Lok Sabha Elections 2024 Phase Five : लोकसभा निवडणुक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पाचव्या टप्प्यासाठी देशात 49 जागांवर मतदान (Voting) सुरू झालंय. तर महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) 13 जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्याने अनेक दिग्गज नेत्यांसह राज्यातील राजकीय पक्षाचा प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.


तर दुसरीकडे मतदारराजा सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. अशातच सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात अवघे 15.93 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वात जास्त मतदान हे दिंडोरी (Dindori Lok Sabha Constituency)आणि त्या खालोखाल पालघर (Palghar) मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे कल्याण लोकसभा मतदारसंघात झाल्याचे समोर आले आहे.


दिंडोरी, पालघरमध्ये मतदानाची आघाडी, कल्याणमध्ये मात्र सर्वात कमी 


राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज, 20 मे रोजी होत आहे. राज्यातील 13 मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी अवघे 15. 93 टक्के मतदान झाले आहे. विशेष म्हणजे दिंडोरी मतदारसंघानंतर पालघर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी उर्वरित मतदारसंघाच्या तुलनेत आघाडीवर आहे. पालघरच्या अनेक दुर्गम आणि ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तलासरी तालुक्यातील कवाडा येथील मतदान केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.


गेले काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील मतदार सकाळच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मतदान केंद्रावर पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनीही आपल्या कुटुंबासह मतदान केलं. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व स्थरातील यंत्रणा गेल्या महिन्याभरपासून कसोशिचे प्रयत्न करत आहे. अशातच आगामी काळात मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे. 


एकूण 13 लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी
    
धुळे- 17.35 टक्के
दिंडोरी- 19.50 टक्के
नाशिक - 16.3 0 टक्के
पालघर-   18.60 टक्के
भिवंडी-  14.79 टक्के
कल्याण  -11.46  टक्के
ठाणे -  14.86 टक्के
मुंबई उत्तर - 14.71 टक्के
मुंबई उत्तर - पश्चिम - 17.53  टक्के
मुंबई उत्तर - पूर्व - 17.01 टक्के
मुंबई उत्तर - मध्य - 15.73 टक्के
मुंबई दक्षिण - मध्य- 16.69 टक्के
मुंबई दक्षिण - 12.75  टक्के


इतर महत्वाच्या बातम्या