एक्स्प्लोर

Maharashtra CM Meeting : कोरोना परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांशी चर्चा, सहकार्याचं आवाहन

राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांना सहकार्य करण्याचंही आवाहन केलं आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांशी चर्चा केली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करण्यात आलं आहे. त्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोन करुन चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन संवाद साधला असल्याचीही माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे. 

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे की, "राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं."

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची चर्चा 

राज्यातील वाढती कोरोना परिस्थिती पाहता काल मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राज्यातील कोरोना स्थिती पाहता कडक निर्बंध लावावे लागतील याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार जे निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितलं आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
Horoscope Today 25 April 2024 : आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा
Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Varsha Gaikwad : धारावीत वर्षा गायकवाड, अनिल देसाईंचा एकत्र प्रचार; ठाकरे-काँग्रेसमधले वाद मिटलेSouth Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रहीDeepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूकAaditya Thackeray Vs Devendra Fadnavis : सत्तेसाठी विचार सोडणाऱ्यांनी बोलू नये : फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
Horoscope Today 25 April 2024 : आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा
Maharashtra News LIVE Updates : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार
Madha : माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
माढ्याचा गड राखण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी मैदानात, मोहिते पाटलांच्या होमग्राऊंडवर घेणार विराट सभा
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
VIDEO : अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार, राशिद लढला, पण गुजरात हरलं, स्टब्सची शानदार फिल्डिंग
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
DC vs GT, IPL 2024 : थरारक सामन्यात दिल्लीचा विजय, गुजरातचा चार धावांनी पराभव
Pushkar Shrotri : पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा
Embed widget