असून सध्या येथे वाहतूक कोंडी पाहायला मिळते. सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला अजूनही जाग आली नसून ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते अजूनही बुजवले गेले नाहीत त्याचप्रमाणे जिथे ब्लॅक स्पॉट आहेत त्याचंही कोणतही नियोजन केले गेलेले नाही. त्यामुळे हे अपघात सातत्याने घडत आहेत.
पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे कंटेनरचा अपघात.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे कंटेनरचा अपघात झाला आहे. रोडवर खड्डे असल्याने पुढच्या ट्रकने अचानक ब्रेक घेतला आणि मागचा कंटेन,र ह्या ट्रकला मागून ठोकला त्यामुळे हा अपघात घडला असून सध्या येथे वाहतूक कोंडी पाहायला मिळते. सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला अजूनही जाग आली, नसून ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते अजूनही बुजवले गेले नाहीत त्याचप्रमाणे जिथे ब्लॅक स्पॉट आहेत त्याचंही कोणतही नियोजन केले गेलेले नाही त्यामुळे हे अपघात सातत्याने घडत आहेत.

Coronavirus : कोरोनाचा धोका कायम, देशात कोरोनाचे 6298 नवीन रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोना संसर्गात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 298 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्या आधीच्या दिवशी 6 हजार 422 कोरोना रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्येमध्ये 123 रुग्णांची घट झाली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजारांच्या पुढे पोहोचली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे प्राण गमावले आहेत.





Nashik Rain : गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, मंदिरे पाण्याखाली

Nashik Rain : गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून 9 हजार क्युसेकने (Water Discharged) गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू झाला आहे. याच विसर्गामुळे गोदावरीच्या (Godavari) पाणी पातळीत पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या मारुतीच्या छातीपर्यंत सध्या पाणी आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ठाणे : मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने

बुलढाणा : आज अंबादास दानवेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या निष्ठवंतांच शक्ती प्रदर्शन

आज बुलढाणा येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याला प्रमुख म्हणून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे संबोधित करणार आहे. गेल्या पंधरवड्यात बुलढाण्यात निष्ठावंत शिवसैनिकांच्या सत्कार सोहळ्यातील कार्यक्रमात झालेला राड्याच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान शिवसैनिकांचा हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून एक प्रकारे निष्ठावान शिवसैनिक बुलढाण्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे बुलढाणा शहरात आज पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून बुलढाण्याला पोलीस छावणीच स्वरूप असणार आहे. मात्र गेल्या वेळी राडा करणारे शिवसेनेचे बंडखोर आ.संजय गायकवाड यांनी यावेळी आपली तलवार म्यान केल्याचं दिसून येत आहे , यावेळी आ.संजय गायकवाडांनी म्हटलं आहे की त्यांना काहीही बोलू द्या आम्ही काहीही करणार नाही मात्र ते जे बोलतील त्याला तुमच्या (मीडियाच्या) माध्यमातून मी उत्तर देणार आहे, पोलिसांवर आधीच भरपूर ताण असून आम्ही पोलिसांवर ताण पडू देणार नाही. यामुळे मात्र आजचा शिवसेनेचा मेळावा कुठल्याही वादाशिवाय पार पडण्याची शक्यता आहे.

वाशिम : औरंगाबाद नागपूर महामार्गावर अपघात, ट्रकला गाडीची धडक, 2 जण जागीच ठार

औरंगाबाद नागपूर महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील काळामाथा गावाजवळ अपघात झाला आहे. पुण्याहून अमरावतीला येत असताना सकाळी साडेचारच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला इनोव्हा गाडीने धडक दिली. या अपघातात दोम जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाशिमच्या मालेगाव ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.

चंद्रपूर : चोरांनी मारला वाघाच्या पंजावरच डल्ला

सावली तालुक्यातील व्याहाड-खुर्द येथील वनविभागाच्या उपवनक्षेत्र कार्यालयातील घटना, 2011 च्या एका कारवाईमधील वाघाचा पंजा, मिशा, नखे आणि इतर मुद्देमाल जप्त करून कपाटात ठेवले होते. बुधवारी रात्री चोरांनी कपाटाचे कुलूप तोडून वाघाचा पंजा लंपास केला. सकाळी सफाई कामगार कार्यालयात गेल्यावर प्रकार लक्षात आला. वाघाचा पंजा चोरी गेल्याने वनविभागात खळबळ माजली आहे. सावली पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केलाय.

रायगड : रायगड एसटी विभागाला बाप्पा पावला, गणेशोत्सवाच्या काळात भारमानात राज्यात प्रथम

रायगड एसटी विभागाला बाप्पा पावला. गणेशोत्सवाच्या काळात भारमानात राज्यात प्रथम... रायगड विभागात तब्बल एक कोटी 18 लाख 9 हजार 507 नागरिकांनी प्रवास केला आहे.

सेन्सेक्समध्ये 370 अंकांनी घसरण तर निफ्टी 88 अंकांनी खाली

सेन्सेक्समध्ये 370 अंकांनी घसरण तर निफ्टी 88 अंकांनी खाली घसरला आहे. वित्त, आयटी, मेटलच्या क्षेत्रात कंपन्यांच्या समभागात घसरण, समभागांच्या विक्रीनं बाजारात घसरण झाली आहे. पुन्हा जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.

यवतमाळ : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यावर रान डूकराचा हल्ला, 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील लाख खिंड येथील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आश्रम शाळेतील विद्यार्थ्यावर शाळेजवळच रान डूकराने हल्ला केला. यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे विद्यार्थ्याने जीव गमावला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली.

बुलढाणा : शाळकरी मुलांची जीवघेणी कसरत, पालकांना मुलांना उचलून पार करावी लागते नदी

बुलढाणा जिल्ह्यातील अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पिंप्री माळेगाव गावाजवळ असलेल्या नदीवर पूल नसल्याने शाळकरी विध्यार्थ्याना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे तर काही विध्यार्थ्याना आपले पालक उचलून नदी पार करून देतात यामुळे मात्र विध्यार्थ्याना जीवाची परवा न करता पावसाळ्यातील चार महिने नदी पार करत शाळेत जावं लागत आहे. या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा केली आहे. मात्र अतिशय दुर्गम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

बुलढाणा : धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरूणांचे हात कापले गेले

बुलढाणा : धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरूणांचे हात कापल्या गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा : कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडणार

कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडणार


कोयणेचे दरवाजे तीन फुटांवरून साडेचार फुटांवर नेहणार


कोयना धरणातून सोडले जाणार 42 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग


10 वाजता उचलणार धरण दरवाजे


कोयना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


कोयना महाबळेश्वर परिसरात पाऊसाचा जोर कायम असल्याने निर्णय

मुंबईत रिमझिम पाऊस सुरू, काही भागात ढगाळ वातावरण

सध्या मुंबईत रिमझिम पाऊस सुरू आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. पाऊस कमी असल्याने सखल भागात अद्याप कुठेही पाणी साचलं नाही. तिन्ही मार्गावरच्या रेल्वे  सुरळीत सुरू आहेत. रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालेला नाही.

औरंगाबाद : डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री,  भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे उपस्थित रहाणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

उत्तर प्रदेश : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि हत्या; प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर (Lakhimpur) येथे दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी पीडित मुलींच्या कुटुंबियांनी 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याचे आदेश दिले असून दोषींना एका महिन्यात शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.


 

नांदेड : दोन खुनाच्या घटनेनं नांदेड हादरलं
किनवट तालुक्यातील बोधडी येथे क्षुल्लक कारणावरून दुहेरी हत्याकांड करण्यात आलंय. 'खून का बदला खून'... नाभिकाने एकाचा खून केला. तर मयताच्या नातेवाईकांनी केला नाभीकाचा खून केला. पैश्याच्या कारणावरून हत्या झाल्याचं समोर आलंय. तर त्यानंतर सदर नाभिकाच्या घरासह त्याच्या आसपासच्या 2-3 घरांना आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे.

 
Maharashtra Rain Update : आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता  हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


शरद पवार यांच्या हस्ते मल्टिस्टेट पतसंस्थेचे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे येणार आहेत. सकाळी 10.30 वाजता एका मल्टिस्टेट पतसंस्थेचे उद्घाटन पवारांच्या उपस्थित होणार आहे. दुपारी 1 वाजता काष्टी येथील कोलाई देवी माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारत शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री,  भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे उपस्थित रहाणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी सहा वाजता होईल. 


‘जागतिक ओझोन दिना’निमित्त कार्यक्रम


‘जागतिक ओझोन दिना’निमित्त केंद्रीय आणि राज्याच्या पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित रहाणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. 


संजय राऊतांच्या जामीनावर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी दिलेली मुदत संपणार  
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या जामीनावर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे. 
 
आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता रत्नागिरीत असणार आहेत.


शासन आपल्यादारी अभियान 
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात शासन आपल्यादारी अभियान राबिवले जाणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता. इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बूथ आढावा बैठक होणार आहे.


कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज सर्वसाधारण सभा होणार आहे. हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाचे नेते या सभेला उपस्थित राहतील.


राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची पत्रकार परिषद
धडगाव तालुक्यातील दुर्देवी तरुणीच्या गावाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे भेट देऊन पत्रकार परिषद घेणार आहेत.
 
पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची पत्रकार परिषद
पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे, संध्याकाळी 6.30 वाजता.


बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 
पिक विम्याचे प्रलंबित प्रश्न आणि जिल्ह्यातील पीक नुकसानी मध्ये जिल्ह्याला डावलले गेलय असं म्हणत आज राष्ट्रवादी, शिवसेना इतर राजकीय पक्ष एकत्रित येऊन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. यामध्ये धनंजय मुंडे आणि प्रकाश साळुंके सामील होणार आहेत, दुपारी 2 वाजता.
 
शिवसैनिकांचा मेळावा 
बुलढाणा येथे आज निष्ठावांत शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे उपस्थित रहाणार आहेत, दुपारी 2 वाजता.
 
उसाच्या गळीत हंगामाबाबत बैठक 
राज्यातील उसाचा गळीत हंगाम कधी सुरू करायचा याबाबत आज सह्याद्री अतिथीगृहावर, दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एका महत्त्वाच्या बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 


पालघरमधील साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सुनावणी


पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2020 मध्ये झालेल्या या घटनेच्या तपासाला तत्कालीन महाराष्ट्र सरकारने सीबीआय तपासाला विरोध केला होता. पोलिसांनी तपासानंतर आरोपपत्र दाखल केल्याचे राज्य सरकारने म्हटले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी  शांघायमध्ये एक बैठकीला उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 


वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी
युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. या प्रकरणावर उत्तर दाखल करताना केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देणे कायद्याने शक्य नसल्याचे म्हटले आहे. या लोकांसाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे की ते त्यांच्या युक्रेनमधील महाविद्यालयातून संमती देऊन दुसऱ्या देशात पदवी पूर्ण करू शकतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तुंचे ऑक्शन 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तुंचे ऑक्शन होणार आहे. या संदर्भात सकाळी 9 वाजता मंत्री किशन रेड्डी पत्रकार परिषद  घेणार आहेत. 


योगगुरू बाबा रामदेव यांची पत्रकार परिषद
योगगुरू बाबा रामदेव आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते पतंजली समूहाच्या 5 कंपन्यांच्या आयपीओबाबत (IPO) तपशीलवार माहिती देतील. योगगुरू रामदेव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा आयपीओ लाँच करण्याची योजना आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.