Jalgaon News : तुम्ही कधी पाहिला नसेल असा गाईच्या डोहाळ जेवणाचा (Cow Baby Shower) शाही थाट जळगावमध्ये (Jalgaon) पाहायला मिळाला आहे. गाईच्या या शाही डोहाळ जेवणाला शेकडो महिलांनी हजेरी लावली होती, तर आलेल्या सर्व महिलांसाठी खास पंच पकवान पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती, तर गाईसाठी ही खास छप्पन भोगाचा प्रसाद या निमित्ताने ठेवण्यात आला होता.



पाळीव प्राण्यावरील प्रेम...
एखाद्या कुटुंबाचं एखाद्या पाळीव प्राण्यावर किती प्रेम असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. हिंदू धर्मात गाईला देव मानले जाते आणि गाईच्या कृपेमुळेच आपल्या घर परिवारात सुख शांती आणि समृद्धी असल्याची जळगाव शहरातील ज्ञानदेव नगर येथील नगरसेवक प्रवीण कोल्हे आणि परिवाराची भावना आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पासून हे कुटुंब राजकारणात आहे, या परिवाराची गाय दारात असली की घर मंगलमय राहते अशी त्यांच्या वाड-वडीलांपासूनची श्रद्धा असल्याने अनेक वर्षाच्या पासून त्यांच्या कडे गाईचे पालनपोषण केले जात आहे.



गाईचे घरातील महिला सदस्याप्रमाणे विधिवत डोहाळजेवण
कोल्हे परिवारात असलेल्या गाई या केवळ प्राणी नव्हे तर त्यांच्या परिवातील एखाद्या सदस्याप्रमाणे त्यांनी सांभाळलं आहे, त्यामुळे गाय गरोदर असताना तिचे ही घरातील महिला सदस्याप्रमाणे विधिवत डोहाळजेवण घालावे. त्यासाठी आपल्या नातलगांना आणि मित्र परिवाराला निमंत्रित करावे अशी कोल्हे परिवाराची इच्छा होती, म्हणूनच गाईचे डोहाळ जेवण कार्यक्रमाचे त्यांनी  आयोजन केले होते.



खास छप्पन भोग प्रसाद
या कार्यक्रमासाठी गाई साठी खास सजावट करून खास छप्पन भोग प्रसाद तिला देण्यात आला, यासोबत तिची खणा नारळाने ओटी भरून विधिवत पूजन करण्यात आले, तर उपस्थित महिलांसाठी ही खास पंच पकवान पदार्थ असलेल्या भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्यामुळे गाईच्या डोहाळ जेवणाच्या निमित्ताने कोल्हे परिवाराने केलेला शाही थाट मात्र संपूर्ण जळगाव शहरात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.


बारामतीतही असाच सोहळा, महिलांसाठी पैठणी साडी भेट


बारामती तालुक्यातील माळेगंवात धंगेकर कुटुंबानं खिल्लार गायीचे डोहाळे जेवण केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं हौसा नाव असलेल्या गायीला पैठणी परिधान करुन मिरवणूक काढण्यात आली होती. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना येवला पैठणी साडी भेट देण्यात आली होती. 


इतर बातम्या


Mahavitaran Strike : संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची नोटीस, मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा