Mahavitaran Strike : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (employees)  संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.


संपाच्या पार्श्वभूमीवर विविध परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर 24 तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल तसेच दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. 


महावितरणाच्या राज्यव्यापी संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांचा सहभाग 


महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. खासगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील 13 हजार कर्मचाऱ्यांचा संपात समावेश आहे. तर रायगडमध्ये 1 हजार 500 कर्मचारी संपात सहभागी.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक


महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


महावितरण बंदचा फटका पुण्यालगतच्या भागाला


महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम अनेक ठिकाणी दिसत आहे. पुण्यातील शिवणे, सनसिटी, वडगाव धायरी या परिसरात लाईट बंद आहे. वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने पहाटेपासून लाईट बंद असल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 



खासगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ परवणार नाही


4 5 आणि 6 जानेवारी 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी हा संप असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समितीनं सांगितलं आहे. हे तीन दिवस त्रासदायक होतील. पण आम्ही दिलगीर आहोत. उदा. BSNL बुडण्यापूर्वी GIO फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीड चा  डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात. उद्या मोबाईलच्या रिचार्जप्रमाणें विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे. ती उद्या खासगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार त्यासाठी हा संप असल्याचं महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समितीनं म्हटलं आहे.


वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका कोयना वीजनिर्मितीला 


वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका कोयना वीजनिर्मितीला बसला आहे. 36 मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद झाले आहेत.  संप असाच सुरू राहिला तर कोयनेचे इतरही वीज निर्मिती बंद होण्याच्या मार्गावर